"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिप्लेसमेन्ट आमच्या पुरत मर्यादित आहे हो . ज्यांना आवडत नसेल तर त्यांना इग्नोर मारायचा ऑप्शन आहे की .काय तो कीस पाडायचा एखाद्या गोष्टीचा . लगेच रिप्लेसमेन्ट होणार आहे जस काय

जाई, देवदासमधे नाही का दिलिप कुमार नंतर शाहरुख खान देवदास झाला!!! हाच सिनेमा तुझा नातू रिमेक म्हणून पाहिन त्यात बाजीराव वेगळा असेल बघ.

बी , इट्स ओके . ती मिसोची गंमत होती फक्त . लेट्स स्टॉप हियर . बाकी ज्याची त्याची समज वगैरे

मस्तानी बरोबर एक स्त्री दाखवलीय. खूपदा वाटत राहिले हिला आधी कुठे पाहिलीय. मग लक्षात आले 'आभाळमाया' मधली चिंगी आहे. त्या अभिनेत्रीचे खरे नाव माहीत नाही.

'मोहे लाल रंग'... गाण्यात दीपिका ला पुन्हा कमरेखाली घागरा. Sad

काशीबाई ला समर्थ पेशवीण दाखवायची का अल्लड पोरगी ह्या घोळात सलीभ फसला बहुतेक . पण ते पात्र गंडले आहे इतके नक्की.

राऊ च्या आयुष्यात मस्तानी आली तेव्हा नानासाहेब वयाने किती वर्षाचे होते. ७-८?

ह्या किंवा अजून दुसर्या कुठल्यातरी धाग्यावर काशी नि मस्तानीला एकाच वेळी मुले हूओनही नानासहेब एक्दम मोठे आणि मस्तानी चा मुलगा २ वर्‍शाचा कसा अशी पोस्ट कुणीतरी टाकलेली पाहिली. सिनेमात ७-८ वर्षाचा एक मुलगा दाखवला आहे की बाजीरावांबरोबर.

काशी दुसर्‍या खेपेची आणि मस्तानी पहिल्या खेपेची अशा एका वेळी गरोदर होत्या बहुदा. राऊ मधे ही तसा उल्लेख वाचल्याचे स्मरते.

बैलांच्या शिंगाना पलिते लावून शत्रू ला उल्लू बनवण्याचे आयडीया श्रीमान योगी मध्ये शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर लाल महालातून पळून जाण्याच्या प्रसंगात वापरलेली वाचले होते.

बंगश च्या लढाईच्या सीन च्यावेळी दुरून मशाली येताना पाहून तिच आठवली आणि सिनेमातही अ‍ॅक्च्युली तेच दाखवले.

निंबुडा, छान माहिती.

हा सिनेमा बघून मला नानासाहेबांचा फार राग आला. त्यानी एक चुक करुन एक घर उद्धस्त केले असे वाटले. जर योग्य वेळी मस्तानी बाजीरांवाना भेटायला गेली असती तर कदाचित ते मानसिक दु:खातून बाहेर पडून चांगले झाले असते. किती निर्दयी दाखवलेत नानासाहेब सिनेमात!

तर मग बी, चिमाजीअप्पांचा ही राग आला असेल.

मूळात सिनेमा बहुतांशी राऊ कादंबरीवर बेतलाय. बरेच प्रसंग उचलले आहेत. सुरुवातीचे काशीची मैत्रीण भानु भेटायला येणे, नदीतून पार करून मस्तानी ल भेटायला जाणे (काशीने दिलेली नवग्रहांची अंगठी देऊन) इत्यादी.

अर्थात चित्रपटाच्या सुरुवातीला राऊ कादंबरीला श्रेय ही दिलेय. खरेखुरचे व्हीलन कोण होते कळायला मार्ग नाही.

सातरच्या छत्रपतींच्या आदेशानुसार नानासाहेब आणि चिमाजी वागले असा उल्लेख कादंबरी मध्ये आहे.

बाजीरावांच्या मातुश्रीबाईच्या ह्या संबंधांच्या विरोधातच होत्या. राजकारणाची खेळी तिकडूनही खेळली गेली आहे. थोडक्यात बा आणि म सोडून सगळेच व्हीलन आहेत Wink

मिसो चे पात्र इतिहासातले नक्की कोणते पात्र म्हणायचे?

त्या अभिनेत्रीचे खरे नाव माहीत नाही. >>> स्वरांगी मराठे
>>
करेक्ट. विसरायला झाले होते.

बादवे, चिमाजी अप्पा म्हणून सयाजी शिंदे सोडून अजून कुणाचा चेहराडोळ्यासंमोर आणायला नको वाटते.

चिअ प्रकृतीने तनु मनु होते ना. वैभव तत्ववादी फा लहान वाटतोय त्या मानाने. चिअ ही फार शूर होते.

इथेच एक विचारतो आनंदीबाईंनी ध चा मा केला. ह्याला धरुन आणा चे ह्याला मारुन आणा करताना खोडाखोड दिसली नाही का वाचणार्‍यांना Happy ते जुने पत्र आहे का अजून कुठे Happy

ओके जाई. असे खरे पात्र होते का पण?

आणि शनिवारवाडा खुद्द बाजीरावांनी बांधून घेतला ना. सिनेमात पुण्याच्या लोकांनी बाजीरावांच्या पराक्रमावरून त्यांच्या स्वागतासाठी शनिवार वाडा बांधला असा उल्लेख केलाय. भले लढाया आणि दौर्यांमुळे स्वतः राऊ शनिवारवाड्याच्या बांधकामा च्या वेळी पूर्ण वेळ उपस्थित नव्हते पण असा भव्य वाडा बांधून त्यात राहण्याची कल्पना त्यांचीच होती बहुदा.

सिनेमाच्या सुरुवातीचे निवेदन इरफान खान च्या आवाजत आहे का? मला तसे वाटले.
इथे कुणी त्याचा उल्लेख केलेला वाचला नाही.

छत्रसालाचा किल्ला दाखवलाय तो राजस्थानम्धला कुठलासा किल्ला आहे असे वाटते.

इरेझर/हरताळ पूड वापरली असेल हो Happy
आणि खाडाखोड असली तरी गारदी आज्ञा पालक असतील, त्यांना 'इथे खाडाखोड आहे..जरुर कुछ गडबड है दया' म्हणायचा हक्क नसेल.

मुग्धटली, मी आत्ता कागदावर तेच वाक्य लिहून पाहिले. शाईच्या पेनानी लिहिले की लगेच खाडाखोड नजरेस पडते. आनंदीबाईंचे ते पत्र असायला हवे. ती केस कोर्टात गेली होती.

हो सिनेमा बहुतांशी राऊ कादंबरीवर आधारित आहे. पण काही काही प्रसंग त्या कादंबरीतही नाहीयेत .
बाकी सिनेमा वेगवान आहे. त्यात संलीभ यशस्वी झालाय .
रणवीर ने छान काम केलेय . त्याचे मराठी उच्चार सहज वाटतात . काही काही प्रसंगात अवघडल्यासारखा वाटला ( हेमावैम )
पण ते दिग्दर्शकीय घोळ असावा .

दीपिकाच काम आवडलं नाही फारस . प्रियांका चोप्राची काशीबाई आवडली . राधाबाई झालेल्या तन्वी आझमीनेही मस्त काम केलेय . वैभव तत्ववादीचा चिमाजी अप्पाही आवडला. बाकी ते आईनेमहाल वगैरे बाबत सहमत . गजानना गाणं आवडलं. बाकीची गाणी अनावश्यक आणि विसरून जण्यायोगी आहेत ( पिंगा वगळता Wink ) मोहे रंग दे वर देवदास प्रभाव स्पष्ट दिसतो
एकंदरीत एकदा बघायला काही हरकत नाही पण पाटी कोरी ठेवूनच

मला एक गोष्ट कळली नाही की जर हा इतिहास शनिवार वाड्यातच झाला होता तर तोच वाडा शूटींगसाठी चांगला करुन त्यातच शुटींग का नाही केली? पैशाचे मोल झाले असते छान. तो परिसर भंसालीच्या नावाने प्रसिद्ध झाला असता. काय ही लोक श्या Sad

इथेच एक विचारतो आनंदीबाईंनी ध चा मा केला. ह्याला धरुन आणा चे ह्याला मारुन आणा करताना खोडाखोड दिसली नाही का वाचणार्‍यांना स्मित ते जुने पत्र आहे का अजून कुठे स्मित >>

बी, तु खरेच निरागस का आहेस बरे इतका?

तुला काय वाटते अशी खरीखुरची खाडाखोड केली असेल का?
'धरावे' अशा आदेशाचे पत्र लिहा असा निरोप असेल. आनंदीबाईंनी स्वता:च्या मनाने 'मारावे' असा आदेश लिहून रवाना केला असेल.

बी, त्या काळात नक्कीच मोडी किंवा फारसी लिपी वापरली जात असणार,
तुम्ही देवनागरीत लिहुन कसं समजणार Uhoh

जुने पत्र आहे का > आपणास दाखवण्याकरीता आनंदीबाईंनी फार फार जपून ठेवले आहे. सापडल्याबरोबर आणून देतो. Light 1

अंबाजीपंत नावाचं पात्र इतिहासात होते की नाही माहीत नाही. चित्रपटात क्रेडिट्स मध्ये राऊ कादंबरीच नाव आहे. आता त्या कादंबरीत ते पात्र आहे कि नाही हे ही आठवत नाही .

बी, त्या काळात नक्कीच मोडी किंवा फारसी लिपी वापरली जात असणार,>> अरे हो हा विचार केलाच नाही मी.. मी आपले देवनागरीमधे लिहून पाहिले Happy

निंबुडा, तुमच्याइतका इतिहास मी वाचला नाही. मी आजवर ध चा मा केला हे डोळ्यासमोर पत्र ठेवूनच विचार केला आहे.

संस्कृत भाषेची उजळणी वर आताच ही पोस्ट टाकली मी,

निंबुडा | 22 December, 2015 - 14:13

बाजीराव मस्तानी वर चर्चा चालू आहे तर ई टिवी वर अंगद म्हैसकरने बाजीरव साकारलेली सीरीयल आठवली.
तिचे शीर्षक गीत असे आहे

'शूरस्य वन्दे, वीरस्य वन्दे, जय हो'

इथे 'शूरस्य' हे रूप चुकीचे वाटते. मराठी मध्ये 'इथे जमलेल्या रसिकांचे वंदन करून आपण कारयक्रमाची सुरूवात करूया' असे चूकीचे मराठे बोलले जाते. त्याच प्रकारे 'शूरांचे/ वीरांचे वंदन' म्हणून 'शूरस्य वन्दे, वीरस्य वन्दे..' असे षष्ठीचे रूप वापरले की काय.

द्वितीया रूप हवे ना.?
शूरान वन्दे.... असे?

बाबौ,
चित्रपटाविषयी मत, राजकारण, धर्मकारण, साहित्य, मिसो पेज 3 गॉसिप, मोडी फारसी दस्तावेज, भाषाविचार आणि अधूनमधून सदाबहार "यशस्वी गुणवंतांनी" आस्थेने घातलेल्या काड्या!!

आता क्रीडा, गव्हावरील तांबेरा, गप्पी माशांची पैदास, आफ्रिकेतील वांशिक समस्या आणि भावी अमेरिकन निवडणुका हे विषय कव्हर झाले की येथील चर्चेला राष्ट्रीय संग्रहालयात मायक्रोफिच बनवून संग्रहित करायला हरकत नाही. Wink

Pages