Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
== काल वाचलेले हे ट्वीट एकदमच
==
काल वाचलेले हे ट्वीट एकदमच भारी होते.
"भिंतीचे पैसे प्रेसिडंट महोदयांनी आपल्या स्वतःच्या खिशातून भरावेत नि मग आपले जबरदस्त निगोशिएशन्स स्किल्स वापरून मेक्सिकोकडून परत घ्यावेत."
==
असले विनोद वाचून ट्रंपविरोधकांना हास्याच्या उकळ्या फुटत असतील तर त्यात आश्चर्य ते काय?
असेच स्वतःचे स्वप्नरंजन आणि विनोदयुक्त मनोरंजन करत रहा.
ट्रंपने भिंत बांधणे व मेक्सिकोने त्याकरता पैसा पुरवणे हे एकाच वेळी होईल, अमुक इतक्या दिवसात होईल असे आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे आधी भिंत व मग मेक्सिकोकडून पैसा अशी त्याची योजना असेल तर माझी हरकत नाही. ज्यांना भिंत बांधणे हेच जातिविद्वेषक, हीन, निंद्य आणि विध्वंसक वाटते आणि ज्यामुळे त्यांनी ट्रंपला मतच दिलेले नाही त्यांनी त्याच्या ह्या आश्वासनाची इतकी सखोल चिकित्सा का करावी बरे?
इंटरेस्टींग?? http://mobile.n
इंटरेस्टींग??
http://mobile.nytimes.com/2017/01/06/opinion/can-bal-keshav-thackeray-bo...
इंटरेस्टिंग आहे ही तुलना.
इंटरेस्टिंग आहे ही तुलना. सुकेतू मेहतांची मुंबईची माहिती सखोल आहे त्यामुळे जरी थोडा पूर्वग्रहदूषित व्ह्यू असला तरी वाचनीय आहे. मात्र ही तुलना ट्रम्पच्या कॅम्पेनच्या संदर्भाने ठीक आहे. बाकी बाबतीत जरा प्रीमॅच्युअर आहे. ट्रम्प चा अध्यक्षकाळ अजून सुरूच झालेला नाही, आणि निवडून आल्यानंतर तरी त्याने रिपब्लिकन पार्टीविरोधात बोलल्याची उदाहरणे ऑलरेडी दिसलेली आहेत.
(बाय द वे - सुकेतू मेहतांचे 'मॅक्सिमम सिटी' पुस्तक ज्यांनी वाचलेले नाही त्यांनी वाचात. अत्यंत वाचनीय आहे).
बाळ ठाकरे व ट्रंप ह्यांची
बाळ ठाकरे व ट्रंप ह्यांची तुलना अशा लोकांनाच आवडेल आणि पटेल ज्यांना ह्या दोन्ही व्यक्तींचा तिरस्कार आहे.
मला जाणवलेले मोठे फरक
१. ट्रंप हा राजकारणात यायच्या आधी यशस्वी उद्योजक होता. कितीही नाक मुरडले तरी त्याची संपत्ती शेकडो दशलक्ष डॉलर इतकी आहेच. अब्जाधीश नसेल पण ही रक्कमही फार कमी म्हणवत नाही. तेव्हा त्याचा राजकारणात यायचा उद्देश हा आणखी पैसा मिळवणे हा नसावा असे वाटते. ठाकर्यांची संपत्ती पाहिली तर व्यंगचित्रकार म्हणून इतके पैसे मिळवता येतील असे शाळकरी मुलगाही मानणार नाही. तेव्हा त्यांचे राजकारण हे त्यांचे उत्पन्नाचे साधन होते.
२. ठाकरे यांनी अनेक राजकीय कोलांट्या उड्या मारल्या आहेत. कधी काँग्रेसच्या बाजूने, कधी पवारांच्या बाजूने, कधी मराठी, कधी भीमशक्ती तर कधी हिंदुत्त्व. आजही ते भाजपचे समर्थक आहेत का विरोधक हे नीट कळत नाही. बहुधा ज्या धोरणामुळे जास्तीत जास्त राजकीय भांडवल मिळते ती धोरणे त्या त्या वेळी स्वीकारण्याचा प्रकार दिसतो. ट्रंपची राजकीय कारकीर्द इतकी अल्प आहे की त्याला राजकीय कोलांट्या उड्या मारायला वेळच नाही दिलेला.
३. शिवसेना ही ठाकरे कुटुंबियांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ठाकर्यांनी स्थापन केली आणि ती ठाकरे घराणेच चालवणार. बाळासाहेब, उद्धव, आदित्य आणि अन्य. रिपब्लिकन पक्ष ही ट्रंप घराण्याची निर्मिती नाही. आणि आज तरी हा पक्ष ट्रंप घराण्याची खाजगी मालमत्ता आहे असे दिसत नाही.
४. ट्रंप हा स्वतः निवडणूकीला उभा राहिला आणि निवडून आला. राजकीय प्रक्रियेत थेट सहभागी होण्यात त्याने कुठलीही हयगय केली नाही. बाळासाहेब ठाकर्यांनी आयुष्यात निवडणूक लढवली नाही. उद्धव, राज, आदित्य ही मंडळीही तीच परंपरा चालवणार आणि रिमोट कंट्रोल बनणार. माझ्या मते हा एक मोठा फरक आहे.
ज्यांना भिंत बांधणे हेच
ज्यांना भिंत बांधणे हेच जातिविद्वेषक, हीन, निंद्य आणि विध्वंसक वाटते आणि ज्यामुळे त्यांनी ट्रंपला मतच दिलेले नाही त्यांनी त्याच्या ह्या आश्वासनाची इतकी सखोल चिकित्सा का करावी बरे? >> महोदय, काँग्रेस भिंत बांधायला जो पैसा देणार तो काँग्रेस कुठून आणणार आहे अशी आपली कल्पना आहे ? तो आमच्या सारख्या टॅक्स पेयर्सच्या खिशातून पण जाणार आहे त्यामूळे चिकित्सा करावीच लागते. सगळ्यांनाच प्रेसीडेंट्सारख्या अशक्यप्राय कर सवलती मिळवून शून्य टॅक्स वर्षानुवर्षे देणे शक्य नाही.
असेच स्वतःचे स्वप्नरंजन आणि विनोदयुक्त मनोरंजन करत रहा. >> अजिबात चिंता करू नका. प्रेसीडेंटच्या कोलांट्या उद्या नि मग तुमचे त्याचे स्पष्टीकरण नि समर्थन हे नक्कीच मनोरंजन करत राहील ह्याची पूरेपूर खात्री आहे. अजून तर शपथ पण झाली नाहिये त्याधीच हि परिस्थिती आहे.
सुकेतू मेहतांचा लेख पुळकावणी
सुकेतू मेहतांचा लेख पुळकावणी आहे. त्यांना ठाकरे माहिती असल्यामुळे तुलना केली आहे इतपतच वाटते आहे. करायचीच असेल तर भारतातल्या आजच्या राजकारण्यांपैकी मोदी हे ट्रम्प फेनॉमेनॉच्या सर्वात जवळ आहेत. मुळात उजव्या राष्ट्रवादी सरकारांचा उदय ही गेल्या १०-१५ वर्षातली ९/११ची युद्धे सुरू झाल्यानंतरची लाट आहे. बाळासाहेब/शिवसेना हा साम्यवादाची पिछेहाट होत असताना, समाजवादी फारसे परिणामकारक राजकीय अल्टर्नेटिव्ह देत नसतानाच्या काळातला फेनॉमेनॉ आहेत.
विक्टर ओर्बान, तय्यब एर्डोगान इथून सुरुवात झालेल्या या आत्ताच्या लाटेतला लेटेस्ट मणी ट्रम्प आहेत.
मॅक्झिमम सिटी उत्तम पुस्तक आहे हेदेखील मान्य.
मला जाणवलेले मोठे फरक >>> फरक
मला जाणवलेले मोठे फरक >>>
फरक भरपूर आहे हो. ट्रम्प चा राजकारणात उदय झाला, त्याकरता वापरलेले गेलेले डावपेच, फॉलोअर लोकांची प्रतिक्रिया यातले साम्य यावर आहे ते. दोन्ही व्यक्ती एक्झॅक्टली सेम आहेत असे आर्ग्युमेण्ट नाही ते.
अपडेटः ही पोस्ट शेंन यांच्या पोस्टवर आहे. पुढच्या अजून वाचायच्या आहेत.
टण्या, ट्रम्पची तुलना
टण्या, ट्रम्पची तुलना कोणत्याही नेत्याशी सध्या फक्त कॅम्पेन च्या बाबतीत करता येउ शकेल. आणि ती भूमिपुत्र, परप्रांतीय, अफाट घोषणा, आक्रमक कॅम्पेनिंग्, आणि "बाहेरचा माणूस" याबाबतीत ठाकर्यांशी व शिवसेनेने वेळोवेळी आधी मराठी व नंतर हिंदुत्ववादावरून केलेल्या आक्रमक प्रचाराशी त्यांनी जर केली असेल ती अस्थानी नाही.
ट्रम्प आणि ठाकरे तूलनेवरची
ट्रम्प आणि ठाकरे तूलनेवरची इकडची सर्व पोस्ट्स इंटेरेस्टींग आहेत.
(अवांतरः टण्या, साम्यवाद ला इंग्रजी प्रतिशब्द आहे का?
मी साम्यवाद, समाजवाद (सोश्यलिजम(?)) , आणि कम्युनिजम (मराठी प्रतिशब्द?) ह्यातला फरक सोप्या शब्दांत कसा कळू शकेल ह्या दृष्टीने विचारत आहे. थँक क्यु इन अॅडव्हान्स.)
I am no expert, so attempting
I am no expert, so attempting despite the risk of ending up on the wrong side of this - when you don't know something well, whether to keep quiet and let people wonder , or speak up and eliminate all doubts
साम्यवाद आणि कम्युनिजम मधे फरक नसावा. कदाचित दोन्ही एकच. समाजवाद म्हणजे सरकारने -बहुतांश लोकशाही द्वारे - एकूण समाजाच्या भल्याकरता सरकारचा निधी वापरणे, त्याकरता लोकांवर जास्त कर लावणे वगैरे. साम्यवादात सर्व संपत्ती सरकारच्या मालकीची व सरकार तिचे वाटप करणार. समाजवादात तितके एकतर्फी नाही - वैयक्तिक प्रगतीला समाजवादात त्यामानाने वाव आहे, पण जास्त कर भरावा लागतो.
समाजवादाचा तिटकारा असणार्या
समाजवादाचा तिटकारा असणार्या अमेरिकेत सुद्धा सोशल सिक्युरिटी, मेडिकेअर, कॅलिफोर्निया सारख्या राज्यांत इमर्जन्सी केअर बद्दलचे नियम (आधी ट्रीटमेण्ट करणे भाग असणे) वगैरे आहेच.
थँक्यू फा!
थँक्यू फा!
समाजवाद्यांची अशी श्रद्धा
समाजवाद्यांची अशी श्रद्धा असते की समाजाचा पैसा योग्य प्रकारे खर्च करण्याचा मार्ग म्हणजे तो सरकारच्या हवाली करणे आणि सगळे कारभार सरकारकडे सोपवणे. भारताचे पहिले आणि थोर पंतप्रधान नेहरुजी हे कट्टर समाजवादी विचारांचे होते. (खरे तर त्यांना साम्यवादाचीही भुरळ होती पण साम्यवाद लोकांच्या गळी उतरवणे अवघड आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी समाजवादाची कास धरली). त्यांची कन्या इंदिरा गांधी हीही त्याच पंथाची. त्यामुळे भारतात रेल्वे, टेलिफोन, बँका, विमा उद्योग, विमान उद्योग विविध उद्योग एवढेच काय पंचतारांकित हॉटेलेही सरकार चालवत असे. यथावकाश सरकारी कारभाराने ह्या सगळ्या उद्योगांचे वाटोळे केले. गिर्हाईकांना तुच्छ मानून, फायदा, पैसा मिळवणे हे पाप मानणे आणि वशिलेबाजी, भ्रष्टाचार, व्यर्थ खर्च भरपूर असे प्रकार दिसू लागले. ३०-४० वर्षांपूर्वी फोन मिळण्याकरता ८-१० वर्षे वाट बघावी लागणे हे सर्रास होत असे हे आज खरे वाटणार नाही. १९९० च्या सुमारास समाजवादाच्या जोखडातून मुक्त होण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली. आज ह्यातले बरेचसे सरकारी उद्योग डबघाईला आले आहेत. कित्येक उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघड झालेले आहे. उदा. ओ एन जी सी मधील अत्युच्च अधिकारी आणि मंत्री ह्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले.
अमेरिकेत ओबामा आणि हिलरी हे छुप्या पद्धतीने तर बर्नी सँडर्स खुलेपणाने समाजवाद आणण्याचा प्रयत्न करत होते. सध्या तरी अमेरिकेत ही विचारसारणी लोकप्रिय नाही.
आज हॉलिवूडच्या गोल्डन ग्लोब
आज हॉलिवूडच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड कार्यक्रमात trum-pet फार जोरदार वाजवले गेले म्हणे
काँग्रेस भिंत बांधायला जो
काँग्रेस भिंत बांधायला जो पैसा देणार तो .............. शून्य टॅक्स वर्षानुवर्षे देणे शक्य नाही.
असामी, हे कुणाला सांगता आहात? सखोल चिकित्सा वगैरे प्रकार बाळबोध बुद्धीच्या माणसांना झेपत नाहीत हो! फक्त ट्रंप काय म्हणेल ते कित्ती चांगले नि बरोबर असे म्हंटले म्हणजे कसे, डोक्याला त्रास नाही!
ज्या अर्थी पाठ्यपुस्तकात लिहीले नाही त्या अर्थी इतर कुणिहि काहीहि म्हणोत, मुसलमानांविरुद्ध मुलांचे मत होणार नाही, जरी खुद्द ट्रंपने विधान केले की ९/११ नंतर हजारो मुसलमान लोक पॅटर्सन मधे नाचले तरी, जरी ट्रंपनेच म्हंटले की काही काळ मुसलमानांना अमेरिकेत प्रवेशच दिला नाही पाहिजे, तरी!
असा ज्यांचा समज आहे, त्यांना काय कळणार?
आता जाईनात का टॅक्स चे पैसे खड्ड्यात. ट्रंप म्हणतो यातच आम्हाला समाधान.
आणि तुम्हाला टॅक्स बुडवणे जमत नसेल तर तुमची अक्कल कमी. ट्रंप युनिवर्सिटी त जायला पाहिजे होते तुम्हाला. म्हणजे प्रत्यक्ष पाठ्यपुस्तकात जरी नाही तरी एकूण लोकांचे पैसे कसे लुबाडायचे हे तुमच्या अप्रत्यक्ष रीतीने लक्षात आले असतेच, असाहि युक्तिवाद हेच लोक त्याच श्वासात करतील.
एकूण काय, लै धम्माल राव. जाम विनोदी राष्ट्राध्यक्ष लाभला आहे, आता जरा नुसती गंमत पहा.
प्रेसीडंत इलेक्ट नी आज परत ते
प्रेसीडंत इलेक्ट नी आज परत ते 'त्या अपंग वार्ताहराची शारीरिक व्यंगावरून मस्करी करत नव्हते तर फक्त त्याने स्टोरी कशी बदलली हे त्याच्या व्यंगाची नक्कल करून दाखवून देत होते देत होते' असे ठासून सांगीतले. आत्ता हेच लॉजिक अॅलेक बाल्डविन ने वापरले तर पंचाईत होईल..
कॉनवे बाईंनी मात्र मस्त मजा केलीये 'मेरील स्ट्रिप लोकांना इंसाईट करते आहे हे योग्य नाही' अशी टीप्पणी केली फॉक्स वर केली आहे.
आत्ता काय बोलणार कप्पाळ
आणि तुम्हाला टॅक्स बुडवणे जमत नसेल तर तुमची अक्कल कमी. ट्रंप युनिवर्सिटी त जायला पाहिजे होते तुम्हाला. >> जबरदस्त झक्की, हे तुम्हालाच सुचू शकते.
कॉनवे बाईंनी मात्र मस्त मजा
कॉनवे बाईंनी मात्र मस्त मजा ............. योग्य नाही' अशी टीप्पणी केली फॉक्स वर केली आहे. हाहा
अहो हसता काय? चक्क फॉक्स चॅनेलवर नि ते सुद्धा कॉनवे बाईंनी सांगितले आहे!! खरेच असणार!
जपून हां, एक दिवस तुम्हीच लोकांना इन्साइट करता असे ट्वीट येईल तुमच्या नावाने - मग थेट वाटरबोर्डिंग, कीप अमेरिका सेफ, मेक अमेरिका ग्रेट!
झक्की माझ्यापेक्षा तुम्हीच
झक्की माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती तावातावने लिहिताय, तेंव्हा तुम्ही पण जपून
मी तर मागेच म्हणालो होतो कि प्रेसीडंट महोदय रिपब्लिकन पार्टी कडून निवडून आलेले असले तरी त्यांची मते बरीवाईट मते मांडताना कोणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. हळू हळू त्यांचा मूळचा डेमोक्रॅटीक स्वभाव टेकोव्हर करेलच असे मला अजूनही वाटतेय. काल गेमप्लेसमधे प्लेऑफ्स चे गेम्स बघताना आजू बाजूच्या रेड नेक्सनी हीच चिंता व्यक्त केली .
>>> हळू हळू त्यांचा मूळचा
>>> हळू हळू त्यांचा मूळचा डेमोक्रॅटीक स्वभाव टेकोव्हर करेलच असे मला अजूनही वाटतेय.
आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या,
त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना!
बाकी एखाद्या डेमोक्रॅट अध्यक्षाने जर कंपन्यांनी आपले कारखाने कुठे उघडावेत याबद्दल जरी अवाक्षरही काढले असते, तर हे लोक त्याला सोशलिस्ट/कम्युनिस्ट ठरवून मोकळे झाले असते. आता मूग गिळून बुक्क्यांचा मार!
>>> मूग गिळून बुक्क्यांचा
>>> मूग गिळून बुक्क्यांचा मार!
नंदनने दोन वाक्प्रचारांची गाठ मारून तिसरा बाहेर काढलेला दिसतोय.
नंदनने दोन वाक्प्रचारांची गाठ
नंदनने दोन वाक्प्रचारांची गाठ मारून तिसरा बाहेर काढलेला दिसतोय. >>>
ट्रम्परिस्थितीचे वर्णन करायला त्याला साधे ओरिजिनल वाक्प्रचार अपुरे वाटले असतील 
अरे आता एक नविन धागा काढारे,
अरे आता एक नविन धागा काढारे, निवडणुका संपल्या, इनाॅगरल सेरेमनी १० दिवसांवर आला आणि काहिजण अजुन निवडणुक - वैध/अवैध, निकाल - नैतिक/अनैतिक यातच घुटमळतायत. शक्यतो विनोदि विभागात काढा, म्हणजे सेलेब्सची गोल्डन ग्लोब, आॅस्कर वगैरेमधली भाषणं त्या धाग्यात आउट आॅफ बाउंड्स वाटणार नाहित...
>> म्हणजे सेलेब्सची गोल्डन
>> म्हणजे सेलेब्सची गोल्डन ग्लोब, आॅस्कर वगैरेमधली भाषणं
पण सेलेब्ज ची भाषणं तुम्हाला कायम विनोदी वाटतात का?
जिकडे काही लोकांनां नविन अॅड्मिनीस्ट्रेशन च एखाद्या रिअॅलिटी टीव्ही सारखं असेल अशी भिती वाटत आहे तिथे सेलेब्ज् ची भाषणं अशी डिसरिगार्ड का करता पूर्णपणे? बाकीच्या अनेक गोष्टींप्रमाणे सेलेब्ज् ही डिस्पोजिबल वाटतात का? गरज पडेल तेव्हा मिठ्या मारायच्या आणि गरज नसेल तेव्हा निषेध?
(मला तर वाटलं फक्त मुरलेले राजकारणीच फक्त असं वागतात? :))
समाजवाद्यांची अशी श्रद्धा
समाजवाद्यांची अशी श्रद्धा असते की समाजाचा पैसा योग्य प्रकारे ................उद्योगात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचे उघड झालेले आहे. उदा. ओ एन जी सी मधील अत्युच्च अधिकारी आणि मंत्री ह्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ले.
अमेरिकेत ओबामा आणि हिलरी हे छुप्या पद्धतीने तर बर्नी सँडर्स खुलेपणाने समाजवाद आणण्याचा प्रयत्न करत होते. सध्या तरी अमेरिकेत ही विचारसारणी लोकप्रिय नाही.
सर्व मुद्द्यांना अनुमोदन. असेच मलाहि वाटते.
वेल्फेअर वरील किती लोक शिक्षण घेऊन, नोकरी धंदा करून स्वतःच्या पायावर उभे राहिले, मेडिकल,हॉस्पिटल यांचे खर्च किती कमी केले, व्हेटरन लोकांसाठी काय केले, राज्यकारभारातली ब्युरोक्रॅसी किती सुधारली, याचे आकडे जर कुठे असतील तर ते तर ते बघायला उत्सुकता आहे - उगाचच गरीब, गरीब करत कष्टाळू लोकांचे पैसे उधळायचे हे मला आवडत नाही.
हे असले काही न करता आपले आठ वर्षे राज्य करत बसायचे, बदला ते धोरण!!
त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाकडे लोकांचे मन वळले, ट्रंप का असेना, रिपब्लिकन आहेत ना, हे महत्वाचे.
नि ट्रंप जे बरळतो, विशेषतः वेड्या वाकड्या, खोट्यानाट्या बढाया मारतो, त्याचा "अर्थ" लोकांपर्यंत पोचवायला कॉन्वे सारखे नि फॉक्स न्यूज सारखे लोक तत्पर आहेतच. चालवून घेऊ त्याला.
>>गरज पडेल तेव्हा मिठ्या
>>गरज पडेल तेव्हा मिठ्या मारायच्या आणि गरज नसेल तेव्हा निषेध? स्मित (मला तर वाटलं फक्त मुरलेले राजकारणीच फक्त असं वागतात?)<<
आयॅम ग्लॅड यु ब्राट धिस अप. कालंच मेरील स्ट्रिपबाईंनी लाईफटाईम अचिवमेंटचा पुरस्कार स्विकारताना केलेल्या भाषणांत ट्रंपला ओढलं. या बाईंनी गरज असताना त्यांच्या फ्रॅटर्निटितल्या रोमन पोलंस्किला मिठ्या (स्टॅंडिंग ओवेशन) मारल्या - त्याने केलेल्या घ्रुणास्पद गुन्ह्याकडे दुर्लक्श करुन. आणी आता सेलेब्स बॅंडवॅगनमध्ये सामील होउन ट्रंप बॅशींग?..
व्हाट ए पिटी!
पण मेरील स्ट्रीप तर सेलेब
पण मेरील स्ट्रीप तर सेलेब आहे. इतर मर्त्य मानवांसारखीच. उद्या तिचा/ तिची कोण सेक्रेटरी आता तिच्या वागण्याचं वेगळ्या प्रकारे समर्थन करेल का ते बघू या.
पण ट्रम्प ने बाकीच्या मुरलेल्या राजकारण्यांनां आणि त्यांच्या कार्यपद्धतीला निकालात काढून, त्यांच्याप्रति जोरजोरात बोंबा मारून शेवटी त्यांच्यासारखंच वागून व्हाईट हाऊस मध्ये एण्ट्री घेतली ना? म्हणजे तो काय फार वेगळा नाही झाला.
पण आता निवडणुकीला मागे सारून पुढे बघणं योग्य ह्या मुद्द्याशी सहमत. उतू गेलेल्या दुधावर किती वेळ रडत बसणार. थोडक्यात तुम्हीही पुढची चार वर्षं अशा प्रकारच्या बॅशिंग करता तयार रहा.
TRUMP URGES SPY AGENCIES TO
TRUMP URGES SPY AGENCIES TO LAY OFF RUSSIA AND FOCUS ON THREAT POSED BY ACTRESSES

राज, असे रागावू नका, अहो
राज, असे रागावू नका, अहो ट्रंप बॅशिंग किती विनोदी असते!
हिलरीला नाही का शिव्या दिल्या ट्रंपने, त्या लोकप्रिय झाल्या नाहीत, कशा होतील? ट्रंप बॅशिंगला सत्याचा आधार आहे. तसे हिलरीबाबत लोकांना वाटले नाही.
२० जानेवारी नंतर कायदे करा - भाषण स्वातंत्र्य रद्द! मग आपोआप कमी होईल. करायची काय १७८७ सालची घटना - पार बदलून टाका, पण गन बद्दलचा कायदा नि टॅक्स बुडवण्याचे, दिवाळे काढायचे कायदे तसेच ठेवा. तोपर्यंत जरा लोकांना मजा करू द्या.
जरा गेंड्याचे कातडे घेऊन वावरावे लागते, उगाच बारीक सारीक लोकांकडे लक्ष देऊन रात्रीची झोप खराब करून ट्वीटर करत बसायचे हे बरे नाही, या वयाला तरी!
>>TRUMP URGES SPY AGENCIES TO
>>TRUMP URGES SPY AGENCIES TO LAY OFF RUSSIA AND FOCUS ON THREAT POSED BY ACTRESSES<<
म्हणुनंच सांगीतलं, विनोदि विभागात काढा...
शेंनं, तुम्ही दिलेली
शेंनं, तुम्ही दिलेली समाजवादाच्यी व्याख्या ही कॅरिकेचर प्रकारातील आहे. आयन रँड ला समाजवादाची व्याख्या करायला सांगितली तर ती अशी करेल.
>अमेरिकेत ओबामा आणि हिलरी हे छुप्या पद्धतीने तर बर्नी सँडर्स खुलेपणाने समाजवाद आणण्याचा प्रयत्न करत होते. सध्या तरी अमेरिकेत ही विचारसारणी लोकप्रिय नाही.
अमेरिकेत लोकप्रिय नाही कारण अमेरिकेतील अनेक गरीबांना आपण गरीब नसून थोड्या काळासाठीच गरीब आहोत व लवकरच श्रीमंत होणार आहोत असे वाटत असते.
ओबामाकेअर बद्दल अनेक भीतीदायक अफवा पसरवून हे काहीतरी भयंकर आहे असे लोकांना पटवून दिले गेले. ट्रंप ला मते दिलेल्या अनेक लोकांंना आता हा साक्षत्कार होत आहे ...
http://imgur.com/A5V7svI
Pages