ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलचंद - मोरवाडी चौकातील? खूssssssssssप गर्दी दिसते बाहेर. त्यामुळेच कधी जायचा विचार नाही केला.~~~ खूप गर्दी दिसते फक्त सर्व्हिस खूप फास्ट आहे अजिबात वेळ नाही लागत जास्त

मुलचंद - मोरवाडी चौकातील? खूssssssssssप गर्दी दिसते बाहेर. त्यामुळेच कधी जायचा विचार नाही केला.~~~ खूप गर्दी दिसते फक्त सर्व्हिस खूप फास्ट आहे अजिबात वेळ नाही लागत जास्त

ऑनलाइन शॉपिंग करताना कपडे , शूज साठी मिंत्रा बेस्ट वाटतं मला . नुकतेच खालील लिंकवर दिलेली सँडल खरेदी केली . त्यानी कमित केल्याप्रमाणे ३ दिवसात दिलीव्हरी मिळाली . मिंत्रावरील कपडे ही चांगले असतात . एखादा क्वचित अपवाद वगळता अनुभव चांगला आहे माझा.
http://www.myntra.com/mailers/shoes/mochi/mochi-beige-laser-cuts-wedge-s...

इथे मी चांगले अनुभव मांडते.आता हा एक वाईट अनुभव:
1. शॉपर्स स्टॉप मेगा सेल मध्ये मुलीला टीशर्ट घ्यायचे होते स्वस्त म्हणून.मग मला पण एक परफ्युम घ्यावा वाटला.तो 1200 चा होता.
2. चार डिलिव्हरी एकाच ऑर्डर च्या 4 वेगवेगळ्या दिवशी आल्या.
3. शेवटच्या डिलिव्हरीत परफ्युम ऐवजी मोजे आले, ते 129 रु चे होते.
4. हे प्रकरण सोपेपाणी पोर्टल वरून माय ऑर्डर्स मधून झालं असतं पण परफ्युम सारख्या वस्तूला रिटर्न एक्स्चेंज नसतो.
5. शॉपर्स स्टॉप च्या चॅट वर समस्या सांगितली.चॅट करणारा गायब झाला.
6. कस्टमर केअर आयडी वर मेल लिहिले आणि योग्य ते फोटो योग्य लेबल्स लिहून पाठवले ऑर्डर आयडी च्या माहिती सह.उत्तर नाही.
7. यांच्या पुढचा थर ग्रिव्हन्स सेल चा मेल आयडी.त्यांना लिहिले.एक तिकीट बनले.त्यावर योग्य फोटो टाकून त्यांनी सांगितल्याप्रमाणे, तरी तीन दिवस काही झाले नाही.
8. हे तिकीट बंद झालं आणि तुम्ही समाधानी आहात का असं मेल आलं.मी अजिबात समाधानी नाही असं रेटिंग देऊन फीडबॅक पाठवला. त्यावर दुसरं तिकीट बनलं
9. ट्विटर वर पोस्ट टाकून हा असा गोंधळ झालाय, हा ऑर्डर आयडी, ही ऑर्डर केलेली वस्तू, हा सूर्य, हा जयद्रथ, ही आलेली वस्तू, हा आलेल्या वस्तू चा इनव्हॉईस,हा पार्सल च्या आत असलेला मोजे इंव्हॉईस आणि त्यावर शेली नामक महिलेचा नाव पत्ता(पत्ता झाकला सोशल मीडियावर), आणि यावर चालू असलेले सध्याचे 3 तिकीट नंबर पाठवले
10. मग एका फटाकडी चा फोन आला आणि तिने परत सर्व महाभारत भरत राजापासून विचारलं.ते सांगितल्यावर आधीचे 3 इश्यू नंबर आहेत सांगून पण चौथा इश्यू उघडला.
11. तोवर आधीचे 2 इश्यू 'आम्ही सोडवले, तुम्ही समाधानी आहात का' म्हणून मेलस आली.त्यांना 'समाधानी नाही, इश्यू सुटलेला नाही' पाठवल्यावर त्यातून अजून 2 तिकीट निर्माण झाली.मग ट्विटर वर शॉपर्स स्टॉप ला टॅग करून परत टाहो फोडला आणि 'मला पैसे परत हवेत पण एकाच समस्येवर जास्तीत जास्त तिकीट चा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा नाहीये' सांगितलं.आता सर्व मेल्स ना ग्रिव्हान्स आयडी cc करणं चालू केलं.
12. अजून 2 दिवसांनी रिटर्न चं तिकीट तयार झालं. याच्या मेल मध्ये रिटर्न इंव्हॉईस मध्ये परफ्युम चं नाव आणि खूप नल होते(एकही दमयंती उर्फ सॉक्स नव्हते. हॅ हॅ हॅ).त्यांना परत लिहिलं की इंव्हॉईस मध्ये मोज्यांचा उल्लेख नाही.
13. रिटर्न वाला माणूस आला आणि त्यानं बाणेदारपणे 'माझ्या इंव्हॉईस वर परफ्युम लिहिलंय, मी सॉक्स घेणार नाही' म्हणून परती नाकारली.त्याला खूप वेळा सांगितलं की अरे बाबा परफ्युम आला नाही हाच मुख्य इश्यू आहे.पण तो म्हणाला माझा फोटो काढा पण पार्सल घेणार नाही.मग त्याचा फोटो काढला आणि त्याने 'कस्टमर कॅन्सलड पिकप' शेरा मारून पिकप रद्द केला.
14. आता आम्ही आमचे दुःख मांडायला इंस्टा वर गेलो आणि तिथे वैयक्तिक मेसेज चा पर्याय होता त्यात शॉपर्स स्टॉप ला सर्व कथा, सध्या चालू 2 तिकीट नंबर,मूळ ऑर्डर, मोजे, मोज्यांचे गोत्र, आतला इंव्हॉईस, रिटर्न इंव्हॉईस, त्यातल्या नलांना(null) लाल गोल करून पाठवले.
15. मग अजून एका इंग्लिश फटाकडी चा फोन आला.ती खूप सहानुभूतीने बोलली.तिला सर्व समजावून सांगावे लागले नाही.मग म्हणाली आम्ही कुरियर वाल्याशी बोलतो.
पुढे 4 दिवस काही झालं नाही.मग परत इंस्टा वर हाक घालून त्यांच्यावर 10 पुरावा फोटोंचा मारा केला.
16. शेवटी त्यांनी मोजे परत न घेता परफ्युम चा रिफंड जमा केला.(बहुधा रामशास्त्री प्रभुणे कुरियर वाले झुकले नसावेत.'ऑर्डर परफ्युम ची आहे.आम्ही मोजे घेणार नाही म्हणजे नाही.')

हा सर्व फॉलो अप लिहिताना जास्त वेळ लागला पण दर वर्किंग डे ला रात्री झोपताना 10 मिनिटांत झाला.यातून मिळालेले धडे:
शक्यतो अमेझॉन किंवा मिंत्रा.रिटर्न 'नॉ क्वेशचन आस्क' असतो.म्हणजे परती नाकारणार नाही, परत घेतल्यावर वस्तू अपेक्षित नसली तर रिटर्न चे पैसे नाकारणार.
मेगा सेल्स, दिवाळी, ख्रिसमस ला कुरियर वाले प्रचंड बिझी असतात.त्यांची अवस्था लढाईत डोके गमावून पण लढत राहिलेल्या मुरारबाजी सारखी असते.तातडी नसल्यास हा काळ ऑनलाईन ऑर्डर ला टाळावा.
जवळ दुकान आहे, वस्तू सहजी दुकानात मिळतेय तर दुकानात नक्की जावे.

मला पैसे परत हवेत पण एकाच समस्येवर जास्तीत जास्त तिकीट चा वर्ल्ड रेकॉर्ड करायचा नाहीये' सांगितलं.>>>> Biggrin Biggrin

बापरे अनु वाचूनच थकायला झालं. खूपच चिकाटी दाखवलीस.

मीही केवळ अ‍ॅमेझॉनवरूनच खरेदी करायची ठरवली आहे. इतर कुठून केली (मोहाला बळी पडून) तर आधीच ती रक्कम अक्कलखाती जमा करून ठेवते मनातल्या मनात. खरंच मनाजोगती वस्तू अवतरली तर लॉटरी! इतक्या निरिच्छतेनं अश्या नॉन-अ‍ॅमेझॉन खरेद्या केल्या तरच निभावेल नाहीतर चिडचिड होते.

मी आजकाल शक्यतो सगळी खरेदी अ‍ॅमेझॉन वरूनच करतो. फ्लिप्कार्ट सुद्धा शक्यतो नाहीच.
अगदी रीसेंटली पिएनजी चं गार्गी कलेक्शन मधून मागवलं होतं ते येइपर्यंत धाकधूक होतीच. पण मिळालं ठीक.
ग्रोसरी करता सरळ वाण्याकडेच जातो शक्यतो नाहीतर मग डिमार्ट रेडी उत्तम. डीमार्टात (दुकानांत) जाणे म्हणजे नको रे बाप्पा अशी गत असते. अक्शरशः लूट केल्यासारखी आणि अतीअनावश्यक खरेदी होते. त्यामानानी अ‍ॅप वरून हवी तितकीच ऑर्डर आणि डील्स ही मिळतात.
बाकी कपडे वगैरे सरळ दुकानात जाऊनच कारण साईज चे माझे तरी जाम वांदे होतात.

जवळ दुकान आहे, वस्तू सहजी दुकानात मिळतेय तर दुकानात नक्की जावे.>> हे अगदी खरे आहे. आम्ही काही वेळेस ऑनलाईन घेऊन स्टोअर पिकप घेतो म्हणजे वेळेत खरेदी पण होती आणि सोईने बरोबर गोष्ट आहे ना ते पाहून घेता येते.

अनू कडे आता नवीन पार्सल चे दार आहे म्हणून ठीक आहे नाही तर इकडे लोकांची पार्सलस् चोरीला गेलेली आहेत दारातून

वाचताना हसू आलं, पण १६ वा मुद्दा वाचून चिकाटीने लढाई जिंकल्याचा फील आला Happy अमेझॉन किंवा मिंत्रा वरच शक्यतो खरेदी करते, कारण तेच - इझी रिटर्न पॉलिसी. फ्लिपकार्टवर सुद्धा फारसा विश्वास नाही, पण अलिकडेच त्यांनी मला (खरे तर चुकून, पण मी complimentry समजते) वॉशिंग मशीन डी स्केल ची डबल ऑर्डर पाठवली. त्यामुळे पावडरीला जागून त्यांच्या बद्दल काही जास्त वाईट बोलत नाही.

खुप च विनोदी पोस्ट. परफ्युम ऐवजी मोजे... ह्याचे एक ललित बनेल. नक्की लिहा. पार्सल ला डोअर आहे ते ग्रेट. कोणीतरी बदलुन मोजे ठेवले असले तर!!! लिफ्ट मध्ये नाक शार्प ठेवा. चोर परफ्युम लावुन फिरेल.

मी पण सध्या पिशवी घेउन मार्केटात जाउन हवे ते घेउन येते. फळे भाज्या फ्रेश व स्वस्त मिळतात. डाळी वगैरे महाग पदार्थ मला अर्धा किलो पण लागत नाहीत पण काहीतरी करुन बघावे किंवा वरण भात खावा म्हटले तरी दोन चमचे तुर डाळ लागते. मग वाण्या कडुन पाव पाव किलो आणते.
वाण्या कडचे सुके खोबरे पण जास्त ताजे व छान असते. कोथिंबीर ताजी व नाजुक नसली की माझा पापड मोडतो. मग ती फ्रेशच घेते.

नाही नाही Happy पार्सल डोअर ने बदलले नाही.नीट बंद पाकीट होते सील केलेले, आणि आत मोजे.जो बदल व्हायचा तो घाईत कुरियर कंपनी कडून शिप करतानाच झालाय.
(पार्सल डोअर चे संस्कार अजून होत नाहीयेत बऱ्याच जणांवर.4 वेळा वापर झालाय.)
चोर परफ्युम लावून हे भन्नाट आहे Happy मुळात मलाच त्या परफ्युम चा वास कसा आहे माहीत नाही.

अनु, एव्हढा त्रासदायक प्रसंग सुध्दा किती मजेदार लिहिला आहेस. पण त्यामागे नक्की बराच मनस्ताप झालेला आहे. तुझ्या चिकाटीचं कौतुक.

अनु, इथल्या सगळ्यांना आता तुझ्या पार्सल डोअर ची माहिती आहे.
Lol
पण तुझ्या चिकाटीचे कौतुक वाटते!
मोजे शेवटी काँप्लिमेंटरी मिळाले म्हणायचे!

अमेझॉन ला पण काही वेळा तापदायक अनुभव येतो. गेल्यावर्षी जूनमध्ये एक सॉफ्ट luggage बॅग मागवली होती, ती वेगळ्या साईझची आल्यामुळे परत करायची ठरवले. बॅग आली त्यावेळी ती एका साध्या प्लास्टिक बॅग मध्ये आली आणि त्याला काही स्टिकर, पॅकिंग नव्हते. अमेझॉन च्या हेल्प डेस्क बरोबर बोलून पिकअप ठरवला, आल्यावर त्याने नेणार नाही सांगितले, पॅकिंग नाही म्हणून. परत हेल्पडेस्क बरोबर १५ मिनिटे खर्च केली, ४ दिवसांनी परत पिकअप ठरला. याने पण तेच सांगितले, असे अजून एकदा झाल्यावर माझा पेशन्स संपला. त्यांना कॉल बॅक करायला सांगितले आणि सुपरवायझर बरोबर बोललो आणि त्याला सांगितले ३ वेळा हेल्प डेस्क ला सांगितले आहे की बॅग पॅकिंग मध्ये नव्हती तर तुम्ही तसे पिकअप टीम ला सांगत का नाही. एक तर
तुम्ही चुकीची बॅग पाठवली आहे आणि वर पॅकिंग नाही म्हणून परत पण घेऊन जात नाही. या वेळी जर नेली नाही आणि पैसे परत केले नाही तर ग्राहक न्यायालयात जाईन, माझ्याकडे सगळ्या चॅट चे टेक्स्ट आहे, काय करता सांगा. दुसऱ्यादिवशी बॅग परत नेली आणि संध्याकाळी पैसे पण परत आले. चिकाटीने मागे लागले तर होऊन जाते पण खूप त्रास होतो तेच तेच सगळीकडे सांगत बसायचा.

(बहुधा रामशास्त्री प्रभुणे कुरियर वाले झुकले नसावेत.'ऑर्डर परफ्युम ची आहे.आम्ही मोजे घेणार नाही म्हणजे नाही.')>>> Lol Lol बापरे काय हा अनुभव! चिकाटी ला सलाम च अनू..
कुरियर ची खिडकी Lol

खतरनाक अनुभव आणि खुप छान मांडले आहे.
मागची तीन वर्ष मुलचंद आणि डिमार्ट वगळता सगळी खरेदी ऑनलाईन केली पण कधी असा अनुभव नाही आला. अ‍ॅमेझॉन आणि बिग बास्केट मधुन सगळ्यात जास्त खरेदी होते. शॉपर्स स्टॉप मधुन कधी ऑनलाईन खरेदी केली नाही.

मी माझी १००% खरेदी ही ओन्लाईन करते, मला तापदायक अनुभव ना के बराबर आलेत.
आणि असा अनुभव यावा यासाठी मी एकदम रिलायबल साईट वरूनच खरेदी करते.

बरं कालच्या लांबलचक पोस्ट वर अजून एक एक्सटेन्शन:
1. मोजे परत न घेता त्यांचा 'आम्ही तुम्ही परत केलेल्या वस्तूची क्वालिटी तपासली आणि ती योग्य आहे.तुम्हाला 3 दिवसात रिफंड मिळेल.' असा संदेश आला.वातावरणात मेपल्स ची पानं पडायला लागून आनंद लहरी उमटल्या.
2. तितक्यात त्यांचा सकाळी संदेश आला की आम्ही रिटर्न पिकप ला माणूस पाठवतोय.
3. या माणसासाठी मी दिवसभर wfh घेऊन घरी थांबले, तर तो बरोबर संध्याकाळी मी वॉशरुम मध्ये असतानाच आला आणि नवऱ्याने पार्सल परत केले.तो घेऊन गेला.
4. मग स्वयंपाक चालू असताना कुरियर ऑफिस मधून फोन आला की तुम्ही आम्हाला मोजे का दिले,परफ्युम ची कॉस्ट आमच्या बॉय ने भरायची का. त्याला म्हटलं बाबा ते सॉक्स त्यांना देऊ पण नकोस.रिफंड प्रोसेस पण करू नकोस.पण मी परत परत पिकप वाल्यांची वाट बघत घरी थांबू शकत नाही(हे भांडण शेजाऱ्यांवर किंवा मुलीवर आऊटसोर्स करता येणारच नव्हतं.)
5. तो 'नाही तुम्ही कस्टमर्स सर्व्हिस वाल्यांकडून इंव्हॉईस वर मोजे लिहून आणा नाहीतर हे चालणार नाही' म्हणाला.त्याला हर प्रकारे 'अरे बाबा, यावर 9 कस्टमर तिकीट, 7 ट्विटर आणि 8 इंस्टा पोस्ट आहेत, माझी 8 मेल्स आहेत ज्यात हा इश्यू त्यांना समजलेला आहे, त्यांनी स्वीकारला आहे आणि रिफंड प्रोसेस चालू झालीय' हे समजावलं.पण तो भांडायला लागला.
6. मग नवऱ्याने फोन घेऊन प्रति भांडण चालू केलं 'आम्ही सभ्यपणे इश्यू सांगतोय, त्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये रिटर्न इंव्हॉईस बनताना हे लिहून येत नाही, अनेक तिकीट टाकून काहीही उपयोग झाला नाही, तुला ते त्यांना पाठवायचं तर पाठव नाहीतर ठेवून घे.'
मग इथे तो माणूस 'तुम्ही फ्रॉड करताय' म्हणाला.
आता यापुढे नवरा-'आम्ही आतापर्यंत फ्रॉड केला नाहीये पण तुम्ही असे वागलात तर करू शकतो. मी जर आता म्हटलं की मी देताना परफ्युमच दिला होता सॉक्स कुठून आले मला माहित नाही तर तुम्ही काय करणार आहे?'
कुरियर माणूस : 'तुम्ही चोरी केलीय.फ्रॉड करताय.हे संभाषण रेकॉर्ड होतंय.'
नवरा: - 'मग तेच सांगतोय.तुमच्या कडे आम्ही सॉक्स दिले हा पुरावा आहे.परत करताना तो वापरा. बाकी आमच्यावर सोडा.आम्ही बघून घेऊ.'

मग मी परत इंस्टा वर जाऊन 'कुरियर वाल्या लोकांकडून मोजे परत घ्या, तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्ही त्यांना समजावतो. तुम्ही समजवलेलं नाही.मुळात रिटर्न इंव्हॉईस वर 'मोजे कलेक्ट करायचेत' अशी कमेंट टाकणे हा सोपा पर्याय होता जो तुमच्या कोणत्याही कस्टमर केअर वाल्याने पाळला नाहीये.आता जे आहे तुमचं तुम्ही बघून घ्या.' असा संदेश टाकला.

आता परत कुरियर वाल्याचा फोन आला तर 'सॉक्स तू वापर, टाकून दे किंवा काही कर.कस्टमर ने रिटर्न दिला नाही, रद्द केला असं लिहून टाक, पुढचं मी बघेन' सांगणार आहे.

नेहमीच्या केस मध्ये प्रोसेस इतकी किचकट बनतही नाही.पण इथे आयटम पूर्णपणे वेगळे(म्हणजे 1200 ऐवजी 200 च्या परफ्युम ची बाटली परत दिली असती या लोकांनी चुकून पाठवलेली तर हा प्रश्न आलाही नसता.) पण इथे 'परफ्युम(कन्झ्युमेबल आयटम),बिनडोक कस्टमर केअर वाले,आणि शॉपर्स स्टॉप चे इश्यू जनरेट करणारे सॉफ्टवेअर, त्यातल्या कमतरता हे तिन्ही पापग्रह एकत्र आल्याने प्रकरण इतकं वाढलं.एरवी 1000 चा वेगळा आयटम जरी मिळाला असता तरी इतके व्याप न करता तो वापरायला घेतला असता.

अनु भारी आहे किस्सा Lol म्हणजे लिहीलेलं वाचताना तुझ्या शैलीमुळे हसू आले पण तुम्हाला नक्कीच तापदायक झाले असेल त्यावेळी याची कल्पना आहे. (आमची पण अशी युद्ध खेळून झाल्येत काही म्हणून कल्पना आहे Lol )

1200 रुपये रिफंड सुखरुप पणे अकाउंट ला जमा झाला आहे.हुश्श.
आता कुरियर वाल्याला (त्याने फोन केला आणि गरज पडली तर) हँडल करता येईल.

<<आता कुरियर वाल्याला (त्याने फोन केला आणि गरज पडली तर) हँडल करता येईल.>>
आता कुरियर वाल्याला सांग की तिकिट टाक

वातावरणात मेपल्स ची पानं पडायला लागून आनंद लहरी उमटल्या. >>>> Lol Lol त्या कुठल्याश्या पिक्चरमधल्या अमिषाच्या बेडरूमप्रमाणे का?
वाचताना हसायला येतंय पण ऍक्च्युअली फार मनस्ताप झाला असेल.

किती तो त्रास? आता पार्सल उघडताना व्हिडिओच बनवा यापुढे.
>>>>>
योग्य सूचना. फार महागाची किंवा नाजूक काचेची वगैरे गोष्ट असेल तर बनवते मी व्हिडीओ.

Pages