अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

he party, in its manifesto, has promised to give free Wi-Fi across the national capital for first 30 minutes, after which users have to pay for the services. The issue helped the party attract a lot of youth, considering the number of smartphone users in the national capital.>>>> हे माहित होतं. जाहिरातींमध्ये /वाटलेल्या पत्रकांमध्ये हे लिहिलेलं होतं.

>>मला वाटले होते फ्री म्हणजे टोटली फ्री... असो. <<
सगळ्यांनाच तसं वाटण्याची शक्यता आहे; सगळेच फाइन प्रिंट वाचतात का?

मुंबईत कशारितीने हे फेबु फ्री वाय्-फाय चालतं याची कल्पना नाहि...

<<त्या प्रशांत भुषणने तर म्हणे पुराव्यानिशी दाखवुन दिलेय, की आप मध्ये किती स्वच्छ आमदार आहेत ते! >>

कुठे? लिंक द्या बरं.
ADR च्या रिपोर्टनुसार शून्य टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत. बाकीच्यांवरचे गुन्हे सुद्धा १४४ चा भंग असले आहेत.
प्रशांत भूषणबद्दल मला स्वतःला खूप आदर आहे. त्यांनी असं काही विधान केल्याचं माझ्या वाचण्यात नाही.
शांती भूषण म्हणाले होते की अकेमध्ये संघटनकौशल्य नाही वगैरे. पण निवडणूकीच्या निकालानंतर हे विधान आपोआपच निकालात निघालंय.

<<बरेच लोक असेही आहेत की जे काँग्रेसभक्त ही नव्हते आणि भाजपाभक्त पण नव्हते ते आता 'आप'चे भक्त झालेत.>>

भक्त होण्यापेक्षा समर्थक होऊया. उद्दिष्टांपासून भटकत आहेत असं वाटलं की विरोध दर्शवूया. Happy

अल्पना +१.
मी पण मुलाखतींमध्येसुद्धा ऐकलं होतं. पेपरमध्ये आलेल्या बातम्यांमध्येही होतं. पण आता भाजपासमर्थकांनी दंगा चालवलाय 'युटर्न घेतला, फसवणूक केली' म्हणून. फ्री दिलं की म्हणायचं, पॉप्युलिस्ट आहेत. ३० मिनिटेच फ्री देणार म्हटलं की म्हणायचं, आम्हाला सगळं फ्री पाहिजे. चालायचंच.
नोव्हेंबर २०१४ ची बातमी --"If voted to power, the party will launch a mobile application 'Aap Ki Sarkar, Aap Ke Dwar" through which essential Internet services will be offered free for 30 minutes," AAP leader Adarsh Shastri said."

CM केजरीवालांच्या हाती मंत्र्यांचा रिमोट!

आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. सहा मंत्र्यांना सर्व खात्यांचे वाटप केले. एकाही खात्याचा 'भार' हाती न घेता त्यांनी मंत्र्यांच्या 'कारभाराचा रिमोट कंट्रोल' आपल्याकडेच ठेवला आहे.

तरी बर, ईथेच मोदींचा कंट्रोल कोणाला पचनी पडला नव्हता पण,

हा केजरीवालचा कंट्रोल असल्याने तो फारच " जेन्युंईन " आणि युग प्रवर्तक ठरेल !

मला असे वाटते की केजरीवाल यांनी विरोधी पक्षाबद्दल बोलणे शक्यतो टाळावे. म्हणजे भाजपचा अहंकार, कॉंग्रेसची रणनीती बद्दल वक्तव्ये करू नयेत. कारण दिल्लीकरांनी त्यांना बहुमत देऊन हे स्पष्ट केलेच आहे की आप या पार्टीवर त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांना अशी वक्तव्ये करायची गरज नाही.

आणी बाकीच्यांना एवढे सांगावेसे वाटते की अरे त्यांना एक संधी देऊन तर बघा आणी त्यांना थोडा वेळ द्या म्हणजे लगेच त्यांनी केलेया आश्वासनाबद्दल स्पष्टीकरण मागू नका.

चुभूद्याघ्या..

<< मला असे वाटते की केजरीवाल यांनी विरोधी पक्षाबद्दल बोलणे शक्यतो टाळावे. म्हणजे भाजपचा अहंकार, कॉंग्रेसची रणनीती बद्दल वक्तव्ये करू नयेत. >>
सहमत.

एकही खातं स्वतःकडे न ठेवण्याच्या निर्णयामध्ये हरकत घेण्यासारखं काय आहे हे कळलं नाही.

दिल्लीला पुर्ण राज्य दर्जा: केजरीवालयांची मागणी, रास्त की एक पळवाट ? ह्या प्रश्नामध्ये " की भाजपाचा (असंख्यांपैकी) आणखी एक चुनावी जुमला?" हा प्रश्न विचारायचा राहिला आहे असं दिसतंय. Wink

Delhi statehood bjp.jpg

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीआधी भाजपाने खास दिल्लीसाठी एक मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला होता. त्यात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासन दिलं होतं. दिल्लीकरांनी विश्वास ठेवून सातच्या सात खासदार संसदेत पाठवले. आता भाजपा जर आश्वासनपूर्तीपासून पळत असेल तर दिल्लीकरांनी ह्या खासदारांना जाब विचारायला पाहिजे.
जागो भारत जागो. निवडून येण्यापुरती खोटी आश्वासनं देणार्‍या नेत्यांना प्रश्न विचारणं आपला हक्क आहे.

नक्कीच जाब विचारायलाच हवा.

होय मिर्ची ताई वाट बघतो आहे. अत्ता तर सुरुवात झाली आहे. पश्न थोड्या दिवसांनी विचारु.

विज कंपन्यांचा कॅग ऑडीट चा अहवाल कघी पर्यंत अपेक्षीत आहे?

साधारण किती घोटाळा बाहेर येईल अस तज्ञांनी धरलेल आहे? म्हणजे किती % दर कमी करता येतिल ते समजेल म्हणुन विचारले. तशी काही समय सीमा नाही; तो पर्यंत सबसीडी आहेच.

योगेंद्र यादव आणि सध्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री यांचे विचार यावर वेगवेगळे आहेत.

योगेंद्र यादव म्हणतात ऑडीट मधुन प्रचंड पैसा मिळणार आहे.

उमुमं ना हाच प्रश्न विचारला आणि आआप तज्ञ तिथुन जास्त आशा नाही असे सांगतात असे म्हटल्यावर वेगळेच सांगतात.

पाण्याच्या फ़ुकट वाटपचे एक वेळ बाजुला ठेवा पण त्याच्या मुलभुत वाटपाच्या सोयी सुविधा नाहीत जलवाहिन्या नाहीत त्याचा प्रचंड खर्च येईल तो जमेस धरला आहे का असे विच्यारल्यावर उमुंम नी पण गेल्या ६५ वर्षात अशी कॅसेट लावल्यावर मी चॅनेल बदलला

बाकी मुद्दे एक एक करुन मग आरामत बोलु. धग्याच्या वाचकानी आणि आआप विरोधकानी समय सीमा लावु नये.

<<विज कंपन्यांचा कॅग ऑडीट चा अहवाल कघी पर्यंत अपेक्षीत आहे?>>

"Reading the straws in the wind, Delhi’s electricity regulator has, over the last week, kicked off an audit exercise aimed at a detailed verification of the physical infrastructure deployed by the three private power distribution companies operating in the capital and squaring it with their capex (capital expenditure) in the last seven years. This is over and above the financial audit being carried out by the Comptroller and Auditor General, a move that was initiated by the AAP during its earlier stint in government."

ऑडिट सुरू करायला पुन्हा आपचं सरकार यायची वाट बघावी लागली ह्यातच सगळं आलं. त्यात किती घोटाळा बाहेर पडणार ते पूर्ण झाल्यावरच कळेल.

<<पाण्याच्या फ़ुकट वाटपचे एक वेळ बाजुला ठेवा पण त्याच्या मुलभुत वाटपाच्या सोयी सुविधा नाहीत जलवाहिन्या नाहीत त्याचा प्रचंड खर्च येईल तो जमेस धरला आहे का असे विच्यारल्यावर उमुंम नी पण गेल्या ६५ वर्षात अशी कॅसेट लावल्यावर मी चॅनेल बदलला>>

चॅनेल नको होता बदलायला. कदाचित पुढे उत्तर मिळालं असतं.
"Dilip Kumar a resident of Sangam Vihar’s Block-16 was surprised at the sight of a government water tanker near his colony for the first time on Sunday morning. Only a day after the Aam Aadmi Party (AAP) government took oath, the Asia’s largest unauthorised colony facing acute water shortage for decades finally received free water."

सरकारी टँकरने पाणी पुरवायच्या कामाला सुरूवात झाली आहे. पाइपलाइन्स पुरवायला अर्थातच वेळ लागणार.

आप सरकारला कामं पूर्ण झाली की नाही हा जाब विचारायला अजून नक्कीच वेळ जायला हवा.
मात्र भाजपाने घेतलेत तसे युटर्न्स आपवाल्यांनी घेतलेले कुठे वाचण्यात/ऐकण्यात आले तर लगेच लिहा. मी सुद्धा विरोध करीन त्या गोष्टींचा.

मोदी सरकारकडूनही एका रात्रीत बदल घडवण्याची अपेक्षा नव्हतीच. आधीही लिहिलंय हे. पण ज्यासाठी लोकांनी निवडून दिलंय त्या दिशेने पावलं टाकायला सुरूवात झाल्याची तरी दिसायला हवं ना. उलट जवळजवळ सगळ्या गोष्टींवर ते विरुद्ध दिशेने पावलं टाकताना दिसत आहेत.

ऑडीट हवी तेवढी करावी.तरी साधारण किती फ़रक पडेल याचा अंदाज तरी हवा ना? आता कॅग ऑडीट मधुन जास्त काही मिळणार नाही म्हटल्यावर नविन ऑडीट?

रेग्युलेटर ने या आधी हे तपासुन झाले आहे. आता आआप च समाघान होई पर्यंत शोघत रहाणार का?

प्रश्नाचे मुळ कशात आहे हे सगळ्याना माहित आहे. ८०% खर्च हा विज विकत घेण्यावर होतो आहे. असे कंपन्याना वेठीला धरुन करुन कोणाचे समाधान सरकार करत रहाणार?

पाणी पोहोचले हे उत्तम झाले. फ़ुकट का दिले हा प्रश्न विचारलाच नाही. मुद्दा एवढाच विचारला होता की मुलभुत सोयी निर्माण करण्याची गरज जास्त आहे त्या बद्द्ल काय करणार. तो खर्च जाहीरनामा देताना विचारत घेतला होत क?
त्यावर गेल्या ६५ वर्षात... सुरुवात.

CNBC TV 18. वर निवडणुकी आधी एक चर्चा चालु होती. आअप च्या मिरा सन्याल होत्या. कधी नव्हे ती ओरडुन ओरडुन चर्चा चलु होती. एक एनालिस्ट ने विचारले , तुम्ही फ़ुकट वाय फ़ाय देणार आहात त्यासाठी मोठि बॅंड्विड्थ लागेल तुम्हाला स्पेक्ट्रम विकत घ्यावे लगेल तेव्हा कुठे सगळ्या दिल्ली ला फ़ुकट वाय फ़ाय मिळेल.. स्पेकट्रम विकत घेण्याचा खर्च हा इतर कंपन्या बोली लावुन घेतात तेव्ढा येईल तुम्ही त्याचे कसे जमवणार?

मिरा सन्याल थोड्या रागने एवढेच म्हणाल्या ;आम्ही सगळे विचार करुन केलेले आहे तुम्ही काळजी करु नका तुम्च्या मर्केट वर याचा काही वाईट परिणाम होणार नाही. तुमचे मार्केट वरच जाईल. तेव्हा त्या एकदाही म्हणाल्या नाहीत तुम्हाला मिळालेली महिती चुकीची आहे आम्ही सदा सर्व काळ फ़ुकट वाय फ़ाय देणार नाही आहोत.

माय्क्रोसोफ़्ट मधे काम करणारे आणि आता आआअप मधे असलेले एक तज्ञ म्हणाले या वाय फ़ाय वर काही डाउनलोड करता येणार नाही याचा उपयोग सरकारी वेबसाईट बघण्या साथी नुसते नेट सर्फ़ करण्यासठी करता येईल.

वाय फ़ाय काही जीवन मरणाचा प्रश्न नाही. ते मिळाले नाही म्हणुन फ़्ररक पडणार नाही. या पेक्षा जास्त महत्वाचे प्रश्न सरकारला सोडवायचे आहेत. एवढ्या मुद्यावरुन सरकार चांगले वाईट ठरवणे योग्य नाही. तरी हा मुद्दा चीप पोप्युलॅरीटी साठी होता का असे वाटल्याशिवाय राहात नाही.

<<आता कॅग ऑडीट मधुन जास्त काही मिळणार नाही म्हटल्यावर नविन ऑडीट?>>

Uhoh कुठलं नवीन ऑडिट ? गेल्या वर्षी चालू केलेलंच बासनात गुंडाळलंय इतके दिवस. आता उघडलं परत.

<<पाणी पोहोचले हे उत्तम झाले. फ़ुकट का दिले हा प्रश्न विचारलाच नाही.>>

नकाच विचारू. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे. एका मर्यादेत प्रत्येकाला मिळायलाच हवं. सरकारचं कर्तव्य आहे ते.
दिल्लीतल्या गोल्फ कोर्सला सरकारकडून किती सबसिडी मिळते काही कल्पना आहे का? बंदच करायची तर ती बंद करावी.

वायफायबद्दल अनेक पेपर्समध्ये आणि अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं की ते किती असणार, किती वेळ फ्री असणार. अल्पना म्हणत आहेत की तिथे वाटलेल्या पत्रकांमध्ये सुद्धा लिहिलेलं होतं.
दिल्लीकरांना माहीत आहे. बाहेरचेच उगीच "फसवलं फसवलं" म्हणून दंगा करत आहेत Wink

वायफाय कनेक्टिव्हिटी जर नसेल तर महिला सुरक्षेसाठी जो 'सुरक्षा बटण' चा प्लॅन आहे त्याला काही अर्थच रहाणार नाही.
महिला सुरक्षेवरून आठवलं. लोकहो, हे वाचा आणि शक्य असेल तर हा फॉर्म भरून देता येतोय का बघा. (पक्षनिरपेक्ष !) Happy

http://khabar.ndtv.com/news/india/aap-funding-issue-in-high-court-740514
आम आदमी पार्टी के विदेशी चंदे के मामले में केंद्र सरकार ने एक बार फिर हाईकोर्ट में कहा है कि जांच में पार्टी के खिलाफ कुछ गैर-कानूनी नहीं मिला है।

हाईकोर्ट ने केंद्र सरकार को 'आप' की विदेशी फंडिंग के बाबत जांच रिपोर्ट सीलबंद कवर में सौपने का निर्देश दिया है। इस मामले में दिल्ली हाईकोर्ट ने आदेश सुरक्षित रखा है।

--------------------
भाजपाचे दात परत घशात घातले Rofl

हे माहीतच होतं. उगीच का जेटलीभौ म्हणत होते की 'ऑनरेबल कोर्टाला' राजकीय भांडणात नको ओढायला !
खोटं बोलल्याबद्दल जेटलीभौ आणि निर्मलातैंवर केंद्रातील सरकार काय कारवाई करणार ?

"बडा गुमान था झूठों को अपने 'नसीब' पर
सच से टकराये तो 'कपडें नीलाम' होने लगें !!" Wink - ट्वीटरवरून साभार

पंतप्रधानांच्या वक्त्यव्यावरून एक गोष्ट सिध्द झाली. लाट कोणाचीही आणि कितीही मोठी असो तिला योग्य दिशेस नेण्यासाठी दिल्लीसारखे Correction जरूरी आहे.

>>विचार करून घोषणा करा... ‘आप’चे संस्थापक सदस्य शांतीभूषण यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना एखादी घोषणा करताना त्याच्या पूर्ततेसाठी वित्तसाहाय्य कसे उपलब्ध होईल, हे डोक्यात ठेऊन घोषणा करावी, असा सल्ला दिला आहे. <<
हम्म... देर आए, दुरुस्त आए... Happy

ओये पाजी फिकर नॉट्ट. ज्यांचा पैसा आहे त्यांच्यासाठी वापरला तर पुरेसा होईल.
शांती भूषण म्हणजे मिडियावाल्यांना तारणहार वाटत असतील बहुतेक Lol
तिकडे मुमं, मंत्री आणि त्यांचे आमदार एकामागोमाग एक कामं करत आहेत आणि आठवडा होऊन गेला तरी आपबद्दल काहीच कागाळ्या करता येईना म्हणून मिडिया बेचैन झाली आहे. काही नाही मिळालं की जायचं शांभूंकडे.

सत्तेत आल्यावर दुसर्‍याच दिवशी दिल्लीच्या एसीबी शाखेने सुमारे २५०० कोटी रूपयांची एक्साईज ड्युटी चुकवलेली दारू हस्तगत केली आहे. किमान दोन वर्षांच्या वीज आणि पाण्याच्या सबसिडीची सोय झाली Wink Proud

"अनाज तो काफी है गोदाम में, बस चूहें उसे भगाकर ले जा रहें हैं। पहले इन चूहोंका बंदोबस्त करना होगा" -- मनिष सिसोदिया.
कोणाला हे वाक्य rhetoric वाटू शकेल. मला पटतं.

स्वाइन फ्लू हा हृदयरोग असून त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही झाडं लावू अशी विनोदी विधानं मुंबईच्या महापौर करत असताना, दिल्लीत मात्र वेगळं काहीतरी घडतंय.
स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी खाजगी लॅब्ज ५ हजारांपासून ते ९-१० हजार रूपये आकारत होत्या. सरकारने ह्या किंमती कॅप केल्या आहेत. कुठलीही लॅब ४५०० रूपयांपेक्षा जास्त फी घेत असेल तर सरकारने दिलेल्या हेल्पलाइनवर फोन करायचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
"The helpline numbers for swine flu relates queries and complaints against overcharging hospitals and labs are:
01122307145, 01122305657"
संबंधित अधिकार्‍यांसोबत मिटींग्ज घेऊन इतर उपायही चालू आहेत. उदा. - टॅमिफ्लू अधिकाधिक ठिकाणी उपलब्ध करवणं, वगैरे.

ह्यातही मिडियाची चंमतग चालूच आहे. राहुल कंवलचं ट्वीट वाचा.
"Delhi Govt has come out with a swine-flu toll free helpline. Dialled the number. Says services disabled 1800-11-4377" Lol हाऊ डेस्परेट !

सुपारी जर्नलिझ्मचे आणखी दाखले पाहण्यास इच्छुक असणार्‍यांसाठी ही लिंक.

आणि आपचा 'चॉकोलेट बॉय' ज्यांना आवडतो अशांसाठी ही लिंक Proud - Meet Raghav Chadha, AAP ka cute quotient

>>ओये पाजी फिकर नॉट्ट. ज्यांचा पैसा आहे त्यांच्यासाठी वापरला तर पुरेसा होईल. <<
आशा करुया सरकारकडे जमा होणारा पैसा त्या कामासाठी पुरा पडेल कारण शंका आहे कि ऊठसुठ सब्सिडी देऊन सुद्धा सरकारची तिजोरी भरलेली राहिल. शांभु साहेबांना त्याचीच काळजी सतावत असावी... Happy

>>२५०० कोटी रूपयांची एक्साईज ड्युटी चुकवलेली दारू हस्तगत केली आहे. <<
बादवे, तुम्ही लिकेतल्या बातमीचा विपर्यास केलेला आहे. फक्त त्या धाडीची किंमत २५०० कोटी रुपये नसुन ती संपुर्ण वर्षाची तुट आहे, तसल्या प्रकरणांमुळे पडणार्‍या तिजोरी वरच्या बोज्याची...

बातमी फुगवुन सांगणे हा नुकत्याच मिळालेल्या सत्तेचा परिणाम समजावा का??? Happy

प्रश्नाचे मुळ कशात आहे हे सगळ्याना माहित आहे. ८०% खर्च हा विज विकत घेण्यावर होतो आहे. असे कंपन्याना वेठीला धरुन करुन कोणाचे समाधान सरकार करत रहाणार?
<<

वीज "गळती"चा खर्च किती होतो ते पहायला हवंय खरंतर. संपूर्ण भारतभर.

वीज इमानदारीत विकत घेणार्‍यावर वीज चोरून वा सबसिडी घेऊन गैरवापर करणार्‍यांकडून बोजा टाकला जातोय हे अगदी खरे आहे.

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू होण्याआधिच्या काळात लोखंडी पलंगाचा वॉटर हीटर करून विहीरभर पाणी 'गरम' करणारे 'शेतकरी' मला ठाऊक आहेत Sad

"ऑडिट" करणे गरजेचे आहे.

यात काय कुठे चुकतंय अन काय बरोबर होतंय ते समजतं. ऑडिट म्हणजे काय होतंय त्याची तपासणी.
DEFINITION of 'Audit'. 1. An unbiased examination and evaluation of the financial statements of an organization.

इब्लीस

ऑडीट करण्यावर कसलीच आपत्ती नाही. कॅग ने कोळसा खाणींचे वाटप झाले त्याचे ही ऑडीत केले होते. १,८५,००० कोटी रुपये सरकारचे नुकसाने झाले असे म्हटले होते. खरे तर हे नुकसान खाणीच्या लाईफ़ सायकल मधे होणार्‍या उत्पन्नावर आधारीत होते. आणि काही खाणींचे आयुर्मान १०० वर्षे इतके आहे. सनसनाटी वेगळीच निर्माण झाली. ज्या कंपन्याना आधी खाणी मिळाल्या त्यांना ही फ़ायदा होणार नाही आणि वाढलेल्या उत्पादन खर्चाचा बोजा विजदर वाढण्यातच होइल.

असो ऑडीट निकाल आल्या नंतरच समजेल कंपन्या केवढा नफ़ा कमवत आहेत की ५०% विज बील कमी होउ शकते की नाही.

मिर्ची
कृपया आपण माझ्या आवडत्या पक्षाबद्दल (शिवसेना) ईथे लिहिण्यासाठी त्रास घेऊ नये. उठा नि स्वतःच पक्ष 'तळागाळात' पोहोचवण्यासाठी कंबर कसलेली आहे. तुमचे 'टोमणे' जिव्हारी लागतात, पण काय करणार उत्तरच नसल्याने प्रत्युत्तर नाही करू शकत. :D:-D:हाहा:

इब्लिस +१
सुनटून्या Lol

वीजबिल कमी करण्यासाठी वीजेचे दर कमी करणं हा एकमेव उपाय नाही. अजूनही काही उपाययोजना करता येणार आहेत. उदा.- मीटर्सचा घोटाळा निस्तरणं. वीजेचे मीटर्स जलद पळतात अशा अनेक तक्रारी आहेत.

दिल्लीत मीटर्स बसवणार्‍या कंपन्यांमध्ये बीजेपी अध्यक्ष सतिश उपाध्याय ह्यांची कंपनी सुद्धा आहे. हा आरोप त्यांनी आधी नाकारला. हा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन असंही सांगितलं. नंतर अकेंनी कागदपत्रे दाखवल्यावर "मग कंपनी असली तर काय बिघडतं?" असा यु-टर्नही घेतला.

बक्कळ डेटाकार्ड शिल्लक असणार्‍या इच्छुकांसाठी -
वीजकंपन्या, मीटर्स आणि 'मीटरमॅन' सतिश उपाध्याय - भाग-१ आणि भाग-२

काल पेट्रोलियम मंत्रालयातून महत्वाची कागदपत्रे चोरी करताना ज्या लोकांना पकडलं त्यात रिलायन्सचा कर्मचारीही आहे. Uhoh
रिलायन्सच्या शेअर्सचा दर घटतोय म्हणे.

दिल्लीत कडक हेडमास्तर आल्यामुळे तिथली शाळा बंद होणार हे ओळखून रिलायन्सने आपला मोहोरा मुंबईकडे वळवला आहे असं दिसतंय.

"Residents of Mumbai’s suburbs may have to brace for a steep hike in power tariff in the 2015-16 fiscal with Reliance Energy, the Mumbai power distribution arm of Reliance Infrastructure, having proposed an increase of 10 to 45 per cent for domestic consumers."

सुपातले जात्यात आले तर.

Pages