बाराबुवा गटग (बारात बुवाच्या घरी गटग)

Submitted by वैद्यबुवा on 29 September, 2015 - 16:05
ठिकाण/पत्ता: 
हार्डिंग टाउन्शिप, न्यु जर्सी.

सगळ्यांनी येणं जमवायचं बघा!. सध्या सहज १० ऑक्टोबर एक तारिख घ्यायची म्हणून घेतली आहे. सगळ्यांना यायला जमेल अशी तारिख नक्की करु पुढे.

विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, October 24, 2015 - 11:30 to 23:01
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा, नविन घराबद्दल अभिनंदन.. ही बातमी कशी मिस केली माहित नाही.. १० ऑक्टोबरला जमणार नाही. पण तारीख पुढे ढकलली गेली तर नक्की विचार करू. यन सीतनं बस आणण्याइतपत माणसं इथं जमलीत आता :).

अंजली, अटलांटाहून बशीने यायला एन्जे फार लांब पडतं. मधे मुक्काम करावा लागेल एन्सीत जाता येता.. तेव्हाचा मेन्यू ठरव.. मग विचार करू.. Wink

तेव्हाचा मेन्यू ठरव.. >>> उकडीचे मोदक, पुरणपोळी, आंब्याचा शिरा... झालंच तर मनातले मांडे Proud

सायो, बाकींच्याना कधी जमतंय ते बघा, त्यानुसार मग पुढचे प्लान ठरवते.

एलेहून बस निघणार असेल तर ह्युस्टनवरुन न्या. ३००० मैलांमधे अजून हजारेक मैल वाढल्याने असा कितीसा फरक पडणार आहे Wink

तुम्ही मंडळी एवढ्या लांबून येताय तर चा-पाण्यासाठी शिट्टीत या म्हणजे माझी पण येण्याजाण्याची सोय होइल. चार हजारात साठेक मैल कसे पण बसतील.

चार हजारात साठेक मैल कसे पण बसतील >> Lol

एलेवाले - बस सोडून टाका. चार-पाचशे मैलांवर आली की गटग तारीख त्याप्रमाणे ठरवू Proud
किन्नर तयार आहेत Happy

बुवा, २४ जमू शकेल कदाचीत >>> हा माणसांचा आकडा आहे का? Wink

चार-पाचशे मैलांवर आली की गटग तारीख त्याप्रमाणे ठरवू >>> Lol

आता एव्हडे फिरत आहात तर बे एरिया, मग एल.ए. मग ह्युस्टन, मग नॉर्थला तल्सा मग अजून नॉर्थला जर इकडे आयोवात या. मग जरा विश्रांती घेऊन जाउया इस्टला, कसं?

ह्यूस्टनला येता आहत तर वर डॅलसवरून न्या बस, इथे बरीच पब्लिक आहेत.
बुवा एवढे प्रेमाने बोलावतायत तर जायलाच हवं, हौसवॉर्मिंग गिफ्ट आणतो हो बुवा Happy

बशीतून एवढा प्रवास करुन बुवांकडे जाउन बसल्यावर बुवांचा बारक्या विचारायचा - एवढे सगळे जॅक स्पॅरो कुठून आले? Biggrin

धनि, इतका म्याप काढतोस तर वर आटोवा दिसत नाही होय. या तिकडेपण. येताना बुवांच्या वंदनाबेनला पण आणा. Lol
किंवा श्रमपरिहाराला इकडे या, मोदक आणि सु.व. खाऊ.

Pages