अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंबा, रेडिट वरची चर्चा वाचली आहे. प्रतिवाद झालेले आहेतच पण त्याचा अर्थ मोदिंनी काहि काम केलेलंच नाहि असा निघतो का, हा इथे चर्चेचा विषय आहे...

>>प्रसाद, मुद्द्यांवरून चर्चा करूया. आपलं-तुपलं जौद्या. मला मोदी आवडत नाहीत. पण त्यांनी काय चांगली कामे केली हे वाचायला आवडेल की.<<

कापोचे, मिर्चीताईंची वरची कमेंट तुम्ही "जंप" केलेली दिसतेय...

राज
######पण त्याचा अर्थ मोदिंनी काहि काम केलेलंच नाहि असा निघतो का, हा इथे चर्चेचा विषय आहे...#####
याचा अर्थ असाही नाही "अगा जे घडलेचि नाही " त्याचे क्रेडिट पण मोदी na देऊन मोकळे व्हा
असो फ़ेसबुक फॉरवर्ड वरून मोदीनी केलेले काम ठरवू नका

हे राम !

प्रसादभौ, पान ६५. तेही नाही सापडलं तर काय, म्हणून पोस्ट खाली चिकटवली आहे.

>"><<मयन्क गान्धी यान्ना का दुर करण्यात आले?>>

मयंक गांधी योयागटाचे आहेत असं एकूण दिसतंय. मी मागे एकदा लिहिलं होतं की महाराष्ट्रातील आपच्या घडामोडी मी जास्त फॉलो करत नाहीये त्या असल्याच कारणांनी. अजूनही काही कुरापती चालू असाव्यात.
Lokpal.us अशा नावाची वेबसाइट तयार करण्यात आली आहे, ती आपवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने आणि आप ला ध्येयापासून ढळू न देण्याच्या उद्देशाने काही लोकांनी तयार केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
AVAM सारखाच प्रकार वाटतो आहे. अवामने नंतर काय केलं ते दिसलंच.
योया, प्रशांत भूषण, मयंक गांधी वगैरेंच्या टाइमलाइनवर चक्कर टाकली तर त्यांचा रोख लक्षात येतो.
असो. असल्या गोष्टींशी आपला थेट संबंध नाही. त्यामुळे चर्चा करण्यात अर्थ नाही.

<<प्रतिवाद झालेले आहेतच पण त्याचा अर्थ मोदिंनी काहि काम केलेलंच नाहि असा निघतो का, हा इथे चर्चेचा विषय आहे...>>
छे, मुळीच नाही. धागा भरकटतो आहे. मोदींना योग्य जागी हलवा, नंतर बोलूया.

<<कापोचे, मिर्चीताईंची वरची कमेंट तुम्ही "जंप" केलेली दिसतेय...>>
राजभौ, त्याच कमेंटमधलं "आता मोदींबद्दल इथे पुरे करूया" हे वाक्य तुम्ही जंप केलेलं दिसतंय. Uhoh

असो. सध्यापुरता रामराम.

>>याचा अर्थ असाही नाही "अगा जे घडलेचि नाही " त्याचे क्रेडिट पण मोदी na देऊन मोकळे व्हा
असो फ़ेसबुक फॉरवर्ड वरून मोदीनी केलेले काम ठरवू नका<<

सिम्बा - कंटेंट बघा, फॉर्वर्डवर विश्वास नसेल तर वर्ची डिएनए ची बातमी बघा, ती पण खोटी का?

मिर्चीताईंच्या त्या वाक्यावर माझा वरचा प्रतिसाद होता. त्या अजुनहि एका विश्वात घुटमळतायत जिथे मोदिंचं काम पोचतच नाहि - ते दाखवुन ध्यायला ती कमेंट होती. आता ती फॉरवर्ड होउन आली म्हणुन त्यात काहि तथ्य नाहि असं तुमच म्हणणं असेल तर इतर वर्तमानप्त्रातुन मोदिंच्या कार्याच्या बातम्या येतात त्याचं काय? ते सुद्धा "घडलेची नाहि का?.." Wink

>>राजभौ, त्याच कमेंटमधलं "आता मोदींबद्दल इथे पुरे करूया" हे वाक्य तुम्ही जंप केलेलं दिसतंय<<
मिर्चीताई - नाहि जंप नाहि केले, पण तुमचंच आधिचं वाक्य एक ऑनसाइडला आलेला "फुल्टॉस" होता म्हणुन त्याची खातिर्दारी इथेच करावी असं ठरवलं. तुम्ही देखिल या धाग्यावर बर्‍याचदा मोदिंना आणलेले आहे, नियमभंगाचं पाप मला लागणार नाहि अशी आशा करतो... Wink

कॅच दॅट बघिरा. आत्ताच्या सत्रात त्यांनी आणलं मोदींना इथे.

<<त्या अजुनहि एका विश्वात घुटमळतायत जिथे मोदिंचं काम पोचतच नाहि>>

त्याच विश्वातील इतर सूर्यगंगांची नावे -- दिल्ली, बिहार Wink
अजून बाकीच्या सूर्यगंगा सापडायच्या मार्गावर आहेत. वॉच धिस 'स्पेस'...

बाकी राजभौ, तुमच्या त्या इंग्रजी फॉर्वर्डची ४-५ महिन्यांपूर्वीच शल्यचिकित्सा झाली आहे. नवीन स्टॉक येऊ द्या. इथे नको. मोदीकाकांच्या धाग्यावर.

A cute hug of kejariwal & Lalu during Nitish Kumar's swearing in ceremony in Patna..........Amazing change in one year..........

हम सब मिले हुए है जी... काळानुरुप नारा मोदी फाय करतोय...

जो पर्यन्त केजरीवाल स्वत: भ्रष्टाचार करत नाहीत तोवर त्यान्नी कितीही लालू यादव सारख्या नेत्यान्ना बिग-हग दिली तरी यामुळे माझा त्यान्च्यावर असलेला अढळ विश्वास यत्किन्चितही डळमळणार नाही.

मोदी हे केजरीवाल यान्च्या एव्हढे (सारखे) स्वच्छ नाही आहेत, त्यान्चे भ्रष्टाचार निर्मुलनाशी काही घेणे देणे नाही आहे.

मला बदल दिसला आणि तो सकारात्मक आहे असे मानायला भरपुर जागा आहे.

युगपुरुष श्री श्री श्री केजरीवाल आणी युगप्रवर्तक श्री श्री श्री लालु प्रसाद स्टेज वर एकत्र !!

kejriwal and Lalu__1.jpg

अरेरे किती तो बदल युगपुरुष श्री श्री श्री केजरीवाल यांच्या विचारसरणीत !

kejriwal twitter.png

वर्षभरात केजरीवाल गुटगुटित दिसू लागलेत.
थंडीला सुरूवात होऊनही मफलर्/कानटोपी काही नाही.
मुख्यमंत्रीपण मानवलेले दिसतेय.
Happy

<<मिर्ची ताई केस चा निकाल लागला का?>> कुठली केस? डिस्कॉम्स का?

<<लोकपाल बिल?>> मंत्रिमंडळाने मंजूर केलंय. आता हिवाळी सत्रात मांडणार असं वाचण्यात आलं. वर सौरभने लिंक दिली आहे एक.

गजाभौ,
"भ्रष्टाचार छूने से नहीं फैलता, करने से फैलता है...." Wink
एक प्रतिक्रिया लोकपाल बिलावरही येऊन जौद्या.

त्या व्हिडिओमध्ये अके लालूंना टाळताना स्पष्ट दिसतंय. मला वाटतं, मुळात अकेंनी लालूंना टाळायलाच नको होतं. ऑफिशिअल कार्यक्रम होता, तर नुसता औपचारिकपणे हात मिळवून पुढे जायला हवं होतं. टाळाटाळी केल्यामुळे ते सगळं दृष्य हिलारियस झालंय.
जनलोकपाल बिल पास केलं, मंत्र्याला बरखास्त केलं, भरपूर कामं होताना दिसताहेत....पण...पण ...पण एका औपचारिक समारंभात लालूंनी अकेला मिठी मारली तर आता अके भ्रष्टाचारी झाले असं मानण्याइतके आप ला पाठिंबा देणारे लोक इतके काही 'हे' नाहीत !
असो.

सातीतै,
स्वेटर-मफलर आलाय बाहेर. २२ तारखेच्या 'कारफ्री डे' च्या रॅलीमध्ये दिसला होता.

सौरभ Happy
युरो, CAG ला डिस्कॉम्सचं ऑडिट करता येणार नाही असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता. त्याविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात दावा करणार आहे असं वाचलं.

>>>><<मज्जा येणार आहे पाच वर्ष.>> अगदी अगदी Lol

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 20:16 <<<<

खरंच, खूप मज्जा येत आहे Wink

अरे व्वा फारच आनंद झालेला दिसतोय.. Wink
पण तरी 5 वर्ष पुर्ण करतील हो..
रेड मारायला गेलेला आॅफिसरने जेव्हा "भिंतींना रंग कधी लावला" हे विचारले तेव्हाच कळले ही भाजप्यांच्या डोक्याने चालणारा आहे. असे मूर्खतापूर्ण प्रश्न विचारण्यात भाजप्यांचा हात जगात कोणी पकडू शकत नाही Rofl

तुम्ही भलत्याच कोणाला तरी पप्पू म्हणताय. त्यांचं लाडाचं नाव दुसरं आहे.
मला सहाशे कोटी मतदारांनी निवडून दिलं आहे म्हणणारे.

Pages