ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साड्या कुठुन घेता? योग्य पोत आणी कलर मिळतो?
>>>>
हॅंडलूमच्या साड्या आवडत असतील तर itokri वर अफाट रेंज आहे. banarsee.in वरून मलमल, कॉटन सिल्क प्रकारात साड्या घेतल्या आहेत. त्याही फार सुंदर आहेत. तिथले आर्ट सिल्क मला पटले नाही. तसेही कृत्रिम धाग्याच्या साड्यात मी कम्फर्टेबल नसते त्यामुळे त्याचा अंदाज नाही.

I टोकरी मस्तच आहे.
मायबोलीवर वेल(म्हणजे वल्लरी) चे फेसबुक पेज आहे आभा फॅशन्स
त्यावर पण चांगल्या साड्या मिळतात.
एक मोडल सिल्क अजरख घेतली आहे

आर्टिफिशल डायमंड ज्वेलरी कुठल्या site वर चांगली मिळेल? नेकलेस कानातले आणि बांगड्या घ्यायच्या आहेत

साड्या कुठुन घेता? योग्य पोत आणी कलर मिळतो?>>> मी माईंत्रा, फ्लिपकार्ट आणि इकडे लोकल बायका entrepreneur आहेत त्या
इंपोर्ट करतात भारतातून त्यांचे फेसबूक पेज असते, तशा मागवल्या आहेत. खण, सिल्क, जॉर्जेट, कॉटन लेनीन, नेट, नारायण पेठ अशा माहित असलेल्या मटेरियल्स च्या ५ हजार आयएनार पर्यंत च्या साड्या मागवते, मग फारशी नावडीची साडी निघाली तरी पैसे वाया चे दु:ख होत नाही.. Wink
मागच्या पानांवर/साडी च्या धाग्या वर साडी साठी च्या भारतीय वेब साईट्स बघितल्याचे आठवतेय..

वर अनू नी बरोब्बर सल्ला दिलाय, कॉमेंट मधे फोटो असेल आणि रेटींग बरे असेल तर ते बघावे.
पँट, चप्पल अशा वापरून खात्री करण्याच्या वस्तू ऑनलाईन घेऊ नये अशा मताची मी आहे Wink
(पँट आणि चप्पल घालून चालून, बसून Wink बघितल्या शिवाय खात्री होत नाही ) Lol

< तपकिरी ऐवजी बदामी सहन करून घेता येत नाही. >>
काय मस्त कॉमेंट आहे. मला आयुष्यात या रंगातला फरक कळणार नाही.>>>> खूप च हसले Rofl

अमेझोन (मोबाईलसाठी),मिंत्रा (कपडे वगैरे) यांचा अनुभव चांगला आहे. रिटर्न सिस्टम ही चांगली आहे.
एक tablet moto g62 lteहवा आहे तो flipcart 17500, आणि Motorola site वर 18500 आहे. (अमेझोनवर नाही. ) मोटो साईटवर घ्यावा का?

https://www.reliancedigital.in/motorola-g62-5g-128-gb-6-gb-ram-midnight-...

हा आहे का srd, रिलायन्सचा खूप चांगला अनुभव आहे वैयक्तिक
शोरूम पेक्षा किंमत बरीच कमी,आणि प्रोडक्ट व्यवस्थित पॅक केलेले असतात

हजार रुपयांचा फरक फोनच्या रंगामुळे असू शकतो.
आपल्याला हवा असलेला रंग आणि इतर स्पेक्स मुख्यत: RAM साईज मॅच होत असेल , किंवा रंगाला महत्व नसेल तर OEM साईट/फ्लिपकार्ट/रिलायन्स डिजिटल/ अमेझॉन/क्रोमा पैकी जिथे कमी किंमत आहे तिथुन घ्यायला हरकत नाही. (यात फ्लिपकार्ट वापरून तीन वर्षे झाली तो पर्यंत चांगला अनुभव होता.) शेवटी वॉरंटी आणि सर्व्हिससाठी OEM कडेच जावे लागते.
डिलिव्हरी घेताना पॅकिंग डॅमेज्ड वाटले तर डिलिव्हरी रिजेक्ट करायची.
पॅकिंग उघडून फिजिकल डॅमेज किंवा वर्कींग फॉल्ट असेल तर? यासाठी आधी साइटवर या प्रॉडक्टला किमान 7 days replacement policy आहे की नाही चेक करायचे.
नाहीतर OEM च्या सर्व्हिस सेंटरला दोन चकरा होतात.

@by तेजो ,तो नाही. तो फोन आहे . Tab 62 हा दहा इंची tablet आहे.

तेजो,मानव ओके धन्यवाद.

यूट्यूबवर विडिओ शोधताना सर्वांनी घ्या घ्या सांगितले. पण आता सापडलेल्या एका विडिओत (Perfect gadget, https://youtu.be/VD6A49DU49Q) सरदारजी म्हणतात की गूगलची Android 12L ही नवीन ओएस tablet साठी आली आहे ती असती तर बरे झाले असते. मग ती माहिती शोधली तर गेल्या मार्चपासून सामसंगच्या चार फोन+टबलेटात आली आहे. म्हणजे प्रसेसर क्वालकॉम 680 ऐवजी mediatek helio G90T असता तर दिली असती. थोडक्यात पुढे येणारे मार्केट Tabletsचे आहे आणि Android L >> OS for large screen.
त्यामुळे जरा थांबून वाट पाहतो की एखादा TAB तसा येतो का. तसा आलाच पण महाग असला (२५-३०ह) तर मग हा पंधरा पर्यंत खाली येईल वाटते.
दुकानांत शोधून आलो तर ते रिअलमीपॅड (3+32), samsung A7lite (3+32) पंधरा हजारला गळ्यात मारायला बघताहेत. लेनोवो /मोटो ठेवत नाहीत. रिलायन्स डिजिटल दुकानात लेनोवो M10 आहे.

वरचा प्रतिसाद टाकल्यावर (आणि त्यात 'रिलायन्स डिजिटल' शब्द आल्याने) त्यांची जाहिरात अवतरली. माबोचे AI जोरात आहे. 😀

ऑनलाईन खरेदी मध्ये आता खूप फसवणूक होते.

नेहमी प्रमाणेच भारतीय लोकांची लबाडी चालू झाली आहे.
ऑनलाईन खरेदी करताना तो प्रॉडक्ट कोणत्या वितरक कडून येणार आहे ते बघा.
Banglore, Mumbai, Madras अशा पश्चिम आणि दक्षिण भारतातील असेल तर च ऑर्डर करा.
नाही तर दुकानात जावून खरेदी करा.
प्रॉडक्ट ज्या राज्यातून येणारं आहे त्या राज्यातील कायदा आणि सू व्यवस्था कशी आहे.
ती राज्य कायद्याने चालणारी आहेत का ?
त्याचा तपास घ्या

असं ऐकलंय की amazon fake cosmetics deliver करते
मला lipstick shade कधीच correct मिळाली नाही
Amazon वरून त्यामुळे ह्या ऐकीव माहितीत तथ्य असू शकते
. सध्या daily wear चे कानातले पाहत आहे, कुठे मिळतील चांगले आणि reasonable? अर्थात online

सध्या daily wear चे कानातले पाहत आहे, कुठे मिळतील चांगले आणि reasonable? अर्थात online. >>>> Cosmetic jewellery खरेदी ही दुकानात जाऊन, पाहून केली तर एक वेगळीच मज्जा. पुण्यात असाल तर clover Ctr मधे प्रचंड प्रचंड व्हरायटी आहे. मुंबई मधे तर गली नुक्कड, लोकल ट्रेन आणि सगळीकडेच.
पण अगदीच online च फक्त हवं असेल तर everstylish.com (पूर्वी या साईट बद्दल चर्चा झाली होती) आणि बजेट थोडं वाढवायची तयारी असेल तर shyle.in (मी पर्सनली shyle fan आहे). Everystylish खुपचच स्वस्त आहे. दोन्ही शॉप्स कडे भरपूर variety आहे.

लॉकडाऊनमधल्या दिवाळीत (नोव्हेबंर 2020) बहिणीला भाऊबीजेची भेट म्हणून आईच्या मदतीने GIVA हून कानातले खरेदी केले आणि ते अगदीच तकलादु निघाले. वेबसाईटपेक्षा
प्रत्यक्षात आकार फारच छोटा होता. वर्णनात सिल्वरप्लेटेड लिहील होत पण केवळ सिल्वर रंगी होते. दूर्दैवाने ऑर्डर करतांना रीटर्नच्या पर्यायाकडे सपशेल दूर्लक्ष झाले. त्यामुळे बहिणीला जरी भेट म्हणून दिले तरी तिनेही अजिबात वापरले नाही. आता तर दागिने, कपडे व चप्पल ह्यांची चुकूनही ऑनलाईन माध्यमांहून खरेदी करायची नाही असे ठरवले आहे.

पी एन जी गार्गी मध्ये लो बजेट पासून 3000 पर्यँत ऑफिस वेअर आणि कॅज्युअल कानातले मिळतात.आता तनिष्क ने पण त्यातल्या त्यात स्वस्त शाया कलेक्शन काढले आहे.
पीओरा वर चांगले खड्याचे कानातले मिळतात.
एव्हर स्टायलिश चे quality रिव्ह्यू फार चांगले नाहीत.
लाईटवेट कागदी कानातले हवे असल्यास लुमिअरआर्ट अँड क्राफ्ट चे पेज बघा.
वल्लरी(वेल), फेसबुक वर कावेरी अभ्यंकर,श्वेता माहेश्वरी, कल्पिता उपासनी,वर्षा भिसे, श्रद्धा पिंगळे चितळे अश्या काही जणी फेसबुक पेजेस आहेत त्यांची, त्याही सुंदर ज्वेलरी बनवतात.

असं ऐकलंय की amazon fake cosmetics deliver करते >> हे मी पण ऐकले होते. पार्लर मध्ये गेलेले तेव्हा पॅराबेन, सल्फेट फ्री महागडे शाम्पू कंडिशनर ऍमेझॉन वर फेक मिळेल असे त्याने सांगितलेले. मग मी काही मागवले नाही. पण एक निव्हिया moisturizer जिओमार्ट वरून मागवले ते नक्की डुप्लिकेट असावे असे वाटले. तसेच पुण्यात रविवार पेठेत पण अनेक कॉस्मेटिकस दुकाने आहेत, त्यात maybelline वगैरेंच्या ऑथेन्टिसिटीवर खात्रीने नाही सांगू शकत पण जरा शंका वाटली.

Online compnys नक्की कशा work करतात.
1),अमेझॉन असून किंवा Flipkart etc.
कोणतीच कंपनी कोणतेच प्रॉडक्ट स्वतः produce करत नाहीत.

२) विविध उत्पादक लोकांशी ह्यांचे कनेक्शन आहे.
३), सप्लायर लोकांशी संबंध आहेत.
उत्पादक आणि ऑनलाईन शॉपिंग ॲप ह्यांची युती योग्य आहे.
त्या मध्ये जनतेचा फायदा आहे.
Original company च ओरिजनल मल lokana मिळेल.
पण ह्या ऑनलाईन कंपन्या डीलर लोकांशी ,लहान मोठ्या दुकानदार लोकांशी, पण संबंध ठेवून आहेत.

बोगस उत्पादक आहे त चे खऱ्या कंपनी सारखे दिसणारे कमी दर्जा चे उत्पादन करतात .त्यांच्या शी पण ह्या अमेझॉन etc कंपन्यांचे लागे बंधे आहेत.
जो दलाली जास्त दिलं त्याचे हे विकणार.
दर्जा शी ह्यांस काही देणे घेणे नाही.

दुकानदार असे सहज करू शकत नाहीत.
त्यांच्या वर थोडा तरी दबाव असतो

कोणती ही गाडी घेतली आणि ती duplicates लागली असे कधीच होत नाही.
अपवाद म्हणून एका दे उदाहरण असेल .
कारण गाडी उत्पादक कंपन्यांचे उत्तम विक्री नेटवर्क आहे.
त्या मध्ये कोणी सहज entry करू शकत नाही.
बाकी अन्न,दूध, कपडे,सौंदर्य प्रसाधने, चीझ,तूप, भाज्या, अगदी औषधे पण सर्रास बनावट असतात.
ह्यांच्या कडे योग्य अशी यंत्रणा नाही.
हे सर्व डीलर किंवा बाकी साखळी वर अवलंबून आहेत

मला voylla चे इअररिंग्स आणि ब्रेसलेट्स आवडतात. कधी महाग वाटतात. तर कधी स्वस्त मिळून जातात. सोनचाफामध्येही कधी तरी चांगले आयटेम्स मिळून जातात.

https://www.facebook.com/Aabhafashionjewellery
https://m.facebook.com/227715407254911/
https://m.facebook.com/100069307582143/
https://www.gargi.shop/?utm_source=SHP_Google&utm_campaign=16397529534&u...
https://www.caratlane.com/shaya/
https://www.facebook.com/115890853115382/posts/pfbid02JxC6LoAr55oyZKCdHk...
Priyanka maheshwari (page is not made, look up on Facebook with search word 'samyankas' or on pune ladies by her name)
https://m.facebook.com/4119197341484254/
https://peora.com/

(यापैकी कोणाकडूनही मी कमिशन घेत नाही Happy खरेदी मात्र करते.)

थँक्यू सो मच अनु आणि मीरा Happy
बघते
मलाही प्रत्यक्षात पाहून खरेदी करायला आवडलं असतं but you know what time is the oil and its luxury for me आता Lol

आमच्या घरी मुलगी आणि बायको lipstick , फेसियल पासुन सगळे अ‍ॅमेझॉन वरुन येते. घेताना fulfilled by amazon आहे ते बघतो . आजुन पर्यन्त तरी नकली माल आला नाही. समझा जरी नकली माल असेल कींवा पॅक नीट नसेल तर परत करता येते.

कॉस्मेटिक बाबत मी ही ऐकलं आहे....
नायका वर चांगला स्टफ असतो
नाहीतर सरळ त्या त्या ब्रँड च्या ऑफिशियल साईट वरून मागवायचे....
बरेचदा बॉबी ब्राऊन , मॅक वगैरे ब्रँड चे कॉस्मेटिक जे सुरुवात च 2000 पासून करतात ते 400 ला मिळत असतील तर ते फेक च असतात.....
कपड्या साठी मिंत्रा डोळेझाकून ऑर्डर करते मी... फक्त आधी रिव्ह्यू बघायचे कस्टमर्स चे... मी गेले 7 वर्ष तरी मागवतेय मिंत्रा वरून... आणि मिंत्रा ने मला अजिबात निराश नाही केलं...
फक्त इतकं च मी 1000 / 1500 पेक्षा जास्त कधी मागवत नाही...
महिन्यातून 5 ते 6 ऑर्डर्स असतात च माझ्या....
400 -500 पर्यंत वेस्टर्न टॉप्स आणि कुर्ते खूप चांगले चांगले मिळतात

आता लॅक्मे आणि मेबीलाईनची कॉस्मेटिक्स ऑफिशियल साईटवरून ऑनलाईन ट्राय करून घेऊ शकता. सरळ चेहऱ्यावर कॅमेरा फोकस करून किंवा इमेज अपलोड करून ट्राय करता येतो. मेबीलाईन मध्ये आपल्या स्किनशेडची मॉडेल इमेज सिलेक्ट करून मेकअप ट्राय करता येतो. मी लॅक्मे ची लिपस्टिक घेतली याच महिन्यात.

Pages