ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे काय त्रास.

मी पर्वा पहिल्यांदाच अमेझॉन वरुन कपडे घेतले. जयपूर कोटन चे एक टॉप फारच आवडले पण सिलेक्ट केले तर एल साइज नव्हता मग एक्ष एल घेतले. परत काही काअही सर्फ करुन तिथे जस्ट चक्कर मारली तर एल साइज पण होता. मग तो ही घेतला. बरोबर निळ्या रंगाचा पट्टेरी पायजमा घेतला. चित्रा मध्ये हे पायजमे गुडघ्यापरेन्त दिसत होते मॉडेल च्या अंगावर. हा सर्व उद्योग मी अर्धवट झोपेत सकाळी ६.३४ - ६.४५ ला केला म्हणू न जरा लाज वाटत होती. अमॅझॉन वर सर्फ करायचे व्यसन लागले आहे. तिथे खरेच काही ही उपलब्ध आहे.

मी शोधुन शोधुन कार्ट मध्ये लावुन ठेवते मग मूड आला की ऑर्डर फाय्नल करते.

मी लाइफ मध्ये काहीही रिटर्न केलेले नाही. हे दोन टॉप नेक्स्ट डे आठ साडेआठ ला आले पण. व पायजमा दुसृया दिवशी!!! एक्स एल साइज बरोबर आला. ते दोन्ही घालुन कालिदास मध्ये मराठी बाणा बघायला गेले. निळ्या मण्यांची एक माळ पण बनवली. आता ह्याची कानातली बनवायची आहेत. तर त्याचे कनेक्ट र हे ते सामान कार्ट मध्ये आहे. पण सध्या मला दोन दिवसांनी बाहेर जावे लागत आहे म्हणून अजुन ऑर्डर टाकलेली नाही. बाकी पदार्थ टिकल्यांचे पाकीट. कुंकवाचे रंग व मेंदीचे कोन असे फारच चिल्लर आहे.

मध्यंतरी कार्लोस सेन्स्झ ला बघुन फेरारी च्या काही मर्च आपल्या कडे असायलाच हव्या असे वाटू लागले तेव्हा सर्च केले तर टीशर्ट आहेत व दोन भारीपैकी परफ्युम स आहेत. ही महाग असल्याने सध्या कार्ट मध्ये पण आलेली नाहीत.

तर वरीन दोन टॉप पैकी एक्स एल व एल दोन्ही फिट आलेत मग दोन्ही ठेवलेत. पाय्जमा जरा लुज आहे कमरेला मग पिन लावुन वापरला.
कम रेला इलास्टिक आहे. उत्साह वाटला तर इलास्टिक मधुन कापुन नाडी ओवुन वापरेन.

फिटबीट >>> वाचतानाच अंदाज आला कुणी लिहिले आहे त्याचा. नेहमीप्रमाणेच खुमासदार....रिप्लेसमेंट मिळाली कि सांग इथे.

वा मत्स्य(ऑटो करेक्ट झालंय, मस्त कंसात म्हणते डिलीट चे श्रम वाचवून) अमा!!! एकदम मॅचिंग.
यावर शॉर्ट(क्रॉप) टॉप पण चांगला दिसेल.

अमा दर्शन दिलंत कि. (मागच्या बोर्डाचे रहस्य काय ?)

पुण्यात तुम्हाला एखाद्या गावंढळ, फाटके कपड्यातल्या, तुटक्या चप्पलेच्या अस्ताव्यस्त गचाळ इसमाने हाक मारली तर ओ द्याल ना ?
तो मी असेन.

अमा, मस्त दिसताय!

रघू, तुम्ही वेषांतर करुन ड्युटीवर असलेले पोलीस अधिकारी की काय! Lol

कपड्यातल्या, तुटक्या चप्पलेच्या अस्ताव्यस्त गचाळ## पुण्यात अशी व्यक्ती दिसली तर आता अमा रघू म्हणून हाक मारतील

माझंही फिटबिट गेल्या महिन्यात चार्जिंग होत नसल्याने बंद पडलं. मग गपगुमान नेहमीचं घड्याळ वापरायला काढलं. वर अनूचा अनुभव वाचून उगीचच स्वतःचं कौतुक वाटलं.

मी-अनु Lol (तुझा प्रॉब्लेम लवकल सुटो, नवं टुणटुणीत फिटबिट मिळो).
पण, “ नवऱ्याचं जुनं फिटबीट 3 वर्षां वापरलं.नंतर एकदा हात आपटून त्याची हाडं बाहेर निघाल्यावर” असं लिहिल्यावर माझा मेंदु ५ सेकंद गंडवलास Proud , पण उरलेली ओळ वाचल्यावर हुश्य झालं. Lol

परत एकदा '4 खोल्यांची जागा, भर बुधवारात संडास, बाथरूम स्वतंत्र' झाले आहे.
यावरून एक जोक आठवला.एक लोहार त्याच्या ट्रेनी मुलाला घणाचे घाव नक्की कोणत्या क्षणी घालायचे शिकवत होता.समोर ऐरण होती. तो म्हणाला 'when I nod my head, you hit on it.' दुसऱ्या दिवशी मुलगा वर्कशॉप चा मालक झाला Happy

हायला अनु Lol डेंजर चं आहे जोक पण हसायला आलं. तुझा फिटबिट चा किस्सा पण Lol लवकर तडीस लागो .
अमा, पोस्ट वाचायला सुरुवात केली की कळलंच अमाची आहे. सहीच फोटो.
आचार्य Lol

आता मीपण कबूल करतेच, पोस्ट अनुची आहे हे लगेच ओळखलं आणि "कुणाची हाडं?" हा प्रश्न मी गिळला. कारण मला माझ्याच हाडांची काळजी वाटली. Wink
(आठवा: 'नियती'चे दात पाडणे)

ते वाक्य वाचल्यावर मला कळलं किती तिरका अर्थ निघतोय ते, जाऊदे आता एडिट नाही, काळ्या दगडावरची रेघ झालीय.
Happy
त्या नव्या तिकीट बद्दल मेल आलंय की आमच्या वेअरहाऊस चा पत्ता बदललाय, भारतात गोंधळ चालू आहे रिप्लेसमेंट ला वेळ होईल, धीर धरा आणि मेल चेक करत राहा.(असं छान छान लिहितात मेले आणि मग 3 दिवसांनी इश्यू बंद करून वाळूवरची अक्षरे एका लाटेत मिटवून टाकतात.मग परत पुढच्या बाईला सर्व महाभारत सत्यवती पासून सांगावे लागते.मग बाई घड्याळ उभे जरा आडवे करा प्रेमाने पुसा प्लग काढा प्लग लावा बटन दाबा, बटनावरचं बोट काढा सांगते ते तिला करून दाखवावं लागतं.मग त्याने काही होत नाही दाखवलं की ती इश्यू लॉग करते.
एरवी उचलून पैसे ngo ला देऊ.पण मेहनतीची कमाई अकार्यक्षम लोकांच्या खिश्यात जाऊ देणार नाही.आखरी दम तक लडेंगे.)

रघु, ब्लुटूथ गॉगल हे पहिल्यांदा ऐकले.बघायला हवे कसे असते ते.

मी अ‍ॅमेझॉन वर नाही घेतला. इथे लिंक देता येत नाही आणि ते ट्रॅन्झॅक्शन सापडत नाही. जी पे वर होती स्कीम.

पोस्ट वाचताना मी-अनु असणार वाटलेलंच.
भारीच लिहिलंय.
सुनिधींनी त्यातही फोड करून मिस झालेला अजून एक जोक उलगडून दाखवला Lol

अमा छानच.

अनू आणि अमा पहिल्या २ ओळींतच कळतय लोकांना तुमच्या पोस्टीचा महिमा Wink
अनू तुला रीप्लेसमेंट मिळो.. माझं १लं फिटबीट कंपनी ने दिलं होतं. सिंगापुरात कंपन्या, गव्हरमेंट लोकांनी चपळ राहावं म्हणून दाताच्या कण्या करत असतात. अमुक स्टेप्स पुर्या केल्या की कॅश रीवॉर्ड पण मिळते. मी आपले दिवशी १०के स्टेप्स केल्या की देव पावला टाईप आहे Wink
स्टेप ट्रॅकर घड्याळं आल्या पासून चकचकीत टायटन वगैरेंच्या पोटावर कसली लाथ बसली असेल ना.. मी १ अ‍ॅनीवर्सरी ला भांंडून घेतलेलं घड्याळ कोपर्यातून वाकुल्या दाखवतं Sad

हो खरंच.स्मार्ट वॉच आल्यापासून साधी घड्याळ विक्री नक्की कमी झाली असेल.पण अजूनही शाळेत मोबाईल आणू देत नाहीत.त्यामुळे 8 वी 9 वी 10वी ची मुलं वापरत असतील साधी घड्याळं.

Pages