Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नायका वर अनेक वेळा expired,
नायका वर अनेक वेळा expired, very close to exipry, fake प्रॉडक्टस च्या तक्रारी झाल्या आहेत
समझा जरी नकली माल असेल कींवा
समझा जरी नकली माल असेल कींवा पॅक नीट नसेल तर परत करता येते.>> नाही साहिल, असा नकली सांगून नाही परत करता येत सगळ्या साईट वर. अर्थात आवडला नाही हे कारण देता येईल. साईट वर १०० ची वस्तू ७० ला मिळेल डीसकाऊंट वर पण ४० ला मिळत असेल तर घोळ आहे. एक तर एक्सपायरी जवळ किंवा नकली.
सरळ त्या त्या ब्रँड च्या
सरळ त्या त्या ब्रँड च्या ऑफिशियल साईट वरून मागवायचे>>>हा करेक्ट अप्रोच आहे.
अनिश्का डीट्टो माझी पण हिच पद्धत आहे
साड्या पण ऑनलाईन २-अडिच हजारा पर्यंत. आणि दुकानातून जरा भारी लग्न प्रसंगी वगैरे, कारण तिथे पोत , झळाळी समोर बघता येतं.
साड्या ऑनलाइन घ्यायच्या
साड्या ऑनलाइन घ्यायच्या झाल्या तर इतर कुठे न जाता आपल्या इथली वल्लरी चवाथे आहे तिचं आभा फॅशन म्हणून पेज आहे फेसबुक वर ...
किमती आणि क्वालिटी आणि वल्लरी ची सर्व्हिस ए वन आहे....
नायका वरून मी लहान मोठे प्रोडक्ट मागवत असते पण कधी डुप्लिकेट किंवा एक्सपायर झालेले प्रोडक्ट आले नाहीत मला तरी. आणि चेंजिंग किंवा कॅन्सल चे ऑप्शन आहेत. मी हल्लीच 850 रु च क्रिम मागवलं पण ते डिलिव्हरी द्यायला वेळ लागत होता म्हणून ऑर्डर केल्याच्या 6 व्या दिवशी मी ऑर्डर कॅन्सल केली. माझे 3 ऱ्या दिवशी 850 रु अकाउंट ला क्रेडिट झालेले दिसले.
नायका आणि मिंत्रा हे 2 च ब्रँड मला कपडे आणि कॉस्मेटिक साठी बेस्ट वाटतात.
Mobile battery हवी असलेली
Mobile battery हवी असलेली अमेझॉन/फ्लिपकार्टवर नव्हती. Maxbhi dot com वर दिसली. ओर्डर केली. चार दिवसांनी ओर्डर डिलेड मेसेज आला. मग माल नाही म्हणून रद्द करतो म्हणाले. मग रिफंड पाठवला आहे, पंधरा दिवसांत आला नाही तर कळवा मेसेज आणि फोन आला. दुसऱ्या दिवशी रिफंड आला. नवीन कंपनी म्हणून भीत भीतच पेमेंट केले. पण फालोअप तेच करत होते. फोन करत होते.
त्यांच्या पेमेंट ओप्शनमध्ये SBI नव्हते म्हणून पेमेंट करता आले नाही तर त्यांचा फोन आला. मग SBI ची लिंक पाठवली. तिथे पेमेंट केले.
एकूण ती साईट प्रामाणिक वाटली.
आज मनिष मार्केटमध्ये ती बॅटरी मिळाली. (मायक्रोसॉफ्ट लुमिया 540,बॅटरी, हे फोन्स चार वर्षांपूर्वीच बंद झालेत. त्यामुळे अशा नव्हती. )आता बघू ही चालते का.
एक अनुभव म्हणून लिहिले आहे.
पहिला दुकानात आणि ऑनलाईन
पहिला दुकानात आणि ऑनलाईन खरेदी किंमतीत फरक होता.
आता तो तितकासा नाही.
दुकानात बघून घेता येते आणि दुकानदार ओळखीचा असतो नंतर काही प्रोब्लेम आला तर त्याची मदत पण होते
या वेळी भारत वारीत १ अनुभव
या वेळी भारत वारीत १ अनुभव ऑनलाईन शॉपींग चा आला तो लिहावासा वाटतोय.
भारतात यायच्या सुमारे दिड दोन महिने आधी जरा वेळ काढून कपडे (स्वतः , नवरा आणि मुलांसाठी) सुरू झाली, माईंत्रा चा अनुभव मागच्या खेपेस बरा असल्याने तिथून ऑरडर करत होते. कपड, रंग पोत हे आईने चेक केले. पण फिटींग मी घरी आल्या वर १.५/२ महिन्यांनी केल्या वर काही काही कपडे बसले, काही घट्ट झाले. परत करायची वेळ निघून गेली होती..
साईट वरच्या साईज चार्ट वरूनच मागवले होते. तसं लक्षात आलं की अॅलन सोली, अडीदास, पुमा किंवा तत्सम ब्रँडेड वस्तू साईज चार्ट & कपडे परफेक्ट फीटींग होते, पण दुसर्या कुठल्याश्या नॉट सो नोन ब्रँड चे कपडे बसत नव्हते/अंगात नीट बसेल तर बाह्यांत घट्ट...असा प्रकार
सो अनुभवांती, नोन ब्रँड वाले कपडे साईज चार्ट नुसार किंवा १ साईज मोठा असे घ्या.
हो.लहान ब्रँड ना किंमत तीच
हो.लहान ब्रँड ना किंमत तीच ठेवून जास्त कपडा मोठ्या साईझेस ना वापरणे परवडत नसावे. त्यामुळे साईझ मोठी असेल तरी कपडा किंचितच मोठा शिवला जातो.किंवा साईझ चार्ट दिलेलाच नसतो.'फ्री साईझ' असं ठोकून देतात.
अमेझॉन वर size issue येतो.
अमेझॉन वर size issue येतो. बहुतेक सगळ्या ब्रँड्स साठी एकच साइज चार्ट देतात. त्यामुळे नीट पाहूनच घ्यावे लागतात. कुर्ती घेताना अगदी ब्रँडेड असल्या तरी फिटिंग कसे आहे, म्हणजे regular की स्ट्रेट की ए लाईन हे बघून कोणता size ते ठरवावे लागते. त्यातल्या त्यात खाली रिव्ह्यू असतील तर त्याचा उपयोग होतो.
खाली रिव्ह्यू असतील तर त्याचा
खाली रिव्ह्यू असतील तर त्याचा उपयोग होतो>>> हो.
या वेळी मी ऑनलाईन ज्वेलरी शॉपींग केली, कुंदन सेट, ओक्सीडाईज्ड सेट वगैरे. ते मस्त आलेत खूप. माईंत्रा वरूनच. त्यात एम आर पी ३ हजार वगैरे लिहले असले तरी माईंत्रा वर ८००/१२०० अशा किमती होत्या दिवाळी सेल.
सलवार कमीज मटेरियल गिफ्ट्/स्वतः साठी असेच घेते कारण मग फिटींग चा इश्यु येत नाही त्यात.
ह्या वेळेस ही फूडकोर्टात जी तौबा गर्दी होती ..बघुनच भ्यायला झाले
पण तरी टिब्स ची फ्रँकी खाल्लीच 
कपड्यांचे वेबसाइटवरच्या
कपड्यांचे वेबसाइटवरच्या फोटोतले व प्रत्यक्षातले पोत आणि रंग यातला फरक पाहता रोजच्या वापरातले सोडले तर इतर कपडे दुकानात जाऊन घेतलेले / शिवून घेतलेलेच बरे असं माझं मत होऊ लागलं आहे.
हो भरत, खरं आहे.म्हणजे शेड
हो भरत, खरं आहे.म्हणजे शेड च्या बाबत अगदी तीच हवी असं असल्यास, आणि आपल्या ओळखीचं, बराच स्टॉक ठेवणारं दुकान जवळ असल्यास दुकानात बरं.
पण इंटरनेट ज्या प्रकारची व्हरायटी दाखवतं ते मला आवडतं.मॉल मध्ये क्वचितच काही आवडतं.आवडलं तरी ट्रायल रूम ला रांगा असतात.लोकल दुकानात 'येही फॅशन है, इसमे कलर नही है,उसमे पीस था लेकीन कल ही खतम हो गया' वगैरे उत्तरं मिळतात.4 दुकानं फिरायची एनर्जी/पार्किंग ची तयारी नसते.
'ट्राउजर आणि जीन्स सोडून सर्व कपडे बायकांनी ऑनलाईन घ्यावे' असं आचरट मत उगीचच बनतं आहे.
पुरुषांच्या बाबत एवढे
पुरुषांच्या बाबत एवढे प्रॉब्लेम येत नसावेत. नुकतेच खास प्रसंगासाठी घेतलेला कुर्ता आणि शर्ट प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट असे निघाले आणि शर्टपीस , पॅटपीस घेऊन शिवून घेतलेले कपडे मस्त झाले, त्यामुळे दुकानात जाऊन शॉपिंगची सवय पुन्हा लावायला हवी, असं वाटू लागलं.
त्यातही सध्या मिनिमलिझमचा मंत्र म्हणत असल्याने ती वेळ आता लवकर येणार नाही.
पुरुषांच्या बाबत एवढे
पुरुषांच्या बाबत एवढे प्रॉब्लेम येत नसावेत. नुकतेच खास प्रसंगासाठी घेतलेला कुर्ता आणि शर्ट प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट असे निघाले आणि शर्टपीस , पॅटपीस घेऊन शिवून घेतलेले कपडे मस्त झाले, त्यामुळे दुकानात जाऊन शॉपिंगची सवय पुन्हा लावायला हवी, असं वाटू लागलं.>> बरोबर फोटो फोटो हवेत अनुमोदन द्यायला.
आम्ही भा रतात शक्यतो एच अँड एम, ना हीतर मार्क्स स्पेन्सर, झारा, मध्ये जाउन फिटिन्ग चेक करुन मगच घेतो. मैंत्रा काही फार अपमार्केट साइट नाही. लो कॉस्ट गुड्स विकते. जसे अमॅझॉन वर कपडे साड्या मिळतात पण चीप फिनिश
पुरुषांमधे ही कुर्ते ,
पुरुषांमधे ही कुर्ते , जॅकेट्स जर ब्रँडेड घेतलेत तर ऑनलाईन जशी सूट मिळते तशी दुकानांत मिळतेच असे नाही. ब्रँडेड ची फिटींग जर घरात त्या ब्रँड चा टीशर्ट असेल तर त्याच साईज चा मागवला तर काम होते.
भरत बाकी ठीके पण शिलाई आता कापडाहून महाग झालिये त्याचं काय?
५ हजार दिलेत मी या वेळी ४ ब्लाऊज शिलाई चे
ड्रेस तर रेडीमेड च घेते शिलाई प्रचंड खर्चिक आणि वेळेवर कधीच देत नाहित म्हणुन..
एकदा तर २५०० च्या साध्या साडी वरच्या ब्लाऊज चे ३ हजार शिलाई म्हटल्या वर मी म्हटले राहु देत, मी दुसरे कॉन्ट्रस्ट घालेन.
(हे मुंबई चे रेट्स आहेत)
मैंत्रा काही फार अपमार्केट साइट नाही. लो कॉस्ट गुड्स विकते.>>> असं काही नाही, चांगले ब्रँड्स पण आहेत. ३-४ हजार पर नग पेक्षा जास्त वाला पीस हवा असेल तर मग दुकानातून च घ्यायचा. पोत, रंग नीट पाहता येतो.
ऑनलाईन केव्हा घ्या:
ऑनलाईन केव्हा घ्या:
1. जेव्हा जवळच्या दुकानात तुमचा साईझ किंवा व्हरायटी मिळत नाहीये.
2. तुमचे फॅशन चॉईस सध्या बाकी जगाशी मिळते जुळते राहिलेले नाहीत.उदा: जग सध्या लो आणि मिड वेस्ट जीन्स घालतंय. सर्व आजूबाजूला असलेल्या शोरूम फक्त लो आणि मिड वेस्ट ठेवतायत.आणि तुम्हाला या ब्रँड चं जरा जुनं मॉडेल नॉर्मल वेस्ट वालं हवं.
3. ऑनलाईन मध्ये 4-5 फिल्टर्स टाकून वस्तू पटकन शोधता येतेय आणि त्या मानाने प्रत्यक्ष दुकानात विक्रेत्यांना समजावून सांगणं कठीण पडतंय
ऑनलाईन केव्हा घेऊ नका:
1. लिथियम बॅटरी वाल्या वस्तू, उदा.स्मार्ट वॉचेस ची स्वस्त मिळणारी 3-4 वर्ष आधी रिलीज झालेली व्हर्जन. वेअरहाऊस मध्ये बरेच काळ स्टोअर केल्याने बॅटरी खराब झालेली असू शकते(एक 3 स्मार्ट वॉच परत करून शेवटी दुकानातून घेतली आहेत.) तुम्ही जर लेटेस्ट रिलीज घेत असाल तर ऑनलाईन ला हरकत नाही.
2. तुम्हाला एक ठराविक शेड किंवा मॅचिंग हवं: प्रॉडक्ट फोटोग्राफी पांढऱ्या बॅकग्राउंड वर लाईट्स लावून केलेली असते.रंग उठावदार आणि थोडे डार्क दिसतात.कधीकधी प्रत्यक्षात पर्शियन ब्लु फोटोत नेव्ही ब्लु दिसतो.प्रत्यक्षात लाल भडक नारिंगी कडे झुकणारा रंग फोटोत टोमॅटो रेड दिसतो. तितकं प्लस मायनस चालत असेल तर घ्या.घेताना रिव्ह्यू मध्ये नॉर्मल लोकांनी नॉर्मल प्रकाशात काढलेले फोटो आधी बघा.
3. जर एखादा विशिष्ट पोत हवा असेल आणि वर्णनात लिहिलेला कापडाचा प्रकार वाचून काहीच अंदाज येत नसेल तर.सेल मध्ये 200 ला 2 कुर्ते 'कॉटन' असं लिहिलेले घेतले ते पॉलिस्टर निघाले.खरं तर कॉटन इतक्या स्वस्तात मिळणार नाही, मिळालं तर रंग कच्चे किंवा अतिशय पातळ कपडा असेल हे माझ्या लक्षात यायला हवं.
अनु ऑनलाईन खरेदीच्या टिप्स
अनु ऑनलाईन खरेदीच्या टिप्स अगदी बरोबर.
मला एकदा स्वस्तातले हेडफोन /
मला एकदा स्वस्तातले हेडफोन / इअरफोन हवे होते. ५० रूपयांपासून ते १५० रूपयांच्या क्वालिटीचे. अगदी २५० रू चे पण चालले असते. जवळच्या मोबाईलच्या / इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व दुकानदारांनी ९०० रू पासून ते २५०० रूपयांपर्यंत दाखवले. मग शेवटी ऑनलाईन पाहिले. हव्या त्या बजेटमधे एक दिवसात मिळून पण गेले आणि नंतर हरवलेले ही सापडले.
इथून पुढे स्वस्तातल्या वस्तू घेताना रंगपंचमीला रंगलेले कपडे टाकून न देता वापरायचे. ते थोडे फाडून पण ठेवायचे. शक्यतो अंघोळ न करता , केस न विंचरता, दाढी क्लीन न करता जायचे म्हणजे स्वस्तातल्या वस्तू दाखवतील. किंवा असा अवतार करायचा कि त्यांच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे आणि ५० रूपये तरी का घालवता हे पडूनच आहे जा घेऊन असे म्हणायला पाहीजेत.
आशु२९, इथेही पुरुषांसाठीचे दर
आशु२९, इथेही पुरुषांसाठीचे दर कमी आहेत. शिवाय मला फक्त शिलाईचाच खर्च होता. कापड गिफ्ट मिळालं होत.
माझ्या साइझचं शर्ट न मिळणं, पोट लपवता येईल असं शर्ट शिवून घेणं हे आणखी फायदे. पॅन्ट कधीच ऑनलाइन घेतली नाही. घरी घालायचे ३/४थ, शॉर्ट्स घेतो. ते पण रस्त्यावर स्वस्तात मिळतील.
भरत
भरत
पुरुषांच्या ट्राऊझर्स बद्दल एक लोचा असा की सध्या ऑनलाईन फक्त घोट्यापर्यंतच्याच ट्राऊझर्स मिळतात. त्यामुळे शिंपी दादाशिवाय तरणोपाय नाही, विशेषतः मी आणि भरत ह्या वयोगटातील लोकांना
शिलाई आता कापडाहून महाग
शिलाई आता कापडाहून महाग झालिये त्याचं काय? ...+१.
कित्येक वर्षांनी या डिसेंबरमध्ये ब्लाऊज शिवायला दिला तर दिलेल्या तारखेच्या 2-३ दिवस नंतर जाऊनही तयार नव्हता.मग एका दिवसात शिवून दिला.पण कसातरी शिवला आहे.कधीतरी चुकतो हे शिंपिणीचे मत!
बाकी ऑनलाईन कपड्यांच्या बाबत मीही अनुत्सुक असते.मीअनुने बरोबर लिहिलं आहे.जास्त किमतीचे कपडे ऑनलाईन घेत नाही.
शिलाईच्या दरांबद्दल अगदी सहमत
शिलाईच्या दरांबद्दल अगदी सहमत. शिवाय इतकी शिलाई देऊन फिटींगची खात्री नसते. त्या उलट ऑनलाईन. जर काही प्रॉब्लेम असेल तर परत करू शकतो.
ब्रॅण्डेड शूज वगैरे सुद्धा शो रूम मध्ये बघून ऑनलाईन खरेदी केले आहेत. किमतीमध्ये खूपच फरक पडतो.
मी घेतलेल्या सात -आठ
मी घेतलेल्या सात -आठ कपड्यापैकी एक टॉप मिन्ट्राने परत घेतला नाही. व्हेंडरने क्वालिटी चेकमध्ये रिजेक्ट केला असे कारण सांगितले. तुमच्याकडे परत आला की परत तिकीट रेज करा मग आम्ही ठेऊन घेऊ आणि पैसे रिफंड करू असे कस्टमर केअरवाले म्हणाले. त्यांनी सांगितले तसे केले पण काही उपयोग झाला नाही. मी एकदाच ट्राय करून टॅग न काढता परत केला होता. सगळेच कपडे परत केल्याचा (जरी ते वेगवेगळ्या दुकानदारांचे होते) राग तर नसेल ना काढला. मी आता रिव्हू वाचते तर बाकी लोकांनाही (वेगळ्या कपड्यांचे ) असे अनुभव आले आहेत. त्यानंतर ठरवले की परत नाही घ्यायचे मिन्ट्रावरून.
मिंत्राचे अनुभव अजिबात चांगले
मिंत्राचे अनुभव अजिबात चांगले नाहीत. आपण जर प्रॉडक्टचे रेटिंग आणि रिव्ह्यू खराब दिला तर ते पब्लिश पण करत नाहीत. त्यामुळे तिथे फक्त चांगले रिव्ह्यू दिसतात.
मिंत्रा चा फार अनुभव नाही.
मिंत्रा चा फार अनुभव नाही.
अमेझॉन वर काही रिटर्न केले आहेत.एकदा एक कीचेन बनवली होती ज्यावर एका बाजूला नाव दुसऱ्या बाजूला इमर्जन्सी फोन नंबर छापला होता.तर पहिल्यांदा नीट बनली.दुसऱ्या वेळा अजून 2 बनवल्या, तर त्याने दोन्ही बाजूला नाव आणि नंबर छापला.ते घाण दिसत होतं. त्याने डिझायनर ला सांगताना त्याच्याकडे चूक झाली कबूल करून परत सुधारलेल्या 2 पाठवल्या. जुन्या परत द्यायची तयारी होती पण घेतल्या नाहीत.
अमेझॉन रिटर्न खूप चांगले आहे.रिटर्न मध्ये कारणे नीट द्यावी लागतात कस्टमर केअर चा फोन आल्यावर परत समाजवावं लागतं.
हो , अमेझॉनची रिटर्न पॉलिसी
हो , अमेझॉनची रिटर्न पॉलिसी उत्कृष्ट आहे. कपडे सोडून बाकी बरेचसे अमेझॉन वरून ऑर्डर केले जाते.
अमेझॉन वरून कपडे मागवले तर मुलांचे use and throw type फक्त.
दुकानात जावे तर पि सौ / pimpri मधले दुकानदार डुप्लिकेट माल विकतात आणि किंमतीच्या मानाने quality नसते. मिंत्राचा अनुभव खराब त्यामुळे कितीही नको वाटलं तरी लक्ष्मी रोड/ मॉल शिवाय पर्याय उरत नाही.
शिलाईच्या किमतीबद्दल वरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन.
- [ ] मुलांसाठी कपडे घ्यायचे
मुलांसाठी कपडे घ्यायचे असतील तर फर्स्टक्राय आणि हॉपस्कॉच बेस्ट आहेत. रिटर्नलाही फार प्रॉब्लेम नसतो. फर्स्टक्रायवर बेसिक ते प्रिमीअम रेंज मिळते, हॉपस्कॉच जरा महाग वाटते पण व्हॅल्यू फॉर मनी आहे. हॉपस्कॉचवर प्री-ऑर्डर साठी ३ आठवड्याचा वेळ दाखवतात. पण कधी कधी ४-५ आठवडेही लागतात. अर्थात ऑर्डर कॅन्सल करण्याचा ऑप्शन असतो.
मिंत्रा मधुन बरीच खरेदी होते.
मिंत्रा मधुन बरीच खरेदी होते. काही वेळा रिटर्न पण केले आहेत कधीच ईश्यु नाही आला. टाटा CLIQ, AJIO मध्ये पण काही ईश्यु येत नाही . पण सगळ्यापेक्षा अमेझॉनची रिटर्न पॉलिसी उत्तम आहे.
अगदी हल्ली पर्यन्त सगळे कपडे, बुट वगैरे ऑनलाईन घेत होतो. ह्या दिवाळी ला मुलचंद नावाच्या दुकाना बाहेर भरपुर गर्दी बघितली. त्या गर्दीत दिवाळी चा वेळी जायच धाडस नाही झाल (दुकानाचा बाहेर रांग होती आणी नंबर येण्यासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागत होते) पण दिवाळी नंतर त्याचा दुकानात जाउन खरेदी केली. कपडे रिझनेबल किमतीत होते. त्याचा कडे अल्टर करायला थोडे पैसे करायला पैसे लागतात पण व्यवस्थित करतात आणि वेळेवर देतात. मुंबई /पुण्यात भरपुर दुकाने आहेत. शक्यतो विकडे मध्ये सकाळी किंवा दुपारी जावे. सुट्टीत / संध्याकाळी जाउ नये भरपुर गर्दी असते.
मुलचंद - मोरवाडी चौकातील?
मुलचंद - मोरवाडी चौकातील? खूssssssssssप गर्दी दिसते बाहेर. त्यामुळेच कधी जायचा विचार नाही केला.
मुलचंद - मोरवाडी चौकातील? हो
मुलचंद - मोरवाडी चौकातील? हो
Pages