न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
मी खेळेन
मी खेळेन सर्व लहान मुलांबरोबर...
नाहीतरी लहान मुलंच माझ्या वयोगटाला त्यातल्या त्यात जवळ आहेत... बाकीचे म्हणजे...
बघा ,बघा,
बघा ,बघा, दक्षिणेला रहाणार्या बाराकरांना सँटिनो वयस्कर म्हणतोय.
आहेत आहेत.
आहेत आहेत. पण गाड्यांसारखे चांगले खेळ सगळे तिर्थरुप घरी आले की निघतात बाहेर. तोपर्यंत आईला छळुन घ्यायचं घरभर उद्योग करत
अग त्याला
अग त्याला कळलं असेल की आई आसपास असताना मायबोलीवर टीपी करते म्हणून मग पसारा करुन तो कामाला लावत असेल तुला. आणि बाबा दमून भागून येतात की नाही घरी? त्यांना कसा त्रास द्यायचा...
वा वा सायो
वा वा सायो तु आता एक गजनी गवार ड्यु आय काढ आणि दमलेल्या बाबा लोकांवर ललित लिही बरे
गजनी,
गजनी, गवार... दोन शिनेमांची नावे एकत्र....

त्या पेक्षा गजनी पवार अस रियलीस्टीक वाटेल.....
वैद्य
वैद्य नैवेद्य मिळाला नै वाट्टं
तोपर्यंत
तोपर्यंत आईला छळुन घ्यायचं घरभर उद्योग करत
"अरेरे, काय हे बोलणे? किती लहान लेकरू ते! केव्हढे कुतुहल असते या वयात मुलांना. नि असे घरभर फिरण्यात अनायासे त्यांचा व्यायाम होतो. वाढते वय ते. खाणे नि व्यायाम पाहिजेच. शिवाय सर्व वस्तू अश्या घरात पसरून ठेवल्या की जेंव्हा हवी ती वस्तू लगेच हाताला लागते, नाहीतर आई बाबा कुठेतरी उंचीवर ठेवतात, हात पुरत नाही आमचा. मग आम्ही कसे खेळायचे?"
वैद्य
वैद्य नैवेद्य मिळाला नै वाट्टं >>>>> ????? मंजे..... ??
तासभर तरी
तासभर तरी निवांत << तासानंतर त्याला काय लागतं?
भुक.. -
भुक..
- अनिलभाई
It's always fun when you connect.
मी स्वतः
मी स्वतः त्यावेळी, अर्रे व्वा, म्हातार्याला चळ लागला ह्! आजीबाई वर लाईन मारतो! असे म्हंटल्याचे आठवते. >>>>>>
आताशा लोक तुम्हाला तसे म्हणतात .त्याला काव्यगत न्याय. पोएटिक जस्टीस अथवा काळाने उगवलेला सूड असलं कायसंस म्हणतात....
आयला, हे
आयला, हे कुणि सांगितले तुम्हाला? उगाच स्वतःवरून जगाची पारख करू नका.
वैद्य
वैद्य नैवेद्य मिळाला नै वाट्टं >>>

तासभर तरी निवांत << तासानंतर त्याला काय लागतं? >> भुक>>> शिरा कोण आणनार आहे ?
उद्या आम्ही ११ ते ११:१५ पर्यंत येतो.
वैद्य
वैद्य नैवेद्य मिळाला नै वाट्टं >>>>> ????? मंजे..... ?? >>>> संपला आता नैवेद्य. खरकटी तेव्हढी वाहुन जाताएत. पूढल्यावेळी लवकर नंबर लावा.
इथे सांस्कृतीक कार्यक्रमांची पण एक यादी डकवा. न येणार्यांना जळवायला
लहान पोरांना भुक लागली की शिरा द्यायला मी मागच्या जमान्यातली मागासलेली सून वाटले की काय. लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं त्यांना आइस क्रीम नको द्यायला ?
संपला आता
संपला आता नैवेद्य. खरकटी तेव्हढी वाहुन जाताएत. पूढल्यावेळी लवकर नंबर लावा.>>>>> आजुन पण डोक्यावरुनच गेल........
जरा आम्हाला समजेल अश्या भाषेत सांगा बुवा..... नाहीतर काय मंग काय ऊपयोग.... 
संपला आता
संपला आता नैवेद्य.>>>
नयनीश, त्या कुण्या एका सासुबाईंच्या 'बहु'चर्चीत आणि वादग्रस्त ललित (?) लेखावर बोलताहेत...जो आता मूळ लेखिकेने उडवलाय...
बारातल्या (व बाराबाहेरच्यादेखील) ए.वे.ए.ठि. च्या तमाम 'भागिदारांना' उद्याच्या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
धन्यवाद नाना....
चला तर
चला तर मंडळी.. ए.वे.ए.ठी. तयारी झालेली आहे. सगळ्यानी संध्याकाळी उशीरा पर्यन्त रहायची तयारी करुन यावे. साधरण ३ वाजे पर्यंत खाणे पिणे उरकेल. मग मनोरंजनाचा कार्यख्रम का कार्यक्रम सुरु करु. तो ६ पर्यंत चालेल. ह्यात कॅरीओकी, लहान मुलांची गाणी, नाच, मोठयानी म्हंटलेली लहान मुलांची गाणी, मोठ्यांनी (मोठ्ठ्यानी) म्हटलेली गाणी, स्टँड अप कोमेडी व इतर खेळ ह्यांचा समावेश असेल.
सर्वानी आपापली कॅरीओकीची गाणी सीडी वर कॉपी करुन आणावी.
आताच आलेल्या बातमीनुसार काही सेलेब्रेटीज सSSSप्राईज विजिट देणार असल्याच कळत.
तसेच काही डुप्लीकेट आयडीज, हा ए.वे.ए.ठी. सुरळीत पार पडु नये म्हणुन, सडकी अंडी, टॉमेटोज वगैरे घेवुन येणार असल्याचीही बातमी आहे. ह्या सर्वाचे क्लूज ह्या बी बी वरच कुठेतरी आहेत असे कळते. तरी कोणाला काही माहीती मिळाल्यास कळवावे.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
सर्वानी
सर्वानी आपापली कॅरीओकीची गाणी सीडी वर कॉपी करुन आणावी >>
म्हणजे झक्कींना दोन तीन सिड्या लिहाव्या लागतील आता... त्यांची सर्व गाणी एका सिडीत बसणार नाहीत कदाचित...
मला गाणी
मला गाणी नुसती माहित आहेत, माझ्याकडे असतील तरी सापडणार नाहीतच. एखाद दोन स्आपडली तर आणीन. माझ्याकडे फक्त कॅसेट्स आहेत. कुणितरी माझ्यासाठी कॅसेट ते सिडी असे यंत्र आणले आहे म्हणे, पण ते अजून माझ्याकडे पोचले नाही. पोचले तरी वर्षभर त्यातून एक तरी सिडी निघेल की नाही कुणास ठाऊक. या एम. बी. ए. करण्यात फार वेळ जातो.
झक्कीकाका,
झक्कीकाका,
माझ्याकडे बर्याच मराठी गाण्यांच्या mp3s आहेत. तुम्हाला हवी असल्यास सांगा, पाठवू शकतो.
म्हणजे तुमचा कॅसेट टू सीडी करण्यात वाया जाणारा बहुमुल्य वेळ वाचेल, आणी तेवढाच माझ्याकडून तुमच्या MBA ला हातभार लागेल.
मी बर्याच
मी बर्याच लोकांना माझा फोन नं ईमेल केला आहे. पण आता लिमिट संपले इथल्या ईमेल्स चे.
आता कुणाला हवा असेल /मिळाला नसेल त्यांनी मला ईमेल टाका, मी पाठवेन मग.
मायबोलीला
मायबोलीला सर्वरचे स्थलांतर करण्यासाठी या शनिवार रविवारी सुट्टी आहे. एकदा काम सुरू केले तर मधे थांबवता येणार नाही. मी शनिवार सकाळी ११ वाजता काम सुरू करावे म्हणतो. (११ वाजल्यानंतर हे पान दिसू शकणार नाही) चालेल का?
धन्यवाद
धन्यवाद ऍडमिन,
हो हरकत नाही. तो पर्यंत ए.वे.ए.ठी. ला सुरवात झालेली असेल.
मंडळी.. कोणाला फोन नंबर पाहीजे असेल तर लवकर कळवा.
माझा इ-मेल anilbhai AT gmail.com आहे.
- अनिलभाई
It's always fun when you connect.
अरेरे,
अरेरे, म्हणजे (अति) उत्साही मंडळींना लगेचच वृत्तांत टाकता येणार नाही.
झक्की (१),
झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(२+२), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(४+१), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २), शोनू (१)
----------------
माझी एक पुतणी आणि तिचा नवरा आमच्याबरोबर येतील. मी लिस्ट update केलीय.
साधारण २२
साधारण २२ मोठे आणि १० मुले आहेत आत्तापर्यंत.
प्राजक्ता
शुभेच्छा
शुभेच्छा बर्का सर्वांना. कुण्णा कुण्णाची आठवण न काढता हा जीटीजी संपन्न होवो!
बापरे,
बापरे, भरपूर पब्लिक आहे की.
>>>कुण्णा कुण्णाची आठवण न काढता
चुकून 'गॉसिप न करता' वाचलं
Pages