मायबोली प्रशासकांना खुले पत्र

Submitted by कॉपरमाईन on 3 November, 2015 - 11:58

मान्यवर मायबोली प्रशासक,

सप्रेम नमस्कार,

गेल्या सुमारे चार-साडेचार महिन्यांपासून मी www.maayboli.com या संस्थळावर सदस्य आहे. मायबोलीचे सदस्यत्वं मी एका विशीष्ट हेतूने घेतले होते. वेगवेगळ्या भाषांतील संस्थळांवर विविध क्षेत्रातील लोकांचा असलेला वावर, त्यांची अभिव्यक्ती, संस्थळाच्या माध्यमातून जाणिवपूर्वक आणि अजाणतेपणी पसरवण्यात येत असलेले विचार आणि या सगळ्यात संस्थळाच्या अधिकारीवर्गाची भूमिका त्यांचा तौलानिक अभ्यास करण्याची कामगिरी माझ्या टीमवर सोपवण्यात आलेली आहे. टीममधील मराठी सदस्यांपैकी एक म्हणून माझ्यावर एकंदर ३ मराठी संस्थळांचा अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मायबोली हे त्यापैकीच एक संस्थळ.

एक मराठी संस्थळ आणि त्यावर असलेलं साहित्यं आणि माहिती म्हणून मायबोली इतर काही मराठी संस्थळांच्या तुलनेत निश्चितच उजवी आहे यात शंका नाही. अनेक वेगवेगळ्या विषयांवरील विपुल लेखन - कथा, कादंबर्‍या, चिंतनात्मक लेख, पाककृती, वैद्यकीय, गिर्यारोहण, आरोग्य, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन अशा विविध विषयांवरील प्रचंड माहिती मायबोलीवर आहे. अनेक वेगवेगळ्या विषयावरील कविता, मराठी गझला, विडंबनं यांचीही इथे रेलचेल आहे. अनेक सदस्यांचं सकस लेखन मायबोलीवर आहे. केवळ वाचनमात्रं असलेल्या सदस्यांनाही निखळ वाचनाचा आनंद देऊन जाईल असं भांडार इथे आहे. अनेक मराठी कार्यक्रमांवरचे आणि खासकरुन बथ्थड मालिकांवरचे धागे आणि चित्रपट परिक्षणं ही चार घटका करमणूकही आहे.

मायबोलीवरील माझा सदस्यत्व कालावधी केवळ साडेचार महिन्यांचा. मायबोली हे संस्थळ म्हणून सुमारे पंधरा वर्षांपेक्षा जास्त कार्यरत असल्याने आधी घडून गेलेल्या कित्येक घटनांची मला कल्पना असणं शक्यं नव्हतं. यासंदर्भात जाणून घेण्यासाठी मी अनेक मायबोली सदस्यांशी संपर्क साधला. काही अपवाद वगळता बहुतेकांनी अतिशय आपलेपणाने मदत केली. वसुधैव कुटुंबकम् या उक्तीला जागणारे अनेक मराठी सृजन जगभरात पसरलेले आहेत हे चित्रं खूप आश्वासक आहे.

वरवर पाहता हे चित्रं खूप सुंदर आहे, परंतु....

ग्रूपिझम अर्थात कंपूबाजी हा न टाळता येण्याजोगा आजार मायबोलीला आहेच!

एखाद्या विशिष्ट प्रदेशातील, किंवा शहरातील लोकांचा ग्रूप असणं हे अनपेक्षित नाही, उलट परदेशांत असल्यास अशा ग्रूप्सच्या माध्यमातून आपल्या आसपास असलेले आपल्या मायभूमीतले लोक भेटणं हा अशा ग्रूप्सचा मोठा फायदा असतो. एखाद्या नवीन प्रदेशात आपण जात असल्यास तिथे आधीपासूनच राहत असलेल्या लोकांची ओळख असणं, त्यांच्याकडून माहिती मिळणं हा मोठा आधार असतो. विशेषतः तिथे राहण्याचा कालावधी लांबचा असल्यास ही माहिती फार महत्वाची ठरू शकते. दुर्दैवाने मायबोलीवरच्या ज्या दोन-तीन ग्रूप्समध्ये या माहितीची चौकशी केल्यावर एकच उत्तर मिळालं - गूगल करा! गूगल कोणालाही करता येईल, गूगलवर माहितीही मिळेल, परंतु वर्षानुवर्षे तिथे राहत असलेल्यांचे अनुभव गूगलपेक्षा मोलाचे असणार नाहीत का?

ग्रूपिझमचा दुसरा उबग आणणारा प्रकार म्हणजे अर्थातच राजकारण!

मायबोलीवरील अनेक सदस्यांचं चरण्याचं राखीव कुरण म्हणजे राजकारणाला वाहिलेले धागे, अड्डे, कट्टे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देशातील काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांना तन-मनाने अर्पण असलेले लोक जो काही धुमाकूळ घालतात ते पाहिल्यावर पुलं च्या पाळीव प्राणी या लेखातील - एकमेकांवर भुंकण्यात म्युन्सिपालटीचे सदस्य कुत्र्यांनाही हार जात नसल्याने कुत्र्यांना आपल्या मर्यादांची जाणिव असेल याबद्दल मला खात्री आहे या वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.

तुम्ही आमच्या पक्षाचे समर्थक नाही ना, मग चालते व्हा पाकिस्तानात ही भाजप समर्थकांची जनरल विचारसरणी काय, किंवा भाजपचे सरकार आल्यापासून सर्वस्व लुटलेल्या सिंध्याप्रमाणे उर बडवत फिरणार्‍या आणि शेंडा-बुडखा नसलेले आरोप करत सुटणार्‍या काँग्रेस समर्थकांची विचारसरणी काय, दोन्हीही सारख्याच नाहीत काय? महत्वाचं म्हणजे काँग्रेस किंवा भाजप यांचे समर्थक नसलेलेही इतर लोक अस्तित्वात असू शकतात आणि ते आम आदमी पार्टीछाप पक्षाच्या भजनी मंडळात नसू शकतात हेच मुळात राजकीय धाग्यांवरच्या महाभागांना मान्य नाही तिथे काय बोलणार? कोणतीही चर्चा मग ती राजकीय असो वा नसो कोणत्याही मुद्द्यावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप, मोदी विरुद्ध सोनिया किंवा राहुल गांधी, दीड वर्ष विरुद्ध ६५ वर्षांचा हिशोब यावर आणण्याची आवश्यकता आहे का? राजापेक्षा राजनिष्ठच जास्तं कडवे असतात आणि बाटगा हा सर्वात जास्तं धर्मनिष्ठ असतो या उक्तीचं वरचेवर प्रत्यंतर देणार्‍या या धाग्यांचा सामान्यं सदस्यांना किती उबग येत असेल याचा हे आक्रस्तळी सदस्य कधीतरी विचार करतात का? मुळात आत्मपरिक्षण नावाचा काही प्रकार असतो हे किती जणांच्या गावी आहे? दुर्दैवाने एकेकाळी चांगलं लेखन करणारे लोकही राजकारणाच्या या विकाराला बळी पडले आहेत. अभिव्यक्तीचा अभिनिवेश न राहता आवेश संचारला की काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणून राजकारणाच्या धाग्यांकडे बोट दाखवता येईल.

राजकीय धाग्यांचा दुसरा प्रकार म्हणजे अत्यंत साळसूदपणे नवनवीन जातीय वाद निर्माण करणे आणि त्याला चलाखीने ब्राम्ह्ण विरुद्ध अब्राम्हण, हिंदू विरुद्ध मुस्लिम, ३ टक्के विरुद्ध इतर, पिढ्यानपिढ्यांचे अत्याचार याचं वळन देऊन त्याबद्द्ल पद्धतशीरपणे बुद्धीभेद पसरवणे. यात तरबेज असलेले अनेक सिद्धहस्त सदस्य मायबोलीवर आहेत. जातीभेदाला विरोध करण्याच्या नावाखाली प्रत्येक प्रतिक्रियेत चलाखीने जातीयवाद पसरवण्याच्या त्यांच्या हातोटीपुढे अनेकांनी हात टेकले आहेत. त्यांच्याच जोडीला देशविघातक अतिरेकी तत्वज्ञानाचं समर्थन करणारे आणि एम आय एम सारख्या पक्षाचे छुपे आणि उघड समर्थकही इथे आहेत. मायबोलीच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणारे विचार आपण पसरवत आहोत हे यांच्या गावी तरी नाही, किंवा समजून-उमजून हे विचार पसरवणं सुरु आहे. सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलं तरी आमचा हेतू साध्य होतो आहे ना? मग बास!

मायबोलीवरील सर्वात उबग आणणारा आणि संतापजनक प्रकार जर कोणता असेल तर तो म्हणजे इथल्या सदस्यांवर करण्यात येणारे वैयक्तीक हल्ले. एखाद्या सदस्यावर आपल्या जुन्या विरोधकाचा डुप्लिकेट आयडी असल्याचा आरोप करणं हे तर अगदीच क्षुल्लक वाटावं अशी एकापेक्षा एक अश्लाघ्य वक्तंव्य इथे केली जातात. एकमेकांचे संस्कार जाहिररित्या काढले जातात, मनोरुग्ण, विकृत, भिकारचोट (नाईलाजाने लिहावं लागत आहे) असल्या शेलक्या विशेषणांची बरसात असतेच, परंतु सदस्याच्या वैयक्तीक, वैद्यकीय आणि कौटुंबिक परिस्थितीवरुनही अत्यंत अपमानास्पद शब्दांत संबोधनं दिली जातात जी केवळ तिरस्कारणीय आहेत. दोन दिवसांपूर्वीच पाहण्यात आलेला एक प्रकार म्हणजे एका अत्यंत गलिच्छा शिवीशी साधर्म्य दाखवणारं संबोधन पंतप्रधानांसाठी वापरणं आणि ते कसं योग्यं आहे याचं निरर्गल समर्थन करणं! समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीही माहित नसताना त्याच्याबद्दल काहिही बरळण्याची ही हिणकस मानसिकता कधी सुधारणार आहे का? आपण स्वतः गेंड्याच्या कातडीचे आहोत म्हणून समोरचाही तसाच असेल, आपल्या विकृतीमुळे त्याला त्रासच व्हावा ही इच्छा असल्यामुळे हे लोक सुधारण्यापलीकडे गेलेले आहेत हेच खरं!

या सगळ्या प्रकारात प्रशासक म्हणून आपण काही अंशी तरी अपयशी ठरलेले आहात असं खेदाने नमूद करावसं वाटतं. मायबोलीवर चाललेल्या तमाशांमुळे आज कित्येक जुने सदस्य एकही वाक्यं लिहीण्यास धजावत नाहीत. कारण कोण कसला अश्लाघ्य वैयक्तीक आरोप करेल याची काहिही शाश्वती नाही. असल्या प्रवृत्तींना वेळीच आवर घालण्यात आपल्याला फारसं यश येत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. प्रशासक मंडळातील काही सदस्यं हे वरकरणी आपण निष्पक्ष असल्याचा आव आणत असले तरी एका विशिष्ट कंपूच्या कारवायांकडे हे लोक डोळेझाक करतात हे लपून राहिलेलं नाही.

मायबोलीच्या एका जुन्या जाणत्य सदस्याशी झालेल्या चर्चेअंती त्यांनी व्यक्तं केलेलं मत मायबोलीच्या सद्यस्थितीबाबत भाष्यं करुन जातं. त्या म्हणाल्या, "आजकाल मायबोलीवर असतं काय? तेच ते राजकारणावरचे धागे, तीच कंपूबाजी आणि तमाशे! मायबोलीवर येण्याची आजकाल इच्छा होत नाही! लाज वाटते असल्या लोकांची आणि त्यांच्या विचारांची!"

अद्यापही वेळ गेलेली नाही असं निदान माझं वैयक्तीक मत आहे. प्रत्येकाने - अगदी प्रशासकांपासून सामान्य सदस्यांपर्यंत आत्मपरिक्षण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक बाबतीत आपलंच मत शेवटचं हा हेका सोडायला हवा! विघातक प्रवृत्ती सर्वत्र असतात, परंतु त्यांना प्रबळ होऊ द्यायचं का मायबोलीचं सकस साहित्य आणि माहितीचं भांडार म्हणून अस्तित्व टिकवून ठेवायचं हे शेवटी आपल्याच हाती आहे.

मायबोलीवरील अनेक धाग्यांवर असलेल्या माझ्या पोस्ट्स या त्यावर काय प्रतिक्रीया येतात हे आजमावण्यासाठी लिहीलेल्या होत्या. त्यामागे कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. तसाच तो या पत्रातही तो नाही. यापुढे कोणत्याही धाग्यावर माझी पोस्ट दिसणार नाही.

आपली नम्र
वैष्णवी धारप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रार +१

बरेच जण इथेही आपापली तीच धुणी धुवायला घेऊन आलेले आहेत तेव्हा चालू द्या!

आता ती प्यांट फुल होणार आहे. क्रांतीकारी निर्णय. नाहीतरी त्या वृद्ध पोटर्‍या पहावत नव्ह्त्या.

मत काय, धार काय, कशाचा कशाला नेम नाही. एक डिसग्रंटल्ड आयडी (आता मराठी शब्द सुचेना त्या करता) ज्याला काही मेंब्रांविषयी राग आहे, मायबोली विषयी राग आहे त्यानी स्वतः आपण अनबायस्ड आहोत असं भासवत मायबोली मेंब्रांचा अन मायबोलीचा लेखाजोखा लिहिला त्यात सबस्टन्स आहे हे गृहित धरुन आपण कसं काय त्यातल्या मुद्द्यांवरुन "सुधारणा" वगैरे हाती घ्यायच्या? काय संबंध? सग़ळाच आंधळा कारभार!

<<< ती पहिली ओपनिंग डिलिट केली तर खरं एका व्यक्तीची निरिक्षणं आणि त्यावर भाष्य असं स्वतंत्रपणे सुद्धा वाचलं तरी विचार करायला भाग पाडू शकतं हे पत्र.>>> बुवा हे वाक्य नक्की तुच लिहिलं आहेस का ? जस्ट चेकिंग !

रार, तुझी मुद्देवाली मोठी पोस्ट आत्ताच वाचली आणि सॉरी त्यातून नवीन ठोस असं काहीच हाती लागलं नाही. मायबोलीवर नियमित येणारी, वाहत्या किंवा बाकी बाफंवर लिहिणार्‍या मंडळींना हे सगळं माहितेय आणि बाकी तुमच्या आमच्यासारखी सूज्ञ मंडळी तेच करतात असं मला वाटतं. बाकी एका गेला की दहा नवीन येणार्‍या पाळीव डुआयड्यांकरता मॉडरेशन हा त्यातल्या त्यात सोपा उपाय आहे आणि अ‍ॅडमिन तो वापरतातही पण परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली आहे हे दिसतंच आहे.

रार, सीमंतिनी आणि मैदेवींच्या लेटेस्ट ( maitreyee | 4 November, 2015 - 22:40 नवीन ) पोस्टला +१ Happy

वैद्यबुवांच्या प्रतिसादातील ह्या वाक्याशी अर्थातच सहमतः

>>>तुम्ही जेव्हा कोणी कसं वागायला पाहिजे ह्याचे एक ते ज्ञ मुद्दे लिहिता तेव्हा तुम्ही स्वत:लाच कसं जास्त कळतं ह्याच्यामध्ये घुसत आहात हे कृपया विसरु नये.<<<

विशेष म्हणजे हे वाक्य लिहिणे ह्यातून हे वाक्य त्यांनाही लागू होते हाही एक भाग आहे. Happy

रार, तुझी उपायांवर चर्चेची पोस्ट पटली.
आता इथेही मूळ विषयाला सोडून परत गांधी, संघ इत्यादी वर कमेंटस सुरु झाल्या.

बुवा हे वाक्य नक्की तुच लिहिलं आहेस का ? जस्ट चेकिंग !>>>>>> श्री, दॅट वॉज बिफोर आय न्यु ह्य द आयडी वॉज.
हा आयडी खरच स्पार्टा नसता तर माझं मत तेच ठेवलं असतं मी की, उगाच ऑफिशियल भासवायची गरज नाही पुढे छान लिहिलय आणि विचार करायला भाग पाडेल.
आता मला जेव्हा कळलं जी ज्यानी लिहिलय तो आयडी स्वतःच धुतल्या तांदळासारखा नाहीये म्हणजेच ज्या गोष्टींबाबत त्यानी राग व्यक्त केलाय तो अनबायस्ड नाहीये त्यामुळे सगळच ढासळतं. आता कॉपरमाईन म्हणून त्यानी अगदी हिरीरिनी मतं मांडली आहेत बाफंवर हे सुद्ध कळलं. आता मी कशाला त्याच्या कुठल्याच क्लेम्स वर विश्वास ठेवीन?

ह्याची पुंगी वाजवणार्‍यांनी आधी त्यांच्या हाय हॉर्स/उच्चासनावरुन खाली यावं. तुम्ही जेव्हा कोणी कसं वागायला पाहिजे ह्याचे एक ते ज्ञ मुद्दे लिहिता तेव्हा तुम्ही स्वत:लाच कसं जास्त कळतं ह्याच्यामध्ये घुसत आहात हे कृपया विसरु नये. >>> बुवा, ज्या व्यक्ती तुम्हाला माहितही नाहीत त्यांच्याबद्दल का असे जजमेंटल होताय? मुळात चर्चेचे मुद्दे सोडून वैयक्तीक आयडीबद्दल बोलायची काही गरजच नाहीये इथे.
मुद्द्यांवर चर्चा करुयात. आणि ते संपले असतील तरी चर्चा करतच रहायला पाहिजे असं नाहीये.

आणि टेक्नीकल मुद्दा : खरंच कळत असेल एकाद्याला एखाद्या विषयातलं जास्त तर त्याबद्दल त्यात प्रॉब्लेम वाटण्यासारखं किंवा ते 'हीन म्हणून ' पॉईंट आऊट करण्यासारखं काय आहे त्यात? फिलॉसॉफी, सोशल स्टक्चर्स हे लोकांचे थरो, डीप अभ्यासाचे विषय असू शकतात. ह्याचा अर्थ लगेच ते लोकं उच्चासनावर, स्वतःला जास्त कळणारे समजतात स्वतःला असं नाही. त्यामुळे इतरांनीही त्यांना लगेच लेबलं लावायला जाऊ नयेत.

सायो, नसेल लागलं ठोस हाती काही. हरकत नाही.

चर्चेचे मुद्दे सोडून? Lol वर ज्या सुधारणा, मायबोलीचं वातावरण ठीक नाही हे गृहित धरुन देण्यात आल्यात त्यावरुनच मी म्हणत होतो की कशावरुन?

कोण बोललं आणि काय बोललं ह्यातील पहिल्या भागाला महत्त्व देणे हे जगभरात होत असते, फक्त इथेच नव्हे. Happy

मनात जरी 'काय बोललं गेलं' ह्यावर रेंगाळावसं वाटत असलं तरी 'कोण बोललं' ह्यावर मत ठरवणे हे सोयीचे पडते. Happy

असो.

हा प्रतिसद लिहायला नको असे वाटत असतानाही लिहिला, क्षमस्व. Happy

रार

तुम्ही माझ्या पोस्टकडे साफ दुर्लक्ष करणार हे माहीत असूनही... ( व्यक्तीशी शत्रूत्व, चांगल्या पोष्ती असं बरंच काही एकत्र वाचून डोकं काम करेनासं झालेलं आहे )

तुमचे जे मुद्दे आहेत त्यासाठी या बाफची काही एक गरज नाही. ज्याप्रमाणे एखाद्याच्या बाबतीत इग्नोरचं धोरण बदलणार नाही त्याच प्रमाणे आपण जे करतो ते इतरांनी करू नये असा उपदेश कुणीही स्विकारण्याची गरज नाही. तुमचे उपाय हे इतर बाफावरती सुद्धा चालावेत. त्यासाठी या आयडीला का दोष देता, मुद्यांना का नाही हा प्रश्न उपस्थित करण्याची अजिबात गरज नाही.

आता आयडिंचा इतिहास देणे हे कंटाळवाणे होऊ लागलेले आहे, तसंही सर्वांना माहीतच आहेत ते.
तेव्हां छोटा राजनने अहिंसेवर भाषण दिले तर मुद्दे घेण्यासारखे आहेत म्हणून घेणार का या प्रश्नाला उत्तर द्यावे. जर घेणार असाल तर मी संत म्हणेन.

एक उपाय जो कदाचित परिणामकारक ठरु शकेल -

प्रत्येक काँप्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट याला एक युनिक मशीन अ‍ॅड्रेस (मॅक अ‍ॅड्रेस) असतो. नवीन आयडीसाठी येणारी प्रत्येक रिक्वेस्ट या मॅक अ‍ॅड्रेस वरुन ट्रेस करुन मगच अ‍ॅप्रूव्ह करण्यात यावी. एकाच मॅक अ‍ॅड्रेसवरुन दुसरी रिक्वेस्ट आल्यास ती डुप्लिकेट आयडीसाठी आहे हे आपसूकच सिद्ध होईल आणि रिजेक्ट केली जाऊ शकेल. लॉगीन करताना प्रत्येकवेळी मॅक अ‍ॅड्रेस व्हेरीफिकेशन जिकीरीचं असलं तरी अशक्यं नाही.

मधुकर विनायक तुम्हाला जेव्हढी माहीती आहे तेव्हढी आम्हाला नाही. जर इतकी माहीती असेल तर तोड सुद्धा माहीती असेलच की

एक डिसग्रंटल्ड आयडी (आता मराठी शब्द सुचेना त्या करता) ज्याला काही मेंब्रांविषयी राग आहे, मायबोली विषयी राग आहे त्यानी स्वतः आपण अनबायस्ड आहोत असं भासवत मायबोली मेंब्रांचा अन मायबोलीचा लेखाजोखा लिहिला त्यात सबस्टन्स आहे हे गृहित धरुन आपण कसं काय त्यातल्या मुद्द्यांवरुन "सुधारणा" वगैरे हाती घ्यायच्या? काय संबंध? सग़ळाच आंधळा कारभार!><<<< एक्झाक्टली.

रार, तुमची पोस्ट सर्वकालीन सत्य आहेच. मला वाटतं प्रत्येक जण त्याला रुचेल ते आत्मपरीक्षण करतोच करतो, त्यात नवीन काही नाही. ट्रोल्स हे फॉलो करणार का तर बहुतेक नाही. आपण अनेक जण करतो का तर प्रयत्न करतोच.
>>तरी काल अमितव या आयडीने काही क्षणासाठी केलेले आत्मपरीक्षण नक्कीच स्वागतार्ह आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे स्मित>> या वाक्यात 'काही क्षणासाठी' , 'सुज्ञास अधिक सांगणे' आणि स्मित हे की वर्ड आहेत का? मी तुम्हाला ओळखत नाही म्हणून विचारलं. तसं असेल तर दुर्दैव. Sad
बाकी माझ्या माबो इतिहासात, मी कदापि कुठल्याही आयडीला धरून विचाराची दिशा ठरवलेली मला आठवत नाही. पण ह्या धाग्यात सातत्याने आणि वारंवार कॉपरमाईन यांना आणि त्यांच्या हेतूला विरोध करणे हे र्म्ड म्हणत्येय तसं आत्मपरीक्षण करतानाच माझ्या लक्षात आलं आणि करतोय. पगारे यांच्या धाग्यावर र्म्ड सोडून कोणीही उतरलं नाही, तिची कळकळ तिच्या पोस्ट्स मधून मला जाणवत होती साम्हौ तेव्हा कुणालाच पडावस वाटलं नाही. मी ही कुंपणावरच राहिलो. जे या धाग्यात करत नाहीये.

"सुधारणा" वगैरे हाती घ्यायच्या? काय संबंध? सग़ळाच आंधळा कारभार! >> जहाँ जागो वही सबेरा. कोंबडं आरवलं म्हणून उठलो का बापाने पेकाटात लाथ मारून उठवला, कशाला पंचाईत करायची? उठलास ना बाबा, लाग कामाला, कर सुधारणा. सिंपल.

तुम्ही माझ्या पोस्टकडे साफ दुर्लक्ष करणार हे माहीत असूनही. >> again, why assume ?

छोटा राजनने अहिंसेवर भाषण दिले तर मुद्दे घेण्यासारखे आहेत म्हणून घेणार का या प्रश्नाला उत्तर द्यावे. >>> वाल्याचाही वाल्मीकी झालाच की, आणि त्यांचं लिखाण आपण संस्कृती म्हणून कौतुकानं वाचतो आजही. आधी तो 'लोकांना मारायचा' म्हणून तेवढंच लक्षात घेऊन दुर्लक्षित नाही करत.
थोडक्यात, उदाहरणं दुसर्‍या बाजूनेही देता येतील /येतात.

आणि हे सगळे उपाय समाजप्रबोधनासाठी किंवा मला फार जास्त कळतंत हे दर्शवायला म्हणून लिहिले नसून एका आणि एकाच कारणासाठी लिहिले कारण - 'उपाय नसावेतच' हे प्रेमॅच्यूअर कनक्लूजन वाक्य पटलं नाही म्हणून.

>>>जहाँ जागो वही सबेरा. कोंबडं आरवलं म्हणून उठलो का बापाने पेकाटात लाथ मारून उठवला, कशाला पंचाईत करायची? उठलास ना बाबा, लाग कामाला, कर सुधारणा. सिंपल.<<< +१

अमित, हे कीवर्ड वगैरे नाहीत. प्रत्येक माणूस, प्रत्येक गोष्टीत टवाळक्याच करेल, चेष्टाच करेल असं मानून त्याकडे पाहू नका. माणसं अतिशय स्वच्छ मनानं एखादी गोष्ट अप्रीशीयेट करू शकतात , आणि ते तसंच होतं.

असं अजिबात बघत नाहीये, म्हणूनच क्लियर करण्यासाठी विचारलं. धन्यवाद.

रार
तुम्ही प्रत्यक्षात असेच वागत असाल तर माझ्यासाठी इथे एक सतीश तांबे आहेत. तुम्ही स्त्री पुरूष कोण आहात हे माहीत नाही... कोण आहात याची कल्पना नाही. गरजही नाही. तुमची पोस्ट इथून पुढे आवर्जून वाचायला आवडेल.

>>मी इथे (या स्पेसिफिक धाग्यावर. इन्स्पेक्टरवाला धागा आठवत असेल काहिंना. नसेल तर असोच.) काही आयडींना (नपेक्षा त्यापाठील व्यक्तींना) बॅश करणारच.

येस, दीड मायबोलीकर उर्फ इब्लिस, ही अशीच अरेरावी केली आहे अनेकदा तुम्ही ( आणि तुमच्या वैचारिक गटाने )
कधीतरी शांततेने, तटस्थ वृत्तीने विचार करून बघा प्लिज.

कोणत्याही चर्चेत लोक मुद्देसूद चर्चा न करता, हमरीतुमरीवर येऊन स्वतःचे मत दुसर्‍याच्या गळी उतरवायचा प्रयत्न का करत असतात ? कोणतीही गोष्ट पुर्णपणे चांगली किंवा पुर्णपणे वाईट नसते.
प्रत्येक गोष्टीतले चांगले तेवढे का नाही घेतले जात ?

अमितव, धन्यवाद. आणि अगदी खरं सांगायचं तर मी सुद्धा काही दिवसांपूर्वीपर्यंत या कुंपणावरच्या लोकांमधेच होते. पण मग लक्षात आलं की असं करून मी या गदारोळाला हातभारच लावत आहे. तेव्हा मायबोलीवरच्याच काही लोकांची मतं, वागणं पाहून मी ही बघ्याची भूमिका सोडण्यासाठी इन्स्पायर झाले. तूर्त चांगल्या गोष्टी शिकायचा आणि त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करते आहे.

मुद्दा माझ्यादृष्टीने - दुसर्‍याचे म्हणणे पटले नाही तर मी काय करू शकतो एवढाच आहे.

अनेकांना तिथेच उणी-दुणी-धुणी काढायला आवडतात [नॅचरल टेंडंसी आहे], कुणाला पत्र लिहायला आवडते, कुणाला बिहारला जायला , किंवा कुणाला वाहट्या धाग्यावर टिपं गाळायला किंवा कुणाला रोमात.

जास्तच कंटाळा आला तर माबोसंन्यास आहेच !

Pages