पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्वाक करा

मला चिपोटलेच्या रेसेपिने केलेला आवडतो - https://www.chipotle.com/guac-recipe

अ‍ॅव्हाकॅडो स्प्रेड म्हणून मस्त लागतो बर्‍याच सँडविच मध्ये. माझे आवडते म्हणजे ब्रेड लाईट टोस्ट करून घ्या, अंडे फ्राय करून घ्या पिवळा भाग थोडा रनी रहायला हवा. वरतून थोडे मिठ आणि मिरपूड टाका. आता ब्रेड ला मॅश केलेला अ‍ॅव्हाकॅडो लावा. त्यावर अंडे टाका आणि दुसरा ब्रेड! हे लै झाक लागते. ग्रील्ड चिकन सॅलड आणि सँडविच मध्येही चटणी / मेयो ऐवजी अ‍ॅव्हाकॅडो वापरता येते.

अव्होकाडो पराठे पण उत्तम होतात, थोड लिन्बु पिळायच मॅश करुन , मग बाकी माल मसाला,कनीक कोथिबिर वैगरे घालुन मळा, लाटा आणी ईटा!

(रेसिपि नको असेल तर चेहर्‍याला चोपड्यालास तजेला येईल, मॅश करुन केशाना लावले तर नरिशिन्ग होइल.)

वेका, नलिनी आणि धनी, एकाचा Guacamole बनवुन नाचोज बरोबर फन्ना उडवला आणि मगच इथे थँक्स म्हणायला आले. फारच टेस्टी प्रकार होता.

प्राजक्ता, उरलेल्या दोनचे उद्या पराठे करेन. लाटलयावर आणि इटल्यावर अभिप्राय द्यायला येइनच.

मग एकची स्मुदी. आणि शेवटचं एक स्कीन आणि केसांना वापरेन.

हुश्श ! तुम्हा सगळ्यांमुळे एकही वाया जाणार नाहीए. Happy

हे माझं इन्ट्युइशन आहे पण साधारण वाफ आणणे म्हणजे आचेवर असलेल्या भांड्यावर झाकण ठेवून त्या झाकणाला वाफ दिसायला लागली की वाफ आली? बरोबर का?

माझं इंट्युशन झाकणावर पाणी ठेऊन त्या पाण्याला वाफ आली की. फक्त या मेथडने कुणी मला दोन वाफा काढ म्हटलं तर स्टुडन्टची दांडी गुल Wink सशल पण तेच म्हणत असावी मी फक्त थोडं वलय दिलं झाकणावर पाणी वगैरे लिहून Proud

ज्या भांड्यात पदार्थ गरम करतोय त्या भांड्यावर झाकण ठेवून मंद पेक्षा कमी आचेवर २ ते ४ मिनिटं ठेवायचं. यामु़ळे आतल्या पदार्थाला वाफ येते. ही एकद वाफ आली असं म्हणायला हरकत नाही. असंच रीपीट मारलं की दोन वाफा.
ज्या पदार्थांत मुळात पाणी कमी असतं त्यावेळेला वरच्या झाकणात पाणी ठेवायचं. त्यामुळे भांड्यातला पदार्थ लागत नाही/ करपत नाही. उदा: शेंगभाज्या परतून करतांना, कारलं परतून करतांना इ.
अशावेळेला वरच्या पाण्याला वाफ आली की पदार्थाला वाफ आली असं म्हणायला हरकत नाही.

आता (तरी) तुम्ही पुरेश्या कन्फ्यूज झाल्या का (नाही)? Wink

साधी वाफ आणि पाण्याची वाफ वेगळी वेगळी असते. पाण्याची वाफ तर पोह्याला पण काढतात. भाज्याना पाण्याची वाफ काढली तर ते पाणी भाजीत पण टाकतात. हल्ली ताटापेक्षा हँडल असलेलं काचेचं झाकण जास्त वापरले जाते त्यामुळे पाण्याची वाफ प्रकार अगदीच बंद झाला आहे. काचेवर वाफ धरली की वाफ आली समजायचं आणि पदार्थ शिजला का ते बघायला तोंडात टाकायचा Wink

अवाकाडो ची कोशिंबीरः अवकाडो मध्यम आकारात कापायचे, त्यात काकडीचे तुकडे बारिक चॉप केलेले, मीठ, कोथिंबीर, हि. मिरची बारीक चिरून घालयची (बारीक चिरलेला कांदा ऑप्शनल) आणि फेटलेले दही मिसळून हल्कं मिक्स करायचं, ही आमच्याकडे आठवड्यातून एकदा तरी होतेच. ही नेपाळी पद्धत आहे.

अवाकाडो मॅश करुन त्यात तिखट किंवा बारीक कापलेली हिरवी मिरची , कांदा , टोमॅटो, मीठ घालुन सँडवीच स्प्रेड करुन सँडवीच मस्त लागतात

प्राजक्ता, Avocado पराठे बनले आज. त्याला स्वतःची काही फार ग्रेट चव नसल्यामुळे बाकी अ‍ॅड केलेल्या जीरा/धना पावडर, कोथिंबीर, थोडी मिरची-गार्लीक पेस्ट यामुळे तिखट ठेपल्यांसारखी चव आली होती. टेक्सश्चर मात्र् मस्त मऊ आणि छानच होतं. नेहमीच्याच स्मुदीपेक्षा, कधी कधी हे करुन पहायला हरकत नाही.

आशु & आदिती, तुमच्या रेसिप्स साठी थँक्स. पुढच्या आठवड्यात नक्की ट्राय करेन. माझ्याकडे दर आठवड्याला ४ चं पॅकेट डिलिवर होतं. वेगवेगळ्या रेसिप्स मिळाल्या तर हव्याच आहेत. Happy

मनी,
अव्होकाडो भारतात कितीला आहेत? त्याचा साधा उपयोग करता येईल का? (म्हणजे कापून खाणे वगैरे)
मला एकदा घेऊन बघायचे आहेत.

मनिमाउ, सह्मत अव्हाकाडो पराठे म्हणजे मी काहि नाखट मेबरासाठी शोधलेला पर्याय आहे, मलाही ग्वाक्मोलच जास्त आवडत.
पराठ्याना वरुन तेल तुप फार काहि न लावता मौ होतात.

भरत, सगळ्यांनी उल्लेखलेली लोलाची रेसिपी आयती शोधुन दिलीत. थँंक्स !

अनु, मला ४चं पॅकेट १००-१२० रुपयांना घरपोच देतो. पण थंडीमधे २-३ महिने २२० रुपये. तुला हवा असेल तर नंबर नोट कर - ८४४६४२०८०८. मार्केट यार्ड मधे गाळा आहे, पण मला घरी/ऑफिसमधे आणुन देतो. इतरही बर्‍याच भाज्या ( बेल पेप्पर्स, मश्रुम, सेलरी, ब्रोकोली, पार्सले, बेबी कॉर्न, झुकिनी इ इ ) आश्चर्यकारक कमी किंमतीत देतो ( दोराबजीशी तुलना केली तर या भाज्या निम्म्या किंवा पाव किंमतीत मिळतात). शिवाय एकदम फ्रेश.

पराठ्याना वरुन तेल तुप फार काहि न लावता मौ होतात. - हो प्राजक्ता. अगदीच. Happy

मनि, धन्यवाद, नंबर नोट केलाय. आमच्या एरियात देतो का बघते.
ग्रीन टोकरी वर पण घरपोच अव्होकाडो आहेत.
हिंजवडीत डिलीव्हरी पाहिजे असल्यास किमान ऑर्डर ५०० रु आहे. बाणेर बालेवाडी पि.सौ. इ. ला मिनीमम १००.
त्यांच्या कस्टमर सर्व्हिस वाल्या बाईशी(चांगली ज्ञानी वाटत होती, कॉल सेंटर वाली नसून चालवणार्‍यांपैकी कोणी असावी.) जरा यावर काथ्याकूट केला होता. 'बाणेर पासून हिंजवडी ४ किमी आहे, ४ किमी जास्त जाण्यासाठी तुम्हाला ४०० रु जास्त ची ऑर्डर का लागते' इ.इ.ती बाई म्हणाली हिंजवडीत आम्ही सर्व उपक्रम राबवून पाहिले आहेत पण तिथे खाण्यापिण्याचा प्रश्न येतो तेव्हा लोक सॅलड ऐवजी जंक फूड वर पैसे खर्चणे जास्त पसंद करतात.
बिग बास्केट वर सॅलड्स आहेत ग्रीन टोकरी ची.

अव्होकाडो ग्रीन टोकरी वर ऑनलाईन, औंध च्या परिहार चौक च्या फळवाल्याकडे पण पाहिलीत.
कधीकधी स्टार बाझार मध्ये आणि गोदरेज नेचर बास्केट मध्ये पण.
http://www.greentokri.com/
आय टी बी(आता टिएटो) या कंपनीच्या जुन्या जर्मन मालकाने पुण्यात शेती चालू केली काही वर्षापूर्वी,
यांची रेडी टु इट सॅलड चांगली असतात. ड्रेसिंग पण फॅटी नसते जास्त.

मनि, धन्यवाद, नंबर नोट केलाय.
बघते माझ्याarea मध्ये देतो का
काही सजेशन्स असतील तर सांग .

मनि, धन्यवाद, नंबर नोट केलाय.
बघते माझ्याarea मध्ये देतो का
काही सजेशन्स असतील तर सांग .

खरवस करताना साधे दुध जरा जास्त पडलेय. वड्या झाल्यात पण चव तेव्हडि चांगली लागत नाहीये. काय करता येइल?

तमिळ लोक वत्थल करतात त्यात त्रिफळाच असते का? की वेगळे काही असते? मी काल शक्तीचा वथ्थल मसाला आणला. तो थोडा सांभार पावडर सारखा असतो. त्रिफळाच्या बीया आहेत घरी. त्यातले काळे मणी काढून टाकायचे असतात ना?

Pages