सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वांचे अभिनंदन.

काही निर्णय फक्त मान्य करायचे असतात.

एकंदरीत ह्या कार्तिकीला निवडणार्‍यांना संगीतातले काही कळत न्हाय असं दिसतय. आणि ह्या झी मराठी वाल्यांनाबी. कुणालाबी निवडत्यात. कायच्या काय. ती कार्तिकी काय आशुद्ध बोलते राव. ह्या ह्या ह्या.. आजाबात न्हाय. आवो.. म्होरच्या टाईमाला हे आसले आशुद्ध बोलणारे पयल्यांदा भाईर काडले पायजेत. आपण तर एक सुदीक sms पाटवणार नाय. राव आशानं संगिताचं(!) किती नुस्कान हुईल. आन त्यातनं जर एकांदी गायकवाड आसल तर मग ह्येंना ईंट्रीच नगो. मंजी कसं बक्षीस कुणाला दिलं हेज्यावरुन पार आरक्षणापरेंत लोकं तोंडाची वाफ घालवुन बसत्याल. त्ये सुतावरुन स्वर्ग गाटणं म्हणत्यात तसं.
असो,
संगीताचा कारेक्रम कसा सुद्ध आणि सपश्ट आसावा. भेदभाव नसावा. जिंकला तरी देशपांडे आणि हारला तरी जोशी. कसं?

अतिशय वाइट असा निकाल ....
आर्या ,प्रथमेश्,रोहित यासाटि योग्य होते..
very very disappointing result ..

मान्यवर ज्युरींकडे कागद-पेन होतं का गुणांची नोंद करण्यासाठी? मला तरी दिसलं नाही...
आधीच्या भागात सांगितलं होतं की शेवटच्या काही भागातले गुण अंतिम फेरीच्या गुणांमध्ये धरले जाणार म्हणून्...त्याचाही काही उल्लेख नव्हता...

कागद-पेन होतं का गुणांची नोंद करण्यासाठी? >>> जाऊ द्या झालं... तो results मान्य करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही... त्यामागची कारणं झी मराठीच जाणे...
वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे प्रश्ण १ लाखाचाच आहे... आर्या आणि प्रथमेश त्यांची गुणवत्ता येत्या काही वर्षात करियर मधे तुफान यशस्वी होऊन सिध्द करतीलच... आणि तेव्हा ही obvious कारणं नक्कीच लागू होणार नाहीत.. (hope so !!)

चला, लोक्स शांत व्हा! Happy
लागायचा तो निकाल लागलेला आहे. आपल्या मतामुळे आता तरी त्यात काही फरक पडणार नाही.
पण त्यामुळे गेले सहा महिने या पिल्लांनी आपल्याला जो आनंद दिलाय त्यावर विरजण का घाला? यातला कुठलाच स्पर्धक नंबर का मोहताज नही है! Happy शिवाय पाचही जणांना विजेते करुन झी मराठी ने आपल्यावर उपकारच केले आहेत. नाहीतर मी आधी म्हटलं तसं १-२-३ असे क्रमांक काढले असते व उपविजेत्याचे पारितोषिक २-३ ला दिले असते तरी जे कोणी ४-५ नंबर वर आले असते तर त्यांना काहीच न मिळाल्याने आपण असेच चिडलो असतो.
शिवाय झी ने सरप्राईज बक्षीस दिले की! पाचही जणांना सांगितीक शिक्षणासाठी २ लाख! अजून काय हवं? चला आता चिडचिड झटकून टाका.. आणि तोंड गोड करा पाहू.. Happy
naral_barfi.jpg
----------------------
एवढंच ना!

आपलं ना काय झालय माहिती का?
तो आजोबांच्या वेशातला अतुल परचुरे म्हणाला तसं..."आता सोमवार मंगळवार आम्ही करायच तरी काय?" म्हणून ही सगळी धुसफुस चाललीये.
काही भाग पुन:प्रक्शेपित करणार आहेत, सीडी येणार आहेच. तेंव्हा एंजॉय माडी. Happy

आता सोमवार मंगळवार आम्ही करायच तरी काय? >>>> अगदी अगदी... काल घरी पण हेच बोलणं झालं होतं.. Happy

एक उगाचच डोकावलेली शंका:
स्पर्धेचा निकाल सट्टेबाजांनी तर लावला नाही?
कारणमिमांसा:
१. झी व्यावसायिक आहे. जात-पात खर्या व्यावसायिकाच्या गावीही नसते (unless there is some material gain). पैशाच म्हणाल तर कार्तिकीचे (किंवा कुणाचेच) आई-वडील किती पैसे देणार?
२. सगळ्याना प्रथमेश, आर्या, रोहीत ह्यांपैकी एक गुणवत्तेवर विजयी होईल असे वाटत होते. मुग्धा लहान असल्याचा फायदा घेऊ शकेल असे वाटले होते. कार्तिकी हा सगळ्यात अनपेक्षित ऊमेदवार (मी "उपेक्षित" नाही बर म्हंटल - नाहीतर नसते वाद होतील!) आणि सट्ट्यात "अनपेक्षित" वरच कमाई असते.
बघा पटतय का Happy

सामुवाई, ही ऑप्शन देखिल विचारात घेण्याजोगी हे! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

शेक्सपिअर मुर्ख होता (निदान भारतात निवडणुका आल्याच्या काळात तरी). तो आपला येड्यासारखा लिहून गेला की नावात काय आहे म्हणुन ... अरे नावात, त्याहीपेक्षा आडनावात किती शक्ती आहे हे सा रे ग म प च्या निर्मात्यांना विचारा. जन्म ठिकाण, जन्म घराणे माणसाच्या हातात नसतं. प्रथमेशचं आडनाव "लघाटे" नसतं आणि आर्याचं आडनाव "आंबेकर" ऐवजी "आंबेडकर" असतं तर देवकी पंडीतला ते जगातले सर्वात महान गायक वाटले असते. निदान या पुढेतरी हिंमत असेल तर मुलांची आडनाव जाहीर न करता स्पर्धा घेऊन दाखवाव्यात.
(हे मी "झी मराठी"लाही पाठवले आहे, याचीही नोंद घ्यावी.)
प्रथमेश आणि आर्या व काही प्रमाणात मुग्धा - मला खरंच तुमच्याबद्दल वाईट वाटतं. परवा तो "सुरत पियाकी" काय गायला. पु. लं. असते तर म्हणाले असते " याच्यासारखी एक तान तुम्ही घेऊन दाखवा, ------ होतो की नाही सांगा". (मी पु. लं. नसल्यामुळे जागा गाळलीये, पण भावना तीच आहे).

जाऊ द्या रे. मोठ्याच्यां धंदेवाईकपणाचं काय सांगायचं पण सगळीच मुलं अप्रतिम गात होती व आपण सर्वजण सगळ्यांनाच विजेता करा असं म्हणत होतो ना? कार्तिकी जिंकली तरी बाकीचेही काही हरले नाहियेत. तिचे आईवडिल तर किती साधे वाटतात ! ते काही असा धंदा झाला असेल तरी त्यात इन्वॉल्व नसणार. त्यामुळे त्या छोट्ट्याशा कार्तिकीला टार्गेट करण्यात अर्थ नाही. तिला तर या जगाचा अजून अनुभवही नाहिये. बाकिच्या चारांसारखी तिही निरागसच आहे. प्रत्येकाचे रेटींग हे व्यक्तीप्रमाणे सापेक्ष असणारच. मला व्यक्तीशः प्रथमेश जिंकावा असे वाटत होते पण म्हणून काही कार्तिकीबद्दल धुसफुस मला करवणारच नाही. निव्वळ आडनावांवरुन पार्शियलिटी हे आजच्या काळाचे न दिसणारे पण कितीतरी योग्य व्यक्तींच्या करियरची हत्या करणारे हत्यार झाले आहे पण ते एखाद्या अजाण बाळाला कशाला चिकटवायचे? (चोखामेळांची योग्यता जर त्यांना विठ्ठलाचा लाडका बनवत असेल तर त्यांचा दु:श्वास करणारी मी कोण?)
************
हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

शेर्लोक,
>> पु. लं. असते तर म्हणाले असते " याच्यासारखी एक तान तुम्ही घेऊन दाखवा ...
अगदी. अगदी.
अहो, पण puristic पडले अल्पसंख्य आणि असल्या अल्पसंख्यकांना ईथे काही अधिकार नसतात कारण "जंते"ला "कोंबडी आणि पोपट" आवडणार आणि त्यालाच ते परफोरमन्स, एक्स्प्रेश्न्स आणि काय काय म्हणणार. असो;

ashwini,
well said...
मला नाही वाटत कुणि कार्तिकी च्या विजेते घोषित केल्याबद्दल धुसफुसतय.. आणि तिलाही कुणी या शंकाभोवर्‍यात ओढत नाहीये.
मुद्दा फक्त एव्हडाच होता की ज्या दर्जा अन स्तरावर ही स्पर्धा पोचली होती त्याला अनुसरून सुसंगत निकाल लागणे/देणे. इथे "हा काय फक्त एक लाखाचा" वगैरे फरक आहे असे म्हणणेही योग्य नाही.. अशी गुणवत्ता, मेहेनत, लगन अन ध्येय हे कितीही लाखात नाहीच मोजता येत. in fact its all beyond that.. आणि संजीव अभ्यंकरांच्या तू उद्याचा बैठकीचा गायक आहेस केवळ याच प्रशस्तीपत्रकावर प्रथमेश ने खुश रहावं हे म्हणणही पटत नाही. तो बैठकीचा गायक आहे हे त्याच्या पहिल्या ४, ५ एपिसोड्स मधूनच समोर आलय, मग तरी तो महाअंतिम फेरीपर्यंत सर्व प्रकारची गाणी गायला का बरे झटत होता..? रोहीत राऊत चं ही तेच आहे.. अवधूत गुप्ते नी त्याला प्रमाणपत्र दिलं म्हणून काही त्याने महाअंतिम फेरीत जीवाची बाजी लावून गाणं सोडलं नाही.. माणिक वर्मा शिष्यवृत्तीसारखा महोत्तम पुरस्कार मिळाला म्हणून आर्याने देखिल मेहेनत अन सिध्ध करून दाखवणं शेवट्पर्यंत सोडलं नाही.. आपल्याला या मोठ्यांच्या कंपूत विजेते होण्याचा तितका वाव नाही याची कल्पना असूनही मुग्धा ने देखिल तीचे प्रयास थाम्बवले नाही.. सर्व प्रस्थापित अन लोकमान्य गाणी सादर करण्याऐवेजी आपल्या वडीलांच्या रचना सादर करायला कार्तिकी ने मागे पुढे पाहिले नाही.
तेव्हा सर्वच मुलांन्नी हा निकाल स्विकारताना कितीही समजूतपणा अन मनाचा मोठेपणा दाखवला असला तरी याचा अर्थ आता सर्वांनाच छान बक्षिसं मिळाली, शिष्यवृत्ती मिळाली, अन महान गायकांकडून प्रशस्तीपत्रकं मिळाली म्हणून त्यांन्नी व इतर सर्वांन्नी मनाची समाधानी करून घ्या असलं काहीतरी उथळ विधान करणं म्हणजे या सर्व मुलांच्या अपार मेहेनतीला, प्रतीभेला, अन क्षमतेला निव्वळ व्यावहारीक तराजूत तोलण्याईतकं धंदेवाईक आहे. आणि मला वाटतं इथे जातीयवाद हा जरी प्रक्षोभाचा सूर दिसत असला तरी मूळ आक्षेप हा या धंदेवाईकपणावर आहे. किम्बहुना अशा वेळी शेवटी बक्षिसांची जाहिर खैरात करून हि लहान मुलं(?) खुष होतील असा काही झी वाल्यांचा समज असेल तर त्यांच्या मेंदूची झेप काही लाखातच संपली असे म्हणावे लागेल. मुलांन्ना तुम्ही दिलेले एक्स्पोजर वगैरे कौतुकास्पद आहेच पण तुमचा स्पर्धेचा हेतू अन tagline काय होती? "महाराष्ट्राचा उद्याचा महागायक्/महागायिका" शोधणे ही ना..? मग निदान त्या हेतूशी तरी प्रामाणिक रहा ना. कौतूकं होतच राहणार आहेत..

मी स्वतः कलेचा भोक्ता, उपासक, विद्यार्थी असल्याने हे निश्चीत माहीत आहे की कुठलाही खरा कलाकार हा प्रशस्तीपत्रकाचा मोहताज नसतो. पण एखादा कलाकार जेव्हा अशा स्पर्धेत उतरतो तेव्हा स्पर्धा म्हणून त्यात सर्वोत्तम स्थान मिळवायला तो निश्चीतच झटत असतो.. किंबहुना अशा वेळी आधीच मिळालेली लोकमान्यता वगैरे ही दुय्यम ठरते, तिथे लक्ष फक्त एकच असतं विजेतेपद.
स्वताच्या खोलीत cricket world cup ची ट्रॉफी नाही म्हणून सचिन तेंडुलकर आजही हळहळतोच!

तेव्हा कलाकार, त्याची गुणवत्ता, जनमानसातील त्याचे स्थान हे एका जागी तर कलाकाराच्या दृष्टीने एखाद्या स्पर्धेत विजय मिळवण्याचे महत्व अन ध्येय हे दुसर्‍या जागी. परवा महाअंतिम फेरीत या दोन्ही गोष्टी एकाच जागी आणून एक दुग्धशर्करा योग घडवून आणण्याची संधी झी ला होती जी त्यांन्नी निव्वळ धंदेवाईक तत्वांवर वाया घालवली. निषेध या गोष्टीचा आहे. हे जेव्हा आपल्याला उमगेल तेव्हा आपण प्रत्त्येक गोश्ट लाखात तोलणे थाम्बवू.

असो. या पोस्ट मधे कुणावरही वैयक्तीक आरोप प्रत्यारोप करायचा मुळीच हेतू नाही पण मला वाटतं मूळ मुद्दा बाजूला सरून भलतच काहितरी समोर येवू लागलं ते खटकलं म्हणून हा प्रपंच.

मी तर म्हणतो... झी ने असा 'निकाल' लावून ह्या सर्व मुलांचे भलेच केले आहे... त्यांना लहानपणीच स्वप्नामधल्या दुनियेतून प्रखर वास्तवात आणले..
नाहीतर बिचारे समजत बसले असेत की यश अणि प्रसिद्धी गुणवत्ता असली कीच मिळते आप्ण फक्त मेहनत घ्यायची की यश आपलेच...
आजकालच्या दुनियेत असे नसते.. यशाची धंदेवाईक गणिते वेगळी असतात आणि अजून इतर बर्‍याच घटकांवर यश अवलंबून असते आणि जे घटक आपल्या हातात नसतात... हे फार लवकर झी ने ह्या मुलांना शिकवले... त्यामुळे पुढे मोठ्ठे झाल्यावर चुकुन त्यांच्या हातात नसलेल्या कारणांमुळे त्यांना अपयशाला सामोरे जावे लागलेच कधी तर बिचारे खचणार नाहीत Proud

ह्यातून झी ची दूरदृष्टीच दिसून येते Happy

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      samuvai ,
      दोन दिवसापास्नं ह्या "अतिशय गहण" विषयावर डोकंफोड केल्यावर आमालाबी थोडी कारणं उमगली हायेत.
      १. ह्या सबंद भानगडीमागं पाकिस्तानवाल्या दहशतवाद्यांचा हात आसला पायजे. मागं मंबयवर येवडा मोठा हल्ला करुनबी ही लोकं एकच हाईत म्हणल्यावर त्यांनी झी मराठीवाल्यांना हाताशी धरुन ह्यो गेम केलेला आसु शकतो. उद्या मोर्चे निगतील, संप होतील, काही ठीकानी दंगली सुदीक. आन जनजीवन ठ्प्प हुईल. (हे आजकालचे अतिरेकी लय डोकेबाज हायेत, काय बी सांगता येत न्हाई.)
      २. ह्येज्यामंदी अमेरीकन भांडवलदारांचा हात आसु शकतो. म्हंजी बगा, सद्याचं जागतिक बाजारात बिगडलेलं गणित आन् त्यात आयडीयासारख्या कंपनीनं 'सा रे ग .. पा' च्या मधुन मिळावलेलं मार्केट ह्येचाबी कायतर संबंद आसला पायजे.(नसल तर जोडला पायजेल, च्यामारी.. आमचे विचारवंत काय नुस्ते पाकिस्तानवाल्यांशी सवाल्-जवाब करायला पाळले हायेत व्हय.)
      ३. तिसरं कारन सापडलं की लागोलाग हीतं खरडतो.(आमची कंपनी त्येचाच तर पगार द्येतीय न्हवं!)

      चुक भुल द्या घ्या. (आमचा थोड्याच दिवसापुर्वी आम्चा जागतिक राजकारणाचा अभ्यास सुरु झाला हाय. त्या दृष्टीकोनातुन बगा म्हंजी तुमालाबी पटल.)

      राम राम.

      मिल्या,
      Happy हे विरोधाभासाचे गणित काही औरच आहे .. Happy

      सुदाकरराव तुमी लईच लांब जाउनशान पोचलाव बगा.अवो ह्यात सगल्यात मोटा डाव फुडच्या इदानसबा विलेक्सनचा हाय.कांग्रेसच्या राज्यातच कार्तिकीसारकी असुद्ध भाशा असनारे कमी लायकीचे लोक जिंकनार त्यामुले आमास्नीच निवडून द्या असा प्रचार करता येईल,कस्सं.
      बा़की योग सायबांची पोस्ट वाचुन लईच मज्जा वाटली मला.त्ये म्हनत्यात मला नाही वाटत कुणि कार्तिकी च्या विजेते घोषित केल्याबद्दल धुसफुसतय आनी मग कालच्याधरन जो धुरळा उडतुया हित त्यो कशापाय?
      आजून येक भारी ऐका- आर्याचं आडनाव "आंबेकर" ऐवजी "आंबेडकर" असतं तर देवकी पंडीतला ते जगातले सर्वात महान गायक वाटले असते. म्हनजी कळलं नव्हं, कार्तिकी जिकल्याचं दुक न्हायी हितं कुनाला पन गायकवाड का बरं आले ह्येचा तरास होतुया.आनी तसं झालं की त्याच्यात सामील असलेले सगळे (जज्य,चॅनेल,मोबाईल) ब्येकार.
      आनी ह्ये म्हने 'प्युरिस्ट',बहुसंख्यांना 'जंत' म्हणणार,त्यांच्या कला,संस्कृती.संगीताला कायम कमी लेखणार वर्णवर्चस्वाच्या ह्या काविळीतुन आपली एवढ्यात सुटका नाही हेच खरे.
      दंडवत!
      ********************************
      द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

      मला प्रामाणिकपणे असं वाटतंय की स्पर्धा संपली, निर्णय लागला, त्यावर सगळ्यांचंच बोलूनही झालंय, तर आता हा बाफ बंद करावा. इथे आता स्पर्धेच्या अनुषंगाने काहीच बोललं जात नाहीये. उलट विषय भरकटतोय.
      आणि कृपया, हा कोणावरही personal attack वगैरे नाही! एक मिनिट सगळ्यांनीच विचार करावा. पटले तर बघा, नाहीतर सोडून द्या.
      -----------------------------------
      प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
      प्रत्येकाच्या मनामध्ये एक तरी बेडी...

      पीयस्जीला अनुमोदन! Happy
      यापुढे या चर्चेतून अधिक निष्पन्न होण्याऐवजी कोलित बाहेर पडतील
      अन ती कुणाच्याही हातात पडतील....... माकड काय नि माणस काय! हातात कोलित मिळाल्यावर जाळपोळच करणार ना???? Proud
      ...;
      आपला, लिम्बुटिम्बु

      लिंब्याला पुर्ण अनुमोदन!
      विशेष करुन 'आम्हीच तेवढी माणसे बाकीची ती माकडे' असा पवित्रा असेल तर नक्कीच!!
      ********************************
      द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

      आगावू, आज काय ठरवून वाकड्यात शिरायचा दिवस का? काय मिळणार यातून? कोणे एकेकाळी एका बाजूवर अक्षम्य अन्याय झाला आता दुसर्‍या बाजूवरही तितकाच अक्षम्य अन्याय होतोय. आणि तेव्हा अन्याय करणारी पिढी आज अस्तित्वातच नाहिये. पण ही तेढ कुणीही कुणावर अन्याय करणं जोपर्यंत थांबवणार नाही तोपर्यंत चालूच राहील Sad आणि दुर्दैवाने आज ना उद्या निसर्ग नियमाने हे पारडं परत पालटेल व हे असेच चालू राहील. मग खरी समानता नक्की कधी येणार? बहुतेक कधीच नाही.
      ************
      हा देहच जेथे नाही आपुला, एकदा जो साईचरणी वाहिला |
      मग तयाच्या चलनवलनाला, काय अधिकार आपुला ||

      >>>>> विशेष करुन 'आम्हीच तेवढी माणसे बाकीची ती माकडे' असा पवित्रा असेल तर नक्कीच!!
      आगाऊ, मला तुझ्या कडून यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया अपेक्षितच नव्हती! Proud
      ...;
      आपला, लिम्बुटिम्बु

      बाप रे , आगाउ नी दिलेली लिंक आत्ता वाचली . ते शिक्षणमहर्षीं बद्दलच जर खरं असेल तर किती भयानक आहे सगळं ... एवढी फिल्डींग लावली होती का खरच ?
      -----------------------------------------
      सह्हीच !

      वरील सर्व चर्चेच्या अनुषंगाने माझ्या मनात उद्भवलेले काही प्रश्णः

      १. आजवरच्या सर्व रिआलिटी शोज मध्ये तुम्हाला वाटणाराच कलाकार पहिले नंबरचे बक्षिस पटकाउन गेला का? नसेल तर तेव्हा देखील तुम्ही obvious ह्या शब्दप्रयोगाचा वापर केला होता का?
      २. जर समसच्या आधारे निकाल (संपूर्ण वा काही भाग) जाहीर होणार आहेत तर कार्तिकी गायकवाडला इतरांपेक्षा अधिक समस मिळाले असतील ही शक्यता का गृहीत धरली जात नाहिये? तुम्हाला जे आवडतात तेच बहुसंख्यांना (मेजॉरिटीला) आवडतात ह्या समजामागचे गृहीतक काय?
      ३. परिक्षकांनी देखील कार्तिकीला इतरांपेक्षा अधिक गुण बहाल केले असतील ही शक्यता का गृहीत धरली जात नाहिये? तुम्हाला जे आवडतात तेच परिक्षकांना आवडतात ह्या समजामागचे गृहीतक काय?
      ४. इतर रिआलिटी शोज मधे जेव्हा तुमच्यामते जो सर्वोत्कृष्ट कलाकार निवडला गेला नाही तेव्हादेखील तुम्हा लोकांना गुणवत्तेचा इतकाच कळकळा आला होता का?

      माझ्या वैयक्तिक मतानुसार इथे अनेकांना 'गायकवाड' जिंकल्याचे अधिक दु:ख होतय, तथाकथित सर्वोत्कृष्ट कलाकार न जिंकल्यापेक्षा.

      आणि योग, तुम्ही वर केलेली काही विधाने ह्या बाफवरील इतर पोस्ट पाहिली तर हास्यास्पद वाटतात हो (तुमच्या विधांनाचा उल्लेख करत आहे कारण तुमच्या बर्‍याचश्या पोस्ट ह्या संयत होत्या)
      उदा: "मला वाटतं इथे जातीयवाद हा जरी प्रक्षोभाचा सूर दिसत असला तरी मूळ आक्षेप हा या धंदेवाईकपणावर आहे."
      अहो काही लोक (लिम्बुटिम्बु, शेर्लॉक वगैरे) सरळ सरळ जातीयतेचा आरोप करत आहेत तर काही अजुन नथीतून तीर मारत आहेत. कुठल्यातरी पोस्ट मध्ये तर जंत वगैरेंनी उल्लेख केला गेला होता. ह्यापेक्षा निंदनीय अजुन काही नाही.
      असो.

      >आणि योग, तुम्ही वर केलेली काही विधाने ह्या बाफवरील इतर पोस्ट पाहिली तर हास्यास्पद वाटतात हो (तुमच्या विधांनाचा उल्लेख करत आहे कारण तुमच्या बर्‍याचश्या पोस्ट ह्या संयत होत्या)
      उदा: "मला वाटतं इथे जातीयवाद हा जरी प्रक्षोभाचा सूर दिसत असला तरी मूळ आक्षेप हा या धंदेवाईकपणावर आहे."
      अहो काही लोक (लिम्बुटिम्बु, शेर्लॉक वगैरे) सरळ सरळ जातीयतेचा आरोप करत आहेत तर काही अजुन नथीतून तीर मारत आहेत. कुठल्यातरी पोस्ट मध्ये तर जंत वगैरेंनी उल्लेख केला गेला होता. ह्यापेक्षा निंदनीय अजुन काही नाही.>
      तन्या,
      Happy माझी ती अक्खी पोस्ट "वैयक्तीक" मत स्वरूपाची होती. अर्थातच जे थेट जातीयवादाचा घोषा करत आहेत त्यांना मी कुठल्याही प्रकारचे समर्थन देवू इच्छीत नाही.

      Pages