Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रंप "ती भिंत" बांधण्याकरता
ट्रंप "ती भिंत" बांधण्याकरता आता काँग्रेसकडे पैसे मागत आहे!
मेक्सिकोने नाही म्हंटले, त्यांच्याजवळ नसले तर कोण देणार? काँग्रेसच ना?
ट्रंप प्रेसिडेंट, रिपब्लिकन काँग्रेस - त्यांना वाटले तर ते बांधतील भिंत! प्लँट पेरंटहूड, वेल्फेअर, यांच्यावर पैसे खर्च करायचे नाहीत.
जो माणूस अशी बढाई मारतो की मी भर मॅनहॅटनमधे खून केला तरी मा़झ्याविरुद्ध कुणि साक्ष देणार नाहीत, मी धंद्यांचे दिवाळे काढले, काँट्रॅक्टर्सना दिवाळे काढायला लावले पण मी स्वतः श्रीमंत झालो त्याला शून्यातून काही करण्याची गरज नाही, अमेरिकेचे १७ ट्रिलियन डॉलर जीडीपी आहे त्याच्या हातात. शिवाय भिंत बांधणार्या कंपनीचे दिवाळे काढून काँट्रॅक्टर्स ना पैसे द्यायचेच नाहीत - त्याला भरपूर अनुभव आहे.
ह्युमन/ड्र्ग्ज
ह्युमन/ड्र्ग्ज ट्रॅफिकिंग,
असे धंदे करणार्यांना तर भिंत बांधून सहज बाहेर ठेवता येईल. ते सगळे पायीपायीच येतात, भिंत बघून म्हणतील, चला परत. शिवाय त्यांना ड्रग्ज घेऊन यायला, बेकायदा ह्यूमन ट्रॅफिकींग करायला कुठल्याहि अमेरिकनाची मदत नसते, कुणिहि त्यांना प्लेन, बोट देत नाहीत, नि त्यांच्याहि कडे पैसे नाहीत!!!
शिवाय मेक्सिकन ड्रग्ज मिळाली नाहीत, मेक्सिकन गुलाम मिळाले नाहीत तर अमेरिकन काय करणार? जगात दुसरीकडे कुठेच हे मिळत नाहीत, काही रशियन, इस्टर्न युरोपियन देशहि ह्यूमन ट्रॅफिकिंग करतात म्हणे, ते विमानातून येतात, म्हणून खरे तर एक भिंत आकाशात बांधावी म्हणजे परकी राष्ट्रे विमानातून हल्ला करणार नाहीत, हे असले धंदे करणार नाहीत!
उत्तम लॉजिक!! कदाचित ट्रंपला ही कल्पना मेलॅनियाने अजून सांगितली नसावी!!
कालच्या शूटींग बद्दल काहीच
कालच्या शूटींग बद्दल काहीच मतं नाहीत अजून?
मी प्रश्न विचारला (शेंडेनक्षत्र आणि राज ह्यांनां) की कालचं शूटींग (फोर्ट लॉडरडेल) कुठल्या प्रकारात बसतं तुमच्या मते?
== मग भारताने करावी मदत. तेल
==
मग भारताने करावी मदत. तेल कुठून आणतील भारतीय? इस्राईलला मदत करून तेल देतील का सौदी अरेबिया, इराण?
==
एक म्हणजे इराण हे शिया आणि सौदी अरेबिया सुन्नी आणि त्यांचा आपापसात ३६ चा आकडा आहे. त्यामुळे त्यांना एकाच पारड्यात बसवणे ठीक नाही. अर्थात इस्रायलच द्वेष करण्यात दोघेही पुढे आहेत. पण दुसरे असे की आपल्याला ह्या देशांकडून धर्मादाय मदत म्हणून तेल मिळत नाही. वट्ट पैसे मोजून आपण ते तेल विकत घेतो. इतक्या मोठ्या गिर्हाईकाला तेल न विकणे त्यांनाच महाग पडू शकेल. आधीच सौदी अरेबिया मंदीने त्रस्त आहे तशात असले काही उद्योग करुन आपल्याच पायावर तो कुर्हाड मारेल का? सौदी आणि शिया ह्यातील संघर्षाचा फायदा करुन एकाला मित्र बनवता येणे सहज शक्य आहे.
== तेंव्हा भिंत बांधून हे
==
तेंव्हा भिंत बांधून हे थांबेल यावर माझा जास्त विश्वास नाही.
==
अहो भिंत ही बेकायदा घुसखोरी करणार्यांना थांबवण्याकरता आहे. नियम पाळून, कागदपत्रे बनवून ज्यांना अमेरिकेत यायचे असेल त्याला आडकाठी नाही. जर अनेक मेक्सिकन लोक शेती वगैरे कामाकरता हवे असतील तर त्याकरता वेगळे व्हिसे निर्माण करता येतील. पण अमेरिकेला जेवढी गरज आहे तितकेच आणि योग्य ती गुणवत्ता असलेले लोकच बाहेरुन येतील असे बघणे अमेरिकेच्या हिताचे आहे. कुणीही सीमा ओलांडावी आणि यथावकाश नागरिक बनावे असला अव्यापारेषू व्यापार का? भारतातले लोक (बहुतांश) सर्व नियम पाळून येतात, ५-१०-१५, जितकी लागतील तितके वर्षे ग्रीन कार्डाच्या लायनीत लागतात आणि स्थायिक होतात. मग अशिक्षित, अर्ध शिक्षित मेक्सिकन लोकांना बेकायदा घुसण्याचा शॉर्टकट का द्यावा? जरा विचार करा.
>>मी प्रश्न विचारला
>>मी प्रश्न विचारला (शेंडेनक्षत्र आणि राज ह्यांनां) की कालचं शूटींग (फोर्ट लॉडरडेल) कुठल्या प्रकारात बसतं तुमच्या मते?<<
आत्तापर्यंतच्या बातम्यांनुसार सॅंटियागो मेंटली इल आहे; टेररीस्ट ॲंगल (आय्सीस वगैरे) दिसत नाहि. टू अर्ली टु स्पेक्युलेट ॲट धिस पाॅइंट. होप आय ॲंसर्ड योर क्वेश्चन...
घ्या, हे एव्हढं रामायण झालं
घ्या, हे एव्हढं रामायण झालं इलेक्शन दरम्यान (इन्फिल्ट्रेशन, ह्युमन/ड्र्ग्ज ट्रॅफिकिंग, नाफ्ता, ट्रेड सॅंक्शन्स) तरीहि रामाची सीता कोण?. >>> ज्यांना तेव्हा ते डीटेल्स वाचण्यात इंटरेस्ट होता त्यांना माहीत असेल, मला नव्हता. आत्ता प्रश्न पड्ला म्हणून विचारतोय. आता काय मागची ६८ पाने जाउन शोधत बसू काय?
नाक दाबले की तोंड उघडते असे
नाक दाबले की तोंड उघडते असे काहीतरी करून मेक्सिकोला तसे करणे भाग पडले जाऊ शकते. >>> ओके. अमेरिका काय लेव्हरेज वापरू शकते, की ज्यातून मेक्सिको ८ बिलियन डॉ खर्च करायला तयार होईल? ट्रेड डेफिसिट वगैरे प्रायव्हेट कंपन्यांचे आहे, त्यात सरकार फारसे काही करू शकणार नाही.
>> मेंटली इल आहे; टेररीस्ट
>> मेंटली इल आहे; टेररीस्ट ॲंगल (आय्सीस वगैरे) दिसत नाहि
तो इराकला जाऊन आल्याचं वाचलं.
>> In November, Santiago paid a visit to the FBI office in Anchorage, telling agents he was hearing voices and being directed by a US intelligence agency to watch ISIS videos, law enforcement sources told CNN.
>> The military said Santiago's nine years of service in the National Guard included one 10-month tour of Iraq, where he was awarded a combat action badge.
टेररीस्ट अँगल दिसत नाही ह्याच्याशी सहमत. पण तरी गन लॉ बद्दल ह्यामुळे काय डिस्क्शन होईल ह्याबद्दल उत्सुकता आहे.
>>ज्यांना तेव्हा ते डीटेल्स
>>ज्यांना तेव्हा ते डीटेल्स वाचण्यात इंटरेस्ट होता त्यांना माहीत असेल, मला नव्हता. आत्ता प्रश्न पड्ला म्हणून विचारतोय. आता काय मागची ६८ पाने जाउन शोधत बसू काय?<<
अच्छा, मग मागची ६८ पानं तुम्ही स्किप केलेली आहेत असं मला कोणी कानांत येउन सागीतलं का?
>>पण तरी गन लॉ बद्दल ह्यामुळे
>>पण तरी गन लॉ बद्दल ह्यामुळे काय डिस्क्शन होईल ह्याबद्दल उत्सुकता आहे.<<
लाॅंगशाॅट आहे. कारण या घटनेत तरी ती व्यक्ती वेटरन आहे. आता त्याची मेंटल कंडिशन बघुन एफ्बीआयने त्याला रेडारवर ठेवायला हवं होतं वगैरे मतप्रवाह सुरु होतील, बट अगेन ॲज आय सेड - इट्स ए लाॅंगशाॅट...
>>ण तरी गन लॉ बद्दल ह्यामुळे
>>ण तरी गन लॉ बद्दल ह्यामुळे काय डिस्क्शन होईल ह्याबद्दल उत्सुकता आहे.>> सशल, गन लॉ बद्दल काही अॅक्शन घेतली जाईल (कोणीही प्रेसिंडंट) ह्याबद्दल तुला आशा आहे खरंच? कोणीही काहीही करणार नाही आणि अमेरिकेतून गन्स जाणार नाहीत.
सायो, मी डिस्कशन बद्दल
सायो, मी डिस्कशन बद्दल उत्सुकता म्हंटलं, तेही इकडच्या आधीच्या चर्चेच्या संदर्भात. कुठल्या इन्सिडन्ट्स ना "रॅडिकल इस्लामिक टेररिजम" कॅटेगरी मध्ये ठरवलं जातं आणि कुठल्या नाही आणि त्याचे निकष काय. ओव्हरऑल ह्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने नविन प्रेसिडन्ट काय बोलणार, करणार ह्याबद्दल उत्सुकता.
मला कोणी कानांत येउन सागीतलं
मला कोणी कानांत येउन सागीतलं का? >>> अच्छा म्हणजे हा प्रश्न दिसल्यावर विचारणार्याने आधीचे "सगळे" वाचलेले नसेल यापेक्षा त्याला वाचूनही समजले नसेल हे गृहीत धरले तुम्ही.
हे वाचून कदाचित आश्चर्य
हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल, पण मला असे वाटते की गन कंट्रोल बद्दल काहीतरी थोडाफार चांगला बदल ट्रम्पद्वारेच होउ शकेल.
मुळात एक लक्षात घ्यायला हवे की मूलभूत बदल लगेच होणे अवघड आहे - मूळचे रिपब्लिकन्स कधीच करणार नाहीत. डेमोक्रॅट्सही मूलभूत काही करणार नाहीत, त्यांनाही गन लॉबी चा पैसा आणि मते हवी असतातच. पण डेमोक्रॅट्स/लिबरल्स जरी अगदी गन विकत घेण्याबद्दल, बॅकग्राउण्ड चेक्स बद्दल थोडा जरी कंट्रोल आणू पाहात असतील तरी त्यांच्यावर गन वाल्यांचा इतका प्रचंड अविश्वास आहे की ती प्रत्येक गोष्ट आपल्या हक्कांवर घाला आहे अशीच घेतली जाते. याउल्ट ट्रम्प असा एखादा नियम त्या लोकांच्या गळी उतरवू शकतो - कारण त्याच्या बाबतीत हे ओपन माइण्ड ने केले जाईल. त्यात तो स्वतः इतका कट्टर गनवाला नाही.
ओके, पण ते नुसतं डिस्कशनच
ओके, पण ते नुसतं डिस्कशनच असणार. बोलाची कढी आणि बोलाचा भात.
यात पूर्ण बंदी आणण्याआधी जे
यात पूर्ण बंदी आणण्याआधी जे स्पेसिफिक कंट्रोल्स आहेत - अॅसॉल्ट वेपन्स ना बंदी/चेक्स, जास्त बॅकग्राउण्ड चेक्स वगैरे कदाचित येउ शकतील. अर्थात ट्रम्प साहेबांनी ठरवले तर.
आणि समजा अमेरिकन ज्यू लोक
आणि समजा अमेरिकन ज्यू लोक इस्रायलला मोठी मदत करत आहेत आणि म्हणून तो तग धरुन आहे. तर काय हरकत आहे? मदत देणारे आणि घेणारे आपापल्या मर्जीने मदत करत आहेत आणि अमेरिकन आणि इस्रायली सरकारची आडकाठी नसेल तर नक्की आक्षेप काय आहे?
--- याबद्दल काही:
१. ओबामाच्या कारकीर्दीत इस्त्रायलला आतापर्यंत सर्वाधिक रकमेची मदत मिळाली आहे - $३८ बिलियन्स/१० वर्षांसाठी, म्हणजेच $३.८ बिलियन्स प्रतिवर्ष. शिवाय हे पॅकेज थेट व्हाईट हाऊसकडून आलंय Memorandum of Understanding म्हणून, त्यात हाऊसचा/काँग्रेसचा काही सहभाग नाही.
२. बुशच्या वेळेस हीच रक्कम दरवर्षी $३ बिलियन्स एवढी होती. म्हणजे 'इस्त्रायलचा शत्रू' असलेल्या ओबामाने २७% इतकी घसघशीत वाढ त्यात केली.
३. महत्त्वाचं म्हणजे, हे पैसे तुमच्या-आमच्या करांतूनच आलेले आहेत. या पैशांच्या बळावर, नेतान्याहू सरकार वेस्ट बँकमध्ये सेटलमेंट्स बांधते आहे. (सेटलमेंट्स कसल्या; अमेरिकेच्या कुठ्ल्याही अपस्केल, सबर्बन नेबरहूडमध्ये शोभावीत अशी सिंगल फॅमिली हाऊसेसची कॉम्प्लेक्सेस आहेत.)
४. ट्रम्पने जी अनेक उलटसुलट विधानं प्रचाराच्या दरम्यान केली, त्यातलं एक म्हणजे इस्त्रायलने आपल्या संरक्षणाचा खर्च स्वतःच करावा हे होतं. नेमेप्रमाणे, मग त्यातही यू-टर्न घेतला गेला आणि सध्या तर, उलट ही करदात्यांच्या पैशांतून इस्त्रायलला केली जाणारी मदत वाढण्याचीच लक्षणं आहेत.
५. आत्ताच इस्त्रायलमध्ये अरबांचं लोकसंख्येतलं प्रमाण साधारण २०% आहे: ८ मिलियन्सपैकी १.५-१.६ मिलियन्स. वेस्ट-बँकमध्ये २.८ मिलियन्स आणि गाझा स्ट्रिपमध्ये १.७ मिलियन्स अरब राहतात. टू-स्टेट सोल्युशन धुडकावून लावून, वेस्ट बँकही जर इस्त्रायलने गिळंकृत केलं तर ते प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास जाईल. (गाझा स्ट्रिप यात धरलेली नाही. ती धरली, तर ते निम्म्याहून अधिक होईल). टू-स्टेट सोल्युशन आवडत नसेल (आणि ह्या सेटलमेंट्सचा उद्देश तोच दिसतो आहे); तर मग नजीकच्या भविष्यकाळात एका अरबवंशीय व्यक्तीला इस्त्रायलचा पंतप्रधान म्हणून तेथील जनतेला स्वीकारावं लागेल
५. बाकी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यासाठी आणि ऑस्लो करारातल्या तरतुदींबद्दल हा व्हिडिओ पहावा असं सुचवेनः
https://www.youtube.com/watch?v=E0uLbeQlwjw
>>> पण डेमोक्रॅट्स/लिबरल्स
>>> पण डेमोक्रॅट्स/लिबरल्स जरी अगदी गन विकत घेण्याबद्दल, बॅकग्राउण्ड चेक्स बद्दल थोडा जरी कंट्रोल आणू पाहात असतील तरी त्यांच्यावर गन वाल्यांचा इतका प्रचंड अविश्वास आहे की ती प्रत्येक गोष्ट आपल्या हक्कांवर घाला आहे अशीच घेतली जाते. याउल्ट ट्रम्प असा एखादा नियम त्या लोकांच्या गळी उतरवू शकतो - कारण त्याच्या बाबतीत हे ओपन माइण्ड ने केले जाईल. त्यात तो स्वतः इतका कट्टर गनवाला नाही.
--- सहमत आहे. मला तर वाटतं, की कितीही उघड विरोध केला तरी एन.आर.ए. आणि गन लॉबी, सदैव डेमोक्रॅटिक अध्यक्ष यावा म्हणून देव पाण्यात बुडवून ठेवत असेल. म्हणजे डेमोक्रॅट आला रे आला निवडून, की तो तुमच्याकडच्या गन्स काढून घेणार अशी हाकाटी करायची. म्हणजे, अनेक लोक असा तथाकथित कायदा येण्याआधी अजून बंदुका विकत घेणार/एन.आर.ए.चे मेंबर होणार. ओबामा निवडून आल्यावर, गन सेल्समध्ये मोठा स्पाईक दिसला होता दोन्ही खेपांना.
आता ट्रम्पच्या बाबतीत असं त्यांना (निदान सुरुवातीला तरी :)) करता येणार नाही!
हो . कदाचित त्याला २०२० मधे
हो :). कदाचित त्याला २०२० मधे डिसओन केले जाईल गन लॉबी कडून, एक दुसरा चर्च, फॅमिली, फेथ वाला रिपब्लिकन पुढे आणून (पुन्हा एकदा मॅरेज ची व्याख्या वगैरे), पण सध्या गरज नाही.
यात माझे थिन्किंग असे आहे, की एखाच्या कम्युनिटीशी संबंधित भल्याचा पण अप्रिय निर्णय त्यांच्या गळी त्यांच्याच कम्युनिटीतील अधिकारी व्यक्ती उतरवू शकते (जसे मुस्लिम कायद्यात सुधारणा ही हिंदू किंवा ख्रिश्चन व्यक्तीने सुचवली तर ती ऐकून घेतली जाणार नाही). गन बद्दल सेन्सिटिव्ह असलेले लोक ही काही कम्युनिटी नव्हे पण एक आयसोलेटेड गट आहे ज्यांच्यात व लिबरल लोकांच्यात प्रचंड मोठी वैचारिक दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांनी कान व डोके बंद न करता त्यांच्याशी याबाबत चर्चा त्यांच्यातलाच माणूस करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे की खरा त्यांच्यातला माणूस हे कशाला करेल? त्यामुळे ट्रम्प सारखा वाइल्डकार्डच करण्याची शक्यता आहे.
ट्रम्प ने निवडला गेल्या नंतरच्या मुलाखतींमधे त्याने ऑलरेडी हिलरीविरूद्ध फार काही करणार नाही, रो वि वेड मधे किंवा ज्या राज्यांमधे गे मॅरेज लीगल आहे तेथे तो पुन्हा काही करायला जाणार नाही याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे येथेही अगदी चान्सेस नाहीत असे नाही.
wo US Congressmen have
wo US Congressmen have reintroduced a bill to curb the use of H-1B visas, on which the Indian IT sector is particularly dependent, the first salvo in the battle against outsourcing that is expected under the watch of President-elect Donald Trump
नंदन तुम्ही बराच अभ्यास करून
नंदन तुम्ही बराच अभ्यास करून लिहीले आहे.
पण जरा लांबले आहे - येथील ट्रंप च्या चाहात्यांना ते क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. ते बाळबोध विचारांचे आहेत, त्यांच्या मते एव्हढा विचार करून, क्लिष्ट गोष्टींमधे पडून मत बनवण्यात अर्थ नाही.
सिनेमात जसे हिरो म्हणतो की शत्रूचा नायनाट करीन, राज्य व्यवस्था बदलून टाकीन नि लोक लगेच टाळ्या वाजवतात, तसे ट्रंपने काही म्हंटले की काही लोक लगेच वा, वा म्हणतात.
लहान मुले, माझे बाबा तुझ्या बाबांपेक्षा जास्त हुष्षार, ताकदवान अशी, हुज्जत घालत बसतात तसेच इथेहि ट्रंप शहाणा आहे, नाही तो वेडा अशी हुज्जत इथे लोक घालतात.
असे आहे इथे.
तर अशी आकडेवारी, विचार करून लिहिणे इथे फारसे उपयोगी नाही. आपण आपले गंमत बघायला यायचे. मधे फुसकुल्या सोडायच्या - मायबोलीचे आभार मानायचे इथे लिहिता येते म्हणून - किती मनोरंजक!

आपल्यासारखे गंमत बघणारे आजूबाजूला असले की भांडणार्यांनाहि जरा चेव चढतो
काल वाचलेले हे ट्वीट एकदमच
काल वाचलेले हे ट्वीट एकदमच भारी होते.
"भिंतीचे पैसे प्रेसिडंट महोदयांनी आपल्या स्वतःच्या खिशातून भरावेत नि मग आपले जबरदस्त निगोशिएशन्स स्किल्स वापरून मेक्सिकोकडून परत घ्यावेत."
शे.न. कोलांट्या उड्या कोण मारतय ह्याला मह्त्व आहे तुम्हाला पटो न वा न पटो.
यात माझे थिन्किंग असे आहे, की
यात माझे थिन्किंग असे आहे, की एखाच्या कम्युनिटीशी संबंधित भल्याचा पण अप्रिय निर्णय त्यांच्या गळी त्यांच्याच कम्युनिटीतील अधिकारी व्यक्ती उतरवू शकते
अगदी +१. चीनशी अमेरिकेचे संबंध सुधारणे निक्सन ला जमले जे डेम ला जमले नसते. मोदी निवडून आले तेव्हा काश्मीर चा प्रश्न ते सोडवू शकतील अशी मला आशा वाटत होती. काश्मीर चा प्रश्न खरेच सोडवायचा असेल तर पाक ला थोडेसे द्यावे लागेल. के काँग्रेस ने केले तर भाजप वाले त्यांना फाडून खातील पण मोदींनीच केले तर गपगुमान स्वीकारतील.
के काँग्रेस ने केले तर भाजप
के काँग्रेस ने केले तर भाजप वाले त्यांना फाडून खातील पण मोदींनीच केले तर गपगुमान स्वीकारतील.>>> मग काँग्रेसवाले त्यांना फोडून खाणार नाहीत का?
आपल्याला सोयिस्कर ती आकडेवारी
आपल्याला सोयिस्कर ती आकडेवारी देऊन एकच बाजू अधोरेखित करणे ठीक वाटत नाही. इस्रायलला अमेरिका घसघशीत मदत करत आहे. ठीक. पण इस्रायलही आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध संशोधनात सहभागी आहे. इंटेल, आय बी एम, गुगल, फेसबुक ह्या सगळ्या कंपन्यांची ऑफिसेस तिथे आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांच्या मिळकतीत इस्रायल सहभागी होत आहे. इस्रायलमधे नामांकित विद्यापीठेही आहेत. शिवाय लोकशाही आहे.
दुसर्या बाजूकडे काय? विमान अपहरण ह्या दहशतवादाचे जनक म्हणून यासर अराफतच्या पी एल ओ कडे बोट दाखवता येईल. एका देशाच्या ओलिम्पिक संघाचे अपहरण करून त्यांना सगळ्यांना ठार करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लहान बालके, महिला ह्यांना आत्मघातकी बाँबचे पट्टे बांधून उपाहारगृहात सोडून तिथल्या उपस्थितांना मारुन टाकण्याचे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. (एवढे करुन नोबेलचे शांतता पारितोषिक मिळवण्याचा विक्रम तर नेत्रदीपकच आहे!)
तमाम अरब देश मोठ्या प्रमाणात पॅलेस्टिनी संघटनांना पैसे देतात. ते मुख्यतः अतिरेकी कारवायांकरता. अनेक मुस्लिम देशात लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकात ज्यू हे डुक्कर आणि माकडे ह्यांच्या जातीचे लोक आहेत, ज्यू लोकांना संपवणे हे मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे असे धडे शिकवले जातात. हे कसले लक्षण आहे? अशी मुले मोठी होऊन ज्यू धर्मियांकडे कशी बघत असतील?
अशा असुरक्षित वातावरणात रहाणारे इस्रायल जर अमेरिकेकडून मदत मिळवत असेल तर मला त्यात फार गैर वाटत नाही. जर चहूबाजूंनी शत्रू असतील तर अशा प्रकारे जास्तीची कुमक मिळवणे हा जिवंत रहाण्याचा उपाय आहे.
>जर चहूबाजूंनी शत्रू असतील तर
>जर चहूबाजूंनी शत्रू असतील तर अशा प्रकारे जास्तीची कुमक मिळवणे हा जिवंत रहाण्याचा उपाय आहे.
पण ही सेटलमेंट वगैरे जिवंत रहायचा उपाय नसून खोडसाळपणा वाटतो.
>> अनेक मुस्लिम देशात लहान
>> अनेक मुस्लिम देशात लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकात ज्यू हे डुक्कर आणि माकडे ह्यांच्या जातीचे लोक आहेत, ज्यू लोकांना संपवणे हे मुस्लिमांचे आद्य कर्तव्य आहे असे धडे शिकवले जातात. हे कसले लक्षण आहे? अशी मुले मोठी होऊन ज्यू धर्मियांकडे कशी बघत असतील?
मग आता मुस्लीम धर्माबाबत काय विचार पसरू पाहतोय किंवा आधीच पसरलेला आहे काही लोकांच्यात?
>>मग आता मुस्लीम धर्माबाबत
>>मग आता मुस्लीम धर्माबाबत काय विचार पसरू पाहतोय किंवा आधीच पसरलेला आहे काही लोकांच्यात?
कुठल्या देशाच्या लहान मुलांच्या अधिकृत पाठ्यपुस्तकात मुस्लिम वा इस्लामविरुद्ध घाऊक द्वेष पसरवणारे धडे आहेत?
शिक्षण फक्त पाठ्यपुस्तकातूनच
शिक्षण फक्त पाठ्यपुस्तकातूनच मिळतं का???
Pages