आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवार जर अश्या 'परग्रहवासियांचे' सभासदत्वासाठी संदेश आले तर त्यांन्ना सभासदत्व अजिबात देउ नये!
हाय काय अन नाय काय. आपणच अपली काळजी घेतलेली बरी!:फिदी:

गंम्मत अपा..र्ट

ओबामा व राउल कॅस्ट्रो ह्यांचे 'हस्तांदोलन' हेही मोठ्या बदलाचे संकेत आहेत!

यक्ष,

>> ओबामा व राउल कॅस्ट्रो ह्यांचे 'हस्तांदोलन' हेही मोठ्या बदलाचे संकेत आहेत!

सहमत. इथे एक महत्त्वाची बातमी आहे. मराठी जगताचं लक्ष गेलेलं दिसंत नाही :

Obama says ‘days of meddling’ in Latin America are past

लॅटिन अमेरिकेत इतर कुणाचाही हस्तक्षेप सहन न करण्याचे धोरण आजपर्यंत अमेरिकेने (=संयुक्त राज्ये) अवलंबले आहे. याला मन्रो डॉक्ट्रिन म्हणतात. हे धोरण १८२१ साली जेम्स मन्रो या संयुक्त राज्यांच्या अध्यक्षाने मांडले. यास आता तिलांजली देण्यात येणार आहे.

ही संयुक्त राज्यांच्या मृत्यूची घंटा तर नाही? गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रॉयका ही धोरणे अवलंबायला सुरुवात केल्यावर पूर्व युरोपात हस्तक्षेप करणं सोडून दिलं होतं. त्यातून पुढे सोव्हियेत संघाचं विघटन झालं. संयुक्त राज्येही याच मार्गाने जातील काय?

आ.न.,
-गा.पै.

दुसरं म्हणजे, नेपाळने परवानगी कशी काय दिली ? कारण एव्हरेस्ट नेपाळच्या हद्दीत येतं ना?
आता एव्हढा मोठा अतिप्रगत(?), सामर्थ्यवान (?) भारत देश सुद्धा चीनला नुसतेच निषेध खलिते पाठवतो, कारण युद्ध करणे शक्यच नाही, तिथे नेपाळसारखा बारका देश काय करणार?
मुळात नेपाळ आज भारताच्या बाजूने आहे की हळू हळू कम्युनिझम (चीन) कडे झुकतो आहे? तिबेटचे काय झाले माहित आहे का? (तुम्ही सगळे जन्मण्यापूर्वी झाले ते तुम्हाला माहित नसेल म्हणून असे लिहीले)

मोदींचे भाषण म्हणजे फक्त दक्षिण अमेरिका, अफ्रिका, पूर्व युरोप, इ. भागातील गरीब, लहान लहान राष्ट्रांनी ऐकावे. इंग्लंड, अमेरिका, रशिया, वगैरे देशांना हे भाषण म्हणजे पाच वर्षाच्या मुलाने सुपरमॅनचा ड्रेस घालून मी सुपरमॅन आहे असे म्हणण्यासारखे आहे.

नमस्कार,
वर्तमानपत्र बघत असताना रफाल विमान खरेदीसंबंधी बातमी वाचण्यात आली. रफाल विमानाबद्द्ल आधीच्या सरकारने २००७ साली जो निर्णय घेतला होता तो नंतर बसनात गुंडाळुन ठेवण्यात आला. त्याआधी बोफोर्स तोफांविरुध्द विरोधकांनी बरीच उठाठेव केली परंतु नंतर त्याच बोफोर्स तोफा सर्वोत्तम असल्याचे निर्देशनास आले. रफाल विमानांबद्दल भारतीय हवाई तंत्रज्ञांनी राजकिय पटलावर हिरवा कंदिल दिला. त्यानुसार Dassault Aviation कंपनीला भारतात विमांनाची निर्मिती करायची होती. पण एचएएलचे तंत्रज्ञान फ्रेंच लोकांना पसंद आले नाही. उलट विमाने फ्रांसमधेच बनवुन भारताला द्यावी असा दबाव टाकला गेला. तिथे हे प्रकरण अडकले गेले. ए के अंटनी यांनी अतिसावध भुमिका घेतल्यामुळे तसेच ब्राझील, कॅनडा, नेदरलँड इ. देशांनी विमानात दोष आढळल्यामुळे Dassault Aviation कंपनीशी असलेला करार रद्द केला. यासर्व घडामोडींमुळे तत्कालीन सरकारने करार थंड बस्त्यात टाकून ठेवला.

जगात सर्वत्र रफाल विमानांची मागणी रद्द होत असताना भारताने ३६ विमानांची खरेदी करण्याचे कारण काय? जिथे ग्रिपेन स्वीडन कंपनीने भारतात विमानांची निर्मिती करण्याचे मान्य केले अश्या कंपनीकडुन विमान खरेदी न करता डबघाईस आलेल्या Dassault Aviation कंपनीला मदत का करण्यात आली? डिसेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यात फ्रेंच रक्षामंत्री यांनी भारत दौरा निव्वळ फिरण्याकरीता केला नव्हता. त्यामागे ही डील तत्काळ व्हावी ही मागणी असेल ? अन्यथा फ्रांसच्या संरक्षण व्यापारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

ब्रिटीश कॅनडा इ. देशांनी लॉकहीड सारखे अत्याधुनिक विमानांना पसंदी दिली असता तडकाफडकी रफाल विमानांची निवड करण्यामागे कारण काय? Dassault Aviation कंपनीबरोबर करार करुन "रिलायंस" कंपनी देखील संरक्षण शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत उतरली आहे. हे देखील एक कारण असु शकते.

प्रश्न रफेल विमानांच्या क्षमतेवर नाही तर करारामधे असलेल्या अटींवर जास्त उठत आहे. जिथे भारताला अश्या विमानांचे तंत्रज्ञान मिळणार होते ते आता मिळणार नाही. स्वीडन कंपनी ग्रिपेन भारतात कारखाना तयार करुन विमानांची निर्मिती करणार होती ती आता होणार नाही. असे बरेच प्रश्न उठतात.

रफेल विमान देखील बोफोर्स तोफेंसारखेच अतुल्य कामगिरी बजावत सुखोई-३० बरोबर दिमाखात सीमांचे रक्षण करत फिरतील हीच सदिच्छा.

- धन्यवाद

बरोबर १ वर्षापुर्वी म्हणजेच १४ एप्रिल २०१४ रोजी नायजेरियातून बोको हरामने अपहरण केलेल्या २१९ शालेय विद्यार्थिनींची सुटका करण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न केल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफझाईने नायजेरियन आणि इतर जागतिक नेत्यांवर टीका केली आहे.

मलालाचे अपहृत मुलींना पत्र - http://edition.cnn.com/2015/04/13/world/malala-nigeria-schoolgirls-abduc...

गेल्यावर्षी इशान्य नायजेरियातील बोर्नो स्टेटमधील एका गावातून २७६ शाळकरी मुलींचे अपहरण करण्यात आले होते. त्यापैकी ५७ मुली सुटका करुन घेण्यात यशस्वी ठरल्या. बाकिच्यांचा अजून पत्ता नाही. शेवटी त्या बोको हराम ह्या दहशतवादी संघटनेच्या एका व्हिडिओ मध्ये दिसल्या होत्या. बोको हरामच्या प्रमुखाने म्हटले आहे की त्या मुलींना इस्लाम धर्मात घेण्यात आलं व त्यांचे विवाह करुन देण्यात आले आहेत (शाळकरी मुलींचे!!! Angry Sad ). मलालाने तरीही आशा व्यक्त केली आहे कारण नायजेरियातील नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादाविरोधात आणि स्त्रिया व मुलींवरील अत्याचारांविरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नायजेरियन फोर्सेस बोको हरामकडून प्रदेश परत मिळवत आहेत आणि शाळांना जास्त संरक्षण देत आहेत.
http://zeenews.india.com/news/world/world-must-do-more-to-free-nigerian-...

युनिसेफच्या रिपोर्टप्रमाणे दहशतवाद्यांनी आतापर्यंत ८००००० मुलांना ईशान्य नायजेरियातून कुटुंबापासून तोडून नेले आहे. http://mobile.nytimes.com/2015/04/14/world/africa/nigeria-militants-have...

लिबियातील इस्लामिक स्टेट मिलिटंट्सनी आज राजधानी त्रिपोलीतील मोरोक्कन दूतावासात बॉम्बस्फोट घडवून आणला. मनुष्यहानी झाली नाही. रविवारी त्याच मिलिटंट ग्रूपने त्रिपोलीतील साउथ कोरियाच्या दूतावासावर हल्ला केला होता आणि त्यात २ जण ठार झाले होते.

मनुष्य हानी जास्त झाली नसली तरी हे कृत्य लिबियातील परदेशी दूतावासांना किती धोकादायक आहे ते कळून येते. ह्या कारवाया त्यांच्या प्लानप्रमाणे पार पडल्यास खूप मोठा विध्वंस होऊ शकतो.

सैबेरियात पेटलेल्या मोठ्या वणव्यात १७ लोक मृत्युमुखी पडले, तर ४६० लोक जखमी झाले. ३० गावांना ह्या आगीची झळ बसली. ७०० गुरं आणि ३००० मेंढ्या जळून खाक झाल्या. बराच मोठा परिसर जळून गेल्यामुळे जिवंत राहिलेल्या गुरांना चरायलाही काही उरलं नाही. ५००० रेस्क्यू कर्मचार्‍यांनी रात्रभर ती आग विझवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. कुणा लहान मुलांचा नाही, तर प्रौढांचा काडेपेटीशी खेळ हे त्या आगीचे कारण आहे.
http://m.gulfnews.com/news/world/huge-siberia-wildfires-kill-17-1.1491252

यक्ष, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (बराक ओबामा) आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष (रौल कॅस्ट्रो) ह्यांच्या दरम्यान पनामा येथे झालेली ही अधिकृत राजनैतिक पातळीवरची भेट तब्बल ५६ वर्षांनंतरची पहिली भेट आहे. १९५९ साली अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो ह्यांच्या वॉशिंग्टन येथे भेट झाली होती आणि १९६० साली क्युबाशी राजनैतिक संबंध तोडून निर्बंध लादले होते. क्युबात आता लवकरच अमेरिकेचा दूतावास उघडण्यात येईल. अमेरिकेचे लॅटिन अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरु होण्याचे लक्षण आहे.

राफेल विमान खरेदी बद्दल इकॉनॉमिक टाईम्स मधली http://economictimes.indiatimes.com/articleshow/46894293.cms ही बातमी माहीतीपूर्ण आहे. सध्या भारत सरकार व फ्रान्स सरकार यांच्यात करार ( direct G2G , कोणत्या ही दोन कंपन्या चा करार नाही ) होउन ३६ विमाने भारत खरेदी करणार आहे. पाक व त्यापेक्षा ही चीन च्या हवाई युद्ध सज्जते ला सामोरं जायच तर भारता कडे ४४ स्क्वॅड्रन्स असायला हव्या ( सध्या ३२ ते ३४ आहेत) अशी हवाईदलाची बराच काळ पासून असलेली मागणी विद्यमान हवाईदल प्रमुखांनी पंतप्रधानांसमोर मांडली होती. पूर्वी च्या सरकारनी केलेले १२६ - तयार असलेली१८ व बाकी १०८ HAL ला तंत्रज्ञान विकून बनवली जाणार अशा प्रकारची - विमान खरेदी करण्याचे प्रयत्न हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लि. ( HAL ) व दस्सात कंपनी यांच्या दरम्यान तांत्रिक बाबी व अर्थिक बाबीं वरून असलेले मतभेद टोकाला गेल्याने अयशस्वी झाल्यात जमा होते व तो करार भारत सरकार ला मोठी पेनॉल्टी दिल्या विना मोडू शकत नाही अशी परिस्थिती होती. दरम्यान च्या काळात वाईट अर्थिक अवस्थेत असलेल्या दस्सात कंपनीला गेल्या फेब्रुवारीत इजिप्त कडून २४ विमानांची ऑर्डर मिळाली, ती ही भारतानी पूर्वी च्या करारात देउ केलेल्या किमती पेक्षा बराच अधिक किमतीत . त्या मुळे वाटाघाटी दस्सात च्या बाजूने झुकल्या होत्या.तेव्हा अठरा ऐवजी एकदम ३६ घेउन पूर्वीचा करार वाटाघाटी करून पूर्ण करण्याचा मार्ग कायम ठेवला आहे. तो करार रद्दबातल केलेला नाही http://www.ndtv.com/india-news/any-future-rafale-jet-purchases-will-be-g... या एन डी टी व्ही च्या बातमी नुसार उरलेली १२६ विमाने ही सुद्धा direct G2G पध्दतीनेच खरेदी केली जातील ( कोणत्या ही दोन कंपन्या चा करार नाही ) अस संरक्षण मंत्री पर्रीकरांनी सांगितल आहे. पहिल्या बातमीत शेवटी स्लाईड्स आहेत. त्या थोडक्यात बरीच माहीती देतात.

ट्रान्सफ़र ऑफ़ टेक्नोलॉजी याचा सहज गैरसमज लोकांचा असा होतो की भारताला सगळं तंत्रज्ञान कोणी देणार आहे. प्रत्यक्षात ते म्हणजे विमान जोडणी भारतात होणे इतकेच होय.

डासु ला हिंदुस्तान एरोनॉटीक्सला ते कंत्राट देण्यात आक्षेप आहे. या भानगडीत हे सगळे आधी अडकलेले होते.

भारतिय वायुदलाला तातडीने गरज असल्यामुळे ती जागा राफ़ेल चे हे ३ स्वाड्रन भरुन काढु शकतात . मिग २१च काय थोड्या कालावधीनंतर मिग २९ सुद्धा सेवेतुन काढावी लगतिल.

February 11 , 2013 |
A joint venture between France’s Dassault Aviation and Reliance Industries Ltd will build components and eventually assemble Falcon business jets in India.

Aviation industry sources said the joint venture, for which a memorandum of understanding was signed recently, was originally meant to build components for Rafale fighter jets to be used by the Indian Air Force.
The joint venture of Dassault and Reliance will determine the shape of the joint venture of the French firm with Hindustan Aeronautics Ltd (HAL) to make the Rafale fighter jets. It will decide which components of the Rafale Dassault will manufacture after concluding talks with the defence officials. Sources said Dassault was once keen to make most of the parts and have control over the joint venture while limiting the role of HAL to just assembling the jets.

However, the government wants HAL to have a greater role so that the Indian engineers are able to absorb the technology better. The $10-billion deal for 126 fighter jets was one of the most keenly contested defence contracts in the past few years. The sheer size of the deal has allowed the government to dictate the terms for greater localisation.

India has long been looking at ways to leverage its defence purchases to build a sophisticated arms industry. The defence forces are expected to spend around $100 billion in arms imports over the next five years. This year, around 89 per cent, or Rs 66,459.43 crore, of the total spending of the defence forces have been earmarked for acquisition and modernisation of equipment.

The government last year changed its defence offset policy to allow technology transfers and research collaboration to offset the splurge on jet fighters, artillery guns and submarines.

नमस्कार,

श्री. युरो आपणास विनंती आहे की मिग २१ आणि २९ तसेच सुखोई-३० यांचा करार वाचून घेण्यात यावा.
गैरसमज आपलाच होत आहे. हिंदुस्तान एरॉनॉटीक्स कंपनी स्थापन करण्यामागील उद्देश भारतात विमाननिर्मिती हाच आहे.

धन्यवाद

रशियाने इराणला अत्याधुनिक S-३०० मिसाइल्स पुरवण्याचा निर्णय घेतला. सुमारे ८०० मिलियन डॉलर्सचा करार अमेरिका व इस्रायलच्या हरकतीमुळे गोठवला गेला होता. आता न्युक्लिअर डिलच्या पार्श्वभूमीवर गुडविल म्हणून ह्या करारावरील निर्बंध रशियाने दूर केला आहे. अजून डिटेल्स आणि इस्रायलची प्रतिक्रिया इथे वाचायला मिळेल.

http://m.csmonitor.com/World/Middle-East/2015/0413/Russia-to-deliver-S-3...

http://www.latimes.com/world/europe/la-fg-russia-lifts-ban-missiles-iran...

भारताला सगळे तंत्रज्ञान रशियाने दिले असते तर तेजस विमानांचा प्रकल्प इतका रेंगाळला नसता. हस्तांतरीत तंत्रज्ञान जुने असते.क्रिटीकल पार्ट नेहेमी आयात होतात. ते कधीही इथे बनवले जाणार नाहीत. सुटे भाग बनवणे आणि संपुर्ण विमान बनवणे यात बराच फ़रक आहे.

नमस्कार,

तेजस विमान हे संपुर्ण भारतीय बनावटीचे विमान आहे. त्यास लागलेला विलंब हा वेगवेगळ्या कारणांमुळे आहे.

धन्यवाद

मयेकर

ए डी ए जी ग्रुप ने पिपावाव डीफ़ेन्स मधे मागच्या महिन्यात गुंतवणुक केली.

दिनेश्क
नमस्कार आणि धन्यवाद.

How Narendra Modi reworked Rafale deal, and why it’s a winner

NEW DELHI: Two themes dominated Prime Minister Narendra Modi's decision to do an outright buy of 36 Rafale fighter aircraft from France — national security and cutting through bureaucratic red tape. In the process, India was able to get better terms for the fighters, which has been hanging fire for the past few years.

Marzieh Afkham ह्या इराणच्या इतिहासातील दुसर्या स्त्री राजदूत असतील. तसेच इराणमध्ये १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती सुरु झाल्या नंतरच्या पहिल्या राजदूत असतील. त्यांचे पोस्टिंग कुठे असेल ते प्रसिद्ध झाले नाही. त्या सद्ध्या इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आहेत.

ह्या आधी Mehrangiz Dolatshahi ह्यांनी १९७० मध्ये डेन्मार्कमध्ये इराणच्या राजदूत म्हणून पद भूषविले आहे.

(ह्या दोघींची नावं कशी उच्चारायची माहित नसल्याने रोमन मध्येच लिहिली Wink )

Marzieh Afkham ह्या इराणच्या इतिहासातील दुसर्या स्त्री राजदूत असतील. >> मस्तच !

सोमालियाची राजधानी मोगादिशु येथे उच्च शिक्षण मंत्रालया बाहेर इस्लामिक मिलिटंट्सनी आत्मघातकी बॉम्बहल्ला केला.

http://mobile.nytimes.com/2015/04/15/world/africa/shabab-attack-ministry...

गरीब श्रीमंत अशी कुठलीच राष्ट्र सुटली नाहीत ह्या धोक्यापासून. त्या लिंकमध्ये त्या मंत्रालयाची इमारत दिसते त्यावरून कल्पना येते की आधीच किती underdeveloped देश आहे तो. पोटासाठी समुद्रात काही सोमाली लोक लुटारूपणा करत असावेत.

UN सेक्रेटरी जनरल बान की मून ह्यांनी २०१४ सालात अतिरेकी संघटनांकडून स्त्रियांवर लैंगिक अत्याचार, गुलामी आणि जबरदस्तीचे विवाह इत्यादि गोष्टी अत्यंत चिंताजनक प्रमाणात टेरर निर्माण करायचे साधन म्हणून केल्या गेल्याचं म्हटलं आहे. ह्यात इस्लामिक स्टेट गृप, बोको हराम, अल कायदा, अल शबाब सकट इराक, सोमालिया, नायजेरिया, माली, लिबिया, येमेन वगैरे देशातील अतिरेकी संघटनाआहेत.

http://www.nationalpost.com/m/wp/blog.html?b=news.nationalpost.com//news...

केश्विनी,

ती नावं मर्जिया आफखाम आणि मेहरंगीज दौलतशाही अशी असावीत असं वाटतंय.

जाताजाता : मेहरंगीजचा अर्थ शोधात होतो तर हे सापडलं : http://www.ourbabynamer.com/meaning-of-Mehrangiz.html

यावरून त्याचा अर्थ वात्सल्यांगी वा प्रेमांगी असा होत असावा.

आ.न.,
-गा.पै.

गामा Happy

मंदार, ह्म्म. ती खूप लहान आहे अजून. तिच्यात स्पार्क आहे पण पुढचं काही सांगू शकत नाही.

mandard माझेही मलालाबद्दल थोडेफार हेच मत आहे. डोक्यात गोळी खाणे (मग धमक्यांना न घाबरता शाळेत जाणारच या निर्धारापायी का असेना) हा शांततेचे नोबेल मिळण्याचा निकष असू शकतो हे अतर्क्य आहे.

Pages