अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यामुळे त्यांना काँग्रेसने १५ वर्षात दिल्लीत केलेले घोटाळे निस्तरायला २५-३० वर्षे मागावे लागत नाहीयेत.
<<

बर ते शीला दिक्षीत यांच्या विरुध्द काय कारवाई केली केजरीवाल सरकाने?
केजरीवालांनी शीला दीक्षित यांच्याविरूद्ध ३७०-३८० पानी पुरावे आहेत असं निवडणूक प्रचारात म्हटलं होतं. आणि आता म्हणतायत कि विरोधकांनी पुरावे द्या मग मी कारवाई करतो.

हो की सकुरा.

<<बर ते शीला दिक्षीत यांच्या विरुध्द काय कारवाई केली केजरीवाल सरकाने?>>

आगाईग्गं. कित्ती वेळा लिहिलं आहे हे. का असं छळता पुन्हापुन्हा तोच प्रश्न विचारून ? Lol

प्रसाद,
अल-दुआ ही मांसनिर्यात करणारी मोठी फॅक्टरी संगीत सोमने सुरू केली होती हे खरं असेल का हो?

अल-दुआ ही मांसनिर्यात करणारी मोठी फॅक्टरी संगीत सोमने सुरू केली होती हे खरं असेल का हो?
<<

मग त्यात गैर काय आहे, मांसनिर्यात करताना ते जर गोहत्याबंदिचा कायदा मोडुन गायींची कत्तल करत नसतील तर त्यात गैर किंव्हा बेकायदेशीर काहीच नाही.

आगाईग्गं. कित्ती वेळा लिहिलं आहे हे. का असं छळता पुन्हापुन्हा तोच प्रश्न विचारून ?
<<

जरा पान नंबर सांगता का?

हा व्हिडीओ बघा आणि मोदिंनी काय आश्वासन दिले होते ते एकदा नीट कान उघडुन ऐका. अर्धवट माहीतीवर पंधरा लाख, पंधरा लाख करु नका सारखे>>> -१

Delhi government serves ‘Rs 500 crore’ defamation notice to Aaj Tak over ‘onion scam’
उत्तम.
निदान बेसिक माहिती मिळवल्याशिवाय कुठल्याच पक्षाविषयी/व्यक्तीविषयी/घटनेविषयी दिवसभर बातमीचं दळण दळत बसू नये इतका तरी दबाव मिडियावर आला पाहिजे.

दिल्लीत एका उन्नत महामार्गाचे (फ्लायओव्हर?) उद्घाटन वेंकय्या नायडू आणि अरविंद केजरीवाल यांनी केले.
या बातमीत विशेष काय?
हा प्रकल्प सुरू करण्याचे श्रेय केजरीवाल आणि हर्षवर्धन यांनी माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनाही दिले. पुलाची योजना दीक्षित यांच्या कार्यकाळातली होती.

दुसरे, हा पूल नियत २४७.१७ कोटी रुपयांपेक्षा १०० कोटी रुपये कमी खर्चात म्हणजे १४७ कोटींत बांधून तयार झाला आहे.

ताई घाईत दिसतात. त्यांच्यासाठी त्यांचे वाक्य प्रुफ रीड करुन देत आहे.
निदान बेसिक माहिती मिळवल्याशिवाय आप / खांग्रेस / अल्पसंस्ख्यांक लांगुललाचन / जातीचे राजकारण करणा-या पक्षाविषयी/व्यक्तीविषयी/घटनेविषयी दिवसभर बातमीचं दळण दळत बसू नये इतका तरी दबाव मिडियावर आला पाहिजे.

भाजप आणि मोदींविरुद्ध काय पाहिजे ते लिहा आणि दाखवा.

<<दुसरे, हा पूल नियत २४७.१७ कोटी रुपयांपेक्षा १०० कोटी रुपये कमी खर्चात म्हणजे १४७ कोटींत बांधून तयार झाला आहे>>
--------
बान्धकामाची किम्मत १०० कोटी ने कमी व्हायचे कारण?

शीला दीक्षित यांनी दिल्लीत केलेल्या कामाचं वाईट बक्षीस त्यांना मिळालं. दिल्लीतल्या बलात्कारांबद्दल आता अरुण जेटली जे काही म्हणत आहेत त्यावरून हे मत बनलंय. महाराष्ट्रात मेट्रो, मोनो अशा सर्व रेल्वेंसहीत सी लिंक, अत्याधुनिक एक्स्प्रेस वे असं सारं काही झालेलं आहे. गुजरात या बाबतीत शेकडो वर्षे मागे आहे. पण फोटोशॉप केलेया बुलेट ट्रेनच्या प्रचारावर लोकांनी विश्वास ठेवला याचं आश्चर्य वाटतं. असा खोटा प्रचार करणारे काय देशाला दिशा देणार ?

मयन्क गान्धी यान्ना का दुर करण्यात आले?

आम आदमी पार्टी कडुन अपेक्षा होत्य, अजुनही आहेत... बेदी, भुषण, यादव आणि आता गान्धी असे एक-एक मोहोरे गळत आहेत. सर्व आल-बेल आहे या बाबत मनात शन्का आहेत.

भरत, लय भारी वाटलं होतं ती बातमी वाचल्यावर. बहुतेक अशी घटना आपल्या इथे पहिल्यांदाच घडली आहे.

<<बान्धकामाची किम्मत १०० कोटी ने कमी व्हायचे कारण?>>

भ्रष्टाचारामुळे होणारी लीकेजेस थांबली/कमी झाली आहेत असं दिसतंय. बांधकाम क्षेत्रातील मुख्य हप्ता मंत्र्यांपर्यंत जातो (म्हणे)--घाबरावं लागतं हल्ली :फिदी:).
हा प्रकार (extortionist corruption) दिल्लीसरकारात पूर्ण बंद झाला असावा. अकेंनी स्वतःच्या मंत्र्यालाच पत्रकार परिषद बोलावून डिच्चू दिलाय हे पाहून उरल्या-सुरलेल्यांनीही धास्ती घेतली असणार.
शिवाय काम वेळेत पूर्ण झाल्यानेही खर्च वाचू शकतो.

त्या उड्डाणपूलाशी संबंधित नाही, पण असल्या दुसर्‍या कामांबद्दल लागलेली अशी पोस्टर्स दिसली होती.

aap poster transparency.jpg

"यह पाइपलाइन आप के पैसे से लग रही है, इस पे नजर रखें!"
असली 'नौटंकी' सर्व पक्षाच्या आमदार-खासदारांना सक्तीची करायला हवी. Happy

दुसरी शक्यता -- कमी दर्जाचं साहित्य वापरून खर्च वाचवला असावा...जे धोक्याचं आहे.
मला स्वतःला असं नाही वाटत, पण शक्यता आहेच.

<<<<<<<कमी दर्जाचं साहित्य वापरून खर्च वाचवला असावा >>>>>>>>>>>>

फार फार तर काही लोक मरतील, पण १०० कोटीतर वाचल्याच समाधान !! हाकानाका !!

<<भाजप आणि मोदींविरुद्ध काय पाहिजे ते लिहा आणि दाखवा.>>

काहीही हां बघिरा.
ताजं उदाहरण. ब्रिटिश मिडिया मोदींना बरंच काही म्हणाली म्हणे -- persona non grata, 'नाक दाबा आणि मोदींशी हस्तांदोलन करा', 'हिंदू तालिबान चालवणारा नेता' वगैरे वगैरे.
पण आपल्या देशी टिव्ही चॅनेल्सवर फक्त वेंबलीमधला रॉक शो, ब्रुक बॉण्ड, जेम्स बॉण्डच दिसला असं ऐकलं! खखोभाप्रेजा Wink

<<मयन्क गान्धी यान्ना का दुर करण्यात आले?>>

मयंक गांधी योयागटाचे आहेत असं एकूण दिसतंय. मी मागे एकदा लिहिलं होतं की महाराष्ट्रातील आपच्या घडामोडी मी जास्त फॉलो करत नाहीये त्या असल्याच कारणांनी. अजूनही काही कुरापती चालू असाव्यात.
Lokpal.us अशा नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे, ती आपवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने आणि आप ला ध्येयापासून ढळू न देण्याच्या उद्देशाने काही लोकांनी तयार केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
AVAM सारखाच प्रकार वाटतो आहे. अवामने नंतर काय केलं ते दिसलंच.
योया, प्रशांत भूषण, मयंक गांधी वगैरेंच्या टाइमलाइनवर चक्कर टाकली तर त्यांचा रोख लक्षात येतो.
असो. असल्या गोष्टींशी आपला थेट संबंध नाही. त्यामुळे चर्चा करण्यात अर्थ नाही.

गजाभौ, गेल्या वर्षी सुरतमध्ये पूल पडला त्यात किती वाचले होते हो?

म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय?
सिंगल पिलर वापरल्याने लँड कमी वापरली गेली. भूमीसंपादनाचा खर्च वाचला म्हणूनही पूलाची किंमत कमी झाल्येय असं लिहीलय तिथे.
मग? शीलाबाईंच्या काळात पूल तयार करायची कॉस्ट डिसाईड केली तेव्हा डिझाईन तयार करून मगच काढली असेल ना?
का आपली शीलाबाईंनी दोन पिलरवाली २४७ ची योजना आणली आणि अरुभाऊ आल्यावर दोन खांबांचा एक खांब करून खर्चात कपात केली.
नवलच एकेक!

>>का आपली शीलाबाईंनी दोन पिलरवाली २४७ ची योजना आणली आणि अरुभाऊ आल्यावर दोन खांबांचा एक खांब करून खर्चात कपात केली.<<

तेच लिहिलंय बातमीत. आता दोन खांबा ऐवजी एक खांब उभारुन खर्चात (लेबर, मटिरीयल, टाइम) कपात झाली हे समजायला इतकं कठीण नसावं, यात भुसंपादनाचा मुद्धा कुठे येतो?

काॅमन सेंस इज नाॅट सो काॅमन या युक्तीची प्रचिती जिथे-तिथे देत जाउ नका...

e of the factors that helped cut the project cost. "The conventional way of designing a flyover is to use twin pillars to support the carriageways, but this corridor is supported on a series of single piers, which has also reduced the cost of land," said a senior official.>>

याचा कॉमनसेन्स असलेल्यांच्या मराठीत काय अनुवाद होतो?
Wink

डिफरंस इन कंस्ट्रक्शन काॅस्ट इज लार्जर दॅन डिफरंस इन लॅंड काॅस्ट. म्हणजेच, कंस्ट्र्क्शन काॅस्ट चं सेविंग लॅंड काॅस्ट पेक्शा जास्त आहे. फ्लायओवर ६ लेनचाच आहे, म्हणजे जमीन तेव्हढिच लागली पण तिची उपयोगीता चांगलं डिझाइन करुन वाढवली (ॲंड देअरबाय रिड्युस्ड अपाॅर्चुनिटी काॅस्ट, टु सर्टन एक्स्टेंट)...

हे पण नाहि समजलं तर सोडुन द्या, आय कॅनाॅट आर्टिकुलेट एनी फरदर...

<<बाकि भक्तीगीतांचा कार्यक्रम चालु द्या...>>

कसचं कसचं !
हे भक्तिगीत पहाण्याचा भाग्ययोग आला की नाही तुम्हाला अजून? बघाच. एकदम लेटेष्ट आणि टडोपा आहे.

सिंगल पिलर च्या ऐवजी डबल पिलर ने खर्च प्रोजेक्ट कॉस्टमधे नेमका कितीच्या गुणोत्तराने वाढतो ? ( स्थापत्य अभियंत्यांसाठी प्रश्न आहे हा. इतरांकडून उत्तर नकोय ).

इतरांसाठी : सिंगल, डबल पिलर मधे भूसंपादनाचा खर्च कसा काय वाढतो / कमी जास्त होतो ? उड्डाणपुलाखालची जमीन कमी अधिक प्रमाणात संपादीत करण्यात येते का ?

की जमीन संपादनाच्या दरात कमी जास्त होत असावं ? शंभर कोटींचं मार्जिन ठेवणे शक्य असेल का ?

युगप्रवर्तक अरविंदजी केजरीवालजी पुरी तरहसे नेता बन गये हैं !

ईसका परीचय देते हु ऐं उन्होंने पुल निर्माण के लिये शिला दिक्षित जी के नाम के कशिदे पढें !

http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Flyover-finished-at-less-t...

मिर्ची, "हिंदू तालिबान चालवणारा नेता" हे उद्गार काढणारा काॅग्रेसचा भाट कोण आहे याची काही माहिती आहे का?

एका पुलाच्या निर्माणामध्ये रुपयांची तरतूद रक्कमेपेक्षा बचत झाली. चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल तज्ञ व्यक्तींचे विचार अपेक्षित.

आणि हो असे पोस्टर्स/होर्डिग्ज लावण्याची महानगरपालिकेची परवानगी लागते. असेल तर त्या परवानगीची लिंक शोधून द्या. Lol

persona non grata, 'नाक दाबा आणि मोदींशी हस्तांदोलन करा', Ex-pariah हे सगळं लिहिणारे कुणाकुणाचे भाट आहेत?
जौद्या, त्यापेक्षा आपण कसं मान्यच करून टाकू ना की ही शिंची ब्रिटिश मिडिया भारतविरोधी, हिंदूविरोधी, आ.वं.मोदीविरोधी आहे आणि हे सगळं भारताला मागे खेचण्यासाठी केलं जाणारं आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे !

<<असेल तर त्या परवानगीची लिंक शोधून द्या.>>

होर्डिंग्ज बिनापरवानगी लावले आहेत ह्याची लिंक तुम्ही शोधून द्या.
सबकुछ हम ही करेंगे तो फिर आप क्या करोगे? Wink

इतरांना बाकीच्या बाफवर भाषेबद्दल आणि गदारोळयुक्त चर्चा करण्याबद्दल सल्ले देणारे इथं मात्र लोकांचे कॉमन सेन्स काढतात.. चांगलं आहे Happy

Pages