निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुदुपार..

दुपार शेंद्री, ज्यांना ज्यांना हवीये, त्यांनी गटङ मधे जागु कडुन बिया घ्याव्यात... Happy

हेमा ताई काय क्लास फोटो....:)

वरच्या फोटोत आहे ती शेंद्री काय? माझ्याकडच्या जंगलात आलीय.

शेंद्री, गणेशवेल वगैरे बीया म्हटले तर फार घातक. त्यांना मरण नसतेच. मी कित्येक वर्षांपुर्वी गणेशवेलीचे रोप नर्सरीतुन आणुन लावलेले. नंतर ते पुर्णपणे काढुन टाकले. पण ते अजुनही माझा पिच्छा सोडत नाही. माझ्या दोन शेजा-याच्या बागेतही ते वाढतेय. माझीच बाळे आहेत तिथे. अबोलीही तशीच. माझ्या शेजा-याकडुन एक रोप मी आबलेले. आता माझ्या कित्येक कुंड्यात ती स्वतःच वाढतेय. Happy

फुलपांखरूं
छान किती दिसते फुलपांखरूं

या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हंसते
फुलपांखरूं

पंख विमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते
फुलपांखरूं

डोळे बारिक करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते
फुलपांखरूं

मी धरूं जातां येइ न हातां
दूरच ते उडतें
फुलपांखरूं

बाल भारतीतली कविता आठवली का नाही!!!! Happy

वा सायली मस्त.

ही शेंद्री का. ओके बर झालस फोटो टाकलास.
फुलपाखरू छान. नविन कॅमेरा घेतलास का?

तुझ्या फोटोसाठी झब्बू

चनस सुंदर आहे शेवंती.

मस्त फुलपाखरू.

माझा सोनटक्का Sad

काल छान कळ्या दिसल्या. मी खुश. एक फुल मिळाले. आज काही फुले आतल्याआत येऊन कोमेजतायेत असं दिसतंय. लहान कुंडीत तिसरा बहर म्हणून असं का?

आधी पहिल्या कणसाला ७ फुले आली पण नीट आली नंतर तर २५, सर्व मस्त मिळाली. आता का असं.

अन्जु , आता तो कोमेजणारच, माझ्या कडच्या ने पण माना टाकल्या, पण कुंडीत त्याचे कंद असतात , त्याला पावसाळ्यात कोंब फुटतात मग ऑगस्ट ते डीसेंबर पुन्हा फुलं येणार ... (हे सगळ मागे जागुनीच सांगीतल होते.. )त्यामुळे काळजी करु नकोस..

फुले बाहेर न पडता का कोमेजतात, अशी वर येऊन फुलतातना तशी न येता आतल्याआत किंचित फुलतात, काढता येत नाहीयेत, फार नाजुकना. वाईट वाटतंय.

सगळं जमेल तसं वाच्तेय. पण वेळ नाहीये. .....अजून काही लिहायला , फोटो डकवायला.
एका कुंडीत अमांडाच्या खोडावर एक वेली वेटोळी घालून वर चढलीये. ही वेल/फूल कशाचं?

स्निग्धा जागू दिनेश धन्यवाद.
बरोबर.. ... चवळी भिजत घालताना न भिजणारे "चाड" .....त्या कुंडीत टाकले असणार. तरी काढून टाकीन तो वेल.

पंख चिमुकले निळे जाम्भळे

खूप वर्षांपूर्वी लोकसत्तात एक विनोदी लेख आलेला, त्यात गुरुजी मुलांकडून हि कविता वाचून घेतात असा सिन होता. मुलगा निरागसपणे वाचतो

पंत ची मुतले नीले जाम्भले...

पंत ऐकून निळे जाम्भळे होतात.

रात्री फुले तोडू नयेत पण आज माझा नाईलाज झाला, आतल्याआत सोनटक्कयाची फुले का फुलतायेत, हे कळत नव्हतं आणि कुंडी एकटी काढून बघू शकत नव्हते. त्यामुळे नवरा आल्यावर त्याच्या मदतीने ग्रीलमधली कुंडी काढली आणि हळूच फुलांच्या बाजूचे कणसाचे हिरवे आवरण बाजूला केले. तर देठ आतल्याआत फोल्ड झाले होते ते अलगद सोडवले आणि ५ फुले फुलणारी काढली. आता उद्या देवाला तरी वाहीन. फोटो मात्र काढला नाही.

हो ना हेमाताई. केवढी खुश होते मी तिसऱ्यांदा फुले येणार म्हणून, एक आज कोमेजले आतल्याआत म्हणून ही आयडिया केली तर आज ५ फुले नीट मिळाली पण ती हलक्या हाताने कणीस सोडवून, फोल्ड झालेले देठ अलगद काढून मोकळी करायला लागली आता रोज फुले कशी येतायेत लक्ष ठेवायला लागणार. कणीस घट्ट का राहिले ते फुलांचे देठ आतल्या आत दुमडले का गेले, कळतंच नाहीये.

एकदाची शेवंती उमलली आमच्याकडे..>>>>>>> किती दिवसांनी चनस? माझी शेवंती अजून अबोलच आहे.मुक्या कळ्या,दीड महिना झाला तरी मुक्याच आहेत. कापायला मन धजावत नाही.

आज शनिवार आरामाचा दिवस.

ही आमच्या कोकणातली मनी. पिल्ल्लं चार्जिंगला लावली आहेत ( स्मित) आत्ता निवांत वाटतायत, पण मस्त खेळायला लागली आहेत आता. मस्ती कुस्ती चालु होईल पोट भरलं की. नाव पण क्यूट आहेत त्यांची इना मीना आणि डिका

From mayboli

अन्जू, खुप थंडी पडलीय का ? त्याने असे होऊ शकते. जर झाडे जोमदार वाढत नसतील तर कापून टाकायची. नवी वाढ जोमदार होईल. कदाचित कुंडीत झाडांची गर्दी पण झाली असेल.

मानुषीताईला नि.ग. परीवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

दिनेशदा धन्यवाद.

इथे मस्त हलकी गुलाबी थंडी. अजून दोन रोपे फुटली आहेत पण लहान आहेत. कुंडी लहान असल्याने येत असेल प्रॉब्लेम आणि दोन रोपे बहरली त्याला नाही आला. दुसरी रोपे काढून दुसऱ्या कुंडीत लावेन पण ह्या एका कुंडीत समहाऊ फुले येतात बाकी ठिकाणी सुकतात. मातीत फरक झालाय का, मला आठवतंच नाहीये, नक्की कुठली माती मी तिथे वापरली.

मानुषी ताई, वा.दि.हा.शु..

अन्जु ताई, बर सुचलं तुला , त्यामुळे निदान फुलं मिळाली तरी तुला...
दिनेशदांनी बरोबर उपाय सांगीतलाय..:)
साधना ...:)
पिल्ल्लं चार्जिंगला लावली आहेत .. Rofl

अन्जू खर सांगायच तर आता सोनटक्क्याच्या फुलांचा सिझन संपत आला आहे. त्यामुळे कदाचीत तशी फुले येत असतील. पावसाळ्यात सोनटक्का चांगल्या प्रतिचा बहरतो. हिवाळ्यात क्वचीत येतो. हवामानाचा परीणाम असावा.

पण काळजी करू नका. त्याचे कंद खाली असतात व ते पसरत असतात.

Pages