सारेगमप लिटल चॅम्प्स (मराठी)

Submitted by योगी on 12 January, 2009 - 16:21

१२ जानेवारी:
पहिली फेरी:

आर्या - खरा तो प्रेमा... अप्रतिम Happy
प्रथमेश - उठी उठी गोपाला... ठिक ठिक... फारसं नाही आवडलं. अवधूत म्हणाल्याप्रमाणे खरंच आवाजात ताण जाणवत होता...
मुग्धा - कोटी कोटी रुपे तुझी... खूप दमल्यासारखी गायली (असं मला वाटलं)
कार्तिकी - पाणगौळण... छान गायली, आधी हीसुद्धा दमल्यासारखीच वाटत होती. वन्स मोअरला मात्र जास्त छान गायली. गाणं झकास होतं आणि गाताना कार्तिकी ज्या प्रकारे एक भुवई उडवायची तेही फार छान होतं Happy
रोहित - येशील येशील येशील राणी पहाटे पहाटे येशील - मस्त गायला पोरगा. ह्याने पुर्ण कार्यक्रमात जी प्रगती केली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे.

दुसरी फेरी:

आर्या - मागे उभा मंगेश... नेहमीप्रमाणेच... खूपच छान, खूपच छान...
मुग्धा - नारायणा रमारमणा... शब्दातीत अप्रतिम. पहिल्या गाण्यात दमलेली वाटणारी मुग्धा ती हीच का असं वाटलं. तिने गाण्याची सुरुवातच इतकी जबरदस्त केली की खरी मुग्धा काय आहे ते लक्षात यावं!
कार्तिकी - चल गं सखे पंढरीला... झक्कास... अगदी तिच्या स्टाईलमधे गायली...
रोहित - ही दुनिया माया जाग मनुजा जाग जरा... छान गायला. आवडलं! अवधूतने अगदी नेमक्या शब्दांत सांगितलं त्याच्या गाण्याविषयी... इंडियन आणि वेस्टर्न स्टाईलमधला फरक...
प्रथमेश - मी हाय कोली... त्याच्या नेहेमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं गाणं... आख्खा स्टुडियो डोक्यावं घ्येतलाव की वो प्वोरानं... भारती आचरेकर, राणी वर्मा (माणिक वर्मांच्या कन्या) आणि विजय कदम... एवढंच नव्हे तर सगळे प्रेक्षक धमाल नाचत होते... प्रथमेशमधला हा बदल खूपच सुखद धक्का होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टण्या, फारच योग्य प्रश्न विचारलेस..

ह्या स्पर्धेत पहिल्या पाच स्पर्धकांनी म्हणलेली गाणी...

कार्तिकी
भिंगाचे भिंगुले, मायामंदिर हालले, कुणी जाल का, पतंग उडवित होते, चल ग सखे पंढरीला, घागर घेऊन, खंडेरायाच्या लगनाला, मधुमिलनात या विलोपले, अरे कृष्णा अरे कान्हा, जैसे ज्याचे कर्म तैसे, लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नांदायला नांदायला, नवलाची गोष्ट, लंबी जुदाई, वाटेवर काटे, इवलेसे रोप, रेशमाच्या रेघांनी, बीज अंकुरे अंकुरे, माझे अछुडे बछुडे, दाटून कंठ येतो, केव्हा तरी पहाटे, धुंदित गंधित, माझिया प्रियाला, माझ्या कान्ह्याचे, या अली, ये हंसावरती बसुनी, केळीचे सुकले बाग, दिसते मजला, कृष्णे वेढिली, उधळीत येरे गुलाल, दादला नको ग बाई, निशाणा तुला,
थकले रे नंदलाला, दिवस तुझे हे, जाहल्या तिन्ही सांजा, यशोदे कृष्णाला, धुंद होते शब्द, जिया धडक धडक, सजल नयन, मन सुद्द तुझं, खोटं नाटं बोलू नका, कळीदार कपुरी, कांदा मुळा भाजी ,तू सुखकर्ता, राधे चल, माझ्या मनी प्रियाची, दमा दम मस्त कलंदर, उघड्या पुन्हा जाहल्या

आर्या
नवल वर्तले, साजण आला, कुणी तरी येणार, ये ग ये ग विठाबाई, अवघा रंग, लिंबलोण उतरु कशी, खरा तो प्रेमा, मागे उभा मंगेश, चम चम करता, येणार नाथ आता, दे मला गे चंद्रिके, मला म्हणात्यात हो पुण्याची मैना, गेला सोडुनी मजसी कान्हा, या चिमण्यानो, मलमली तारुण्य माझे, पान खाये सैंय्या, रंगा येई वो, वादळ वारं, सखी गं, येऊ कशी प्रिया, गुंजीसी है, काहो धरिला, ऋतू हिरवा, सैनिक हो, नका तोडू पावनं, ये जवळी, जाईन विचारीत, देना रे पुन्हा पुन्हा, अनामवीरा, कशी झोकात, असेल कोठे रुतला,
झिम झिम झरती, त्या चित्तचोराला, गगन सदन, नाही कशी म्हणू तुला, दिल चीज़ क्या हैं, युवती मना, सहज सख्या, मी पुन्हा, चांदणे शिंपीत, यमुना जळी खेळू खेळ, मी मज हरपून, कुठं तुम्ही गेला, मी आज फुल, दे रे कान्हा, जाहल्या काही चुका, असा मी काय गुन्हा केला, समयीच्या शुभ्र कळ्या, सुनियोजी

प्रथमेश
रात्र काळी, शतजन्म शोधताना, मन लुभाले, तू माझी माऊली, मी हाय कोली, उठी उठी गोपाला, घोंगडीवाला कांबळीवाला, सुरत पिया की, तव नयनांचे, तू सप्तसूर माझे, परब्रह्म निष्काम, राहिले ओठातल्या ओठात, कैवल्याच्या चांदण्याला, त्या फुलांच्या, आयो कहांसे, सोहम हर डमरू, अवघे गर्जे पंढरपूर, कशी तूज, स्वर आले दुरूनी, झन झननन, हृदयाच्या तालावर, परी म्हणू की, रंध्रात पेरीली मी,
तुझसे नाराज नही, जय शंकरा, परवशता पाश, काटा रुते कुणाला, नाही बोलायाचे, आताच अमृताची,
अग मैना, पाहिले न मी तुला, संत भार पंढरीत, शब्दावाचून कळले, सांगा मुकुंद, माझे माहेर पंढरी,
जेव्हा तुझ्या बटांना, झनक झनक तोरी, माझे जगणे, माझे जीवन, काळ देहासी आला, सुंदरा मना मध्ये,
देवाघरचे ज्ञात, जे वेड मजला, मान वेळावूनी, दत्त दर्शनाला, बगळ्यांची माळ फुले, दयाघना, ए मेरी जोहराजबी, हे सुरांनो

रोहित
निघालो घेऊन, अबिर गुलाल, साडे माडे तीन, ही दुनिया मायाजाल, येशील येशील राणी, ही चाल तुरू तुरू, ओंकार अनादी अनंत, देवा तुझ्या दारी आलो, दिलरुबा मधुर हा, भक्ती वाचून मुक्तीची, ग साजणी,
ही मायभूमी, सोनियाच्या गाली, एक चतूर नार, तू तेव्हा तशी, दशरथा, जबरदस्त फंडा, गारवा, तूच सुखकर्ता, आलबेला आला, मा तुझे सलाम, मर्म बंधातली, समजावूनी व्यथेला, आई भवानी, डौल म्होरच्या,
नं. ५४, फिटे अंधाराचे, जेव्हा तिची नी माझी, अंजनीच्या सुता, दिस नकळत जाई, तुला पाहतो रे, ये ये येना प्रिये, ये गो ये ये मैना, दूर किनारा, इन दिनो, मन उधाण वार्‍याचे, स्वामी कृपा, हा छंद, आम्ही ठाकर, गाव जागवीत आली वासुदेवाची स्वारी, पोरी तू कमाल, झाला महार, ती येते आणिक जाते, मल्हारवारी, राधे कृष्णा, भेट माझी तुझी, ढिपाडी ढिपांग, लगा चुनरी मे दाग

मुग्धा
देव जरी मज, जेथे जातो तेथे तू, अरे अरे पावट्या, घट डोईवर, कोटी कोटी रुपी तुझी, नारायणा रमा रमणा, एकवीरा आई, कमोदिनी काय जाणे, निजरुप दाखवा हो, उगवला चंद्र पुनवेचा, नाचत होते हरी मंदिरी, अमृताहुनी गोड, मैफलीचा रंग, बडा नटखट है, राधधर मधुमिलिंद, छन छन, आकाश पांघरोनी,
चाफा बोलेना, राधा कृष्णावरी, एका तळ्यात होती, वृंदावनी वेणू, अंग अंग तव अनंग, लो चली मै,
नको वाजवू, वार्‍या वरती गंध, काय बाई सांगू, विकल मन आज, परिकथेतील राजकुमारा, वाजवी पावा गोविंद, पदरावरती जरतारीचा, चल रे शिरपा, क्षणभर उघड, देव माझा, दिवसा मागुनी, खेड्यामधले घर कौलारू, कंठातच रुतल्या ताना, यशोमती मैय्या से, चल ऊठ रे, विसरू नको, लपविलास तू हिरवा,
छडी लागे छम छम, श्रीरंगा कमलाकांता, डार्लिंग डार्लिंग, तुला पाहते रे, रुतुराज वनी आला, कोकिळ कुहू कुहू बोले, जांभुळ पिकल्या झाडाखाली, ऐन दुपारी, पवन दिवानी

Source : Zee Marathi Sa Re Ga Ma Pa website

जरा वरती प्रत्येकानी गायलेल्या गाण्यांवर नजर टाका... कार्तिकीने फक्त लोक गीते, भक्ती गीतेच गायली असे वाटत असेल त्यांनी जरा नीट लक्ष देऊन वरची लिस्ट वाचा....
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

>>>> अहो काही लोक (लिम्बुटिम्बु, शेर्लॉक वगैरे) सरळ सरळ जातीयतेचा आरोप करत आहेत
टण्या, माज्या पोस्ट पुरते.... मी सरळ सरळ जातीयतेचा आरोप केला नाहीये, तर, "परिस्थितीवश वस्तुस्थिती बघता जातीयतेचा आरोप अशक्य का नाही" याची मला भावलेली कारणमिमान्सा प्रत्येक पोस्ट मधून टाकली हे! व याचे शन्का निरसन व्हावे ही इच्छाही प्रदर्शित केली हे! त्याव्यतिरिक्तही माझ्या पोस्ट मधे बरेच काही आहे, ते सोडून, त्यान्चे सन्दर्भ सोडून येवढे बिनधास्त विधान करणे निदान तुझ्याकडून अपेक्षित नव्हते!
वरल "जन्ता"चे उदाहरणही तसेच, दोन चार पोस्टामागे आगाऊने तो "आरोप" केला हे की सवर्ण इतरान्ना जन्त म्हणतात......! ते त्याचे विधान हे! "आम्ही" कुणी म्हणायला गेलो नाहीहोत, व आगाऊने म्हणले म्हणजे लगेच ते "खरेच" मानायला पाहिजे असेही नाही, नाही का?
तुझ्या मनात उद्भवलेले प्रश्ण केवळ वकिली थाटाचे आहेत! वस्तुस्थितीचा विपर्यास करु पाहून लक्ष दुसरीकडे वेधणारे आहेत म्हणून त्यान्चा "अनुल्लेख" करतोय! Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंब्याभाउ,मी घरी जायच्या आत ही पोस्ट टाकलीत त्याबद्दल धन्यवाद,मला क्लॅरिफाय आताच करता येईल.
माझे ते वाक्य saamuvai यांच्या >>अहो, पण puristic पडले अल्पसंख्य आणि असल्या अल्पसंख्यकांना ईथे काही अधिकार नसतात कारण "जंते"ला "कोंबडी आणि पोपट" आवडणार आणि त्यालाच ते परफोरमन्स, एक्स्प्रेश्न्स आणि काय काय म्हणणार.>> या वाक्याला उत्तर होते,त्या वाक्यातून मी हाच अर्थ लावला.तो चुकीचा वाटत असेल तर तो शब्द मी नक्कीच मागे घेईन पण मुद्दा अजिबात नाही.
ट्ण्याच्या मनातले प्रश्न वकिलि थाटाचे नसुन अडचणीत आणणारे आहेत त्यामुळे त्यांचा अनुल्लेख अपेक्षितच आहे.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

टण्या.. तुझ्या प्रश्णांची उत्तरे द्यायचा प्रयत्न...

पहिला प्रश्ण तरी माझ्यासाठी NA आहे.. कारण मराठी srgmp सोडून इतर relality shows पाहिले नाहीत..

२. जर समसच्या आधारे निकाल (संपूर्ण वा काही भाग) जाहीर होणार आहेत तर कार्तिकी गायकवाडला इतरांपेक्षा अधिक समस मिळाले असतील ही शक्यता का गृहीत धरली जात नाहिये? तुम्हाला जे आवडतात तेच बहुसंख्यांना (मेजॉरिटीला) आवडतात ह्या समजामागचे गृहीतक काय?
--> गृहीतक नाही.. पण मग समस ची संख्या झी मराठी ने घोषित का केली नाही?? ती केली असती तरी ती manipulated नाही ह्याला पुरावा काय? फक्त कार्तिकी पुरतं बोलायचं तर समस मधे कार्तिकी आघाडी वर कधीच नव्हती... (निदान मी पाहिलेल्या एपिसोडस मधे) जाणकारांनी अधिक माहिती आणि लिंका द्याव्या जर हे चूकीचं असेल तर..

३. परिक्षकांनी देखील कार्तिकीला इतरांपेक्षा अधिक गुण बहाल केले असतील ही शक्यता का गृहीत धरली जात नाहिये? तुम्हाला जे आवडतात तेच परिक्षकांना आवडतात ह्या समजामागचे गृहीतक काय?
--> परत तेच.. कोणी कोणला किती गुण दिले हे झी मराठी नी जाहिर का केलं नाही?? आत्ता पर्यंत प्रत्येक गाण्याचे मार्क्स त्या किंवा पुढच्या एपिसोड मधे जाहिर झाले होते.. तसं असताना फक्त मेगाफायनलचे गुण लपवायचं कारणं काय??? असं केल्याने निकालातली पारदर्शकता गेली असं वाटलं तर त्यात काय चुकीचं आहे???

४. इतर रिआलिटी शोज मधे जेव्हा तुमच्यामते जो सर्वोत्कृष्ट कलाकार निवडला गेला नाही तेव्हादेखील तुम्हा लोकांना गुणवत्तेचा इतकाच कळकळा आला होता का?
--> हे पहिल्या प्रश्णाप्रमाणेच.. पण झी च्या srgmp मधे आत्तापर्यंत जेव्हा अभिजित कोसंबी, वैशाली माडे, प्रसाद ओक आणि लिंबेकर-चितळे हे जिंकले होते त्यावेळी मला नाही वाटत की ओरडा झाला होता. मायबोलीवर किंवा इतर माध्यमांमधेही... कारण जिंकलेले हे खरच जिंकावे असे होते.. मग त्यात फायद्या तोट्याच्या गोष्टी असल्या तरी...
आगाऊ आणि इतरांसाठी.. वैशाली जिंकली होती तेव्हा "जोशी" आणि "पानसे" इतर स्पर्धक होते.. पण तरीही सगळ्यांनी वैशाली ला भरभरून मतं आणि कौतूक केलं होतं कारण तीच पुर्णपणे deserving होती.. तेव्हा उगाच पोटशूळाच्या गोष्टी करू नका... आणि जरी कार्तिकी च्या जागी "वैशंपायन" जिंकली असती तरी ही मी results manipulated आहेत का? असच विचारलं असतं... कारण truly deserving आर्या, प्रथमेश आणि रोहीत हेच होते...

असो..

कारण जिंकलेले हे खरच जिंकावे असे होते.. > अनुमोदन
-----------------------------------------
सह्हीच !

>तुझ्या मनात उद्भवलेले प्रश्ण केवळ वकिली थाटाचे आहेत! वस्तुस्थितीचा विपर्यास करु पाहून लक्ष दुसरीकडे वेधणारे आहेत म्हणून त्यान्चा "अनुल्लेख" करतोय!>:)
लिंब्या अनुमोदन!! Happy

अडमा तुला मोदकाचं ताट रे! Happy
----------------------
एवढंच ना!

एडीएम, गुड रिप्लाय! Happy
आगाऊ, अरे बाबा आता पुढले ड्रामे बघायची वेळ झालीये, त्यासाठि सरसावून बस! Proud [अन ड्रामे कोणते ते विचारु नकोस, एक अक्षरही बोलणार नाही, कारण ड्राम्यान्ची जरी भविष्यवाणी वर्तवली तरी तुम्ही दोन दोन हातान्च्या पालथ्या मुठीन्नी बोम्बलायला मोकळे की बघा "यान्ना हे असच घडायला हव होत", ती सन्धी मी देत नाही]
(बिच्चारी कार्तिकी, तिच्याबद्दल मात्र व्यक्तिशः वाईट वाटते की असल्या पडद्यामागिल घाणेरड्या राजकारणामुळे, इतक्या लहान वयातच तिचे नाव वादात गोवले जातय अन मटासारखी वृत्तपत्रे "धडाडीने" हा प्रश्ण धसास लावू पाहून आगीत अजुन तेल ओतताहेत! आज वृत्तपत्रे, उद्या काय्,सन्ध्याकाळपर्यन्त मिडियाही यात टीआरपी वाढविण्यासाठी सहभागी झाल नाही तर नवल! Sad )

बाकी तुला "जन्ता" या शब्दाचा (जनता असा अर्थ न घेता की जो शॉर्टफॉर्म मायबोलीवर असन्ख्य वेळेस वापरला जातो), वाक्यातील बाकी सन्दर्भ सोडून केवळ "जन्त" वा "वर्म्स" (कृमीकिटक) याच अर्थाने शब्द घ्यायचा असेल तर कोण अडविणार?????
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मला नाही वाटत की मायबोली वर जातियतेला कुणी खतपाणी घालत असेल म्हणुन. कार्तिकी गायकवाड विजयी घोषीत झाल्यावर इथे ज्यांनी कुणी तिच्या विरोधात मत प्रदर्शित केले आहे. ते त्यांचा आवडता गायक अंतिम फेरीत विजयी घोषीत होऊ न शकल्याने केले आहे. ती 'गायकवाड' असल्याने कुणीही दुखावले गेले नाही. परंतु मुद्दामहुन तो समज काही मा.बो.कर निदर्शनास आणुन देत आहेत. मुबैवरझालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बी.बी. च्यामार्गाने हा बी.बी. जाणार असेल तर मॉड नी त्वरीत हस्तक्षेप करुन हा बी.बी. तत्काळ बंद करावा. ही विनंती.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

आणि जरी कार्तिकी च्या जागी "वैशंपायन" जिंकली असती तरी ही मी results manipulated आहेत का? असच विचारलं असतं>>>> अगदी बरोब्बर!

पण इथे वाद सुरू झाला तो एका वेगळ्याच कारणाने.. त्या पोस्टमध्ये जतियतेचा गंध होताच... झीला दोष न देता स्पर्धकाच्या आडनावावरून भलतेच निषकर्श काढले गेले.. .. आणि आपले गुणदर्शन झाकण्यासाठी अशुद्ध उच्चार वगैरेंची ठिगळॅ लावण्यात आली.टण्याचे प्रश्न आपण स्वत्।लाच विचारून पाहीले तर इतक्या धुळवड्याचा अर्थ नक्की लागेल. एसेमेस हा वादाचा मुद्दा होऊ शकतो,झीची पॉलिसी वादाचा मुद्दा होऊ शकतो पण या सगळ्या प्रकरणात 'ते' वगैरे हा भाग कुठून आला???/ निकाल अनपेक्षित असला म्हणून कोणत्याही टोकाला जऊन विरोध करायचा हे अगदी उत्तर प्रदेश विधानसभेसारखे झाले!
_________________________
-Impossible is often untried.

नक्कीच ! माझ्यापुरतं बोलायचं म्हटलं तर 'गायकवाड' संदर्भ आधी माझ्या लीटरली लक्षात ही आला नव्हता , इथे त्या obvious कारणामुळे अन नंतर लिंब्याच्या पोस्टनंतर Light 1 पेटला . मला एकतर रोहित किंवा आर्या जिंकावेत असं वाटत होत पहिल्यापासून . इनफॅक्ट घरातल्या सगळ्यांची मतं कार्तिकीला होती !

मंडळी मिटवा आता ... कुठल्या कुठे जातोय हा विषय Sad

-----------------------------------------
सह्हीच !

सतिश, एक्झॅक्टली सुरवातीपासून हेच सान्गायचा प्रयत्न करतो हे की,
जर "पैसे देणेघेणे" हा मुद्दा चालु शकतो, "बेटीन्गवाल्यान्चा हस्तक्षेप" हा मुद्दा चालु शकतो, कारण ते जाणवतात, तर अन्य जाणवणारेच मुद्दे का नाही चालत? लगेच "जातियता" आणली वगैरे बोम्ब का? एखाद्या फॅक्टच्या अस्तित्वाचे खरेखोटेपण, त्याचा शहानिशा नको करायला???? की दरवेळेसच "ऍट्रॅसिटीची" भिती बाळगावी???
माझ्या पहिल्यापासुनच्या पोस्ट मधे अत्यन्त स्पष्ट्पणे नमुद केल हे की मुग्धा नि कार्तिकी पहिल्या तिनात कुठेच बसत नव्हत्या असे मला व माझ्या सम्पर्कात आलेल्या बहुतेकान्चे मत!
वर दिल्याप्रमाणे मार्क जाहिर न करणे, समसची सन्ख्या पूर्वी जाहिर करत होते, आत्ता जाहिर न करणे, कॉलबॅक करणे, त्यातुन मेचके पुन्हा बाहेर पडणे, या सर्व बाबी शन्केला वाव देत नाहीत का?
अन जर ती शन्का स्पष्ट्पणे माण्डली तर लगेच "जातियता" आणली असे कसे?
उलट आता तर असे वाटतेय की "पाचान्नाही" अन्तिम फेरीत सामावुन घ्यायच्या वेळेसच फायनलचे निर्णय ठरले होते की काय?
की एसेमेस च्या आर्थिक गणिताप्रमाणे, ज्या स्पर्धकान्ना एसेमेस कमी सन्ख्येने येत होते त्यान्ना इलिमिनेट केले गेले? (पण हे ही खरे नसावे कारण अवन्ती पटेल ही सगळ्यात जास्त एसेमेस घेणारी होती, तरी ती एलिमेनेट झाली!)

माझ्या मते आता हा बीबी बन्दच व्हायला हवा, त्या ऐवजी ऍडमिनने इथे तत्काळ एक कौल निर्माण करुन द्यावा, ज्याद्वारे, मायबोलीपुरते आम्हि आम्हाला हवे ते उमेदवार विजयी म्हणुन घोषित करु शकू, कशी काय वाटते आयडियेची कल्पना???? Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

बाकी तुला "जन्ता" या शब्दाचा (जनता असा अर्थ न घेता की जो शॉर्टफॉर्म मायबोलीवर असन्ख्य वेळेस वापरला जातो), वाक्यातील बाकी सन्दर्भ सोडून केवळ "जन्त" वा "वर्म्स" (कृमीकिटक) याच अर्थाने शब्द घ्यायचा असेल तर कोण अडविणार?????
>>>
लिम्ब्या आत्ता पोस्ट हुडकायला वेळ नाही पण त्या पोस्टमध्ये जंत हा शब्द 'जन्ता' असा न वापरता 'जंत' ह्याच अर्थाने वापरला होता. वर जंत ह्या शब्दाभोवती कोट्स पण होते.

>>>
"परिस्थितीवश वस्तुस्थिती बघता जातीयतेचा आरोप अशक्य का नाही" याची मला भावलेली कारणमिमान्सा प्रत्येक पोस्ट मधून टाकली हे!"
>>>
माझ्या वाक्याचा अर्थ 'लिम्ब्याने ह्या निकालाच्या मागे जातीय राजकारण असल्याची शंका व्यक्त केली आहे, शेर्लॉक ह्यांनी ह्या निकालाच्या मागे जातीय राजकारण असण्याचा आरोप केला आहे' असा घेतला तरी चालेल.

माझे प्रश्ण वकिली थाटाचे आहेत ह्याचा अर्थ कळला नाही. मी पुन्हा एकदा हे नमूद करु इच्छितो की कार्तिकीच ही सर्वोत्कृष्ट आहे असा माझा दावा नाहिये. पण ती इथल्या बहुसंख्य लोकांच्या अपेक्षेविरुद्ध जिंकली म्हणुन ह्यात obvious, जातीयवादी कारणे आहेत ह्या मुद्दा आक्षेपार्ह आहे.

बाकी सवडीने..

>>>> पण ती इथल्या बहुसंख्य लोकांच्या अपेक्षेविरुद्ध जिंकली म्हणुन ह्यात obvious, जातीयवादी कारणे आहेत ह्या मुद्दा आक्षेपार्ह आहे.
देअर यू आर! अरे टण्या, तू हे गृहीत कुठून काढलेस की "इथल्या लोकान्च्या अपेक्षेविरुद्ध जिन्कली म्हणुन यात "तसली" कारणे आहेत असे म्हणले????" आमचि अपेक्षा रोहितबद्दलही होती केवळ आर्या वा प्रथमेश बद्दल नाही! व हे मी माझ्या आधीच्या पोस्ट मधे पुन्हःपुन्हा सान्गितले आहे! (च्यामारी हे असे यान्ना सान्गावे लागणे हे ही लान्छनास्पद)
(जर पाच न ठेवता तीन वा दोनच ठेवले अस्ते अन्तिम फेरीत तर काय झाले अस्ते???? पाच ठेवायचा निर्णय होईस्तोवर या दोघी बाहेर जातिल असेच वाटत होते! व ते वाटणे मनचे नव्हे तर त्या त्या वेळेस परिक्षक देत असलेल्या गुण व एसेमेस्च्या क्रमावरुन वाटत होते!)
आख्खा महाराष्ट्र म्हणले तरी चालेल, प्रथम क्रमान्कासाठि मुग्धा व कार्तिकी हे गृहितच धरले जात नव्हते! त्यातुन या निकालाबद्दल अन्य कोणतेच कारण धडपणे लागू पडत नाही (याची चर्चा वरील अनेक पोस्ट मधून झाली हे) म्हणून जर त्याबाजुनेही स्वाभाविकपणे विचार केला तर हल्लीच्या परिस्थितीत तो गुन्हा कसा?
आता जन्त या शब्दाबद्दल....... पान सहा तपास
ही मूळची पोस्ट सामुवाईची
>>>>> >> पु. लं. असते तर म्हणाले असते " याच्यासारखी एक तान तुम्ही घेऊन दाखवा ...
अगदी. अगदी.
अहो, पण puristic पडले अल्पसंख्य आणि असल्या अल्पसंख्यकांना ईथे काही अधिकार नसतात कारण "जंते"ला "कोंबडी आणि पोपट" आवडणार आणि त्यालाच ते परफोरमन्स, एक्स्प्रेश्न्स आणि काय काय म्हणणार. असो;

मागचापुढचा सन्धर्भ लावुन, डबल कोट्स टाकल्याने "सर्वसामान्य जनता" असाच अर्थ निघतो, निदान माझ्यामते तरी, उलट त्यातुन कुणी जन्त वा वर्म असा अर्थ घेवु नये म्हणुन तर डबल कोट्स, सावधानते साठी!
फार फार तर "मेन्ढरान्प्रमाणे जास्त विचार न करता एकामागे एक जाऊ पहाणारी" बहुसन्ख्य जनता (puristic लोकान्च्या तुलनेत बहुसन्ख्य) असा अजुन थोडाफार स्पष्ट अर्थ निघु शकेल Proud पण यात जन्त वा वर्म्स हा अर्थ कुठुन आला
हा इथे आणला गेला..... पहा
ही पोस्ट आगाऊची पहा, अर्थाचा सोईस्कर विपर्यास करणारी प्रचारी धाटणीची
>>>>आनी ह्ये म्हने 'प्युरिस्ट',बहुसंख्यांना 'जंत' म्हणणार,त्यांच्या कला,संस्कृती.संगीताला कायम कमी लेखणार वर्णवर्चस्वाच्या ह्या काविळीतुन आपली एवढ्यात सुटका नाही हेच खरे.
आता या अर्थाचा मुद्दामहुन सोईस्कर अनर्थ करवुन घेवुन केलेल्या जळखाऊ, भडकाऊ भाष्यावर काय बोलणार????
...;
आपला, लिम्बुटिम्बु

अर्थातच जे थेट जातीयवादाचा घोषा करत आहेत त्यांना मी कुठल्याही प्रकारचे समर्थन देवू इच्छीत नाही.

हे मात्र तुम्ही अतिशय चांगले करत आहात. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच केले आहे. कुठल्यातरी फुटकळशा गल्लीतुन एक बोर्ड लावायचा - आम्ही जातीयवादाचा, पाकिस्तानी अतिरेक्यांचा, त्यांना मदत करणार्‍या स्थानिक गुंडांचा तिव्र शब्दात जाहिर निषेध करीत आहोत. ही अशा प्रकारची विधानं म्हणजे शुद्ध पळपुटेपणा आहे. मतांसाठी स्वतः जातीयवादी शक्तींचे लांगुलचालन करायचे आणि या शक्तींचा ईतरांवर यथेच्छ अन्याय करुन झाला की जातीयवादाचा असा "निरुपद्रवी" निषेध करुन मोकळे व्हायचे. पण एक लक्षात घ्या, अपघात आणि असे सांस्कृतिक घातपात हे नेहमी दुसर्‍याच्या घरीच होतील असे नाही. कधीतरी ही विषवृक्षाची छाया स्वतःवर पडली की त्यातला भयाणपणा जाणवतो. आणि आपण आजपर्यंत याचा निषेध केला नाही याचे वाईटही वाटते. आज जो अन्याय आर्या आणि प्रथमेशवर झाला आहे तो कदाचित वेगळ्या रुपात तुमच्या माझ्या मुलांवरही होऊ शकतो.

आज जो अन्याय आर्या आणि प्रथमेशवर झाला आहे तो कदाचित वेगळ्या रुपात तुमच्या माझ्या मुलांवरही होऊ शकतो>>>>>> Happy

हे म्हणजे अति झाले आणि हसू आले! काहीतरीच काय.... अन्याय म्हणे!

जी स्पर्धा विश्वासार्ह नाही तीत न जिंकल्यामुळे काय डोम्बलाचा अन्याय होणारे? दुसर्‍या कॉलबॅकपासून स्पर्धा म्हणून दर्जा संपुष्टात आला... त्यनंतर गाणे ऐकण्यासाठीच मी तरी पाहीले... शेवट्या भागातही खूप उत्सुकता वगैरे नाही ताणली गेली>.. कुणीही आले असते तरी काही विषेष नसते वाटले.

वर एक मुद्दा आला आहे शिक्षणसम्राटाच्या राजकारणाचा.... केले असतिल त्याने प्रयत्न जास्त एसेस्मेस मिळवण्यासाठी तर काय फरक पडतो... मागे कुणीतरी मुग्धाच्या शाळेने कसे जास्त एसेमेस मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांकडून एसेमेसची वेगळी फी घेतली होती तेही याच बीबी वर सांगितले होते. त्यात काही वाईट नाही. स्पर्धाच आहे जास्त एसेमेस मिळवायची तर प्रचार होणारच... आपणही वैशालीसाठी मायबोलीवर भरपूर प्रचार करत होतोच... फॉर्मॅटच आहे तसा तर करतिल कोण्कोण काय्काय! त्याचा काय बाऊ करायचा!
_________________________
-Impossible is often untried.

तन्या,
obvious शब्दप्रयोग ज्यांन्नी इथे प्रथम वापरला ते हात वर करून मोकळे झाले आहेत Happy आणि obvious या शब्दाचा अर्थही तितका obvious नसतो हे महान सत्त्य इथे प्रकाशित झाले आहे तेव्हा तो शब्द या वादातून बाद केला जावा Happy
बाकी चालू द्या, अजून नवनविन सत्त्ये उजेडात येत आहेत.. (जे सत्त्य उजेडात यायला हवे आहे म्हणजे अंतिम फेरीतील परीक्षकांचे गुण आणि समस ची संख्या ते उजेडात येणार नाही हे obvious आहेच) Happy

सुधाकरराव,
चुकिच्या नोकरीत सडताय पगा तुमी. हाश्यसम्राट मदी असता तर कवाच किताब जिंकला असता.

तुमच्या लेखातील विनोद बाजूला ठेवला तरी अतिरेकीही करु शकणार नाहीत एवढ नुकसान आपण आपल्याच देशाच करतोय प्रत्येक ठिकाणी जात आणून. म्.टा. मधील लेख वाचला आणि वाईट वाटल.
खर म्हणजे समरस समाज निर्मितीसाठी कलांचा, व्यासपीठांचा उपयोग व्हायला हवा पण घडतय उलटच.

पूनमला अनुमोदन. माझ्यापुरती लेखनसीमा.

>>>>> खर म्हणजे समरस समाज निर्मितीसाठी कलांचा, व्यासपीठांचा उपयोग व्हायला हवा पण घडतय उलटच.

याच सारेगमच्या व्यासपीठावरुन स्वा.सावरकर्-छ्.शिवा़जी महाराज यान्च्यावरची गाणी इतर गाण्यान्बरोबर गायली गेल्यावर त्यासही आक्षेप घेणारे अस्तित्वात अस्ताना ही कसली अपेक्षा तुम्ही करताय???? Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

>आज जो अन्याय आर्या आणि प्रथमेशवर झाला आहे तो कदाचित वेगळ्या रुपात तुमच्या माझ्या मुलांवरही होऊ शकतो.
sherloc
बरेच दिवसांनी उगवलात..? Happy
अगदी! माझेही तेच म्हणणे आहे की निषेध हा अप्रामाणिक निकाल अन पर्यायाने अन्यायाचा आहे, मग तो अन्याय वा निकाल कुठल्याही स्पर्धक वा जातीविरुध्ध असला तरिही. त्या अर्थाने केवळ जातीयवादी निकाल आहे असे म्हणणार्‍यांन्ना माझे समर्थन नाही.. निकालामागे काय objective assesment and transperency अपेक्षित आहे हे मी माझ्या आधीच्या पोस्ट्स मधे लिहीलेले आहे. बाकी तुमचे राजकीय शवविच्छेदन चालू द्या..:)
तुमच्या आगमनाने पहा पुन्हा मूळ विषयाला धरून मुग्धाचे गोड गाणे आठवले: उगवला चंद्र पुनवेचा
अन इथल्या चर्चेमूळे पुन्हा एकदा आर्याचं हे गाणं आठवलं: सरणार कधी रणं... Happy

सामुवाई,
कसलं गॉड बोल्ता वो तुमी. तुमाला १०० लाडु.(कळ्याचं चालत्याल का रव्याचं)
पण ते हाश्यसम्राटाचं तेवडं आमच्या मनामंदी आणु नगा. आवो आमी समजा जिकलु तर आमच्या आडनावावरनं हीथं आजुन येक बी बी सुरु व्ह्यायचा. Rofl

नमस्कार

मला वाटते इथे लोकांचा आक्षेप कार्तिकी "गायकवाड" जिंकली म्हणुन नाही तर इतर तिच्यापेक्षा जास्त चांगले होते हा अंदाज असल्यामुळे आहे. (अपवाद मुग्धा चा ..ती पहिल्या पाचात यायच्या लायकीची नव्हती हे मी या बा फ वर वेळोवेळी पोस्ट करत आलेलो आहे. हो! ती "वैशंपायन" असली तरिही..). जर vesatility and improvement हा निकष लावला गेला असेल तर रोहित हा जास्त लायक होता असे वाटते.

या आधीच्या पर्वात "अभिजीत", "वैशाली", "यज्ञेश्वर" हेच जिंकावे असे मला वाटत होते आणि तेच जिंकले तेव्हा मला अतिशय समाधान वाटले होते. वैशाली ला डावलुन सायली पानसे आली असती तरिही मी तितकाच तीव्र आक्षेप घेतला असता. "कुलवधू" चे "शीर्षक गीत" हे माझ्या अत्यंत आवडीचे आहे ते मी कितीतरी वेळा ऐकतो त्यावेळी माझ्या डोक्यात गायिकेचे आडनाव काय आहे हा विचार चुकुनही येत नाही. वैशाली माडे ही वैशाली सामंत पेक्षा उजवी आहे हे माझे स्पष्ट मत आहे.
रसिक प्रेक्षक हा कलावंताचे आडनाव पाहुन सीडी विकत घेत नाही तर तो गुण पाहतो.

परीक्षकानी किंवा झी मराठी ने काय निकष लावले, कसे विजेता ठरवले ही त्यांची गणिते असतील ती असतील पण जे आक्षेप घेत आहेत ते जातीमुळे असे ज्याना वाटत असेल ते चुक आहे.

आर्या, प्रथमेश , रोहित याबद्दल आपण काळजी करायचे कारण नाही..मला एक जुन्या कवितेतली ओळ आठवतेय
"केला जरी पोत बळेची खाली"
"ज्वाला परी ते वरती उफाळी"
या सर्वांचे भविष्य उज्ज्वल आहे.

सर्वाना माझ्या शुभेच्छा!

मी वाचत(च) नाही(च). रोज सकाळी नवीन पोस्टींचे अर्धशतक तरी असते म्हणुन ठावुकाय Wink

अरे बापरे...
शेवटची फेरीच फक्त ऐकली मी आणि त्यात तरी केवळ आर्या आणि कार्तिकी मधेच स्पर्धा आहे असं वाटलं.
मुग्धा सोडूनच द्या.
रोहितचे स्वर खास नाही वाटले पण हिंदी गाणं मस्त म्हणाला तो.
प्रथमेश चा सूर स्वच्छ होता. पण शब्दफेक अति शुद्धतेचा हव्यास वाटली. कार्यक्रमाच्या आधी दिवसभर मी सूरत पियाकी हेच ऐकत होते सिडीवर त्यामुळे प्रथमेशची शब्दफेक, शब्दांचा फ्लो तोडणं अजिबातच नाही आवडलं. केवळ सूर आणि ताल महत्वाचे आणि शब्दांना महत्व नाही असं वाटलं. त्याचं एकूण गाणंच playing to the gallery वाटलं मला. त्याचं हिंदी गाणं तर हे राम. मुळात १३-१४ वर्षाच्या मुलाला 'तू अभीतक है हसी!' हे म्हणायला लावणं यासारखं दुर्दैव नाही. आणि प्रथमेशने त्याचं पार भजन करून टाकलं असं वाटलं.. 'और मै जवाssssन!' हे माफ कराच होतं.

केवळ आर्यामधे एक व्हर्सटॅलिटी होती. मस्तच गाते आणि मोठी होतीये ती. तिची मॅच्युरिटी लक्षात येते. ती बोलताना आणि गाताना सुद्धा. पण फार लवकर ती सायली पानसे सारखी खोटं खोटं वागायला शिकेल की काय आणि तो खोटेपणा गाण्यातही उतरेल की काय अशी भिती वाटते. ती गाणं म्हणते. अप्रतिम म्हणते पण त्या त्या वेळेला ते गाणं जगतेय असं वाटत नाही. खूप सावध गाते असं वाटतं.

कार्तिकी ने जी अत्यंत अवघड गझल म्हणली त्याला तोड नाही आणि लोकगीतामधे तीचा कणनकण गात असतो हे कळतं. आपल्याला जागेवर हलायला लावते ती. नाट्यसंगीत म्हणणं म्हणजे अवघड आणि लोकगीत म्हणणं हे कमअस्सल असल्या फालतू तुलना मी करत नाही. लोकगीत हे एखाद्या भावगीतासारखं न होता त्या पूर्ण जोशात, ठसक्यासह पण तरी ठेक्यात नी सुरात व्हायला हवं जे सोपं नाहीये. तिचा आवाज भसाडा? एक वेगळा हस्की टोन आहे तिच्या आवाजाला. खूप कमी असतात असे आवाज. भविष्यात काय होईल माहीत नाही पण अश्या वेगळ्या टिंबरच्या आवाजाची मागणी पण काही कमी नाही. असो..

माझ्यामते (मला आधीच्या फेर्‍या माहीत नाहीत. केवळ अंतिम फेरीवरून सांगतेय.) अनपेक्षित असला तरी भयानक इत्यादी काही नाहीये या निकालात. आर्या किंवा कार्तिकी या दोघीच deserving होत्या त्यातल्या एकीला मिळालं.

वेगळ्या कुणाला मिळालं असतं तरी मी त्यातलं राजकारण शोधलं नसतं. तो एक सोयीचा बहाणा झाला. आपल्याला हवा तो जिंकला की स्पर्धा योग्य आणि नको तो जिंकला की राजकारण... पट्या नही..

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मी इथली चर्चा वाचून ट्यूब वर पाहिले. मला कार्तिकीचं 'उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या' खूप आवडलं. आर्याचं 'येऊ कशी', मुग्धाचं 'पावट्या' आणि 'डोकं फिरलंया'. मागच्या पानांवर लिन्क्स असतील तर अजून बघेन. सगळ्यांनी त्यांच्या आवडत्या परफॉर्मन्स चा व्हिडिओ असेल तर लिन्क द्या प्लीज.

लालु,
माझ्या ऑरकुट व्हिडिओज मधे आर्या चे बरेच व्हिडिओज आहेत, नक्की पहा :).

आर्याची सगळीच गाणी शोधून ऐक लालू. मुग्धाची पण ऐक. तिचं 'हुरहुर असते तीच उरी' तर नक्की ऐक.

बाकी ऍडम, हिंदी सारेगमप कितीही भंकस असलं तरी ते निकाल मात्र योग्यच लावतात हा! Biggrin ~~D

Pages