इनस्टंट खरवस ..... (Added New Photos)

Submitted by मी मी on 27 June, 2013 - 07:46

इनस्टंट खरवस

मी मुंबईला राहत असतांना बरेचदा बर्याच हॉटेल मध्ये खरवस चाखले … अतिशय आवडू सुद्धा लागले होते …. पण इकडे परत आल्यावर परत तसली चव आपल्याला चाखता येणार नाही याची खंत टोचत होती …ऽश्यतच एकदा मैत्रीनिजवळ हे बोलून गेले … आणि तिने बेटच लावली …. 'म्हणाली अगदी तसेच किंबहुना त्याहून चवदार खर्वस आत्ता इथेच तुला दहा मिनिटात करून खायला घालणार ....त्याबदल्यात मी तिला मूवी दाखवायचा …

मी पण अगदी नाक वर करून आनंदाने बेट स्वीकारली …. खरतर त्यामागे दोन कारणे होतीच … एकतर मिळालाच तर खूप दिवसांनी खरवस खायला मिळणार आणि दुसरे हिला कसल जमतंय तसलं मुंबईच चविष्ट खरवस बनवायला …. बेट हरण्याचा प्रश्नच येत नाही ….

मग काय तिने खरच दहा मिनिटात खर्वस तयार केलं हो …. आणि ते सुद्धा अगदी तंतोतंत तसंच नाही खरतर अधिकच चवदार ….

घ्या तर मग तुम्ही सुद्धा कृती लिहून आणि या बानीवर बघाच करून ….पाहुणे वेळेवर टपकले तरीही अगदी कमी वेळात तयार होणारा हा उत्कृष्ट गोड पदार्थ …

Ingredients :-

1 टीन कंडेनस्ड मिल्क (मिल्कमेड किंवा कुठलेही)
त्याच प्रमाणात (1 टीन) तापवून रूमटेम्प्रेचर एवढ्या तापमानाच दुध
तेवढेच (1 टीन) गोड दही (मलाईचे नको, साधे पण अजिबात आंबट नसलेले)
पाव तुकडा जायफळ ची पूड (आवडत असल्यास) (विलायची वापरू नये)

कृती :-

* एका पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे …
* दुसऱ्या पातेल्यात दही, दुध आणि मिल्कमेड एकत्र करून हलक्या हाताने फेटून घ्यावे (मिक्सर किंवा ब्लाइन्डर चा उपयोग करू नये…. दह्याचे गडे तसेच राहू नये आणि व्यवस्थित एकजीव व्हावे एवढ्यासाठी लागेल तेवढ्याच प्रयत्नाने फेटावे)
* हे मिश्रण छोट्या पसरट भांड्यात काढून किंवा लहान लहान कपांमध्ये काढून त्या उकळत असलेल्या पाण्यांमध्ये हे भांड किंवा ती सगळी कपं ठेऊन वरून झाकण ठेवावे (झाकण उपडे ठेवावे जेणेकरून वाफेचे जमा पाणी परत त्यात सांडू नये …. मी काचेचे झाकण असलेल्या फ्रायपँन चा उपयोग करते)
* फक्त ५-७ मिनिट मध्यम आंचवर तसच होऊ द्यायचं ….
* नंतर टूथपिक टाकून चारही बाजूने शिजले असल्याची खात्री करून घ्यायची (टुथपिक आत पर्यंत टाकून बघायच... काहीही चिकटून आल नाही तर समजायचे खरवस तयार आहे)
* खरवस तयार आहे पण थंड करून खायची मजाच वेगळी म्हणून निदान अर्धा तास थंडगार करायला फ्रीज मध्ये ठेवायचे ……
* काढून त्यावर वरून (आवडत असल्यास) जायफळाची पूड पसरायची …
* खर्वस नुसत देखील खाता येत तसेच फळांच्या तुक्ड्यांसोबतहि खाता येत (आंबा, लीची, स्त्राव्बेरी, अननस इ.)

टीप ; जास्तीची साखर घालण्याची गरज नाही मिल्कमेड असल्याने खर्वस बेताचा गोड होतो
मिश्रण ओतयच्या भांड्याला तेल-तुपाचा हात लावायची गरज नाही ….
ढोकळा पात्र किंवा इडली पात्रात सुद्धा हा पदार्थ करता येतो ……

तर खर्वस करायला आता गायीच्या ताज्या चिकाची वाट बघायची गरज नाही …
अतिशय चविष्ट आणि उत्तम दर्जाचा खरवस अगदी घरीच दहा मिनिटात तयार करता येतो ….

मी यानंतर अनेकदा खर्वस स्वतः बनवून मन भरेल इतपत खाल्ला देखील आहे …. आमचा मूवी बघायचा मुहूर्त मात्र अजून काही निघेना झालाय......

1390634842081.jpg1390634841748.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुदा ही पाक्रू माझ्याकडच्या पुस्तकात भोप्पा दही म्हणुन आहे Uhoh
आज कन्फर्म करते. खरवसासारखे लागत असेल तर मग मज्जाच आहे Happy

अगो ने ही पाकृ दिली आहे.....पण त्यात मिल्क पावडर वापरली आहे.

मिल्क पावडर न वापरताही खरवस चांगला होत असेल तर छानच....कमी कॅलरीचा खरवस होईल.

वर्षा .........
इकडे नागपुरात हल्दिराम मध्ये छोट्या मडक्यात मिष्टी दही म्हणून एक प्रकार मिळतो … तो पण असाच तयार केला जातो फक्त त्यात दही जर जास्त आणि साखर सुद्धा अधिक घातली जाते … मी सांगितलेले प्रमाण म्हणजे परफेक्ट हॉटेलचे खरवस

sonalisl :- कंडेनस्ट मिल्क मध्ये किती कॅलरीज असतात मला नक्की माहिती नाही बर का …

धन्यवाद, चायनाग्रास अजुनही मिळाले नसल्याने ति कृती करताच आली नाहिये, ही करुन बघेन.
>>> कंडेनस्ड मिल्क <<< अन नेहेमीचे चितळे/कात्रज दुध यात फरक काय असतो? कंडेनस्ड मिल्क नसेल तर काय करावे?

अन नेहेमीचे चितळे/कात्रज दुध यात फरक काय असतो? कंडेनस्ड मिल्क नसेल तर काय करावे?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>कंडेनस्ट मिल्क म्हणजे दुध नसतं …… बासुंदी किंवा रबडी आणि मावा यांच्या मधला काहीतरी हा प्रकार आहे …. मिल्कमेड म्हणून याचा टीन मिळतो बाजारात मिठाई वगैरे करण्यासाठी वापरतात

@ वर्षा_म - भोप्पा किंवा मिष्टी दहीही म्हणतात वाटतं. फक्त ते बेक केलेलं असतं. पण खरवसासारखंच लागतं.
मी, वर सांगितलेलं मिश्रण पोळीच्या डब्यात घालून, घट्ट झाकण लावून एक शिट्टी काढते. एकदम छान होतो खरवस.

कंडेनस्ड मिल्क ....म्हणजे घट्ट दूध....पाणी काढलेले.

sonalisl :- कंडेनस्ट मिल्क मध्ये किती कॅलरीज असतात मला नक्की माहिती नाही बर का …>>>हो...पण अगो च्या पाकृ मधे.... तू दिलेले पदार्थ + समप्रमाणात मिल्क वापडर आहे.

एक प्रयोग फसलाय.....काय चुकले तेच कळले नाही.>>>>>>>>>>>>>>>>झाकण उपडं ठेवायला विसरू नये …. आणि मध्यम लो वर अगदी ५-७ मिनिट होऊ द्यावा …. बघता बघता तयार होतो …. गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवावा …. कुकर मध्ये करू नका …. झाकणाचा फ्रायपँन असेल तर अति उत्तम

मी कूकर मध्येच केला होता>>>>>>>>>>>>>>गरजच नाही …नुसत्या पसरट भांड्यात होतो तो लगेच …. एकदा या पद्धतीने करून बघ...

जराशी वेगळी पण सोपी रेसीपी दिसतेय.
मी देखील हेच लिहायला आले होते की हा फोटो दिनेशदांच्या खरवस रेसीपीचा आहे..

अवांतरः (दुसर्‍यांचे फोटो वापरण्याआधी पुर्व परवानगी घेतली असेलच ही अपेक्षा.. )

सारिका … पियू आणि मंजूडी >> मी हा फोटो इंटरनेट वरून घेतलाय …. इंटरनेट वर खरवस या नावाखाली हा फोटो उपलब्ध आहे तो तिथून घेतांना चोरी बिरी असा उद्देश नव्हता इकडे विदर्भात वगैरे खर्वस हा शब्द फारसा लोकांना माहिती नाही …. निदान बघून मी नेमक्या कोणत्या पदार्था बद्दल बोलतेय हा अंदाज यावा यासाठी तो टाकलाय ....Symbol म्हणून

त्यातल्या त्यात पहिल्याच कॉमेंट मध्ये मी हे लिहिणार होते पण पोस्त टाकल्यावर काही सेकंदात मी ती संपादन करायला घेतली आणि संपादन करून बघते तर इतरांचे प्रतिसाद सुरु झाले होते …. त्यांना उत्तर देण्याच्या नादात परत विसरले … आणि राहिला प्रश्न चोरीचा तर इथून चोरून इथेच टाकायचा मूर्खपणा अस्सल चोर करत नाही …. आणि चोरायला बरच काही आहे इथे नेमक खरवस च्या फोटो च मी काय करू सारिका...… तेव्हा कृपया ………

मामी, जर kharavas असं गुगल केलंत तर दिनेश यांचा फोटो त्यात येत नाही (पेज स्क्रोल डाऊन करुन खाली गेल्यास पाकिस्तानी वाटणार्‍या बायकांचे फोटो का आहेत ते कळलं नाही)
देवनागरीत खरवस असा सर्च केल्यास वरचा फोटो त्यात दिसतो.

मयी, तुमचा उद्देश वेगळा असेल, पण प्लीज तुम्ही दिनेशदांची परवानगी घ्याल का? कारण इंटरनेटवरचे फोटो, जे प्रताधीकारमुक्त नसतात, ते वापरल्यास गुन्हा ठरतो. मायबोलीवर प्रताधीकाराबद्दल जागरुकता आहे.

Pages