निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवासात टिपलेले काही मोर....

फोटो काढला तेव्हा हा मोर ५/६ फुटांवर होता... माणसांची सवय असावी... कारण बुजत नव्हता. १५,२० फुटावरून माझ्या दिशेने आला. मान वेळावून आजुबाजुला बघितलं आणि त्याच्याच तोर्‍यात निघूनही गेला...

प्रचि... ०१

मोराचा फोटो मस्तच.. चक्क डोळ्यात निरु दिसतोय त्याच्या !!

कर्नाळा अभयारण्यात पुर्वी पक्ष्यांचे पिंजरे होते, तिथे एक धीट मोर होता. चार लोक जमले कि तो पिसारा फुलवून नाचू लागायला.. ऋतू कुठलाही असो.

सुरेख फोटो निरु.. मोराच्या डोक्यावरच्या तुर्‍यालाही मोरपिसांसारखी (त्या आकाराची) हे माहित नव्हत.. आज तुमच्या क्लोझअप मुळे कळल

जबरदस्त आहे मोराचा क्लोज-अप!>>>>>> +१

शोभा१, गुलबक्षी सुरेखच.दुसरा फोटो तर एकदम मस्त.

सुप्रभात...

गुलबाक्षी खुप गोड...:)

अन्जु ताई, अस नको म्हणुस प्लीग, हळु हळु सरावाने चांगले फोटो येतात.. Happy

आहाहा शोभा काय सुंदर फुले आहेत ग. माझ्याकडे पिवळी आहे.

सायली गोकर्ण छान.

अन्जू आपल्याला निसर्गातील घटक कसेही फोटोत आवडतात. आणि तुमचे फोटो इतकेही न टाकण्यासारखे नसतात हो. टाकत रहा.

भारद्वाजाचे दर्शन घ्या.

प्रवासात टिपलेले आणखी काही मोर....

हा मोर पाहिला तेव्हा एकटाच होता. आजूबाजूला लांडोरी नाहीत की आकाशात ढग नाहीत.. पण चालता चालता मधेच थबकला आणि किंचित आमच्या दिशेला वळून पिसारा फुलवला...
नाच नाही काही नाही..
बस, थोडासा पिसारा मिरवला...
जणू एखाद्या नुकत्याच मोठ्या होत असलेल्या लहान मुलीने आईचा भरजरी शालू नेसून हातावर लफ्फेदार पदर घ्यावा आणि मिरवावा तसा...

प्रचि... ०१

प्रचि... ०२

प्रचि... ०३

हे फोटो आहेत की पेंटींग ! जबरदस्त. इतक्या जवळून स्पष्ट मोर आणि मोराचा फोटोही पहिल्यांदाच पहातेय.

निरु, निव्वळ नयन सुख... क्या बात है! असे वाटते आहे. असंख्या पाचुंची उधळण होते आहे....
दुसरा फोटो गजब... मानेच्या मागचा भाग काय मस्त आलाय... त्या मोराला पण माहिती नसेल आपण ईतके सुंदर दिसतो ते...

आहाहा मोर, वा क्या बात है.

बाबा लहानपणी रामनगरमधे न्यायचे खास मोर बघायला. तिथे 'नवरे' यांनी पाळलेला मोर होता. तो कधी कधी छान पिसारा फुलवुन नाचायचा.

सायली पांढरी गोकर्ण मस्त. माझ्याकडे हल्ली पांढरी आणि जांभळी दोघांना मस्त बहर आहे.

जागु भारद्वाज एकदम सही.

Pages