आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'व्हाय व्ही आर सेंडिंग धीस अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर टू पाकिस्तान' ह्या विषयी स्तंभलेखन करताना पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसैन हक्कानी ह्यांनी अमेरिकेच्या पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमेरिकेच्या बराक ओबामांच्या सरकारने दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला १ अब्ज डॉलर्सचे लष्करी साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तरी तसा वापर न होता ही सामग्री भारताविरोधातच तिचा वापर होईल असंही ते म्हणाले. पाकिस्तानचा अतिरिक्यांविरोधात फसलेला लढा हा कमी शस्त्रसाठ्याचा परिणाम नसून पाकिस्तानमधील इच्छाशक्तीच्या अभावामुळे तसे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निर्णयाचा हेतू चुकीचा असल्याचे दर्शवले आहे. दहशतवाद्यांचा प्रश्न न सुटता नुसती शत्रुत्वातच वाढ होईल.

ह्या निर्णयाअंतर्गत अमेरिका १५ लढाऊ हेलिकॉप्टर्स, १००० 'हेलफायर' क्षेपणास्त्र, संपर्क यंत्रणा, प्रशिक्षण पुरवणार आहे. ह्याचा वापर पाकिस्तान बलुचिस्तानातील बंडखोर आणि काश्मिर खोर्‍यातील भारतीय सैन्याविरोधात केला जाईल असे सूतोवाच हक्कानींनी केले. १९५० पासून अमेरिकेने पाकिस्तानला अंदाजे ४० अब्ज डॉलर्सचे लष्करी सहाय्य मेले आणि असे करुन भारताशी लष्करी आघाडीवर बरोबरी करण्याच्या पाकिस्तानच्या भ्रमाला अमेरिका खतपाणी घालते आहे असेही त्यांनी स्तंभलेखात म्हटले. हे सहाय्य त्यांनी कम्युनिस्ट विरोधी लढ्यासाठी वापरायचे अशी अपेक्षा होती पण पाक ने कोरिया किंवा व्हिएतनाममध्ये एकही सैनिक पाठवला नाही. उलट ती सामग्री १९६५च्या युद्धात भारतविरोधात वापरली.

तात्पर्य, अमेरिकेचा हा निर्णय भारतासाठी इशार्‍याची घंटा आहे.

इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी ह्यांना सरकारविरोधी निदर्शकांना ठार मारण्याचे आदेश दिल्याप्रकरणी २० वर्षं कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावर गाझापट्टीतील हमास ह्या अतिरेकी संघटनेला मदत करण्याप्रकरणीही खटला चालू आहे.

मोर्सी सरकारमधील इतर नेते/समर्थ्क मुस्लिम ब्रदरहूड नेते ह्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स भागाला काल ताशी १३५ किलोमिटर वेगाच्या वादळाचा तडाखा बसला. तब्बल दोन लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रेल्वे वाहतूकही विस्कळीत. किनारी भागात मोठी जहाजे अडकून पडली. गेल्या १० वर्षांतील सर्वात मोठे वादळ आहे.

अश्विनि ताई

भारताला हा धोका आहेच हे सत्य तरी अमेरिका हे थांबवेल हा विचार करणं थोड भाबडेपणाच आहे. या सगळ्या शस्त्र पुरठ्यामधे अमेरिकन डीफ़ेन्स इंड्स्ट्रीचं भल बघण हे त्यांच आद्य कर्तव्य आहे.

अमेरिका हे थांबवेल हा विचार करणं थोड भाबडेपणाच आहे. या सगळ्या शस्त्र पुरठ्यामधे अमेरिकन डीफ़ेन्स इंड्स्ट्रीचं भल बघण हे त्यांच आद्य कर्तव्य आहे.>>> इतक्या वर्षांमध्ये नाही थांबवलं तर आता काय थांबवणार? जवळ जवळ सगळीकडेच तो धुमाकूळ घालणं चालू आहे. आपण फक्त अगदी व्यासपीठावरुनसुद्धा जाहिर टोमणे मारु शकतो त्यांना 'लेकी बोले सुने लागे' स्टाईलने आणि मग ते ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देतील नेहमीप्रमाणे. मग आपण आलं अंगावर तर घेतलं शिंगावर करुच. तोटा शेजारचे घर जाळण्यासाठी निखारे विकत घेणार्यांचाच आहे. कारण त्या निखार्‍यांबरोबर इतरही अनिष्ट गोष्टी त्यांना त्यांच्या अस्तनीत सांभाळाव्या लागतात. आणि द्वेष करणार्‍यांना स्वतःची अस्तनी जळली तरी द्वेष आवरता घेता येत नाही. त्यासाठी हक्कानींनी म्हटल्याप्रमाणे सकारात्मक इच्छाशक्ती पाहिजे.

एखादा तगडा दादा गावात गल्लीबोळातून फिरत, ह्याला त्याला मारण्यासाठी, नळावरची भांडणं चालती ठेवण्यासाठी हॉकी स्टिक्स, दगड धोंडे, बाटल्या, सुरे पुरवत फिरतो आणि वर साळसुदासारखा भांडणात मांडवली केल्याचा आव आणून दबदबा निर्माण करतो तसं काहिसं वाटतं कधी कधी. त्याचं ऐकून आपापसात भांडून नकळत त्याचे गुलाम बनत चाललेले येडे लोक आहे ते पण स्वत्व गमावतात.

नील प्रकाश (Abu Khaled al-Cambodi) हा इस्लामिक स्टेटचा ऑस्ट्रेलियन सदस्य. वय फक्त २३ वर्षे. हा ऑस्ट्रेलियातील तरुण मुलांना IS मध्ये रिक्रूट करतो आणि त्यांना त्यांच्याच देशावर हल्ले करायला चिथावतो. हा स्वत: ह्या मार्गात कसा आला? त्याचं सद्ध्याचं मिशन काय? ह्याची ही कहाणी ...

http://m.theaustralian.com.au/in-depth/terror/lost-in-syria-the-journey-...

>>या सगळ्या शस्त्र पुरठ्यामधे अमेरिकन डीफ़ेन्स इंड्स्ट्रीचं भल बघण हे त्यांच आद्य कर्तव्य आहे>> अगदी अगदी. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील ३०% भाग हा संरक्षण साहित्याच्या विक्रीतून येतो. त्यामुळे अमेरिका कोणाला ना कोणाला शस्त्रे विकतच रहाणार. फुकटची शस्त्रे देऊन पाकिस्तानचे आपल्यावरील अवलंबित्व वाढवणे हा साधा हेतू आहे त्यामागे. पाकिस्तान त्या शस्त्रांचे खरे काय करतो हे धडधडीत सत्य जगासमोर आहे पण तरिही वेगवेगळ्या मदतीच्या नावाने शस्त्रे देत रहाणे हे धोरण अमेरिका सोडत नाही. आणि आपल्यालाही मग ते वरचढ शस्त्रे ऑफर करतात.. पक्के व्यापारी अहेत. त्यांना दुसर्‍या कशाशीही घेणं देणं नाही.
चीन अ अमेरिकेकडुन मदत मिळवून पाकिस्तान ने गेल्या आठवड्यात बरेच मैदान मारले आहे. आता मोदी चीन दौर्‍यात काय मिळवतात ते बघायचे. ह्या सगळ्या विषयावर आज सकाळ व लोकसत्तामधे छान लेख आले आहेत.

बांग्लादेशात अ‍ॅसिड हल्ल्याच्या दोषींना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. पीडीत महिला अ‍ॅसिड हल्ल्यात अंध झालेली होती.

://aajtak.intoday.in/story/acid-thrower-given-death-in-bangladesh-1-809213.html

जसे बालगुन्हेगारीचे वय कमी केले तसेच भारतात या अ‍ॅसिड हल्ल्यावर देखील कडक कायदा करावा.

एकिकडे इराणच्या अणुकार्यक्रमाचा बोलबाला सुरु असताना तिकडे उत्तर कोरियाचं काय चालू आहे? चीन सरकारशी संलग्न असलेल्या विश्लेषकाने चक्क उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांविषयी चिंता दर्शवली आहे. गेली कित्येक वर्षं अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाची चीन पाठरा़खण करत होता आणि आता उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची वेगाने निर्मिती करण्याचे तंत्र आत्मसात केले असून पुढील वर्षभरात उत्तर कोरिया भयावहरित्या ती संख्या दुप्पट करु शकतो असा इशारा त्यांनी दिला आहे.

उत्तर कोरिया २० अण्वस्त्रांनी सुसज्ज असल्याचे म्हटले जाते. आंतरराष्ट्रिय नियमांची पायमल्ली करुन निर्मिलेल्या ह्या अण्वस्त्रांविरोधात अमेरिका आणि युरोपने नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतही त्यांच्यावर कठोर निर्बंध घालून एकटे पाडण्यासाठी प्रयत्न केले होते. पण तसे होऊ नये म्हणून चीनने उत्तर कोरियाच्या बाजूने राहून नकाराधिकार वापरला होता.

पण गेल्या काही वर्षांपासून (किम जाँग-उन ह्यांनी उ. कोरियाची सूत्रे हाती घेतल्यापासून) उ.कोरिया आणि चीनमध्ये दुरावा निर्माण झाल्यासारखे वाटते. गेले तीन वर्ष सत्तेवर असलेल्या किम जाँग-उन ह्यांनी चीनला भेट दिली नाही. त्यांचे सरकार चीनला विचारात न घेता निर्णय घेते. त्याचमुळे चीनने उ. कोरियाच्या अणुकार्यक्रमाबद्दलची आपली भूमिका बदलली असावी.

काही दिवसांपुर्वी अमेरिका/इराण वाटाघाटी सुरु असताना उ. कोरियाने संशयास्पदरित्या लष्करी साहित्य इराणमध्ये पाठवले.

'अ‍ॅन्झॅक डे' निमित्ताने आपली भूमिका मांडताना ऑस्ट्रेलियातील आघाडीचे उद्योजक हॅरॉल्ड मिशेल ह्यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या दोन देशांनी एकत्र येऊन ऑस्ट्रेलेशिया खंडाची महासत्ता म्हणून पुढे यावे असे आवाहन केले आहे. असे झाल्यास आशियातील इतर महासत्तांसमोर आपण कणखरपणे वावरु शकतो असे त्यांनी म्हटले. युरोपिय महासंघाच्या रुपात युरोपिय देशांनी मिळवलेले सामर्थ्य व स्थान आणि रशियाकडून सुरु असलेल्या हालचाली ह्यांचाही दाखला दिला. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे दोन्ही देश अमेरिकेचे मित्र देश आहेत आणि सद्ध्या अमेरिकेकडून चीनला शह देण्यासाठी Asia-Pacific भागात हालचालींना वेग दिला गेला आहे. चीन व ऑस्ट्रेलियामध्ये व्यापारी सहकार्य आहे पण संबंध काहिसे तणावाचेच आहेत. अश्या बॅकग्राऊंडवर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड एकत्रीकरण झाले तर चीनच्या विस्ताराला पायबंद बसून Asia-Pacific मध्ये अमेरिकेचा प्रभाव वाढू शकतो ह्या दृष्टीने ह्या ऑस्ट्रेलियन उद्योजकाचे आवाहन महत्वाचे मानण्यात येते. (हळूहळू अमेरिकी साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही असे वाक्य प्रचलित होणार काय? Wink )

ऑस्ट्रेलियाच्या संसदेने २००६ साली दोन्ही देशांनी एकत्र येऊन महासंघ स्थापावा किंवा निदान एकच चलन स्वीकारावे अशी शिफारस केली होती. ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंड दरम्यान १९८३ पासून मुक्त व्यापार करार कार्यरत आहे आणि आता 'सिंगल इकॉनॉमिक मार्केट'साठी प्रयत्न चालू आहेत.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटनच्या बाजूने लढणार्‍या ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैनिकांनी २५ एप्रिल, १९१५ रोजी काळ्या समुद्रातील गॅलिपोलिजवळ झालेल्या लष्करी मोहिमेत भाग घेतला होता आणि दोन्ही देशांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण केली होती. 'अ‍ॅन्झॅक लिजंड' म्हणून ओळखण्यात येणारी ही घटना दोन्ही देशांच्या एकत्रित राष्ट्रियत्वाचा महत्वाचा हिस्सा मानली जाते.

अश्विनी ताई,

ऑस्ट्रेलिया न्युझीलंड एकत्र आले तर आमच्या दोन करन्सी ट्रेडींग पेअरस कमी होतिल. Wink

अर्रे ताई काय सगळेच? Biggrin

लीलावती, असंच आपलं वाचून काढते काहीबाही आणि लिहिते इथे. पण खरंच, आपल्या व्यतिरिक्तच्या जगात काय चालू आहे ह्याची आपण नोंद घेतली पाहिजे जमेल तशी. अश्या सगळ्या घटनांतूनच इतिहास बनत जातो. तिसर्‍या महायुद्धाची नांदी वाटतेय एकंदर.

अमेरिका, इस्रायल, युरोप व इतर चिल्लर पिल्लर विरुद्ध रशिया व इतर असा दीर्घकालीन संघर्ष सद्ध्या होऊ घातला आहे असं सद्ध्याच्या हालचालीवरुन वाटतंय. ऑल्मोस्ट युद्धाची तयारी दिसतेय. तिकडे मध्य-पूर्व व अफ्रिका धुमसतेच आहे. पुर्वेला चीनचा ड्रॅगॉन सरसावतोच आहे.

होय ! अगदी खरंय . आम्ही देखील रोज जेव्हा मेस मध्ये वगैरे भेटतो तेव्हा रोजच्या बातम्यांवर चर्चा करतो . माझा एक मित्र रशियन - भारतीय आहे. तो दोन्ही ( अमेरिका - रशिया ) बाजूंनी व्यवस्थित विश्लेषण करून समजावतो. त्यामुळे चर्चेला मजा येते.
सध्या मी गडबडीत असल्याने इथे माहिती देऊ शकत नाहीये पण थोडी मोकळी झाले की इथे देत जाईन माहिती.

चीन व पाकिस्तान मधे नुकतेच झालेले ४६ अब्ज डॉलरचे ५१ करार, चीनने पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात केलेली गुंतवणुक आणि दोन्ही देशांच्या प्रमुखांनी केलेली लहान भाऊ - मोठा भाऊ ची भाषा, ह्यामुळे गेले काही दिवस भारतात चिंतेचे वातावरण आहे. भारताचे हे दोन शत्रु असे एकत्र येत असल्याने आपल्या कपाळावर आठ्या येणे स्वाभाविकच आहे. पण ह्या सगळ्या करारांचा चीनलाच कसा फायदा आहे व पकिस्तानशी जवळिक दिखाऊ असून प्रत्यक्षात चीनला पाकिस्तान च्या भल्याशी काही घेण देण नाही असे नमूद करणारा लेख आज विजय साळुंके ह्यांनी सकाळ मधे लिहिला आहे. मला तो आवडला. त्याची लिंक खाली देतो आहे. इच्छुकांनी जरूर वाचा.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4970030086472847511&Se...संपादकीय&NewsDate=20150424&Provider=विजय साळुंके&NewsTitle=चीन-पाकिस्तानची सोयीची सोयरिक

ग्वादर बंदरापर्यंत ३००० किलोमिटरचा हायवे बांधणार म्हणे! आधीच चीनने तो काराकोरम हायवे बांधून ठेवलाय पाकव्याप्त काश्मिरातून नेऊन पार अफगाणिस्तान सीमेपर्यंत. आपल्याबाजूला हिमालयाचा खूप दुर्गम प्रदेश आहे आणि पलिकडे पठार. त्याचा खूप फायदा होतो त्यांना.

विवेक मूर्ती अमेरिकेच्या महाशल्यचिकित्सकपदी
----------------------------------------------------
भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती (३७) हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले असून, उपाध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात विवेक मूर्ती यांचा शपथविधी झाला. अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे इन्चार्ज असणारे विवेक मूर्ती या पदावर असणारे सर्वात तरुण अधिकारी ठरले आहेत

व्वा.. हा धागा मी रोज पेपर वाचल्या सारखा वाचतो .. भरपूर माहिती मिळते..
धन्यवाद ..

तिसर्‍या महायुद्धाची नांदी वाटतेय एकंदर. >> हम्म, 'तत्कालीन कारणे' या विभागात येणार कारण निर्माण व्हायचा अवकाश दिसतोय फक्त ..
अमेरिकेने कितीही अलिप्त राहायचा, चाणाक्ष खेळ्या करण्याचा प्रयत्न केला तरी ते यातून सुटू शकणार नाही अस वाटत.. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या केलेल्या शक्त्या त्यांच्यावर उलटणार .. अति तेथे मातीची प्रचीती त्यांना येणार..

युरोपियन युनियनची रेस्क्यू जहाजं लिबियाच्या दिशेने निघाली आहेत. लिबियन विस्थापितांचा प्रश्न भूमध्य समुद्रात नुकत्याच घडलेल्या मोठ्या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. ह्या वर्षी म्हणजे २०१५ च्या पहिल्या ४ महिन्यांत ४०००० मायग्रंट्स इटलीमध्ये वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा वापर करून घुसले आहेत. हे विस्थापित आशिया, अफ्रिका आणि मध्यपूर्वेतील गरीबी व युद्धपरिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी युरोपात जातात.

EU border agency Frontex says 276,000 people entered the bloc illegally last year, more than double the number in 2013. Sea crossings to Italy quadrupled to 170,000 as anarchy in Libya opened opportunities for people smuggling gangs. Some 43,000 came into the EU last year via the Balkans but 32,000 arrived in just the first three months of this year, Frontex data shows.

http://mobile.reuters.com/article/idUSKBN0NF1SO20150424?irpc=932 इथे हे मायग्रंट्स बेकायदेशिररित्या कश्याप्रकारे स्थलांतर करतात ते दिलं आहे आणि परिस्थितीचा सविस्तर आढावा आहे.

भारतीय अमेरिकन विवेक मूर्ती (३७) हे अमेरिकेचे सर्जन जनरल बनले असून,
----- वय केवळ ३७... नेत्रदिपक कामगिरी.

(Bali Nine firing squad) - इंडोनेशियाने अंमली पदार्थ गुन्ह्यांसाठी पकडलेल्या १०, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, फ्रान्स व नायजेरियाच्या नागरिकांना देहदंडाची शिक्षा सुनावली आहे आणि त्या प्रकियेचा भाग म्हणून त्या देशांच्या दूतावासातील प्रतिनिधींना बोलावून घेतले आहे. ह्यावरून इंडोनेशिया व ह्या देशांमध्ये थोडा तणाव आला आहे.
Indonesia has harsh punishments for drug crimes and resumed executions in 2013 after a five-year gap. Six executions have been carried out so far this year.

http://m.news24.com/news24/World/News/Countdown-for-Bali-Nine-firing-squ...

आज नेपाळला ७.८ रिश्टरचा तीव्र भूकंपाचा धक्का बसला. त्यापाठोपाठ ६.६ रिश्टरचा आफ्टरशॉक बसला. ह्या भूकंपाचे धक्के नेपाळ, उत्तर भारत, तिबेट व बांगलादेश येथे जाणवले. नेपाळमध्ये कमीतकमी ४५० लोकांचा मृत्यू झाला तर भारतात २०, तिबेटमध्ये ६ व बांगलादेश मध्ये २ जणांचा मृत्यू झाला. ह्या हिमालयन देशातील भूकंपामुळे घरं, शेकडो वर्षं जुनी देवळं भुईसपाट झाली. एव्हरेस्टवर गेलेले गिर्यारोहक सुखरूप असल्याचं टिव्हीवर सांगितलं. पण खाली दिलेल्या लिंकमधल्या सविस्तर माहितीत एव्हरेस्टच्या वाटेवरील खुम्बू आईस फॉल येथे हिमकडा कोसळला आहे व अनेक गिर्यारोहक त्या खाली दबले गेल्याची शक्यता आहे.

http://m.thehindu.com/news/national/massive-earthquake-in-nepal-tremors-...

ह्या लिंकमध्ये अपडेट्स आहेत. त्याप्रमाणे नेपाळमधला डेथ टोल ६०० च्या वर गेलाय. भारतातीलही वाढला. http://m.firstpost.com/india/live-devastating-earthquake-kills-over-600-...

Indian Air Force's C-130 J Super Hercules aircraft in Saturday took off from the Hindon airbase here carrying NDRF personnel and relief material to Nepal in the wake of the devastating earthquake that has hit the Himalayan country.

चिली देशातील २००० ज्वालामुखींच्या साखळीतील सगळ्यात भयानक ज्वालामुखी कॅल्बुको बुधवाए गुरुवारमध्ये २ वेळा कुठलीही पुर्वलक्षणं दिसून न येता अचानक जागृत झाला. त्यातून उसळणारी राख दक्षिण ब्राझिलपर्यंत पोहोचली आहे. चिली, अर्जेंटिना व उरुग्वेच्या राजधान्यांकडे जाणारी विमानं रद्द करण्यात आली.

ह्या ज्वालामुखीच्या जागृत होण्यामुळे १७ किमी उंचीचा क्लाउड निर्माण झाला आणि जवळपासची गावं राखेच्या जाड थराखाली आली. त्या राखेच्या वजनाने ज्वालामुखीच्या जवळची काही घरं व शाळा कोसळल्या Uhoh

http://www.dnaindia.com/world/report-chile-volcano-ash-cloud-reaches-bra...

-------
ह्या वसुंधरेच्या पोटात चांगलं वाईट काय काय दडलंय. तिला गृहित धरून चालणार नाही. तिची काळजी घ्यायलाच हवी.

Please share...may be helpful for needy

Nepal National Emergency Operation Centre numbers:
+977-142-001-05
+977-142-002-57

Helpline number of the Indian Embassy in Nepal for queries regarding the Nepal Earthquake: +977-985-110-7021
+977-985-113-5141

आईगं !
पण एव्हढा मोठा भूकंप झाल्यामुळे हिमकडे कोसळून अपघात झाले असतील असे वाटलेच होते .
सध्या भूगर्भात जोरदार हालचाली सुरु आहेत .
सुरुवात जपान मधल्या भूकंपाने झाली मग NZ मध्येही झाल्याचे वाचले होते. त्यानंतर चिलीमध्ये ज्वालामुखी आणि आता नेपाळ (हिमालय ) !

गेल्या कित्येक वर्षात जुन्या हिमालयामध्ये पूर्वेकडे भूकंप झाला नव्हता त्यामुळे शास्त्रज्ञांना अनेक प्रश्न पडले होते. बहुदा आणखीन मदत होईल हिमालय समजून घ्यायला !

आजच्या वृत्तपत्रात ही बातमी मिळाली : http://www.deccanchronicle.com/150427/nation-current-affairs/article/iis...

वेळ मिळालाच तर तो जर्नल पेपर शोधून वाचेन मी.

Pages