बाराबुवा गटग (बारात बुवाच्या घरी गटग)

Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता: 
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.

सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, धागा उगडूनही एक आठवडा झाला की? बघ अजूनही. खुप आधी धागा उघडून काही फाय्दा होत नाही कारण पबलिक तारिख थोडी जवळ येऊ पर्यंत नक्की सांगू नाही शकत.

बुवा तुमच्या होम डिपोत मिळणारे फणसाचे गरे मेन्युवर टाका (आणि इतर मेन्युपण) पब्लिक लगेच कंफर्म करेल.

चित्र धमाल आहे. Happy

२४ ला जर सगळे ११, १२ वाजेस्तवर येणार असतील तर मी येऊन सर्वांना भेटून जाईन म्हणतो, जेवायला थांबू शकणार नाही, पण भेटणे महत्वाचे. १० ची वेळ, म्हणजे १२ पर्यंत लोक उगवावेत अशी आशा आहे.
पन्नास वर्षे अमेरिकेत राहिले तरी वेळेवर येणे लोकांना जमत नाही, तुम्ही त्या मानाने इथे नवीनच. त्यातून भारताशी संपर्क जास्त तुमचा! १, २ वा़जेस्तवर उगवाल!
असा मी आपला मनात विचार करतो आहे, मी आपला येऊन जाईन झाले.
इच्छा असेल तर (हो, म्हणजे आता एव्हढे वाईट्ट लिहीले तर गेलास उडत म्हणाल) पत्ता कळवावा.
धन्यवाद.

झक्की, तुमच्यासारखे सेलेब्रिटी फुकट दारू घेऊन येत असतील तर सगळे उगवतील हो बरोब्बर ११ ला Happy
दॅट रिमाइंड्स मी - जेवणाचा मेनू का ठरवत नाहीये कुणी अजून Happy वंदनाबेन आहे ना अव्हेलेबल त्या वीकेन्डाला ?

झक्की, पाठवतो पत्ता.

मै, असतील अवेलेबल वंनदनाबेन पण मी जेवायची ऑर्डर देत आहे (कोणाकडे ते ठरतय अजून) त्यामुळे कोणी प्लिज काही करुन आणत बसायचा विचार करु नका. Happy

बुवा,
कुणाकडेही दिली तरी एक ऑर्डर एन सी डिलिवरी आहे ते विसरू नका बरं का. Wink

सी चा जे करू नका नाहीतर आनंदीबाई सारखे वैद्यबुवांना ईतिहासात स्थान द्यावं लागेल. बाकी तुम्ही सुरमा वगैरे लावत नाहीच त्यामुळे काही प्रश्न नाही. Proud

बरेच दिवस (वर्षे?) झाले माबोकरांना भेटून, आता परत बाराकर झालो आहोत तर यायला सोपे पडेल.
एकदा माणसाशी विचारून नक्की झाले की नावनोंदणी करते.

बीअर नक्की. ११ ते ११:३० च्या दरम्यान पोचेन, १२ ला परत. नेहेमीप्रमाणे त्याच दिवशी मुलगा येणार, तो आला की त्याला कापायचे हा सौ. चा नेहेमीचा उद्योग. आता आम्ही त्याचे कॉलेजचे पैसे दिले हे खरे पण एव्हाना तेव्हढे पैसे नक्कीच फिटले असतील. असो.

मलाही तीन वाजता निघावे लागेल.. संध्याकाळी अजून एक पार्टी आहे..
मी एकटाच येणार आहे.. काही करून आणायचे असेल तर कळवा... Happy

झक्की, पत्ता मी कालच पाठवला. कृपया इमेल बघून कळवा मिळाला का ते.

ओके देसायनू:)तुम्हाला चहा थर्मास मध्ये भरुन देणेत येइल. Happy

गोगा, तुम्हाला कितीही पार्ट्या अटेंड करता येत असतील आता एका दिवसात. तुम्ही काय खात नाय की पीत नाय!

Pages