यु ट्युबवरचे पाककृतींचे चॅनेल्स

Submitted by साधना on 6 May, 2020 - 09:03

मंडळी,

या धाग्यावर आपल्याला आवडलेल्या यु ट्यूब पाककृतींच्या चॅनेल्सबद्दल लिहुया. आपल्याला आवडलेल्या तिथल्या पाककृतींबद्दलही इथे लिहुया. उत्साही मंडळींनी केलेले प्रयोग व त्याचे फोटो यांचेही स्वागत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर काही बदल करता येत नाही. म्हणून प्रतिसादात लिहिते.

1. सध्याचा हॉट शेफ रणवीर ब्रार.

याचे चॅनेल आवडायचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक पाकृ तो तुकड्यात मांडतो, प्रत्येक तुकड्यात काय करायचे हे सांगतो आणि सोबत पाकृ व त्यातील घटकांचा रंजक इतिहासही सांगतो. प्रत्येक पाकृ अशी मांडल्यावर ती खरेच सोपी वाटायला लागते. त्याच्या प्रेझेन्टेशन स्किल्समध्ये तुफानी प्रगती झालेली आहे हे त्याचे जुने विडिओ बघितले की सहज लक्ष्यात येते.

2. श्यामा कुलकर्णीकाकू यांचे सीकेपी कूकिंगहे चॅनेल.

हे चॅनेल अजून फारसे प्रसिद्ध झालेले नाही. पण प्रत्येक पदार्थ निगुतीने करणारी, करताना त्यातील खाचाखोचा नीट समजावून सांगणारी ही काकू मला आवडते. यातले काही पदार्थ मी करून पाहिले आहेत, अर्थात 100 टक्के फॉलो केले नाही पण बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे.

3. लेट्स बी ऑनेस्ट.... कुणाल कपूरच्या रेसिपीज छान आहेत पण मी मोस्टली नयनसुखासाठी त्याचे चॅनेल बघते.

4. लिविंग फुडझ ह्या चॅनेलचे काही व्हिडीओज इथे आहेत. नॉर्दन फ्लेवर्स खाली गुजरातच्या वरच्या राज्यातील गोड पदार्थ एकत्रित केलेले आहेत. रणवीर ब्रार होस्ट असल्यामुळे सगळे पदार्थ करायला अगदी सोप्पे आहेत असा भास होऊ शकतो. काल मी राजस्थानी मिठाया बघत होते. गुलाब साखरी नावाचा पदार्थ करायला खूप कठीण आहे असे तो बोलताना म्हणाला. पण प्रत्यक्षात करताना बघून सोप्पा वाटला. ही जादू अर्थात रणवीरची. Happy

5. लिविंग फुडझची इंडियन करीज ही सुद्धा एक चांगली मालिका आहे.

6. निशा मधूलिकाच्या रेसिपीज त्यातल्या डिटेलिंगसाठी मला आवडतात. तिच्या टिप्स ट्राईड अँड टेस्टेड असतात.

7. हेब्बर्स किचन वरचे व्हिडीओज पण छान आहेत. नो बडबड, ओन्ली वर्क.

8. एपिक चॅनेलवरचे राजा, रसोई और अन्य कहानियाचे संक्षिप्त भाग आहेत. होस्ट परत एकदा रणवीर ब्रार.

9. सीकेपी पाककृतींसाठी सुषमा देशपांडे यांचेही हे चॅनेल चांगले आहे.

10. अनुराधा तांबोळकरांच्या या चॅनेलवर पाककृती व्यतिरिक्त इतरही बरेच काही आहे.

11. श्री. विलास देशपांडे यांच्या चॅनेलवरही सीकेपी व अन्य पाकृ आणि इतर माहिती आहे.

12. अफगाणी पाकृ करून पाहायच्या असतील तर हे चॅनेल बघा. सोप्या आहेत बऱ्याच.

13. जेमी ऑलिव्हर ब्रिटिश असला तरी पाककृती सोप्या आहेत. त्याचा फोकच्य ब्रेड खूप आवडलाय... सूट बूट घालून कोणी ब्रेड बनवत असेल तर तो ब्रेड स्वर्गीयच असणार..... कधीतरी करणार नक्कीच.....

14. जोन व एडम या जोडीचे हे चॅनेल मी अधून मधून बघते. यांची हमस व ताहिनी पेस्टची रेसिपी अफलातून आहे.

15. शुभांगी कीर यांच्या बोलण्याच्या पद्धतीची मला जाम मजा वाटते, म्हणून हे चॅनेल मी बघते. काही रेसिपीज चांगल्या आहेत.

16. एपिक चॅनेलवरची लॉस्ट रेसिपीज ही मालिका इथे संक्षिप्त रुपात आहे.

कोणतंच पाककृती चॅनल फॉलो करत नाही. एखादी रेसिपी हवी असल्यास तेवढ्यापुरती शोधणं पुरतं. काही वर्षापूर्वी मधुराच्या रेसिपी पाहिल्या होत्या भाकरी करण्याकरता (मधुराज रेसिपीज), तिची कटाच्या आमटीची रेसिपी छान आहे. (अवांतर- तिचं अशुद्ध बोलणं ऐकायला जीवावर येतं)

मी हेब्बर किचनचे विडीओ बघून कटोरी चाट आणि ईन्सटंट चकली केली होती . दोन्ही छान झाले. मुलांना आवडले.

20200329_173215.jpg20200417_164219.jpg

Hebbar kitchen, Nisha Madhulika ani cooking shooking आवडतात मला.
निशा मधुलिका आणि cooking shooking speed वाढवून बघते.
Cooking shooking chya पद्धतीने चीज गार्लिक ब्रेड केला होता lockdown madhe तेही कढईत, अप्रतीम झाला होता.

रणवीर ब्रार चेक करते आता.

फूड कोड वरून चॉकलेट केक बनविलेला तो सुध्दा मस्त झाला होता.

मधुराचं पुण्यातलं आणि पुण्याबाहेरचं सुद्धा फॅन फॉलोईंग भरपूर आहे असं तिच्या काही ईव्हेंट्सच्या व्हिडिओजमधून दिसतं. साधारण ८-९ वर्षं जुन्या व्हिडिओंमध्ये तिची बोलण्याची पद्धत बर्‍यापैकी वेगळी होती.

हो संपदा. तिचे अमेरिकेतले व्हिडिओज पाहिले होते तेव्हा तिची भाषा अशुद्ध नव्हती. आता ‘रेसिपीज नकोत पण भाषा आवर‘ होतं ऐकताना. अगदीच बहिष्कार नाही टाकलेला तिच्या रेसिपीजवर पण शक्यतो नाही बघत.

मी पण फार चॅनल्स फाॅलो करत नाही. या धाग्यावरचे इनपुट्स योग्य व्यक्तींकडे जातील Happy

वरचे फोटो मस्त आहेत. पावभाजीचा हेब्बर किचनचा व्हिडिओ छान आहे.

साधना, मी पहिल्यांदाच नेमका रणवीरचा उपमा पाहिला. का पाहीला असं झालंय. बापूला उपमा आजाबातच जमला नाहीये. आता जरा उत्तरेकडील रेस्प्या बघून आवडतोय का ते पहाते. बाकी रणवीर चांगलाय.

मला आवडते मधुरा. आजपर्यंत तिच्या रेसीपीने केलेली एक पण गोष्ट फेल गेलेली नाहीये आणि खूप appriciation पण मिळालंय.

हेब्बार चे बघेन आता

मी रेहाना ला फॉलो करते फेबु वर. तिच्या इन्स्टा पॉट रेसिपीज मला सोप्या आणि हमखास जमणार्‍या वाटल्या त्यानंतर इतर पण बर्‍याच रेसिपीज करून पाहिल्या आणि आवडल्या. ती आपल्याशी बोलत बिलत नाही. पण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवते आणि सोबत स्क्रीन वर इन्स्ट्रक्शन येतात.
https://www.youtube.com/channel/UCJYFu6cyUltd43HYTQjAylg/videos

होमकुकिन्गशोच्या हेमा सुब्रमण्यमच्या पण छान असतात रेसिपी, साउथ अ‍ॅक्सेन्टच इग्लिश आहे, तिचे सलवार कमिज आनी ज्वेलरी पण छान असते.सोफ्ट ,प्लेझन्ट आणि हसरा टोन असतो बोलण्याचा.
तिचे मेजरिन्ग कप् आणी स्पुन पण खुप मस्त आहेत, मी बघत होते मधे ऑर्डर करायला पण तेव्हा आउट ओफ स्टॉक होते.
रणविर ब्रार पण मस्त आहे एकदम खासे पन्जाबी वर्ड असतात, दुकान लगा रहु वैगरे. प्रत्येक पदार्थाचा उगम , मसाल्याच्या टिप्स एक्दम कॅज्युअल.
कुणाल कपुर्,विकास खन्ना ,रणविर ब्रार याना बघुन वाटत हे सग्ळेच शेफ एवढे हॅन्ड्सम कसे?चुकुन मुव्हित जायचे तर शेफ झाले बहुधा.
काल परवा सहज म्हणून गावरान एक खरी चव म्हणून चॅनेलचे एक-दोन व्हिडियो बघितले ते पण आवडले, कोल्हापुर साइडच्या शेतातल शुटिन्ग असाव. शेतातच चुल मान्डुन , पाट्यावरवन्ट्यावर वाटण वैगरे करुन ,चिकन केले होते, थेट चुल मान्डण्यापासुन सगळ दाखवतात, ८० वर्शाच्या आजि आणी त्यान्ची मुलगी का सुन ते कळल नाही पण मस्त वाटत ते वातावरण बघायला.
त्यान्ची मातिची भान्डी तर असली सुरेख आहेत.

अजून एक आवडलेलं चॅनल म्हणजे गावरान एक खरी चव. त्या आजी मस्त ठसक्यात बोलतात. आणि रेसिपीज ऑथेन्टिक असतात अगदी.
https://www.youtube.com/channel/UCqDZOZrBWFQEdCPGB1ecHSg

मिनिस्ट्री ऑफ करी हे पण चॅनल मला आवडते. नीट फॉलो केले तर परफेक्ट जमतात त्यांच्या रेसिपीज.
https://www.youtube.com/channel/UCmz93_O9gskc2lMcs5UyPJg

मी हेब्बार अनेकदा बघते. म्हणजे नुसतीच बघते कारण ते नो नॉनसेन्स व्हिडिओज मला आवडतात.आणि रेसिप्या सोप्या असतात.

मी एकदा त्यांच्या पद्धतीनं कुर्मा केला होता आणि तो भारीच चविष्ट झाला होता.

हेमा सुब्रमणियमचा अप्पमचा व्हिडिओ पाहिलाय. त्यात ती अप्पम बोलताना जरा वेगळ्याच पण भारी गोड ढंगानं बोलते - आSपम असं.

बाकी काही फारसे पाकृचे चॅनल्स बघत नाही, वापरत तर नाहीच नाही.

आपण चित्रपट बघतो तसे मी हे चॅनेल्स बघते. करून पाहण्याची इच्छा अनेकदा होते पण असल्या कामवाढवू इच्छांना मी जास्त हवा देत नाही. Happy Happy

मी बहुतेक हवी ती रेसिपी शोधतो.
पण त्यातल्या त्यात कबिताज किचन, निशा मधूलिका, नागपूरचे मास्टर शेफ, मधुरा यांच्या पाकृ जास्त पाहिल्या जातात. निशा मधूलिका यांच्या बहुतेक पाकृ टोमॅटो प्युरीने सुरवात होतात त्यामुळे बऱ्याचदा गाळतोही.
गावरान एक खरी चव यातुन सुद्धा गवारीची भाजी आणि अजून काहीतरी केले होते.

हेब्बार माहीत नव्हते, बघायला पाहिजे.

रणबीर ब्रार मला पण आवडतो. सगळं नीट झालं की जिलेबी ट्राय करून बघणारे त्याची. सध्या सगळं होल्ड वर ठेवलंय.
सूनबाईंनी त्याचे छोले केले होते अप्रतिम झाले होते अस म्हणत होती.

नातीला मधुराची भावनगरी आवडते पहायला. मधुरा भिजवलेलं बेसन फेटायला लागली की ही इकडे " ई sss किती मेसी करतेय " म्हणून हसत सुटते . तिला ते मेसी करणंच आवडत पहायला.

ही हेब्बार ची मी केलेली पावभाजी . तिची आणि माझी दोघींची फेवरीट.
IMG_20200305_134205~2.jpg

स्नेहमयी, तुझ्या सासूबाईंना सांग, मी त्यांची फॅन आहे. खूप कौतुक वाटते त्यांचे. खूप डिटेलवार रेसिपी सांगतात, त्यामुळे विडिओ जरा लांबतो. पण पदार्थ करायला मदत होते.

बहुतेक सगळेजण पदार्थ कसा करायचा हे सांगतात पण भाजी तोडायची कशी, साफ करायची कशी हे कोणी सांगत नाही. तुझ्या सासूबाई नीट समजावून सांगतात. मी वर दिलेय त्यांचे चॅनेल.

स्नेहमयी, तुझ्या सासूबाईंना सांग, मी त्यांची फॅन आहे. खूप कौतुक वाटते त्यांचे. खूप डिटेलवार रेसिपी सांगतात, त्यामुळे विडिओ जरा लांबतो. पण पदार्थ करायला मदत होते. >> तेच लिहिणार होते की त्या स्नेहमयी च्या साबा आहेत म्हणून

हेबाबर किचन आणि masteer रेसिपीज(विष्णू मनोहर यांचे), दोन्ही कडच्या रेसिपीज आजीबात बिघडत नाहीत, निशा मधूलिका छान आहे ,पण पदार्थ करण्यासाठी खूप पूर्व तयारी करावी लागते ,आणि रेसिपीज राजस्थानि आहेत, खूप मसालेदार,
मधुराच्या रेसिपीज सोप्या आहे पण भाषा मात्र अशुद्ध आहे( सारखी मस्त, आणि आजून काहितरी विशिष्ट शब्द वापरते, )

छान धागा.

गेले कित्येक वर्ष हे कूकिंग चॅनेल्स बघत आहे. वर सांगितलेले सगळेच कधी ना कधी पहिले आहेत.
पण हल्ली सर्वात आवडते म्हणजे कबिताझ किचन. रोखठोक व सरळसोप्या कृती. तिच्या टिप्स हि चांगल्या आहेत.
निशा मधुलिकाचे विडिओ लांबड लावणारे वाटतात . खूप ऑथेंटिक व वेळखाऊ असतात त्यापेक्षा शॉर्टकट मध्ये रेसिपी हेब्बर च्या असतात.
शमा कुलकर्णींचे चॅनेल छान आहे
काही चॅनेल्स फक्त नेत्रसुखासाठी असतात जसे रनवीर . पण रेसिपी करून नाही पहिल्या कधी
६-७ वर्षांपूर्वी मधुरा अमेरिकेत असताना तिचे विडिओ पाहायचे तेव्हा मला वाटतं खूप कमी गृहिणी होत्या युट्युब वर, संजीव कपूर , vahrevah , असे फेमस chef असायचे. त्यावेळी तिचे विडिओ आवडायचे व genuine वाटायची . पण ती जशी फेमस झाली तशी तिचे सादरीकरण बदलले. मग तिच्या पाककृती बघणे बंद केले. ओव्हरacting करते व खूप commercialised असं वाटतं आता. त्यामुळे तिचा विडिओ दिसला तरी इग्नोर करते.

कूकिंग विडिओ मध्ये सादर करणाऱ्या व्यक्तींशी कनेक्ट होणे खूप महत्वाचे आहे.

मधुराची भाषा खटकते खरी.तरी आवडीने पहाते मी तिचे पदार्थ.
मस्स्सत...घमघमाट सुटलाय..आहाहा..
आणि.
चला तर मग ..ही हमखास वाक्य असतात तिची.
हेब्बार्स व yum curry ही मस्त आहे.
Yummy food and fashion चे केक व पुडिंग भारी असतात.

Pages