निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग तूला एक नवीन पिक मिळाले बघ. प्रा. घाणेकरांच्या मते आपण काही ठराविक धान्यांच्याच मागे लागलो आणि चवदार, पौष्टीक अशी धान्ये, जी पुर्वी वापरात होती, ती विसरलो. हे खरे तर घातक आहे.

Dillenia suffruticosa

राणीच्या बागेत एक झाड आहे. त्याला पिवळी फुले येतात आणि गुलाबी फळे, ती फळे उकलल्यावर फुलांपेक्षा जास्त सुंदर दिसतात. मी आणि जिप्स्यानेही त्याचे फोटो टाकले होते पण नाव आम्हाला माहीत नव्हते.

बी ने याचे फोटो फेसबूक वर टाकले आणि चक्क नंदन कलबाग यांनी त्याचे नाव सांगितले... खुप छान वाटले.

आता मला फोटो सापडणे कठीण आहे, पण या नावाने गुगलून बघता येईल.

का कोण जाणे, Dillenia suffruticosa चे फळ मागे कुणीतरी टाकलेल्या शेन्गा फुट्णार्य व्हीडीयोतल्यासारख्या फूट्त अस्साव्यात असे वाटते... मस्त दिसत आहेत.

इंद्रा, बुलबुल फोटो मस्त.

दिनेश, ते फळ किती मस्त दिसतय. पहिल्यांदाच पहातेय.

आमच्या कोकंणात संध्याकाळच्या वेळी टिपलेली ही सुतार पक्ष्यांची जोडी. सूर्य मावळताना दोघे ही आले झाडावर.

DSCN3333.jpg

आणि ही माझी रिक्षा. निगकरांना नक्की आवडेल.

http://www.maayboli.com/node/56844

आमच्याकडे एक चाफ्याचे झाड आहे त्याचे फुल आकाराने खुप मोठे असते..

आणि या स्पायडर लिली कडे बघूचांदण्याचांचाच भास होतो.

चांदण्याचे शेत.

आहाहा मस्त कलरफुल फोटो, दिनेशदा.

एम आय डी सी डोंबिवलीत इंडस्ट्रियल एरियात एका रोडवर चाफ्याची खुप झाडे लावली आहेत. त्यात सोनचाफा नाहीये पण पांढरा, थोडा पिवळसर, गुलाबी, लालसर असे विविध प्रकार आहेत.

परवाच एका रोडवर कांचनचीपण बरीच झाडे लावलेली बघितली, नक्की कुठला रोड, आठवत नाहीये. इथलाच डोंबिवलीच्या आसपासचाच भाग. लहान आहेत अजुन झाडं पण एकाला पांढरी फुले आली होती.

डोंबिवलीत आहे मात्र झाडांची श्रीमंती काही ठिकाणी, आनंद होतो बघुन. Happy

दिनेशदा एक मोर रामनगर भागात पण स्टेशन परिसरात होता, पाळलेला होता पण मस्त फिरायचा. शहरात पण काही रस्त्यांवर अजूनही छान झाडे आहेत.

आसपासच्या परिसरात बागडणारे मोर मात्र नाही बघता आले, बाबा फक्त रामनगरचा मोर बघायला न्यायचे. जवळ होताना आमच्या तो परिसर. आमचा रोड तर मुख्य रहदारीचा आहे पण बकुळीची अनेक झाडे आहेत. काही ठिकाणी पिंपळ आणि पर्जन्यवृक्ष पण आहेत. पण काही भागात खुपच झाडे आहेत. आतल्या शांत रोडवर.

राजस कांचन निव्वळ नयन सुख...:) आभार दिनेश दा,
फुलांची रंगसंगती खुप लोभसवाणी, पाने आणि कळ्या देखिल काय गोड दिसतायत..
दा, भारतात आहे का हा राजस कांचन?
स्पायडर लीली खरच चांदण्या समिप..
चाफा देखिल टवटवीत...
सुतार पक्षाची जोडी एखाच्या पेंटीग सारखा भास होतोय..

फारच मस्त फोटो - सुतारपक्षी आणि इतर फुलांचेही ....
राजस कांचन तर कधी गुलमोहराच्या फुलासारखा तर कधी कर्दळीच्या फुलासारखा वाटतोय .... Happy Wink

दादा, मस्तच! अश्याच चांदण्यां माझ्या बालपणीच्या आठवणीत पण आहेत.
ममो, सुतारपक्षांची जोडीपण भारीच. तुझ्या रिक्षेने फिरुन आले. तो जो मनिमोहोर आहे का म्ह्णून विचारलेस तो रोवन आहे.

दिनेशदा मस्त आहे राजस कांचन!
सुतारपक्षी, खूप वर्षांनी दिसला. कोकणात खूप दिसायचे. आणि मग सुतारकाम करत बसायचे. Happy

राजस.. मी ठेवलेलं नाव, खरे नाव नाही. पण हि खास तयार केलेली जात वाटतेय. अगदी कमी उंची असतानाही फुले येतात. भारतात कामाची नाही... सगळी फुले देवावर वाहून ती मुर्ती झाकून टाकली जाईल आणि झाड उघडे पाडले जाईल.

I am back ... AddEmoticons0424.gif

हुश्श झाल्या बा एकदाच्या सगळ्या पोश्टी वाचुन...
आता प्रत्येकाची हजेरी नै घेत पण माहिती आणि प्रचि सगळेच मस्त आलेत..

तुमाले म्हणुन सांगतो,
नेट चा न कळल्यापासुन मोठ्ठ्या स्क्रिन वरच वाचनं बघण चालते..आणि माझं इतकी वर्ष जित्त असलेल्या डोंगलाला डोंबलाचे बंद व्हायचे डोहाळे लागले म्हणुन इतके दिवस कोमात होती.. त्यात घरी गेली होती काही मैने,, त्या मोबाईलच्या इतकुश्या स्क्रिन वर वाचन न प्रतिसाद देण म्हणजे डोक्याला ताप म्हणुन कस्काय वर जरा अधे मधे ग्रुप मदे डोकवायची बास...

असो..
आता बर्‍यापैकी रेग्युलर राईन असा वादा वगेरे तर नै करणार पण चक्कर नेमीची ठेवत जाइन..
असो.. बाकी चालुद्या...

Pages