मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉपरमाईन ताई चे वय 20 आठवडे 5 दिवस आहे.पण त्यांच्या मायबोली अभ्यासावरून तसे वाटत नाही.
मग त्यांचा आधिचा आयडी उडवला होता का ? का?

मायबोली प्रशासक ने उडवला होता तर प्रशासक वेळोवेळी कारवाई करत असते हे सिद्ध होतेच की.

मायबोलिवरचे वातावरण, लेखण आणि प्रतिक्रिया स्वच्छ ठेवणे इथे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

पत्रातील कंपूचा मुद्दा आवडला.

अजूनही इथे एकाच कंपूतील लोक वारंवार इथे लिहून आणि नॅचरली एकमेकांच्या मतांना अनुमोदन देऊन काय सिद्ध करत आहेत तर हेच की जे कॉपरमाईन ह्यांनी लिहिले ते. काहीही दोष आढळत नाही पत्रात. खूप छान पत्र लिहिले. अभिनंदन.

Why people are taking Maayboli so seriously? People should understand that there is a big world outside maayboli.

मायबोलीवर कोणत्याची चर्चा भरकटण्याचं कारण काही N आयडी, डुआयडी इ.इ. हे सगळ्यांना माहित असतानाही, आपण एकूणच 'आयडी' या अडथळ्यापाशी स्वतःला आणि चर्चेच्या विषयांना परत परत अडवून घेत आहोत मायबोलीवर असं नाही का वाटत आपल्याला?
आयडीच्या पलिकडे जाऊन चर्चेतल्या मूळ मुद्द्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, हे इथल्या बहुतेकांना पटत असूनही ह्या धाग्यावर देखील दुर्दैवानं बहुतांशी पोस्टी 'आयडी' ह्याच संकल्पनेभोवती घुटमळताहेत, किंबहुना अडकल्या आहेत.
isn't it high time की याच नाही तर इतर कोणत्याही डिस्कशन बीबी वर आपण आयडींविषयी न बोलता चर्चेतल्या मुद्यांविषयी बोलावं?

इथं जो मुद्दा मांडलाय त्यात जरी तथ्यांश असला तरीही... ज्यावेळी तुम्ही "मी अमक्या कंपनीकडून सर्वेक्षण करत होते" वगैरे लिहिता त्याक्षणी तुम्ही गोपनीयतेचा भंग करता. दुसरी गोष्ट: कंपनीनं तुम्हाल सर्वेक्षण करायला ठेवलं आहे. कळकळीची विनंती वगैरे करून प्रशासकांची उणीदुणी काढण्यासाठी नाही. त्यामुळे तुम्ही कितीही योग्य मुद्दे मांडलेत तरी जेव्हा खोटी माहिती देता तेव्हा तुमचा प्रीमाईस ऑलरेडी डगमगलेला असतो.

मी स्वतः आंतरजालीय सर्वेक्षण करणार्‍या कंपन्यांसाठी भाषांतरकाराचे काम करते (प्रश्नावली आणि उत्तरांचे भाषांतर) त्यामुळे या अशा सर्वेक्षणांमध्ये नक्की काय घडतं आणि काय अपेक्षित असतं याची मला संपूर्ण कल्पना आहे, परिणामी मी ठामपणे हे सांगतेय की वरच्या "जाहीर पत्रामधला" पहिला पॅरा हा मायबोलीकरांना "&^*" समजून "आपण लिहिणारे लई भारी" असे गृहितक ठसवण्यासाठी लिहिलेला आहे. माझ्यामते तरी नंतर कितीही सोनं उगाळलेलं असलं तरीही हा सुरूवातीचा खोटेपणा नजरेआड करता येत नाही. कंटेंट रायटर असल्यामुळे कुठे कुठे काय लपवाछपवी केली आहे ते स्पष्ट दिसतंय (अधिक माहितीसाठी: संपर्क साधा! इथं आमची ट्रेड सिक्रेट्स फोडणार नाही)

अगदी जेम्स बाँड असल्यागत "मी उचकवाय्ला प्रतोसाद दिले"वगैरे तर शुद्ध तुपातला निलाजरेपणा आहे. सर्वेक्षणं अशी होत नाहीत. ती पद्धत नाही.

सर्वेक्षणामध्ये तुम्ही एक तर कंटेंटला स्टॅटिस्टिक्समध्ये मोजू शकता (त्यासाठी काही फॉर्म्युले वगैरे असतात. उदा: अमुक वेळेत इतके प्रतिसाद, इतक्या व्हिजीट्स) पण त्यासाठी संकेतस्थळाच्या प्रशासनाकडून योग्य ती माहिती मिळवावी लागते, जे इथं अर्थात झालेलं नाही. दुसरा मुद्दा: कंटेंटचा अर्थ आणि त्यामधला सकारात्मक आणि नकारात्मक विचार. त्यासाठी आधी काय सकारात्मक आहे आणि काय नकारात्मक हे डीफाईन करावं लागतं वर अमितवने मांडलेला "उद्देश्/मोटीव्ह/हेतू" चा मुद्दा इथेच डीफाईन होतो. तो जोपर्यंत स्पष्ट केलेला नसेल तोपर्यंत सर्वेक्षणाच्या निष्कर्षांना काहीही अर्थ राहत नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाई इथे निष्कर्ष लिहत नाहीत. तर मायबोलीवर किती अंदाधुंदी माजली आहे यावर चर्वितचर्वण करत आहेत. का ब्वा? तुम्ही तीन संस्थळांचा अभ्यास करतात मग तिन्हीकडे असेच इमोशनल अपील केलेत का? मग केवळ मायबोलीबद्दलच का? मायबोलीवर राजकारण आणी त्यावरचे धागे हा एक भाग झाला, त्याहून अधिक वेगळं काहीतरी सकस आणि दर्जेदार लिखाण होतच आहे, तिथे तुमचे लक्ष का गेले नाही? आहारशास्त्र आणि चित्रपट-टेलीव्हीजन हे भाग अतिशय व्यवस्थित चालू आहेत. तिथे काहीही गदारोळ नाही, मग तिकडे तुमचे लक्ष का गेले नाही (यापैकी कुठल्याही बीबीवर मी या तथाकथित सर्वेक्षकांची "उचकवणारी" पोस्ट पाहिली नाही. असल्यास कृपया लक्षात आणून द्या) गुलमोहरमध्ये अनेक लेखक लिहत आहेत. भले प्रतिक्रिया कमी असतील पण वाचकसंख्या नक्कीच चांगली आहे (हे मी गुलमोहरमध्ये अनेक वर्षं लिखाणाच्या अनुभवावरून लिहत आहे) चांगल्या लेखनाला मायबोलीवर नावाजलं जातंच. त्या सर्वांचा ऊहापोह या लेखनात केलेला आहे का? का नाही केला? केवळ राजकारण इतकंच मायबोलीचं रूपडं असल्याची ज्या काय आयड्यांची कल्पना आहे त्यापैकी एक वरील आयडी आहे आणि सर्वत्र यशेच्छ गोंधळ घालून झाल्यावर आपला आयडी नष्ट होणार असलयची कल्पना आल्यानंतर "मैं तो अंडरकव्हर एजंट था" म्हणत बाजू सावरून घ्यायचा प्रयत्न चालू आहे हे स्पष्ट दिसत आहे.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या न्यायाने तळीराम श्रेष्ठ होता असं कन्क्युजन काढून थांब्यात.

Why people are taking Maayboli so seriously? People should understand that there is a big world outside maayboli.
>> इथे सिरीयसली चर्चा करणार्‍या लोकांना, किंवा इथली चर्चा सीरीयसली घेणार्‍या लोकांना - ' मायबोलीच्या बाहेर मोठं जग आहे याची कल्पना नाहीये' असं assumptiuon किंवा गैरसमज कृपया करून घेऊ नये.

वैष्णवी धारप ! खिक

माबोच्याच एका डु आय चा हा उद्योग आहे हे बारकाईनेच काय पण ढोबळपणे वाचतानाह्जी स्पष्ट दिसतेय. त्यासाठी लोकांनी एवढी शाई खर्च करावी हेच आश्चर्य !

मला रार व आरेम्डीचे मत पटले.

प्रत्येक (ओरिजिनल वा ड्युप्लिकेट(?) ) आयडिमागे एक जीवंत मानव अस्तो हे गृहितक मी कधीच विसरत नाही.
त्यामुळे कॉपरमाईन कोण, त्यांचा उद्देश काय, लिहिल्याप्रमाणेच आहे की वेगळा, तो कायदेशीर आहे का वगैरे बाबी तपासणे जे माझ्या अखत्यारीत/अधिकारात/कुवतीत असूच शकत नाही, मी करायला जात नाही.
कॉपरमाईनने जे मुद्दे मांडले आहेत ते वास्तव आहे, व ते वास्तव वाळवंटातील उंट वादळ आल्यावर वाळूत तोंड खुपसुन बसतो तशागत बसुन नाकारण्यात वा कॉपरमाईन आयडीच्या सत्यासत्यतेवरच गदारोळ उठवित मुळ मुद्यांवरुन स्वतःचे व इतरांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. सबब......

कॉपरमाईन ने मांडलेल्या बहुतांश मुद्यांशी मी सहमत.
माझ्या मते, मायबोलीची मूळ सुरुवात ही अत्यंत खाजगी गरजेतून, अतिशय लहान पातळीवर सुरुवात झाली होती, व बी रुजवुन एखादे रोप वाढवावे, तशागत इतकी वर्षे याचे संगोपन व वाढ माबोप्रशासनाने केली आहे व अनेक दीर्घकाल सदस्यत्व असलेल्यांनी मायबोली बहरावी/फुलावी, ते विरंगुळ्याचे, मदतीचे, आधारगटाचे असे साधन व्हावे म्हणुन प्रयत्न केले आहेत.
आजरोजी मात्र, दिसताना मायबोली ही एक "संस्थात्मक" रचना दिसते. अशा कैक संस्था असु शकतात, नेटवर, वास्तवीक जगात. अशा संस्थांचा एक विशिष्ट ढाचा असतो. तो ढाचा, तसा असू नये, किंबहुना तो ढाचा पूर्णपणे उन्मळून मोडून पडावा असे वाटणार्‍या विध्वंसक/विधुळ्या "ताकदी" देखिल अस्तित्वात असतातच. गेल्या दोनपाच वर्षात मायबोलीवर विविध सदस्यनामांच्या द्वारे सातत्याने हिंदु धर्मातील विशिष्ट जाती/समुहास टारगेट करीत विद्वेषाची पेरणि करणारे लेखन होणे हा माझ्या मते एका दूरगामी कटाचाच भाग असावा, व असे काही होणार हे मला तरी नवे नव्हते, त्याचे आश्चर्यही वाटले नाही. उलट मी तर म्हणेन की मायबोलीपर्यंत येऊन पोहोचायला या "मंडळींना" अंमळ उशीरच झाला आहे.... Proud
असो.
उडदामाजी काळेगोरे या न्यायाने हे असे असणारच.

आपण एकूणच 'आयडी' या अडथळ्यापाशी स्वतःला आणि चर्चेच्या विषयांना परत परत अडवून घेत आहोत<<< रार एकदम चपखल

माझ्या मते प्रत्तेक आय डी चे स्वतंत्र व्यक्तीमत्व असते तो त्याची मते मांडतो.

People should understand that there is a big world outside maayboli.<<< आपल्या घरात चार-पाच किंवा थोडे अधिक संख्येचे कुटुंब असते तरी पण आपण बाह्यजगता कडे दुर्लक्ष करून आपल्याच कुटुंबाची काळजी घेत असतो तेच नाते माझे मायबोलीशी आहे.

मायबोलीवर कोणत्याची चर्चा भरकटण्याचं कारण काही N आयडी, डुआयडी इ.इ. हे सगळ्यांना माहित असतानाही, आपण एकूणच 'आयडी' या अडथळ्यापाशी स्वतःला आणि चर्चेच्या विषयांना परत परत अडवून घेत आहोत मायबोलीवर असं नाही का वाटत आपल्याला?
आयडीच्या पलिकडे जाऊन चर्चेतल्या मूळ मुद्द्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, हे इथल्या बहुतेकांना पटत असूनही ह्या धाग्यावर देखील दुर्दैवानं बहुतांशी पोस्टी 'आयडी' ह्याच संकल्पनेभोवती घुटमळताहेत, किंबहुना अडकल्या आहेत.
isn't it high time की याच नाही तर इतर कोणत्याही डिस्कशन बीबी वर आपण आयडींविषयी न बोलता चर्चेतल्या मुद्यांविषयी बोलावं?>>

खूप छान रार.

सर्वेक्षण करता करता मायबोलीत, इथल्या सदस्यांच्या भावविश्वात(!) गुंतून गेल्याने भावुक होऊन कळकळीने लिहिलंय का पत्र? (की पत्रं Wink )

<मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. >
आपलेपणाने मदत करणार्‍यांकडून ऐकायला आवडेल. की त्यात गोपनीयतेचा भंग होईल?

हा एकच आयडी आहे असं जे कोणी मानत आहेत त्यांना दंडवत. सर्वेक्षण करणारी टीम असते, एकट्यादुकट्या व्यक्तीला आयडी काढून देत नाहीत आणि ती आयडी काय लिहिते आहे याचंही मॉनिटरिंग केलं जातंच. आयडी ओरिजिनल की डुप्लिकेट याच्याशी मला देणंघेणं नाही पण "अजेंडा" काय आहे तो मात्र अतिशय खोटारडा आणि निर्लज्ज आहे.

मयेकर. स्टोकहोम सिंड्रोम झालाय बहुतेक.

मागे एका बावडेकर कि तत्सम नावाच्या आयडीने प्रशासकांना उद्देशून पत्र लिहील्याचे धूसरसे आठवते. त्या आधी भास्कर या आयडीने पत्र लिहीले होते. भास्कर या आयडीने प्रत्येक धाग्याचे मालिकांप्रमाणे पुढील भाग काढले होते. या धाग्यात वेगळं काय होतं यावर प्रकाशझोत टाकणे कुणाला शक्य झाल्यास बरें. पण काहीच आयडींना ही उबळ का यावी ? उडवलेल्या प्रत्येक आयडीकडेही मुद्दे असतीलच ना. कुणाकुणाच्या मुद्यावर चर्चा व्हावी याचं एक धोरण ठरवलं गेलं तर बरें.
सतीश देवपूरकर या प्राध्यापकांना ज्या गुन्ह्यासाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तो ज्यांच्या आग्रहामुळे दाखाला गेला त्यांनी ते गुन्हे कधीच केलेले नसतील तर आणखीच बरें. अशी खात्री देता येईल कांय ?

( असे धागे काढण्यात निष्णात असणा-या एका आयडीचा अनुल्लेख झालाय असे वाटत असल्यास ते वाटणे चुकीचे नाहीय असं लगेच जाहीर करण्याचा इतक्यात कोणताही हेतू नाही).

मुळात हा लेख कॉपरमाईन यांनी लिहिला म्हणून बहुतांशी लोकांना यावर आक्षेप आहे. जर का हा लेख त्यांच्या ऐवजी दुसर्या कुणी लिहिला असता तर यावर आक्षेप घेतला गेला असता का?

ते जाऊ द्या, पण जे मुद्दे त्यांनी मांडलेत त्यांना कुणाचा आक्षेप नसावा.

एक वेळ अशी होती की मायबोली वर भेट दिल्यावर बर्याचशा नव्या कथा, एखाद्या कादंबरीचा भाग, एखादी नवी कविता किंवा गझल असे वाचनात यायचे. पण हल्ली सर्वांनी हे सोडून एकमेकांवर हल्ले आणी प्रतिहल्ले करायला सुरुवात केली आहे आणी त्यासाठी कट्ट्याचा आधार घेतला जात आहे.

कुणी भाजप समर्थक, कुणी काँग्रेस समर्थक तर कुणी आप ला पाठींबा देणारा.. आणी मग या सर्वांचा एकमेकावर चालणारा हल्ला आणी प्रतिहल्ला. मुळात सर्वांचा हा अट्टाहास का की मी अमुक पार्टीला समर्थन देतोय तर सर्वांनी तेच करायला हवे.. प्रत्येकाच्या मताचा आदर का केला जात नाही..मग एकमेकांची उणी दुनी काढली जातात.. काँग्रेस नी अमुक वर्षात का केले आणी भाजप आता काय करतेय?? अरे खरच जर इतकी काळजी आहे तर राजकारणात सहभागी व्हा आणी काहीतरी करा..

मागे कुणीतरी मायबोली वर लिहिले होते, की ही राजकारणी मंडळी मागचे सर्व विसरून एकमेकांच्या गळाभेट घेतील आणी सर्व काही पूर्ववत होईल. पण आपले काय? आपण तेव्हा जी एकमेकांवर धूळफेक केली आणी त्यामुळे जी तेढ निर्माण झाली ती सहजासहजी मिटेल?

आत्मपरीक्षणाची गरज आहे हे मात्र खरे..हे मात्र माझे मत

नंदिनी, तुझ्या सर्व्हेबाबतच्या अनुभव व ज्ञानाबद्दल पूर्णतः आदर बाळगुन तरीही असे लिहू पहातो की काय, त्याच त्या मेथड्स म्हणजेच सर्व्हे होय काय? त्याव्यतिरिक्त, मी एक अतिसामान्य माणुस म्हणुन माझ्या रोजच्या जगण्यात माझ्या अनुभवास येणार्‍या गोष्टि, माझ्या नजरेस पडलेल्या, ऐकण्यात आलेल्या गोष्टी यांची मेंदुतील काही केमिकल लोच्याद्वारे सांगड घालित काही एक नि:ष्कर्ष काढत नसतोच का? किंबहुना मी तर म्हणेन की प्रत्येक व्यक्तिच रोजच्या त्याच त्या रटाळ जगण्यातही सातत्याने आजुबाजुच्या परिस्थितीचा/वास्तवाचा "सर्व्हे" प्रत्यही करीतच असते. मी तरी करतो बोवा. व त्यावरुन कसा वर्तमानकालीन/भविष्यकालिन अंदाज कसा बांधला जाईल हे व्यक्तिव्यक्तिगणिक बदलत जाईल.
आज २०१५ मधे कॉपरमाईन ज्या बाबींवर लिहू पहात आहेत, त्या बाबींचे स्वप्न मला दहा ते बारा वर्षांपूर्वीच पडलेले होते. व हे असे होणारच, हे माहित होतेच, उलट उशीरच झालाय असे माझे मत. हे स्वप्न वा मत, हा माझ्या वैयक्तिक पातलीवरील "एका सर्व्हेचाच" नि:ष्कर्ष होता असे नाही म्हणता येणार?
अहो दिवाळी आलीये, साधा पंखा, इस्त्री, मोबाइल घ्यायचा विकत तरी आपण किती किती माहिती काढतो..... सर्व्हेच असतो ना तो?
पोरं लग्नाला आलि, मग बघा स्थळे, आईबाप करीत असलेला सर्व्हेच अस्तो ना तो? ...
अगदी सारसबागेत बाहेर गेलात तरी तिथल्या भेळपाणीपुरीच्या लायनीने असलेल्या गाड्या, विविध पदार्थ... एका नजरेत आपण त्या रांगेचे निरीक्षण करतो, खिशाचा अंदाज घेतो, त्यावेलची जीभेची खुमखुमी लक्षात घेतो, व कोणत्यातरी एका गाडीपाशी जाउन खातोपितो, ते बिना सर्व्हेचे???
का प्रत्येक वेळी "सर्व्हे" म्हनजे विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट आयुधे वापरीत, विशिष्ट "कोष्टकातच भरलेली माहिती" म्हणजेच सर्व्हे??? अहो ती टेबल्स, ती कोष्टके, ती सुत्रे आमच्या मेंदुत व नजरेसमोर तरळूच शकणार नाहीत व त्याकरता कॉम्प्युटर/वह्या/रजिस्टरे/दुसर्‍यांची मते वगैरेच हवीत असे कशाला?
असो.
तुमचा तुमच्या क्षेत्रातील दांडगा अनुभव व ज्ञान यांचा सर्वथा आदर करुनही वरिल पोस्ट मजसारखा एक सामान्य माणुस दैनंदिन जगण्यात सतत सर्व्हे कसा करु शकत असेल, करत असेल, या करता समर्पित. Happy
(उडी मारुन न जाता पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद Proud )

ते इथे आल्या आल्या त्यांना खाजगी ग्रूपात जाऊन सदस्यत्व घ्यायचं कळलंय.
कॉपरमाईन इथे आल्या दिवसापासून 'गुजरात' ग्रूपचे सदस्य आहेत.
त्यांच्या आगमनाची तारीखही आमच्याकडे नोटेड आहे बरं!
Happy

हा धागा आता वाचला. (प्रतिसाद नाही वाचले)
वाचताक्षणीच एक पोल स्फुरलाय.

कॉपरमाईन कोणाचे आयडी असेल?
पोलसाठी पर्याय जाणकारांनी द्यावेत. Happy

एकच पर्याय सगळ्यांना माहित्येय रे ऋन्मेष, पोल कसा होणार त्यावर?

भारतीय या आयडीने दलित हत्या या विषयावर कळकळीने तथ्य मांडू पाह्णा-या एका आयडीला देशद्रोही असे संबोधले होते. तसंच दलित हत्या हा कल्पनाविलास असून लेखक पाकिस्तानी एजंट आहे असं म्हटलेलं होतं. या लेखकाने प्रशासकांकडे तक्रार केली होती. प्रशासकांच्या उदारमतवादी धोरणाने भारतीय या आयडीवर कारवाई न होता तो पुढे अनेक वर्षे अबाधित राहीला. मायबोली प्रशासनाने तो धागा मर्यादीत केल्याने एका ख-या मुद्याला इथेही माध्यम उरले नाही म्हणून सदर लेखकाने मायबोली स्वतःहून सोडली आणि सायबर सेल गाठला. पण तेथील अधिका-यांनी आणि काही मित्रांनीही एखाद्याचं लाईफ कसं बरबाद होतं हे समजावून सांगितल्याने तो विचार रहीत झाला.

भारतीय आयडी कुणाचा याच्याशी काही घेणं देणं नाही. पण हे प्रकार आजच होत अस्ल्याचा साक्षात्कार झाल्याच्ञा थाटात त्यांचे वंशज गळे काढत असल्याने सहज माहीतीसाठी विनाप्रयोजन दिलेलं आहे.

एल्टी. जेकाय सारसबाग आणि लग्नाचे आईबाप वगैरे फाफटपसारा लिहिला आहेस त्याला प्रोफेशनल सर्वेक्षण म्हणत नाहीत. तुझे जे वैयक्तिक अनुभव आहेत आणि त्यानुसार तू जी मतं अनुमानं निष्कर्ष काढत जातोस त्याचा परीघ हा केवळ तुझे वैयक्तिक आयुष्य इतकाच राहू शकतो. तू त्याला जनरलायझेशन करू शकत नाहेस. जनरलायझेशन करायचे झाल्यास प्रोफेशनल सर्वेक्षणं केली जातात. त्यासाठी लार्ज डेटा आणि त्यावर केलेली गणितं फार महत्त्वाची असतात. मला लांब केस आवडतात हे तुझे वैयक्तिक अनुमान झाले पण त्यातून सर्वच "कोब्रांना" लांब केस आवडतात हा निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी काही हजार कोब्रांना हा प्रश्न विचारून त्याची टक्केवारी काढावी लागते. मग त्यातून "चाळीस टक्के कोब्रांना लांब केस आवडतात" वगैरे निष्कर्ष निघू शकतो. त्यासाठी प्रोफेशनल सर्वेक्षण करावेच लागते.

नंदिनी, तुझ्या सर्व्हेबाबतच्या अनुभव व ज्ञानाबद्दल पूर्णतः आदर बाळगुन तरीही असे लिहू पहातो की काय, त्याच त्या मेथड्स म्हणजेच सर्व्हे होय काय?>>> हो. याबद्दल एक अख्खा विषय मास मीडीयामध्ये शिकवला जातो. मीडीया प्लानिंगमध्ये स्पेशलायझेशन घेऊन एम बी ए अनेक युनिव्हर्सिटीज ऑफर करतात.

मलाही सुचलय काही......
कॉपरमाईन.... काही एक लिहायच्या मांडायच्या आधी, एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे....
कुंपणा अलिकडचे आपलेच अस्तात....
कुंपणापलिकडचे तर "ते दुसरेच" अस्तात... धोका असला तरी तो निश्चित कुणाकडुन ते माहित असते...
पण सगळ्यात जास्त धोका "कुंपणावर बसलेल्यांकडून" असतो, ते एकतर या बोटावरची थुंकी त्या बोटावर बदलल्याप्रमाणे आपली बाजु बदलतात, वारा येईल तशी पाठ फिरवतात, वा अतिआदर्शवादाचे धनि होऊन मूळ मुद्याकडे वा अंतिम उद्देशाकडे दुर्लक्ष करतात. असो.
मला कुंपणा अलिकडचे/पलिकडचे, वा कुंपणावरचेच अशांचा काहीच फरक पडत नाही... माझ्याकरता सब घोडे बारा टक्के.. Proud

सुनियाद सहमत.

मागे भास्कर नावाच्या आयडीने अनेक धागे काढ्लेहोते. धाग्याचा विषय काहीही असला तरी गांधीजी , गांधी घराणे यावर टीका या एकाअच हेतूने ते धागे प्रेरीत होते.

पगारेंचा धागा हा नथुरामाला हुतात्मा मानणे योग्य आहे का इतकाच होता , पण तो धागा मात्र ब्राह्मणविरोधासाठी काढला आहे अशी लबाड कोल्हेकुइ काही लोकानी चालू केली.

भास्करचे धागे चालवून घेणार्‍याना पगारेंच्या धाग्यात ब्राह्मणद्वेष दिसला हे किती मोठे आस्चर्य आहे.

कॉपरमाईन हा आयडी जेन्युइन नसेलही किंवा त्या आयडीचा हेतूही संशयास्पद असेल. पण त्या निमित्ताने गेले काही दिवस/महिने अनेकांना जाणवणारा, त्रास देणारा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि त्या चर्चेतून काही चांगलं घडवता येणार असेल तर या धाग्याचा वापर त्यासाठी करावा असं मला वाटतं. सर्वानुमते जेन्युइन असणार्‍या एखाद्या आयडीने धागा काढला जाण्याआधीच तो कॉपरमाईन यांनी काढला. पण तरीही त्यामुळे त्यातले सगळे मुद्दे invalid ठरत नाहीत.

नंदिनी, आय डू अ‍ॅग्री वुईथ यू.... तशा सर्व्हेचे महत्व मी कमी मानितच नाही. पण...... वर आरेम्डीने लिहिलय तशाच मताचा मी आहे.
पण वरील बहुतेक प्रतिसादात, "दुहेरी निष्ठा" अशा पद्धतीचा काहीसासा वाद जो १९७७ मधे जनता सरकारात सामिल जनसंघीयांचे आरेसेस बरोबरच्या संबंधाबाबत काढून तत्कालिन बुद्धिमंत/विचारवंतांनी जो गदारोळ माजविला होता, त्याची आठवण झाली. अति साधनशुचिता, व मुळात चुकीची ग्रुहित साधनशुचिता असे दोन प्रश्न त्यावेळी होते.
वरील चर्चेतही तसेच होताना दिसते आहे. व कॉपरमाईन ओरिजिनल की ड्युप्लिकेट, तिचा सर्व्हे बरोबर की चूक, वगैरे अनेक बाबींवर धुरळा उठविला जाताना दिसतोय, व दुर्दैवाने माबोवरील जुनेजाणते लोकही त्या धुरळ्यात एकतर मळताहेत वा आवडीने ती धुळवड खेळताहेत असे मला वाटते.
ड्युप्लिकेट आयडी काढून "झुंडीने" आल्यासारखे दाखवित इथे विशिष्ट हिंदुत्वद्वेष्ट्या व नवद्वेषमूलक ब्रिगेडी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी मायबोलीचा वापर होतोय, हा मूळ मुद्दा आहे असे माझे मत.
लक्षात घ्या की इथेच, मायबोलीवरच पूर्वीही आत्यंतिक विरोधी मतांच्या लोकांमधे चर्चा/वाद झडले आहेत. आठवा, चिन्हच्या निमित्ताने नग्नतेचा अभ्यासक्रमातिल सहभाग, एम.एफ.हुसेनवरील चर्चा.... पण कधी "अशा झुन्डी एकान्गी कॉन्गी/ब्रिगेडी विचारांच्या टोळधाडी अवतरल्या" नव्हत्या.... जशा त्या गेल्या दोन वर्षात साथीच्या रोगाप्रमाणे पसरुन मायबोलिवर हल्ला करित आहेत.
हे सत्य मांडू पाहिले, तर मांडणारा कोण आहे, आयडी कोणति, त्यामागे बुवा आहे की बाई, ... गरज काय हे शोधायची?

Lol

Even if admin removes Id, people come back with second/third id and continue mud slinging. So what is the solution?

Only solution is to ignore such threads and posts. Don't touch them. For example, had people ignored pagare's latest thread on nathuram , it wouldn't have reached the post count it reached. If people unite and decide to ignore such threads, only the handful of duplicate ids will be seen on these threads and they won't be such a big nuisance.
When you post on a serial offender's thread, you are lending credibility and recognition to that person who uses it to wreak further havoc. If you are sick of caste based attacks, don't touch those threads, don't add to the topic. When people bring caste, politics, gandhi, nathuram into even topics like cooking and movies, ignore those ids and their posts. If you have major issue with a post, report to admin but don't bother replying to that id. Is that id really worth your time and attention? Don't think so!

जनरलायझेशन करायचे झाल्यास प्रोफेशनल सर्वेक्षणं केली जातात.<< नंदिनी चा हा मुद्दा एकदम योग्य आहे. अश्या प्रकारे सर्व्हे करण्यासाठी परवानगी ची गरज असते. मी सुद्धा आत्ताच एका गावाच्या सर्व्हे मधे काम करुन आलो आहे. सर्व्हे करण्यापुर्वी ग्रामपंचायती ची लेखी परवानगी, तसेच त्या भागाच्या संबंधीत सरकारी विभागा कडुनही परवानगी घेतली होती. आणि ज्या कारणासाठी सर्व्हे घेतला होता त्या बद्दलही मी वैयक्तीक लेखन करू शकत नाही जो पर्यंत तो रिपोर्ट पुर्ण तयार होत नाही तो पर्यंत तरी.

सीएन्डब्ल्यु, तुमचे मताशी बराचसा सहमत... इग्नोर करणे हे काही काळ उपयोगी ठरु शकेलही.
पण कसे आहे ना? हल्ली घरात बरेच डास घुसुन चावत रहातात, मच्छरदाणी/उदबत्ती वगैरे लावुन किती काळ इग्नोर करणार त्यांना? शेवटी हल्ली त्यांची उत्पत्ती स्थानेच नष्ट करण्याचा उपाय सांगितला जातो, इलेक्ट्रिक रॅकेटने मारले जाते, विशिष्ट कंपनीची धुरांची कांडी/कागद पेटवले असता डास नुसते पळून जात नाहीत तर मरुन पडतात असे दाखविले जाते.... जे डासांकरता, तेच तत्सम चावे घेणार्‍या आयड्ञांकरता करणे भागच आहे, फार काळ इग्नोर करित रहाणे परवडणारे नाही. कारण अजुन पन्नास वर्षांनी तेव्हांचे गुगल वा अजुन काही सर्चरिझल्टमधे या हिणकस ब्रिगेडी/कम्युनिस्ट आयडींचे लिखाण "इतिहास" म्हणून दाखवेल.... व या लिखाणाचे दाखले देऊन तेव्हांचे ब्रिगेडी (शिल्लक अस्लयास) अजुनच....... अहो रक्तबीजासारखे आहेत हो हे.. नुस्त्या इग्नोरास्त्राने संपणार नाहीत. Proud हे आपले माझे मत बरका, गंभिरपणे घ्याच असे नाही.

Pages