नमस्कार , हा धागा सुचायच तात्कालिक कारण म्हणजे दिलवाले सिनेमा पाहू नका म्हणून येणारे वाटेल ते मेसेज .
अगदी तो देशद्रोही पासून मुसलमान अन पाकडा आहे इथपर्यंत .
इथे मी सुरूवातीलाच नमूद करतो की मी शाहरूखचा फॅन आहे . त्याच सर्वात महत्वाच कारण म्हणजे "ही इज सेल्फ मेड मॅन" . त्याची स्ट्रगल अन त्यानंतर त्याने घेतलेली झेप तर कुठल्याही क्षेत्रातील माणसाने आदर्श घ्यावा अशी आहे .
दुसर या इंडस्ट्रीत राहून ही उगाच हिरोईनशी स्क्कॅंडलचा आधार न घेता फॅमिलीला महत्व देण .
त्याहूनही जास्त आवडतो मला त्याचा कभी हा , अंजाम , डर अन बाजीगर मधला अभिनय . राहुल अन राज कधी आवडलेच नाहीत मला 
पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यात काही दुर्गुण नाहीतच .
तो स्वतःला शहाणा समजतो , अॅरोगंट आहे वगैरे मी ऐकल आहे . अभिनयाबाबतही तो अगदी सर्वोत्तम आहे असही काही नाही , त्याच्या बर्याच मर्यादा आहेत .
याबद्द्ल टीका झाल्यास वाईट वाटायच काही कारण ही नाही .
पण समहाऊ बर्याच लोकाना त्याच्याबद्द्ल परकोटीचा राग का आहे ते मात्र समजत नाही .
आयपीएल मधे पाकिस्तानी खेळाडू घ्यायचा निर्णय त्याचा होता का ? इतर कोणीच आपल्या चित्रपटाच प्रमोशन पाकिस्तानी वाहिनीवर करत नाही का ? सगळेच सेलेब्रिटी सगळ्या आपत्तीवेळी जाऊन मद्त करतात का ?
हिंदुत्ववाद्याना सगळ्या खानात त्याचच वावड का ?
शाहरूख एक अभिनेता म्हणून न आवडण समजू शकतो , पण एक व्यक्ती म्हणून एवढा राग का ?
संयत शब्दात आपल मत मांडाव अन चर्चा हो द्यावी एवढीच अपे़क्षा . 
पुढचा सुपर्रस्टार थेट
पुढचा सुपर्रस्टार थेट शाहरूखच्या रुपात उगवला.>> हे कोणी ठरवलं?
>>>>
यात ठरवायचे काय?
जसे मोदी पंतप्रधान आहेत, लतादिदी गानसम्राज्ञी आहेत, सचिन क्रिकेटचा देव आहे, तसा शाहरूख सुपर्रस्टार आहे.. ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल
रशियातल्या एका प्रांतात सगळेच
रशियातल्या एका प्रांतात सगळेच जण शतायुषी आहेत. त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणाऱ्या टीमने सांगितले कि रोज दोन पेग व्होडका हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे.
त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास
त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणाऱ्या टीमने सांगितले कि रोज दोन पेग व्होडका हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे.
>>>
हे खरे असते तर जगभरातल्या लोकांनी आपल्या मुलांना दूधात बोर्नविटा टाकून न देता रोज दोन चमचे व्होडकाच पाजला असता.
तसा शाहरूख सुपर्रस्टार आहे..
तसा शाहरूख सुपर्रस्टार आहे.. ईट ईज अॅज दॅट अॅज सिंपल>> हिच तर गंमत आहे. अमिताभ जाऊद्या पण अमीरचे रोलतरी जमतील का याला..
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या
शाहरूखच्या या वयातील सळसळत्या उत्साहाचे रहस्य काय असावे हे एक सिक्रेटच राहणार..>> बोटॉक्स, फोटोग्राफी, स्पेशल एफ्फेक्ट्स, अॅक्शन रीटेक्स, ड्रग्स वगैरे हजारो सिक्रेट्स आहेत आणि बहुतेकांना माहित आहे. किती तो भाबडेपणा..
रशियातल्या एका प्रांतात सगळेच
रशियातल्या एका प्रांतात सगळेच जण शतायुषी आहेत. त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करणाऱ्या टीमने सांगितले कि रोज दोन पेग व्होडका हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे.
किती तो भाबडेपणा..>> भाबडेपणा
किती तो भाबडेपणा..>> भाबडेपणा नाही, बेरकीपणा म्हणतात याला. गरज नसताना कौतुक करत रहायचं आणि पब्लीक कसं तुटुन पडते ते बघत मजा घ्यायची.
मागे सचिनच्या धाग्यावरही हेच झालं होतं.
निवडणूक आली कि पूर्वी भाजपचे
निवडणूक आली कि पूर्वी भाजपचे लोक पवारांचे कौतुक करायचे. कॉंग्रेस वाले लगेच पवार आणि भाजपमधे छुपे संबंध आहेत असा आरोप करत. त्यामुळे पवारांच्या काही जागा हमखास पडायच्या.
ऋन्मेषपण शाखा / स्वजो / सई / अमेय वाघ यांचे _ंड फाटेस्तोवर कौतुक करतो. दोन चार माबोकर जरी विरोधात गेले तरी चालेल.
त्यामुळे पवारांच्या काही जागा
त्यामुळे पवारांच्या काही जागा हमखास पडायच्या.>>>>>
असे आहे होय.
ऋन्मेषपण शाखा / स्वजो / सई / अमेय वाघ यांचे _ंड फाटेस्तोवर कौतुक करतो. दोन चार माबोकर जरी विरोधात गेले तरी चालेल.>>>>> म्हणूनच आम्ही यांचे शिणुमे बघत नाही.
https://youtu.be/AtynHqfPpBg
https://youtu.be/AtynHqfPpBg
म्हणूनच आम्ही यांचे शिणुमे
म्हणूनच आम्ही यांचे शिणुमे बघत नाही.>>>
सेम याच्या शाखा प्रेमाची इतकी शिसारी आली आहे की पूर्वी थोडा जरी आवडत असेल आता तर तिडीक जाते त्या शाखाबद्दल
हाच जर हेतू असेल की शाखाबद्दल लोकांना तिडीक जावी, शिसारी यावी तर ऋ बाळ यशस्वी झाला आहे
अभिनंदन
ऋबाळ सर
ऋबाळ सर
हे
ऐकाबघाhttps://youtu.be/qan0Y9hXpPQ
बोटॉक्स, फोटोग्राफी, स्पेशल
बोटॉक्स, फोटोग्राफी, स्पेशल एफ्फेक्ट्स, अॅक्शन रीटेक्स, ड्रग्स वगैरे हजारो सिक्रेट्स आहेत आणि बहुतेकांना माहित आहे. किती तो भाबडेपणा..
Submitted by aashu29 on 21 December, 2021 - 14:27
>>>
काही आधार आहे का याला?
शाहरूख हे खरे खोटे करायला ईथे येणार नाही म्हणून काहीही आरोप
अमिताभ जाऊद्या पण अमीरचे
अमिताभ जाऊद्या पण अमीरचे रोलतरी जमतील का याला..
Submitted by वीरु on 21 December, 2021 - 14:26
>>>>
अमिताभ ते दिलीप, सगळ्यांचे रोल जमवलेत याने
पण या अमीर अमिताभ यांना शाहरूखचे रोल जमतील का?
ऋन्मेषपण शाखा / स्वजो / सई /
ऋन्मेषपण शाखा / स्वजो / सई / अमेय वाघ यांचे _ंड फाटेस्तोवर कौतुक करतो.
म्हणूनच आम्ही यांचे शिणुमे बघत नाही.
याच्या शाखा प्रेमाची इतकी शिसारी आली आहे की पूर्वी थोडा जरी आवडत असेल आता तर तिडीक जाते त्या शाखाबद्दल
>>>>>
ऋन्मेषला कोणते कलाकार आवडतात, ऋन्मेष कोणाचे कौतुक करतो... ते बघून तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडी ठरवता?
सिरीअसली???
अमिताभ ते दिलीप, सगळ्यांचे
अमिताभ ते दिलीप, सगळ्यांचे रोल जमवलेत याने
फारच गमत्या स्वभाव आहे बुवा तुमचा. किती हसवाल.
पण या अमीर अमिताभ यांना शाहरूखचे रोल जमतील का?>>
कोणीही कोणाचाही रोल करू शकतो.
कोणीही कोणाचाही रोल करू शकतो... जो आधी करतो त्याला आपण मान्यता देतो...
आनंद चित्रपट धर्मेंद्र किंवा किशोर याना मिळणार होता... त्यांनी केला असता आपल्याला तेच आवडले असते...
डर मधला शाहरुख चा रोल अमीर ला ऑफर होता.. त्याने नाकारला... केला असता आपण त्याचे कौतुक केले असते कि हा रोल अमीर शिवाय दुसऱ्या कोणाला जमणार नाही...
अर्शद वारसी याने जॉली llb केला म्हणून तो त्याचा रोल ठरला.. तोच दुसऱ्या एखद्या हिरोने केला असता तर???
च्रप्स +१२३४
च्रप्स +१२३४
जंजीर तर आधी राजकुमार,
जंजीर तर आधी राजकुमार, धर्मेंद्र वगैरेंना ऑफर झाला होता. पण इतिहास घडला. यांनी केला असता तरी बघीतलाच असता.
शाहरुख असेल ग्रेट, पण त्याला दिलीप, अमिताभच्या पंक्तीत बसवु नकोस. हे म्हणजे सुनील गावस्करला अजय जाडेजाने टक्कर देण्यासारखे झाले.
पुष्पाचा लीड रोल चॉकलेट स्टार
पुष्पाचा लीड रोल चॉकलेट स्टार महेशबाबूला ऑफर झाला होता तो नको म्हणाला मग स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन झळकला म्हणजे महेशबाबूला जमणार नाही असं थोडेच आहे.
शाहरुख असेल ग्रेट, पण त्याला
शाहरुख असेल ग्रेट, पण त्याला दिलीप, अमिताभच्या पंक्तीत बसवु नकोस. >> त्यांना आता नका थांबवु नका. बोलु द्या.
mruanali - एक ते तॉलीवूड च्या
mruanali - एक ते तॉलीवूड च्या हीरॉबद्धल धागा हवा.... हिरो आणि त्याचे टायटल... चॉकलेट स्टार, आयकॉन स्टार, एनर्जेटिक स्टार, स्टायलिश स्टार.... खतरू आहे हा प्रकार...
ओके, तसंही साऊथ हिरो आणि
ओके, तसंही साऊथ हिरो आणि सिनेमे आवडीचा विषय आहे
काढते लवकरच....
मुख्य विषय- आमिर खान आणि सलमान खानचे सिनेमे आवर्जून पाहावे वाटतात तसे शाहरुख खानचे वाटत नाहीत माबोवर यायच्या आधीपासूनच तो तितकासा काही आवडत नाही.राग बिग काही नाही पण आवडत पण नाही.
>>>>>>>>त्यांना आता नका
>>>>>>>>त्यांना आता नका थांबवु नका. बोलु द्या.

कोणीही कोणाचाही रोल करू शकतो.
कोणीही कोणाचाही रोल करू शकतो... जो आधी करतो त्याला आपण मान्यता देतो...
>>>>>
एक्झॅक्टली च्रप्स, एकदा चित्रपट बघून ते डोक्यात फिट्ट झाले की मग दुसर्याचा विचार करू शकत नाही.
आपण विचार करतो की मग या शैलीचा अमुकतमुक चित्रपट याने कसा केला असता.
पण तसे नसते, कारण हिरो बदलताच त्यानुसार चित्रपटाची शैलीही बदलते आणि त्या हिरोच्या स्ट्रेंथला साजेसा चित्रपट बनतो.
एक उदाहरण म्हणजे मुन्नाभाई चित्रपट सुद्धा शाहरूखला पहिला विचारले होते. त्याला डेट्स वगैरेमुळे नाही जमले. मग संजय दत्त आला. आज आपण विचार करू की यार तो रोल तर संजूचाच होता. शाहरूखला बिलकुल सुट झाला नसता. पण याचे उत्तर राजूनेच दिले आहे, तो म्हणाला की आधी चित्रपटात रोमांटीक अँगल तगडा होता, शाहरूख असताना फोकस त्यावर गेला असता, संजू आला आणि भाईगिरीची टपोरी स्टाईल खुलून आली.
करण जोहर यासाठीच स्पष्ट बोलायचा की मी चित्रपट लिहीतानाच शाहरूखला डोळ्यासमोर ठेऊनच लिहायचो.
शाहरूखचे कौतुक यासाठीच की त्याने ट्रॅजेडी किंग दिलीपकुमारचा देवदासही केला आणि अँग्री यंग मॅन म्हणून अक्षरशा राज्य केलेल्या अमिताभच्या डॉनलाही हात घातला. त्याच्या या हिंमतीलाच माझा सलाम! अन्यथा अमिताभने आपली संपुर्ण छाप टाकलेला कौन बनेगा करोडपती त्याच्या अनुपस्थितीत करेल असा एकही जीव या भूतलावर नव्हता.
शाहरुख असेल ग्रेट, पण त्याला
शाहरुख असेल ग्रेट, पण त्याला दिलीप, अमिताभच्या पंक्तीत बसवु नकोस. हे म्हणजे सुनील गावस्करला अजय जाडेजाने टक्कर देण्यासारखे झाले.
Submitted by रश्मी. on 21 December, 2021 - 18:33
>>>>>
तुमच्या या विधानावरून समजते की तुम्हाला दिलीपकुमार आणि अमिताभ फार आवडतात
मलाही ते ग्रेटच वाटतात, आणि ग्रेटच आहेत.
शाहरूखमध्ये बाकी जे आहे ते त्याला वेगळ्याच लेव्हलला नेते.
विचार करा,
दिलीपकुमारला आपले युसुफ खान हे मुस्लिम नाव बदलून हिंदू नाव घेऊन मार्केटमध्ये उतरावे लागले.
पण शाहरूख खानने आपलेच नाव वापरले आणि माय नेम ईज खान हेच एक मार्केटमधील ब्रांड नेम बनवले
हि त्याची महानता आहे, हा त्याचा ग्रेटनेस आहे !
विचार करा,
विचार करा,
दिलीपकुमारला आपले युसुफ खान हे मुस्लिम नाव बदलून हिंदू नाव घेऊन मार्केटमध्ये उतरावे लागले.>> सर, तब्येत बरी आहे तुमची?
>>हि त्याची महानता आहे, हा
>>हि त्याची महानता आहे, हा त्याचा ग्रेटनेस आहे !<<
ऋन्म्या, स्पोर्ट्समधे एक म्हण आहे - फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट. शाखाचं यश हे मर्यादित फॉर्मवर अवलंबुन होतंं. तेहि करण जोहर, चोप्रा कंपनीने केलेल्या मार्केटिंगमुळे. आणि तुझ्यासारखे येडे त्याच्यामागे धावत असल्यामुळे. कुठला रे तो टुकार सिनेमा मराठा मंदिरात केवळ प्रसिद्दिकरता खेचला? असो. तर त्याला फॉर्म म्हण, नशिब म्हण किंवा राजेंद्र कुमार म्हण. शाखा - ए सिनेमॅटिक हॅज-बीन नौ. पिरियड. राजेंद्र कुमारला तुझी पिढि ओळखत नाहि, शाखाला तुझ्या मुलांची पिढि ओळखणार नाहि. पण दिलिपसाब, बच्चन यांचा क्लास इज परमनंट, तो विसरला जात नाहि...
जाऊ दे ऋबाळ सर, तुमच्या
जाऊ दे ऋबाळ सर, तुमच्या बाजूने बोलतो.
दिलीप कुमार, कमल हसन, अमिताभ बच्चन, मनोज वाजपेयी, राज कपूर हे सगळे अद्रक आहेत.
टेंशन नै लेने का.
रूनमश सर आता उलटी यायला लागली
रूनमश सर आता उलटी यायला लागली बास करा
किती गरळ ओकाल, मान्य आहे तुम्हाला शाखा चा तिरस्कार आहे पण थोडा कंट्रोल करा की राव
Pages