मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यासाठीच तांबेद्वयीबद्दल लिहीलं होतं. मुद्दाम वेळ काढून वाचावं..>>>>

सुनियाद, 'पुतना मावशी' कथासंग्रह त्यांनी लिहिला आहे तेच का? खूपच वेगळ्या विषयावरच्या कथा होत्या, मला आवडल्या.

कोण बोललं आणि काय..............................'कोण बोललं' ह्यावर मत ठरवणे हे सोयीचे पडते. स्मित

+१००. सोपे ना ते!

रॉहू, आज पोटर्‍या बघवत नाहीत, म्हणून फुल पँट, उद्या चेहेरा बघवत नाही म्हणाल तर काय बुरखे पांघरून वावरायचे का?

जे दिसते ते नाही आवडले तर दुसरीकडे बघावे. खरे तर, ज्याच्याकडे बघावेसे वाटते त्याचा/तिचा फोटो पाकीटात ठेवावा. म्हणजे मग बघवत नाही असे दिसले की तो फोटो बघायचा.

कुठे भांडणं होतात हे शोधत होतो खालील ग्रुप्स गेली १० पानं बघायचा प्रयत्न केला. १० पानं ग्रुप प्रमाणे ६ महिने ते १ वर्ष किंवा अधिकचा कालावधी आहे. काही राहिलं असेल काही तर सांगा बदलेन.
वाचू आनंदे - नाही.
गुलमोहर कथा/ कादंबरी - नाही
गुलमोहर लेख - (खुले पत्रवर प्रयत्न पण रिझनेबल चर्चा अजूनही चालू आहे, आणि काहीही सापडलं नाही)
गुलमोहर कविता - १० पानात काही सापडलं नाही, पण मस्के यांच्या कवितेवर चर्चा आठवते, त्याचीही पातळी ठीक होती असं आठवतं, सापडली कोणाला तर बदलेन.
गुलमोहर गझल - अगेन १० पानात काहीही सापडलं नाही. देवपूरकर यांच्या पानांवर जोरदार चर्चा आठवते. प्लीज करेक्ट.
गुलमोहर विनोदी लेखन - नाही
गुलमोहर बालसाहित्य - शोधलं नाही, पण नसेल याची खात्री.
गुलमोहर चित्रकला - नाही
गुलमोहर प्रकाशचित्रण - नाही
गुलमोहर विविधकला - नाही.
या ग्रुप्स मध्ये प्रतिसादात ३ अंकी प्रतिसाद अगदी हातावर मोजता येतील (ओके, १.५ माणसांच्या Wink ) इतक्याच लिंक्स ना होते. प्रत्येक जण प्रतिसाद देत नाही, नावडली तर प्रतिसाद देत नाही इ. आहेच. पण बरेच प्रतिसाद अगदी नगण्य वगैरे होते. तर हे धागे वर आणणे हेच महत्त्वाचं आहे. जे adminला कित्येकवेळा सांगूनही लास्ट प्रतिसाद धागा वर ही पॉलिसी बदलू शकलेली नाही. टेक्निकल कारणं असू शकतील.

आता हितगुज ग्रुप्स बघुया.
कोतबो - इथेही पातळी सोडून प्रतिसाद फार कमी दिसले. ऑनलाईन फोरम आहे सो, टिंगल टवाळी होणारच हा माझा क्रायटेरिया आहे, कोणाचा वेगळा असेल तर कदाचित उत्तर बदलू शकेल. पण फार नाही याचीही खात्री.
क्रिकेट - ३-४ बाफ मध्ये पोस्ट आठवतात. खूप मोठे धागे, आणि असतील तर सांगा.
चित्रपट - मला तरी सापडत नाहीये फार काही. ---- हेल्प प्लीज.
धार्मिक - येस आहेत.
प्रवासाचे अनुभव - नो
विरंगुळा, विज्ञान, संगणक - नाही.
आणि चालू घडामोडी - असंख्य
वाहते धागे - इथे असलं तरी फार काही फरक पडत नाही. चालायचंच.
तर चालू घडामोडी मध्ये जवळजवळ प्रत्येक धागा पेटण्याची शक्यता आहे. या चालू घडामोडी तितक्या 'चालू' न ठेवता मागे टाकता येतील का? काही ठोस हवं तर हेच करू शकतो. किंवा चालू घडामोडी सार्वजनिक करता येणार नाहीत असं काही. इथे कोणी स्वभाव बदलणे अशक्य आहे हे प्रेमीस आहे, जे practically खरं आहे. आणि चालू घडामोडी पेटल्या तरी मोस्टली admin नी त्यावर कारवाईही केलेली दिसते. हे बघितल्यावर परिस्थिती अजिबातच हाताबाहेर गेलेली वाटत नाहीये. फक्त पाहिल्या पानावरून गप्पांची पानं आणि चालू घडामोडी हटवा आणि काळजी मिटवा.

अमितव. अभिनंदन केव्हढे मोठे काम केलेत!
मी तेच म्हणत होतो - नुसते वाईट काय बघता? चांगले पण असणारच, नि तेहि जास्त.

आता राजकारण विषय घेतला तर त्यात भाग घेणार्‍यांची पातळी अगदीच खालची. त्यांना सभ्यपणा माहित नाही. अक्कलहि फारशी नाही - लागतच नाही राजकारणासाठी, खरे तर इतर काही जमले नाही तर राजकारणात घुसायचे.
आमच्या काळी नागपुरात जांबुवंतराव धोटे म्हणून एक आमचे समकालीन गृहस्थ होते. हा गडी कुठल्याहि परीक्षेत कॉपी केल्याशिवाय पास झाला नाही. गुंडगिरी हा प्रमुख धंदा. कुठल्याहि कॉलेजच्या निवडणुकीत कुणाला निवडून यायचे असेल, तर आधी धोट्याला गाठायचे. तेंव्हा सुपारी हा शब्द प्रचलित नव्हता पण याच्याकडे अनेक सुपार्‍या. त्याची भाषा म्हणजे विचारूच नका. पुढे हा गृहस्थ महाराष्ट्र विधानसभेत निवडून आला.

शपथविधी समारंभात मारा मारी करणार्‍या लोकांची माहिती असेलच, तेहि निवडून आलेले.

असे हे भारतातले राजकारण नि त्याबद्दल बोलणारे लोक! काय उगाच सोज्ज्वळपणाच्या गप्पा मारता, यांच्याशी!

जनावरांच्या झुंजीसारखे समजून बघायचे. मधून मधून गंमत म्हणून टोचायचे.

माझी मायबोली प्रशासकांना एक नम्र सूचना - हा धागा वाचू नका - यात काहीहि वाचण्या सारखे नाही. उगाच धुळवड चालू आहे. बघायला गेलात तर धूळ उडेल अंगावर. सांगितले आहे कुणी!

चीकू - तेच. त्यांची फेसबुकची वॉल मुद्दामून पहा शक्य असल्यास. वादाचे विषय कसे हाताळतात ते ही पहा.वादाच्या विषयाला हातच घालायचा नाही असं न करता वाद घालणा-याची समजून घालण्याचं त्यांचं तंत्र अजब आहे. पूर्वी अन्यायग्रस्त भावनेने आक्रस्ताळी लिखाण करणारेही आज त्यांच्या संपर्कात येऊन बदलले आहेत.

अमितव - कथा या प्रकारात वाद झालेले आहेत, अमूक एक कथा माझ्यावरच लिहीलेली आहे अशा समजातून प्रशासनाला उद्देशून त्याच बाफवर उग्र भाषेत पत्र लिहीण्याचे प्रकार झालेले आहेत. तुम्ही जे विषय वादग्रस्त म्हणून मांडले आहेत ते बरोबर आहेत. पण त्यावर हे असंच होणार. फेसबुक वर मात्र पूर्वी भांडणं होऊन आता मात्र या विषयाची दुसरी बाजू समजावून घेताना लोक दिसताहेत. पेड ट्रोल अर्थातच अपवाद आहेत. सध्या ते शांत असल्याने चर्चा होत असतात. शक्य झाल्यास सतीश वाघमारे, मयूर लंकेश्वर या लोकांच्या वॉल पहाव्यात.

चोप्य पस्ते मास्तर हा अत्यंत मोलाचा पुरस्कार दिल्याने इतका आनंद झालेला आहे की पुरस्कार परत करण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. आपल्याच वॉलवरचं लिखाण चोप्य पस्ते केल्याबद्दल हा पुरस्कार देणा-यांचे कसे नि किती आभार मानावेत ? मला तर जन्मभर या ऋणातच रहावेसे वाटते आहे.

रार यांच्या मुद्याबद्दल चर्चा पुढे चालू..

गेल्या १० पेजमध्ये दिसलं नाही, नजरचूक असू शकेल. कदाचित admin नी प्लेजरिझम म्हणून उडवलेल्या कथेविषयी म्हणत असाल तर ती सध्या नाही.

रार

पूर्व सोशल मीडीयावर खरे लिहीण्यापेक्षा बरे दिसेल असे लिहीण्याकडे लोकांचा कल होता. त्यातून इमेज बनते फक्त. या इमेजचं रक्षण करण्यात त्या लेखकाचीही घुसमट होते. हल्लीच्या पिढीने मात्र व्यक्त होण्यातल्या मानवी मर्यादा लक्षात घेतल्या आहेत. बरे दिसण्यापेक्षा खरे लिहीण्याकडे कल आहे. प्रत्यक्षात जसा मनुष्य स्विकारला जातो तसंच इथेही होताना दिसतं. हा हल्लीचा ट्रेण्ड आहे. यामुळे ग्रुपिझम वाढतो मात्र व्यवहारात त्याला इलाज नाही.

वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर लोक सन्मान देतात हे खरे आहे. पण वाल्याला देत नाहीत. अंगुलीमालला खुद्द त्याच्या घरच्यांनी नाकारले होते. त्यामुळे दरोडे घालणा-याला जग मान देईल असे नाही. वाल्या काय किं वा अंगुलीमाल काय यां ना अग्निदिव्यातून गेल्यानंतर जगाने स्विकारले आहे. त्या आधी नाही.

पत्रलेखिका बदलल्या आहेत असा घाईने निष्कर्ष काढू नये. त्यांचा पूर्वेतिहास पाहून लोकांनी झोडपलं आहे कारण कुनालाही न विचारता प्रशासकांना खुले पत्र लिहीण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का हा लोकांचा मुद्दा आहे. असं पत्र लिहीण्याचा अधिकार गेलेल्या प्रत्येक आयडीला नाही का या प्रश्नाला बगल दिल्याने मूळ मुद्दा बाजूला पडणार नाही.

तुमचे मुद्दे हे सर्वकालीन सत्य आहेत हे मागेच म्हटले आहे. ते कुठेही स्विकारले जाऊ शकतात. त्यासाठी आयडीला का झोडपता असा प्रश्न विचारणे गैर आहे.

अशा दोन तीन कथा आहेत.कौतुक शिरोडकर यांच्या एका कथेवरही असे प्रतिसाद होते. दुसरे एक लेखक अशा पत्रामुळे मायबोलीवर कथा वगैरे लिहीण्याचे बंद झाले.

>>त्यांचा पूर्वेतिहास पाहून लोकांनी झोडपलं आहे कारण कुनालाही न विचारता प्रशासकांना खुले पत्र लिहीण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का हा लोकांचा मुद्दा आहे>> अजिबातच नाही. लेखिकेने प्रशासकांना उद्देशून काय लिहावं/लिहू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे आणि मायबोलीवर त्याचं स्वातंत्र्यही आहे. जर त्यांनी म्हटलंय की मी ह्या संकेतस्थळाचा अभ्यास करण्याकरता इथे आले आहे, तर त्या अभ्यासाचे निष्कर्ष काय हा प्रश्न कुणाच्याही मनात येईलच. तोच प्रश्न त्यांना विचारलेला आहे.
जे आयडी इथून उडवले गेले ते का गेले हे त्या आयडींसकट सगळ्यांना माहित आहे. गेलेले आयडी दुसर्‍या नावाने परत येतात हेही इथे सगळ्यांना माहित आहे. आता ह्या लेखिकाबाईंनी अ‍ॅडमिनची विपु न गाठता बीबी गाठून तक्रार करायचा पायंडा पाडलेलाच आहे तर बाकी आयडींनीही त्यांचाच कित्ता गिरवावा. नाही का?

तेच .

गुलमोहर कथा/ कादंबरी - नाही

>>>>> अमितव, हे तितकसं खरं नाही. पण याकरता 'कुठे भांडणं होतात' या प्रश्नाऐवजी 'कोण भांडणं काढतं' असा प्रश्न बनवावा लागेल. Proud Wink

>> हल्ली घरात बरेच डास घुसुन चावत रहातात, मच्छरदाणी/उदबत्ती वगैरे लावुन किती काळ इग्नोर करणार त्यांना? शेवटी हल्ली त्यांची उत्पत्ती स्थानेच नष्ट करण्याचा उपाय सांगितला जातो, इलेक्ट्रिक रॅकेटने मारले जाते, विशिष्ट कंपनीची धुरांची कांडी/कागद पेटवले असता डास नुसते पळून जात नाहीत तर मरुन पडतात असे दाखविले जाते.... जे डासांकरता, तेच तत्सम चावे घेणार्‍या आयड्ञांकरता करणे भागच आहे, फार काळ इग्नोर करित रहाणे परवडणारे नाही. कारण अजुन पन्नास वर्षांनी तेव्हांचे गुगल वा अजुन काही सर्चरिझल्टमधे या हिणकस ब्रिगेडी/कम्युनिस्ट आयडींचे लिखाण "इतिहास" म्हणून दाखवेल.... व या लिखाणाचे दाखले देऊन तेव्हांचे ब्रिगेडी (शिल्लक अस्लयास) अजुनच....... अहो रक्तबीजासारखे आहेत हो हे.. नुस्त्या इग्नोरास्त्राने संपणार नाहीत

बापरे ही गर्भित धमकी आहे की दाभोळकर आणि कलबुरगी यांच्या हत्येचं निर्लज्ज समर्थन?

@ दीडमा...
>>>> ५. इथून तिथून ब्रिगेड अन शेंडी खेचून आणणारे लिंबूराम. <<<<<
प्रत्येक हिंदूने शेंडी राखली पाहिजेच अशी धर्मप्रथा आहे. तेव्हा ती दुसर्‍या कुणाची तरी खेचून आणणे वगैरे "क्षुद्र" प्रकार हिंदु करीत नाहीत. स्वतःची राखतात व स्वतःबरोबरच येतेच.

>>> इथुन तिथुन ब्रिगेड...... <<<< वरील टग्याच्या पोस्ट मधिल शेवटचे आगलावे वाक्य पहा, >>>> बापरे ही गर्भित धमकी आहे की दाभोळकर आणि कलबुरगी यांच्या हत्येचं निर्लज्ज समर्थन?<<<<<
ही अशी लोक अशा प्रकारे इथे मायबोलीवरील आयडींच्या इग्नोर करण्याच्या वा आयडी डिलिट करण्याच्या संदर्भात काडीचाही संबंध नसलेली दाभोळकर/कलबुर्गी हत्येची बाब इथे मधे घुसडवत मायबोलीकरांवर गंभिर आरोप करत वैचारिक दहशत पसरवु पहातात, तेव्हा ब्रिगेड आलेलीच असते, मला काही वेगळी आणायला लागत नाही.
असो.

वरील टग्या आणि लिंबूटिंबू यांच्या पोस्टचा धाग्याशी काहीही संबंध नाही. admin कृपया पोस्ट काढून टाकाव्या.
याच का आणि ही असतील, असं कुणाला म्हणायचं असेल तर त्यांनी त्या पोस्ट ही काढायला सांगाव्या.

दुसरोंके पाप घिनानेसे अपने पाप कम नही होते हैं जानी !
हे दोन्ही (किंवा जास्त) वैचारिक गटांना उद्देशून आहे.

मतभेद असले तरी ते सभ्य भाषेत मांडता आले पाहिजेत. पुन्हा उदाहरण मिर्ची यांचे.

>>> >>>>> अमितव, हे तितकसं खरं नाही. पण याकरता 'कुठे भांडणं होतात' या प्रश्नाऐवजी 'कोण भांडणं काढतं' असा प्रश्न बनवावा लागेल. <<<<
वरील मामी यांचे वाक्य वाचा.... अक्षरषः "हातच्या कंकणाला आरसा कशाला हवा" या म्हणी प्रमाणे, त्यांच्या पोस्ट नंतर लगेचच टग्या यांची पोस्ट आलेली आहे, त्यावरुन "आगलावी भडकावु पोस्ट/मजकुर टाकुन कोण भांडण" काढते हे कळण्यासाठी "आरशाची" गरज नसावीच, नै का? तुम्ही मात्र सबघोडेबाराटक्के दराने माझी बचावात्मक उत्तरादाखलच्या पोस्टलाही "इथे संबंध नसलेली" ठरवुन मोकळे झालात. ते होणारच होते. असो.
इग्नोरास्त्र महत्वाचे आहेच्च.

अमितव हा धागा अ‍ॅडमीन सोडुन एकमेकांची उणीदुणी काढणे, जुने स्कोर सेटल करणे याकरताच आहे. धाग्याच्या विषयाशी काही संबंद नसलेल्या पोस्टीच ८५% आहेत. त्यामुळे असे उडवायचे झाल्यास विणलेल्या चादरीचे फक्त धागे उरतील.

उदा:
१. जुने संदर्भ
२. जुन्या मेल्स
३. मोदी/गांधी
४. प्रतिस्पर्ध्याचे संदर्भ
५. स्क्रिनशॉट, टोळधाड, कंपुबाजी, जुने संदर्भ
६. उगाच उचकावण्याकरता टाकलेले फोटो, मधेच शिवाजी संभाजी गोडसे सावरकर गांधी गोडसे
७. संघाने घातलेले हाफपँट व बनियन
८. ब्राम्हणद्वेष, मुस्लीममद्वेष, मधेच आपपसातील जातीवरुन द्वेष, काँग्रेस वा भाजपाची उणीदुणी
९. एक्मेकांच्या व्यवसायावर, व्यंगावर, आजरपणावर वाट्टेल ते बोलणे
१०. ब्रिगेड, कलबुर्गी, भारत कसा वाईट

असे अनेक विषय हाताळायचा मोठा आखाडा जमला आहे. गंमत म्हणजे २५०+ पोष्टी झाल्या तरी ज्यांना पत्र लिहीले आहे त्या अ‍ॅडमीन किंवा अ‍ॅडमीन टीमला एकही वाक्य लिहावेसे वाटलेले नाहीये. जर अ‍ॅडमीनलाच काही वाटत नसेल तर तुम्हा आम्हासारख्यांनी कशाला गळे काढायचे. ज्या गोष्टीवर उपाय होणे शक्यच नाही ती उगाळत बसण्यात काय अर्थ आहे. जे पटते आवडते ते वाचावे. नसेल पटत तर नविन ठिकाणी जावे.

मामीच्या पोस्टचं पाहिलं वाक्य धरून आहे. आणि जोक करणे हे विषय सोडून मी मानत नाही. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लिहा. आणखी मुद्दे आहेत, पण इथे नको.
कापो, मी स्किप केल्या असतील हो पोस्टी. मसल मेमरी सहसा दगा देत नाही आणि ऑटोस्किप होतं सगळं. Proud
उगाळत बसण्यात अर्थ नाही हे खरेच. पण तुमचा आणि माझा आणि इतर अनेक जणांचा वेळ जात नाही, काय करणार. इथे नको त्या लोकांनी दंगा केला तर धागा वाहता होऊन सगळ्या पोस्टी ग्लोबल वॉर्मिंगला मिळणार, तरी कोणी थांबातंय का... सगळा वेड्याचा बाजार. शुभरात्री.

>>>>>>>>>>>>माझी मायबोली प्रशासकांना एक नम्र सूचना - हा धागा वाचू नका - यात काहीहि वाचण्या सारखे नाही. उगाच धुळवड चालू आहे. बघायला गेलात तर धूळ उडेल अंगावर. सांगितले आहे कुणी!>>>>>>>>:हाहा:

कान्देपोहे तुमची आताची ताजी ताजी पोस्ट लय भारी!

दोन्ही बाजुच्या लोकांना स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे आणि आपणच तेवढे कसे चांगले आणि दुसर्‍या गटाचे कसे वाईट हे दाखविणे चालू आहे.

त्यातही मो.सं.भा.हिं.ब्रा.द्वेषी लोक जास्तच आक्रस्ताळे आणि आक्रमक आहेत. आणि स्वतः तसे असुनच्या असुन वर आपण तसे नसुन दुसरेच आहेत हे दाखविण्याचा केवढा आटापिटा चालू आहे. आणि या गटाची खासियत अशी आहे की स्वतःची ओळख कधीच उघड होऊ द्यायची नाही आणि इतरांना शोधत फिरायचे. लपाछपीचा खेळच जणू.

मो.सं.भा.हिं.ब्रा. या बाजूने लिहिणार्‍या लोकांनी प्रतिवाद केलेला आहे बहुसंख्यवेळा, आणि तसा तो नाही केला तर अनेक वाचकांना ती दुसरी ब्रिगेडी प्रवृत्तीची बाजूच खरी वाटण्याचा धोका आहे. एकतर स्वतः प्रचंड बुलिन्ग, ट्रोलिन्ग सगळे करायचे आणि वर दुसर्‍याला ट्रोलिन्ग करतात म्हणायचे, मजाच आहे.

मी हे लिहिले आहे याचा अर्थ असा नाही की मला मो.सं.भा.हिं.ब्रा. बाजूची सर्वच मते मान्य आहेत. त्यामुळे मी फक्त एकाच बाजुचा आहे हा गोड गैरसमज तर कोणी अज्जिबात करून घेऊ नये. Happy

प्रशासकांनी कितीही प्रयत्न केले ह्या डुआयडींना हुसकावण्याचे तरीही ते परत येणारच.

ह्या डुआयडींची सवय त्या झुरळांसारखी असते, घरात एकाद्या कोपर्‍यात जरासी जरी घाण असेल तर ही झुरळ येणारच मग त्यांना हुसकावण्यासाठी कितीही वेळा पेस्ट कंट्रोल सारखे पर्याय वापरा, ही झुरळ घरात यायची काही थांबवायची नाहीत.

यावर उपाय एकच घरातील तो कोपरा स्वच्छ करणे आणि मायबोली सारख्या सुशिक्षित, सभ्य घरातील घाणेरडा कोपरा हा आहे, हा कोपरा स्वच्छ करायच्या ऐवजी उचलून बाहेर फेकून दिला तर सर्व समस्या सुटतील असे वाटते.

या गटाची खासियत अशी आहे की स्वतःची ओळख कधीच उघड होऊ द्यायची नाही आणि इतरांना शोधत फिरायचे.

........

अग्गोबै !

मागे एकदा जयंत फाट्क नावाच्या व्यक्तीने मला धमकी द्ले होती ... तुला सरळ करतो वगैरे.

माझा मोबाइल नंबर मी त्याला दिला होता. तर आजवर काही उत्तर आle नाही

माझा दुसर्‍याच्या विपुत दिलेला पत्ता कट्ट्यावर सार्वजनिक करुन दिवसभर मला धमक्या दिल्या जात होत्या.

Pages