आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इराकने त्यांची सगळ्यात मोठी रिफायनरी इस्लामिक स्टेटच्या ताब्यातून परत मिळवली. रिफायरी परिसरात अजून थोड्या चकमकी चालू आहेत. गेल्यावर्षी जूनमध्ये IS ने ही बैजी रिफायनरी ताब्यात घेण्याआधी रिफायनरीतून रोज १७५००० बॅरल्स इतकं तेल शुद्धिकरण होत असे. नंतर इराकने नोव्हेम्बरमधे परत ताबा मिळवला आणि गमावला. गेल्या आठवड्यात IS ने ह्या रिफायनरीत ब्लास्ट घडवून वेगवेगळे installations, storage tanks, technical institute आणि distribution points ताब्यात घेतलं होतं.

http://m.hindustantimes.com/world-news/iraqi-forces-retake-most-of-baiji...
--------

इतर देशांत काय काय घडतंय :-(. इंधन हा प्रत्येक देशाची चालत राजण्याची ऊर्जा आहे. त्याशिवाय कुठलाही देश विकलांग होइल. आपल्या रिफायनरींच्या बाबतीत इतर सेफ्टी मेजर्स घेतले जातात. मिलिटंट्सपासून त्या सुरक्षित आहेत का असा विचार मनात आला. थोडा जरी घात झाला आणि रिफायनरी उडवली गेली तर कल्पना करु शकत नाही इतकी दूरपर्यंत हानी होइल. आपल्यावरच्या संकटाच्या नुसत्या कल्पनेवरून, जे देश आत्ता हे झेलत आहेत त्याच्यावर असलेल्या ताणाचा अंदाज येतो.

केश्विनी,

इस्लामिक राज्य हे अमेरिकेचं तालिबानला दिलेलं उत्तर आहे. मुजाहिदीन सीआयेच्या हाताबाहेर गेल्यावर तालिबान हे उत्तर अमेरिकेकडून दिलं गेलं. अगदी तस्साच प्रकार आता हाताबाहेर गेलेल्या तालिबान्यांच्या बाबतीत घडतो आहे. मधल्या मध्ये जनता भरडून निघणार.

आ.न.,
-गा.पै.

घ्या! अजून एक! शुक्रवारी इराकमधील US Consulate वर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ISIS ने घेतली आहे. The blast in Ainkawa killed two Turk and eight injured.
No employees were wounded or killed.

इथे फोटोंसकट सविस्तर वृत्त आहे.
http://www.dailymail.co.uk/news/article-3044749/IS-claims-deadly-US-cons...

सौदी अरेबियाने केला निष्पाप येमेनी बालकांचे खून :
http://21stcenturywire.com/2015/04/15/saudi-bombing-campaign-massacres-d...

पेशावरात शाळेच्या हल्ल्यात मुलांचे खून पाडले गेले त्यापेक्षा हे काय वेगळं आहे?

-गा.पै.

http://aajtak.intoday.in/story/fishing-boat-packed-drown-into-sea-in-lib...
लीबिया में प्रवासियों को लेकर जा रहा एक बड़ा जहाज हादसे का शि‍कार हो गया. बीच समुद्र में जहाज डूब गया, आशंका जताई जा रही है कि इस हादसे में जहाज पर सवार करीब 700 लोगों की मौत हो गई है. जहाज के डूबने की सूचना मिलते ही राहत और बचाव कार्य शुरू कर दिया गया है.
---
Sad

इस्लामिक स्टेटने आज सोशल मिडियावर ३० इथिओपियन ख्रिस्चन लोकांची लिबियात गोळ्या घालून व शीर उडवून हत्या केल्याची चित्रफित अपलोड केली आहे.

२०१३ मध्ये इजिप्तमधून इस्लामिक स्टेटच्या तत्वांना मानणारे बरेच लोक लिबियात गेले आहेत. इस्लामिक स्टेट इराक व सिरियाचा बराच भाग कंट्रोल करतं आणि त्यांना मिडल इस्टचा नकाशाच बदलायचा आहे.

http://mobile.reuters.com/article/idUSKBN0NA0IE20150419?irpc=932

ह्या लोकांच्यात मानवी जनुकं तरी आहेत की नाही? नुसते दिसायला मानव, कृत्यं दानवाची.

Sad
Sad

इवान, २०१५ मध्ये लिबिया आणि इटलीमधल्या भूमध्य समुद्रात विस्थापितांच्या स्मगलिंगमधे एकंदर १५०० जणांचे प्राण गेले आहेत. स्वत:च्या देशात हे लोक सुरक्षित नाहीत म्हणून चोरून पलिकडे जायला बघतात मासेमारी करणार्या नौकांमधून. गस्तीची जहाजं दिसली की त्या भरभरून चाललेल्या नौकेत पळापळ होते आणि त्या उद्भवलेल्या इम्बॅलंसमध्ये नौका उलटतात. बिचारे जातील तर कुठे जातील?

आई जेवू घालीना, बाप भीक मागू देइना. इथे इटली म्हणजे बाप नाही, पण तेवढाच त्यांना आधार असतो.

यांच(इसीस) फार फार अति होत चाल्लय आता नाही का..
ख्रिश्चन विरूद्ध मुस्लिम असा बराच मोठा संघर्ष जवळ येत आहे असे दिसते.. यात जग भरडले जाणार.. पण भारत यादरम्यान अलिप्त राहील या सगळ्या नंतर भारत महासत्ता म्हणून उदयास येईल असे वाटत राहते.
हे मत बाळबोध असेल कदाचित , पण मला खरच असे वाटते..

न्युक्लिअर डील झालं नाही तर इराणवर मिलिटरी action घेतली जाईल ह्या धमकीमुळे इराणच्या अयातुल्लाह खामेनींनी त्यांच्या लष्कराला ' "defensive preparedness" वाढवायची सुचना केली आहे.

In a speech to commanders and troops, the supreme leader said "the other side with insolence threaten us all the time", denying Iran was seeking an atomic bomb and insisting its military doctrine is defensive.

http://www.dailymail.co.uk/wires/afp/article-3045670/Iran-leader-urges-m...

पिकेश, wait and watch. सद्ध्यातरी जवळजवळ सगळे खंड कमी जास्त प्रमाणात पेटलेले दिसत आहेत. जिथे शांतता वाटतेय तिथे वेगळ्याप्रकारची धुम्मस असू शकते.

But yes, प्रत्येक भारतीयाला जगातल्या उलथापालथी पाहून वाटत असेल की आपल्या देशाने अजून बराच बराच चांगूलपणा (दिखाऊ नव्हे) राखला आहे. युद्ध टाळायची मानसिक ताकद राखली आहे. डोक्याशीच दहशतवाद पोसला जात असल्याने बॉर्डरवर अपरिहार्य हानी होते आहेच. पण असे शेजारी असते तर आतापर्यंत इतर कुठल्या देशाने एव्हाना भरपूर राडा केला असता आणि ह्या सगळ्यात भारतही एक पेटलेलं राष्ट्र म्हणून ओळखला गेला असता.

ऑस्ट्रेलियन पोलिसांनी मेलबर्न मधून ५ इस्लामिक स्टेट मिलिटंट्सना ताब्यात घेतले. फक्त १८ वर्षे वयोगटातील हे सर्व दहशतवादी पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियात होणार्या 'अ‍ॅनझॅक डे'च्या कार्यक्रमाच्या वेळी घातपात घडवण्याच्या तयारीत होते आणि ऑस्ट्रेलियन पोलिस हे दहशतवाद्यांचे टारगेट होते.

ह्या वर्षा अखेरपर्यंत होऊ घातलेल्या अमेरिका-युरोप दरम्यानच्या मुक्त व्यापार कराराच्या विरोधात शनिवारी संपूर्ण युरोपात (जर्मनी, ब्रिटन, स्पेन, ऑस्ट्रिया सह इतर देश) अनेक शहरांमध्ये एकाचवेळी 'डे ऑफ अ‍ॅक्शन' ह्या नावाने निदर्शने करण्यात आली.

'ट्रान्सअटलांटिक ट्रेड अ‍ॅण्ड इन्वेस्टमेंट पार्टनरशिप (TTIP)' ह्या नावाने असलेल्या ह्या करारावर २०१३ पासून वाटाघाटी सुरु झाल्या आहेत. दोन्ही खंडांतील ८० कोटी नागरिकांना सामावून घेणारा आणि व्यापारात दरवर्षी १०० अब्ज डॉलर्सची भर घालणारा हा करार आहे. ह्या राष्ट्रांच्या प्रमुखांनी ह्या व्यापाराचे जोरदार समर्थन केले असले तरी त्या देशांतील विविध संघटना व राजकिय गटांनी त्या विरोधात 'स्टॉप टीटीआयपी' नावाने स्वतंत्र मोहीम सुरु केली आहे.

युरोपिय संसदेत "टीटीआयपी' करारासंदर्भातील प्रस्तावावरील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे व ९०० दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत.

एकट्या जर्मनीत तब्बल २०० निदर्शने व मोर्चे काढण्यात आले. ब्रिटनच्या लंडन व इतर शहरांत मिळून १०००० नागरिक निदर्शनांमध्ये सामिल झाले होते. स्पेन व ऑस्ट्रियामध्ये २०००० हून अधिक निदर्शक विरोधी कार्यक्रमात सामिल होते.

'वुई से नो, वुई डोन्ट वाँट धिस', 'स्टॉप टीटीआयपी' अश्या घोषणा देण्यात आल्या. ह्या पुर्वी ऑक्टोबर २०१४ मध्येही अश्या निदर्शनांचे आयोजन केले गेले होते.

चीनच्या AIIBचे मध्यंतरी अमेरिकेने कौतुक केले असले तरी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी 'अमेरिकेचे ९५%हून अधिक ग्राहक परदेशातील आहेत. हे लक्षात घेता जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम अमेरिकेनेच ठरवायला हवेत, चीनसारख्या देशाने नाही' असा इशारा दिला आहे.

Asia-Pacific क्षेत्रातील मुक्त व्यापार करारासाठी अमेरिका जोरदार हालचाली करत असून संसदेत एक स्वतंत्र विधेयक मंजूर केले गेले. चीनने गेल्या काही वर्षांत अमेरिकेच्या प्रभावाखालील जागतिक व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी 'AIIB', ब्रिक्स बँक, एससीओ, 'सिल्क रोड इनिशिएटिव्ह' ह्या सारख्या मोहिमांना वेग दिला होता. AIIB ला मिळालेले यश अमेरिका व जपानसारख्या देशांसाठी डोकेदुखी आहे.

'मेड इन अमेरिका' हे तीन अभिमानस्पद शब्द असलेले प्रॉडक्ट्स आणि सर्विसेस पुरविण्यासाठी ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप' ह्या कराराद्वारे नव्या बाजारपेठा मिळतील असे ओबामांनी म्हटले आहे.

सोमालियात अल-कायदाशी सलग्न असलेल्या शबाब ह्या दहशतवादी संघटनेने UN ची UNISEF च्या workersना घेउन जाणारी बस बॉम्बस्फोट घडवून उडवली.
http://www.dailymail.co.uk/wires/afp/article-3046622/Vehicle-bomb-blast-...

शूरवीर सौदी अरेबियाचे प्रताप पहा तरी. इथे महाभयंकर चित्रे आहेत. दुवा स्वत:च्या जबाबदारीवर उघडणे : http://english.farsnews.com/newstext.aspx?nn=13940130000727

रासायनिक शस्त्रे वापरल्याबद्दल सलमान बिन अब्दुल अझीझ बिन सौद आणि त्याच्या कुटुंबातल्या सत्ताधाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटले भरून फासावर लटकवायला हवं.

-गा.पै.

हरे राम !!
गामा काय हो हे, फाशी तरी पुरेल का यांना ..

आणि आपल्या पोस्टीमधला सुंदर सुंदर हे शब्द काढून टाकावेत हि विनंती..
दुवा स्वत:च्या जबाबदारीवर उघडणे : हे कृपया गांभीर्याने घेणे.
मी एक सेकंद उघडून पटकन बंद केला.
Sad

पिकेश,

त्यांच्यासाठी फाशी हा सर्वात दयाळू न्याय आहे. येमेनात प्रत्यक्ष सैन्य घुसवायची सौदींची ताकद नाही. म्हणून रासायनिक अस्त्रे वापरून निरपराध लोकांचे प्राण घ्यायचे. असं धोरण आहे. Angry

आ.न.,
-गा.पै.

गामा, फार भयानक आहे :-(. राक्षस आहेत ते. एकदा इतकी अधोगती झाल्यावर त्यांचा अंतही तसाच होणार.

संघर्षग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितरित्या परत आणल्यावर भारताने येमेनमधील दूतावास शेजारच्या जिबौती देशात हलवला आहे. 'ऑपरेशन राहत' अंतर्गत ६६८८ लोकांना येमेन बाहेर काढण्यात आले.. ह्या ६६८८ लोकांमध्ये ४७४१ भारतीय नागरिक असून १९४७ परदेशी नागरीक होते.

'वसुधैव कुटुंबकम्', अर्थात सर्व विश्वाला आपले कुटुंब मानण्याची भारताची परंपरा.

अर्थात सर्व विश्वाला आपले कुटुंब मानण्याची भारताची परंपरा.>> सहमत. एक छोटी दुरुस्ती. पाकिस्तानने देखिल आपल्या काही नागरीकांची सुटका केली आहे.

हो नाठाळ, मी ह्या धाग्याच्या ५व्या पानावर एक सेपरेट प्रतिसाद पाकिस्ताननेही आपले ११ नागरीक सोडवले असा टाकला आहे Happy

अरे बापरे!!! खुपच भयानक आहे हे. त्या कोवळ्या मुलांची अवस्था पाहवत नाही अतिशय हृदयद्रावक दृश्य आहे.

गामा, सुंदर सुंदर चित्रे हा शब्दप्रयोग प्लीज काढून टाका.

पिकेश, नरेश माने आणि संदिप एस, सुंदर सुंदर हे शब्द काढून त्याजागी महाभयंकर असा शब्द टाकला आहे. आगोदरच प्रयोग उपरोधाने केला होता.
आ.न.,
-गा.पै.

पेशावर मधे लहान मुलांना मारणारे काय आणि येमेन मधे रासायनिक शस्त्रे वापरणारे काय.. सैतान आहेत हे लोक. दुसरा शब्द सुचत नाही.

चौकट राजा, अक्षरश: गेले काही दिवस मी मनातल्यामनात त्यांना माझ्या कुवतीत बसतील अश्या शिव्या घालतेय. बदडून काढावंसं वाटतं एकेकाला धरून. सगळ्यांना पोत्यात घालून एखाद्या परग्रहावर अन्नपाण्याशिवाय सोडून यावंसं वाटतंय :अओ:. अगणित लोकांचे तळतळाट माथी घेतले असतील ह्या लोकांनी. किती जणांना मारलय, अपंग केलय, अनाथ केलय, बेवारस केलंय, देशोधडीला लावलंय ह्या लोकांनी. माणसं असून किडामुंगीसारख्या हत्या करत सुटलेत :-(. कमवतायत काय? तर पुढले अनेक जन्म पुरून उरेल एवढं पाप.

पाकिस्तानी तालिबानने केली क्षेपणास्त्र चाचणी

तेहरिक ए तालिबान पाकिस्तान अर्थात पाकिस्तानी तालिबानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन 'ओमर १' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तान आणि चीन अब्जावधींचे करार करण्यात गुंतले असतानाच हे वृत्त आले आहे. क्षेपणास्त्र चाचणीचे वृत्त आल्यानंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील पाकिस्तानी लष्करात चिंतेचे वातावरण असल्याचे समजते.

दहशतवादाविरोधात अमेरिकेने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लढ्यात सहभागी असल्याचा दावा करणा-या पाकिस्तानने पाक-अफगाण सीमेवरील तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) संघटनेच्या कारवायांकडे दीर्घ काळ दुर्लक्ष केले होते. टीटीपी अफगाणिस्तानमधील तालिबानला पाठिंबा देत असल्यामुळे पाकने सोईस्कर पर्याय स्वीकारला होता. मात्र अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा पाडाव केल्यानंतर तालिबानचे काही नेते टीटीपीच्या प्रभावाखालील भागात लपून बसले होते. या संदर्भात गुप्तचरांच्या अहवालाआधारे अमेरिकेने दबाव टाकल्यामुळे पाकने टीटीपी विरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर टीटीपीकडे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान पोहोचल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.

टीटीपीने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्राचे सुटे भाग जोडण्याचे काम सुरू असल्याची काही दृश्ये आहेत. ही दृश्ये दाखवून टीटीपीने 'ओमर १' क्षेपणास्त्राच्या अनोख्या रचनेचे कौतुक केले आहे. झटपट तयार करता येईल असे हे क्षेपणास्त्र आमच्या कारवायांना आणखी बळ देईल, असा दावा टीटीपीने केला आहे. अल्लाच्या कृपेने लवकरच आमचा शत्रू भुईसपाट होईल असेही टीटीपीने म्हटले आहे.

पाकिस्तानी तालिबानने व्हिडिओमध्ये आम्ही घातक शस्त्रे तयार करण्यास सक्षम आहोत; आमच्याकडे आत्मघाती पट्टा, आत्मघाती वाहन, हँड ग्रेनेड, अँटी जॅमर डिव्हाइस, रॉकेट लाँचर आदी आधुनिक यंत्रणा असल्याचा दावा केला आहे

हे प्रकरण डोईजड होणार आहे पाकिस्तानला !! जे जे पेरेल तेच उगवणार !

अजिंक्य वरील अहितीपूर्ण पोस्ट बद्दल धन्यवाद ..

मला आंतरराष्ट्रीय घडामोडींची पुरेशी जाण नाही, त्यामुळे मला काही प्रश्न पडलेत ते कोणी वेळ मिळाल्यास कृपया सोडवावेत.
१. हे जे क्षेपणास्त्र यांनी बनवले आहे, त्याकरता अनेक वैद्यानिक आणि इतर भरमसाठ सुविधा लागल्या असतील कि .. हे सगळ यांना कसेकाय उपलब्ध होते.? यांच्या मागे कोणती मोठी जागतिक शक्ती आहे काय.?
२. यामध्ये भारताला कितपत धोका आहे.? कारण हे लोक अविचारी आहेत, ते आपल्यावर हे क्षेपणास्त्र डागू शकतात काय.? त्यांचे दुश्मन कोणाला मानतात ते..?

हे मिसाईल टेस्ट करतात म्हणजे उडवुन बघतात, जशी लहान मुले दिवाळीत रॉकेट उडवतात.

ही मिसाईल पाकिस्तानला उत्तर कोरीया कडुन आणी चिन कडुन मिळालेली आहेत. बनवण्याची त्यांची क्षमता नाहीय.

Pages