Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पोळीची कणीक मळताना, भात
पोळीची कणीक मळताना, भात शिजवताना वापरू शकता. भात किंचीतच पिवळसर होतो पण मऊ मोकळा आणि बाय डिफॉल्ट स्निग्ध होतो.
https://www.maayboli.com/node/36009
माझी रसमलाई रेसिपी या लिंकवर आहे. प्रतिसादांतून पण मदत होऊ शकेल. तुम्हाला शुभेच्छा.
Kandyachi paat ghari bharpur
Kandyachi paat ghari bharpur aahe .bhaji karun kantaka aalaay.pasta wagaire chi recipe milel ka? Kandyachi paat takun
Fried rice with manchurian
Fried rice with manchurian kara.कांद्याची पात संपेल.
मधुराचा बुलानी पराठा आहे
मधुराचा बुलानी पराठा आहे youtube वर त्यातही खपेल कांदा पात. मी करते, टेस्टी होतो.
खरंतर पुलाव, बिर्याणी, पुलाव टाईप नुडल्स, पास्ता सगळ्यात छान लागते कांद्याची पात.
कांदा पात + थोडासा लाल भोपळा
कांदा पात + थोडासा लाल भोपळा असं सूप मस्त लागतं.
हौसेने कमी पॉलीशचा कोलम
हौसेने कमी पॉलीशचा कोलम तांदूळ घेतलाय. चव छान आहे, पण भात मोकळा हवाय तो चिकट होतोय. भात नेहेमीच्या कोलमसारखा मोकळा व्हायला काय करावं लागेल?
भांडयात शिजवा
भांडयात शिजवा
थोड़े शिजले की थोड़ी पेज काढून टाका
पाउंड केक रेसिपी हवी आहे.
पाउंड केक रेसिपी हवी आहे. अंडं खात नाही आणि एक एगलेस मिळाली तर त्यात टोफू आहे ते आवडतच नाही. एरवी वेगन डाएट म्हणून पनीरला टोफू रिप्लेसमेंट आहे. मला वेगन नकोय तर टोफूला रिप्लेसमेंट पनीर चालेल का?
मला हा केक लयीच्च आवडतो त्यामुळे करून बघायची इच्छा आहे.
https://www.google.com/search
https://www.google.com/search?safe=strict&rlz=1C1GCEA_enUS874US874&ei=6s...
पाऊंड केकसाठी रणवीर ब्रार ची
पाऊंड केकसाठी रणवीर ब्रार ची रेसिपी आहे. त्यात त्याने प्रत्येक अंड्याऐवजी पर्याय सांगितला आहे. त्यात flax seed powder म्हणजे जवसाची पूड व अजून काही तरी सांगितले आहे.
ओके. मी गूगल सर्च केलाय, पण
ओके. मी गूगल सर्च केलाय, पण बेकिंग स्किल्समुळे कमी कटकटीची वगैरे रेसिपी हवी होती.
आता वरच्या लिंकमधून आणि रणवीर ब्रार रेसिपी मधून काय जमेल ते बघते.
मग रणवीर ब्रारची एगलेस केकची
मग रणवीर ब्रारची एगलेस केकची रेसिपी आहे. चांगली आहे.
पौंड केक म्हणजे 1 पौंड वजनाचा
पौंड केक म्हणजे 1 पौंड वजनाचा केक का?(सध्या गुगल करणार नाही)
अनु, पूर्वी त्यात लागणारे
अनु, पूर्वी त्यात लागणारे सगळे घटक एक पौंड मापात असायचे म्हणून पौंड केक असं मला मूळ रेसिपीमध्ये वाचून समजलं. आजकाल बरीच व्हर्जन्स असतात, वेगन, एगलेस पण मिल्कक्रीमचा, ब्राऊन, शुगरफ्री वगैरे...
पण बेकिंग स्किल्समुळे कमी
पण बेकिंग स्किल्समुळे कमी कटकटीची वगैरे रेसिपी हवी होती.>> अन्ड्याला पर्याय म्हणुन जे पण घालशिल, बेपा, बेसोडा, मेक शुअर अगदी ताजे आहेत नाहितर गच्च केक होतो (स्वानुभव)
पौंड केक म्हणजे 1 पौंड वजनाचा
पौंड केक म्हणजे 1 पौंड वजनाचा केक का?>> नाही ग , साधा प्लेन केक फक्त मैदा,अंड ,साखर,बटर घालून केलेला .आणि हा गोल नसतो तर लोफ(ब्रेड च्या ) सारखा असतो . अयंगार कडे मिळतो बघ , स्लाइस करून देतात ,इतका हलका असतो कि बस !!
पूर्वी त्यात लागणारे सगळे घटक
पूर्वी त्यात लागणारे सगळे घटक एक पौंड मापात असायचे म्हणून पौंड केक असं मला मूळ रेसिपीमध्ये वाचून समजलं>> म्हणजे सत्यनारायणाच्या शिऱ्यासारखं सव्वा पटीच्या मापात.
ओह अच्छा.हो तो ब्रेड सारखा
ओह अच्छा.हो तो ब्रेड सारखा केक आठवला बेकरीत पाहिलेला.
मला एकदा लहानपणी सारखा टायर साच्यातला बाजूला फिका सोनेरी तपकिरी क्रनच(शब्द लिहिता येत नाहीये) वाला केक पण करायचाय.
टोफू अत्यंत वाईट लागतो(मला).
साधी बेकिंग पावडर, सोडा घालूनही केक फुगतो.फक्त अगदी मऊ हलका नाही.
टायर साच्याला Bundt mold
टायर साच्याला Bundt mold म्हणतात , मला ते अजून कळलेलं नाहीये असा का असतो तो साचा !?
इतर साच्यांपेक्षा "मी वेगळा" असं तो बंड (Bundt) पुकारतो
आणि त्यातून केक सुटला कि त्याच्या पाठीवर आपोआप नक्षी येते
अंडे नको असेल तर १अंडे=१/४ कप
अंडे नको असेल तर १अंडे=१/४ कप दही या प्रमाणात दही वापरता येईल.
ओके प्राची, हे जमेल असं
ओके प्राची, हे जमेल असं वाटतंय.
रावण पिठले
रावण पिठले
ह्यात सगळे समप्रमाणात असते म्हणे , एक वाटी
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=l-hxBww28Tw
या रेसेपीनं उत्कृष्ट केक होतो. सर्व सामान तयार असेल तर तयारीचा वेळ धरून ४० ते ५० मिनीटांमधे केक तयार होतो.
पंचफोरण वापरुन काय बनवता येईल
पंचफोरण वापरुन काय बनवता येईल? मी सर्च केल पण जास्त काही मिळाल नाही.
पंचफोरण वापरुन काय बनवता येईल
पंचफोरण वापरुन काय बनवता येईल? मी सर्च केल पण जास्त काही मिळाल नाही.>>>> परवरची भाजी ( परवर हे दिसायला तोंडल्यारखे पण आकाराने लांबट मोठे असतात.), बटाट्याची भाजी करता येईल. पंचफोरन दाल पण करतात.
पंचफोरणाची ( मोहोरी, जीरे,
पंचफोरणाची ( मोहोरी, जीरे, बडीशेप, मेथीदाणे, कलौंजी) फोडणी करुन दुधी भोपळ्याची हरभरा डाळ घालून भाजी, बटाटा भाजी, मिक्स डाळ पण चांगली लागते.
पंचफोरण म्हणजे परवर की दुसरे
पंचफोरण म्हणजे परवर की दुसरे काही?
जर परवरच असेल तर ह्याची चणा डाळ घालून भाजी मस्त लागते. करून बघा.
अगं VB पंचफोरण म्हणजे
अगं VB पंचफोरण म्हणजे बंगाली पद्धतीची फोडणी. यात मसाल्याचे ५ घटक असतात म्हणून पंच फोरन म्हणतात.
https://www.shikshakitchen.in/2018/01/panch-phoran-masala.html
वरती मीपुणेकर ने लिहीलेय.
वरती मीपुणेकर ने लिहीलेय. झंपी कोथाय ?
Ok थांकू रश्मी.. मला हे
Ok थांकू रश्मी.. मला हे नव्हते माहीत☺️
Pages