निसर्गाच्या गप्पा (भाग २८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 October, 2015 - 01:38

नमस्कार
सध्या सोनटक्का, गुलाब, झेंडू अशी फुलझाडं छान बहरली आहेत. पक्षांची घरटी तयार करण्या साठी लगबग चालू आहे. काही पक्षी पिल्लांना घास भरवताना दिसू लागलेत.
पण या बरोबरच एक खंतही आहे. ती म्हणजे अत्यंत कमी झालेला पाऊस.
मी एक कविता लिहिली होती
आहेत तोवर पाहून घ्या
झाडं, रोजच मोजून घ्या
बेरीज शिकता येणार नाही
वजाबाकी शिकून घ्या ....
गंमत म्हणून ठिक आहे असं म्हणायला, पण हे दुर्दैवी चित्र आहे. निसर्गाला तोल राखणं आता कठीण होतय अस वाटतं. दुष्काळ, काही ठिकाणी पूर, भुकंप, ढगफुटी, वाढती उष्णता ही त्याचीच प्रतीकं असावी. आपल्या जवळ जवळ सर्वच कृती निसर्गाला त्रासदायकच आहेत असं वाटत रहातं. अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टींमधे हे जाणवतं. प्लॅस्टीकबॅग नको म्हणून कागदी पिशव्या वापराव्या तर त्यासाठीही झाडांचाच जीव जातो. कागद वाचवण्यासाठी ई कम्युनिकेशनचा वापर केला तर त्याच्या वेव्हज मुळे पक्षी डिस्टर्ब होतात. अशी साखळीच सापडत जाते. आपल्या बरोबरच मुलांमधेही निसर्गप्रेम आणि जाण निर्माण व्हावी हे चांगलं आहे. शाळांमधेही पर्यावरणाचा विषय असतो पण मुलांना त्याबद्दल आकर्षण, उत्कंठा, रस वाटण्या ऐवजी त्याना त्याचा त्रासच होताना दिसतो. त्यात लिहावा लागणारा प्रोजेक्ट हा तर निसर्गासाठी फायद्याचा की तोट्याचा? कारण जे मनात रुजायला हवं, ते न होता प्रोजेक्ट खरडायला हजारो मुलं लाखो कागद संपवतात आणि रुजलेल्या झाडांचच नुकसान होतं. असे अनेक विरोधाभास दिसत रहातात. अशा करुया की ही परीस्थिती बदलेल.
असो, निसर्ग म्हटलं की छान, सुंदर असच चित्र उभं रहातं आणि तसच बोलावं लिहावं असं वाटतं. पण वर लिहीलय तीही एक बाजू आहेच.
"निसर्गाच्या गप्पा" या उपक्रमा मुळे बरेच निग प्रेमी एकत्र आले आणि खूपच माहितीची देवाण घेवाण झाली. मुख्य म्हणजे एखादी शंका कोणाला विचारावी हा प्रश्ण सुटला. एखादा प्रश्ण विचारला की जाणकारां कडून लगेच हवी ती माहिती मिळते. याचे असेच शेकडो भाग होवोत आणि निसर्ग प्रेमाचा झरा असाच खळाळत राहो.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी जो-एस यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या जगातील वाईटाचा अनुभव नाही, दुष्टाव्याची जाण नाही आणि म्हणूनच भयभीतीचा लवलेश नाही.
आणि असेलच कसा, कारण त्याच्या साठी(द्रुष्टिने)एका अंगाला अख्ख्या जगातलं सारं वात्सल्यं एकवटलेली आई आणि दुस-य्या बाजूला जगातील सर्वात सामर्थ्यवान गोष्ट म्हणजे त्याचे बाबा.....>>>> क्या बात है!

अच्छा कारल्याचे होय!
निरु, जब्बरी फोटो, आणि त्याहुन कीत्ती तरी पटीने जब्बरी लिखाण..
क्या बात है! घरी जाता जाता अस काहीतरी वाचायला मिळावे...मस्त! Happy

आहाहा....... क्या बात है,निरू .. हा फोटो म्हंजे सो सो क्लासी.. एकेक पंखाचं मऊपण इथपर्यन्त अनुभवता येतंय..
फोटो आणी वर्णन...... ग्रेट ग्रेट!!!!!!!!!!!

नलिनी, सायु, वर्षू नील धन्यवाद...
वर्षूनील हा फोटो निकाॅन Cool Pix 100 ह्या कॅमेर्‍यातुन काढला आहे..

निरु, जब्बरी फोटो, आणि त्याहुन कीत्ती तरी पटीने जब्बरी लिखाण..>>>>+१११११

हा फोटो पावसाळ्यातला आहे. मी फ्लेमिंगो पहायला गेले होते तेव्हाचा. उरण पाणजे येथिल. ह्या जागेला आत्ताच सरकारकडून अभय अरण्य म्हणून घोषीत करण्यात आल आहे.

जागु, सुन्दर फोटो......ओल्या कचर्याच्या बागे सन्दर्भात माहिती दे....सदध्या मी मातीविना झाडे लावायचा प्रयोग करतेय.

ओरिसात पट्ट्चित्रात नैसर्गिक हिरव्या आनि गुलाबी रन्गान्साठी
गुलबक्षीच्या पानान्चा व फुलान्चा उप्योग करतात.

अनघा छान माहीती गुलबक्षीची.

मागच्या भागांमध्ये आले आहे ओल्या कचर्‍यापासून खताबद्दल. एक लेखही कोणीतरी टाकला होता. शोधावे लागेल.
आणि इथले जाणकार सांगतीलच.

काही दिवसांपूर्वी आमच्या टेरेसवरून लांब एका झाडावर हे पक्षी एकत्र दिसायचे. कॅमेर्‍यातही मला ओळखता येत नव्हते. रंगावरून साळुंख्या वाटायच्या पण फोटोत वेगळेच वाटताहेत. पक्षांची सभा म्हणतात ती हिच का?

मसाई माराच्या प्रदेशातील Little Green Bee Eater...

आजुबाजुला Famous Migration चि रणधुमाळी आणि धुळवड चालु होती...... आणि हे साहेब एकदम निवान्त..

अरे वा जागु पक्षांची शाळा.

बाबा लहानपणी संध्याकाळी न्यायचे आम्हाला रामनगर भागात, एका झाडावर कावळ्यांची शाळा भरायची. आता ते झाड नाही बहुतेक, मधे कोणीतरी फेसबुकात लिहीलं, रस्त्याच्या कामात त्याचा बळी गेला Sad . मी स्वतः त्या भागात जाऊन बघितलं नाहीये अजुन.

नीरु फार गोड पक्षी, इंद्रधनुष्य मस्त फोटो.

जागु ती पक्षांची सभा भारीये...
निरु, वेडा राघु मस्त टिपलात..
देवाचे झाड, व्वा! जवळुन बघायला मिळेल का?

जागु ते बहुतेक रोझि स्तर्लिन्ग आहेत... Its there migration time.

खालिल लिन्क मधे बघ हेच आहेत का ते...
https://www.google.co.in/search?hl=en&site=imghp&tbm=isch&source=hp&biw=...

Today upgraded to windows 10. The Marathi typing getting distorted. Erasing mistake is very difficult.
All photos beautiful!

Pages