न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०
जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363
मी एविएठी ला यावं म्हणतोय. पण
मी एविएठी ला यावं म्हणतोय. पण एकट्याला एका दिवसात इतक्या लांब ड्राईव्ह करायला नको वाटतंय. CT राज्यातून कुणाबरोबर येणं शक्य आहे का? म्हणजे माझं एका दिवसातलं गाडी चालवणं कमी होईल.
म्हणजे शीटी ते बागराज्य मी नुसता बसून गप्पा हाणणार (किंवा गप्प बसणार हवा तर)
चला आता अश्विनीला आणि खिचडीला
चला आता अश्विनीला आणि खिचडीला यायला हरकत नाही अजयबरोबर.
हे काय माझा प्रतिसाद एकदम
हे काय माझा प्रतिसाद एकदम गायब आणि अगदी सेम प्रतिसाद आर्चच्या नावाने.
अजयराव , तुम्ही अॅडमिनला
अजयराव , तुम्ही अॅडमिनला बरोबर आणा म्हणजे तुमची सगळी कामे होतील.
अजय, मी जाणार आहे शिट्टीतुन.
अजय, मी जाणार आहे शिट्टीतुन. माझ्याबरोबर येऊ शकता.
cinderella, तुम्हाला
cinderella,
तुम्हाला मायबोलीवरून मेल केली आहे. मला जरूर आवडेल तुमच्या बरोबर यायला.
अजय, adm आणि विशाल हे येताहेत
अजय, adm आणि विशाल हे येताहेत हे वाचून आनंद झाला. सचिन, किती शहाणा तू त्यांना घेऊन येतो आहेस, नि पुनः प्लेट्स, चमचे हेहि आणणार. सिंड्रेला, तुम्हाला पण धन्यवाद, अजय ना आणण्याबद्दल.
पण आश्विनी नि असामि येणार नाहीत हे वाचून वाईट वाटले.
माझं येणं पण कॅन्सल झालंय.
माझं येणं पण कॅन्सल झालंय. (मी पदार्थांच्या यादीत काही आणण्याचं कबूल केलेलं नाही.
)
च्च, आम्ही तुझे पदार्थही मिस
च्च, आम्ही तुझे पदार्थही मिस करु.
अरे, अरे! मृ पण नाही. माझे
अरे, अरे! मृ पण नाही.
माझे घरः ११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, बा. रा.
गूगल मॅप वर छान कळेल.
बरेचसे लोक २८७ नॉर्थ , एक्झिट २२ बी - २०६ नॉर्थ घेऊन येतील. हे २२ बी वर जरा जपूनच. अगदी १५ mph नी या. मग अगदी डावीकडे, डावीकडे करत, बरोब्बर २०६ नॉर्थ पकडा. मग बराच वेळ २०६ नॉर्थवर रहा. चेस्टर गाव, २४ रस्ता, यांना वार्याच्या वेगाने मागे टाकून थेट, डावीकडे Flanders Netcong Rd नि उजवीकडे मेन रोड दिसेस्तवर जात रहा. मेन रोडवर, म्हणजे उजवीकडे वळा. सत्पुरुष ज्याप्रमाणे वाटेतल्या प्रलोभनांना न भुलता, सन्मार्गाने जातात, तसे तुम्ही पणे सरळ किंवा उजवीकडे जाण्याचा मोह टाळून डाव्या बाजूच्या रस्त्याला लागा. पुढे तुम्हाला एक flashing yellow light दिसेल. तिथे परत डावीकडे जाण्याचा मोह टाळून सरळ जा. तो Eyeland Ave. असल्याचा साक्षात्कार होईल! माझ्या घराजवळ आल्याने तुम्हाला सर्वत्र सुंदर प्रकाश, सुवास पसरल्याचे आढळून येईल. त्या प्रसिद्ध Eyeland Ave वर traffic light दिसेस्तवर, म्हणजे दोन मैल सरळ जा. त्या traffic light ला डावीकडे वळण्यासाठी वेगळी लेन आहे (आम्ही रहातो ना तिथे, मग आम्ही आमच्या स्वतंत्र रस्त्यावरूनच जाणार). तिथे डावीकडे वळा. नि चौथे, Bi-level पिवळ्या रंगाचे घर म्हणजेच ११४ रायटर रोड. आठवण राहिली, सापडले तर, मेलबॉक्स ला फुगे लावून ठेवण्याचा विचार आहे.
या पेक्षा जे शिट्टीहून ८०
या पेक्षा जे शिट्टीहून ८० वेस्ट हा राजमार्ग घेऊन येतील त्यांच्या साठी सोपे आहे. एक्झिट ३०, हॉवर्ड बोलेव्हार्ड, घ्या. डवीकडे वळा, हॉवर्ड बोलेव्हार्डवर चालवताना पुनः रस्त्यावर उजवीकडे जाणारा रस्ता दिसेल, तिकडे लक्ष न देता डावीकडे राहून थेट traffik light पर्यंत या. तुमच्यासाठी मुद्दाम केलेल्या डाव्या लेनमधून डावीकडे ४६ इस्ट ला वळा. लग्गेच पहिला traffic light ला उजवीकडे वळा. हाच तो जगप्रसिद्ध हिलसाईड अव्हे. जगप्रसिद्ध कारण पाश्चात्य देशात एकूण ५१३५६ हिलसाईड अव्हे. आहेत म्हणे. तर या हिलसाईड अव्हे. वर उजवीकडे वळलात की दोन traffic light सोडून तिसर्या traffic light ला डावीकडे वळा. हा रायटर रोड! जात रहा, डाव्या बाजूला उपरनिर्दिष्ट ११४ रायटर रोड हे आमचे घर दिसेल.
जे जवळपास हून १० वेस्टवरून
जे जवळपास हून १० वेस्टवरून येणार आहेत त्यांच्यासाठी सूचना पूर्वीच दिल्या आहेत.
२७ जून, १४:११ चे माझे पोस्ट पहा.
आयला, झक्कीन्चे घर शोधण
आयला, झक्कीन्चे घर शोधण म्हणजे अवघडच प्रकरण दिस्तय! मला तर काही म्हणजे काही कळले नाही, कधी डावी कडे कधी उजवीकडे तर कधी सरळ...... नशिब, मागे जा अस सान्गत नाहियेत!
आता गुगल म्यापवरुन झक्कीन्च घर बघितलच पाहिजेल
बघतो सापडत का ते
अहो नुसता पत्ता लिहा, ११४
अहो नुसता पत्ता लिहा, ११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी. मग वाट्टेल तेव्हढा लहान मोठा करा नकाशा. म्हणजे आजूबाजूचे मोठे रस्ते, लहान रस्ते, त्यांची नावे, सगळे दिसेल. इथे रहाणार्यांना सवय आहे. अहो ४०० किलोमीटरवरून येऊन अचूक घर शोधून काढायचे म्हणजे एव्हढे सगळे लिहायलाच पाहिजे. अजय ४०० किमी वरून, लालू इ. पण ४०० किमी. त्यातल्या त्यात सर्वात जवळ नयनीश, फक्त ३० किमी., फार तर फार. जवळात जवळचे दुकान २ किमी वर. त्याला म्हणायचे अग्गदी जवळ! उगाच नाही म्हणत इथे, प्रत्येक माणसाला निदान एक पाय नि चार चाके पाहिजेत.
देश भारताच्या अडीचपट मोठा, लोकसंख्या एक त्रुतियांश. तरी आमच्या बा. रा. त लोकसंख्येची घनता जास्तीत जास्त आहे. अर्थात आमच्या भागात आमच्या शेजार्यांची घरे १५ मीटर दूर एकमेकांपासून. घरातच गाडीत बसून लोक बाहेर पडतात. शेजार्याचे दर्शन दोन तीन आठवड्यातून एकदा व्हायचे!
खरे तर अंतर्मुख होऊन स्वतःमधल्या ईश्वराचा शोध घ्यायला हा देश उत्तम.
खरे तर अंतर्मुख होऊन
खरे तर अंतर्मुख होऊन स्वतःमधल्या सैतानाचा शोध घ्यायला हा देश उत्तम.
अंतर्मुख झाल्यावर मला ईश्वर
अंतर्मुख झाल्यावर मला ईश्वर मिळेल असे वाटू लागते. तुम्हाला सैतान दिसत असेल तर तुमचे नशीब!
तर मंडळी, आज ५ ऑगस्ट.
तर मंडळी, आज ५ ऑगस्ट. पदार्थांची यादी पक्की करा. आमच्या घरी साबुदाणा नाही, उपासाचे काहीच नाही. तेंव्हा खिचडी इ. जमणार नाही.
पण कढी, काकडीची कोशिंबीर, पिण्याचे पदार्थ नि इतर सुविधा मिळतील.
मी पावभाजी आणि
मी पावभाजी आणि मुलांकरता(ह्यात सँटीही आला) पास्ता आणेन गेल्या वेळेसारखाच. .
मी इथून शुभेच्छा आणि जमलंच तर
मी इथून शुभेच्छा आणि जमलंच तर मिंट फ्लेवर्ड डेन्टल फ्लॉस पाठवेन. ए वे ए ठीला आलेल्या एखाद्या मायबोलीकराच्या सेलफोनवर फोन करेन.
झक्की, तुमचा अॅड्रेस गुगलवर
झक्की, तुमचा अॅड्रेस गुगलवर सापडला नाही. पुन्हा एकदा झीप कोड सकट पाठवा.
ही घ्या यादी परत एकदा. कोणाला
ही घ्या यादी परत एकदा. कोणाला काही अजून यात भर घालायची असेल तर घाला.
शाकाहारी- रुनि, लालू, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१)
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड,आईसक्रीम, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं...
अजय, अडम, शोनू, झक्की, बो-विश तुमचे नाव कश्यात शाकाहारी की मांसाहारीत?
ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
तो पत्ता इंग्रजीत असावा.
तो पत्ता इंग्रजीत असावा. म्हणजे गुगल वर शोधायला सोप्पा...
विनय
शाकाहारी- रुनि, लालू, अडम,
शाकाहारी- रुनि, लालू, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१+१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१), विकु(१), बो-विश, अजय.
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी.
ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
दुरुस्त करा...
114 Righter Rd, Succasunna,
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876
अनिलभाई, तातडीने तुम्हाला फोन
अनिलभाई, तातडीने तुम्हाला फोन करायचा आहे. केंव्हा सोयीचे होईल? तुमचा नं. माझ्याकडे आहे.
शाकाहारी- रुनि, लालू, अडम,
शाकाहारी- रुनि, लालू, अडम, पन्ना(२), विनय(२) सिन्डी (१), विजय (१), मैत्रेयी (२+२),सायोनारा (१), अमृता(२), नयनीश(४+१), सचिन(१), विकु(१), बो-विश, अजय.
मांसाहारी- नयनीश , सिंडी (१)
लहान मुले - पन्ना(१), सिन्डी(१),मैत्रेयी (२), सायोनारा(१), अमृता(१), नयनीश(१)
उपवास--
मेनू- बटाटेवडे-चटण्या-मिरच्या-ब्रेड, मराठवाडी चिकन, भेळेचं सामान, पाणी पुरी, वेज पुलाव, पावभाजी. मँगो शेक/मँगो लस्सी, मुलांसाठी पास्ता, आईसक्रीम, स्वीट्स (विनय आणणार), कढी, काकडीची कोशिंबीर, कणसं, पानं, साबुदाण्याची खिचडी.
ए.वे.ए.ठि. तारीख : ९ ऑगस्ट
वेळः सकाळी ११ पासुन पुढे
स्थळ : झक्कींचे घर (११४ रायटर रोड, सक्कासुन्ना, न्यू जर्सी)
114 Righter Rd,
Succasunna, NJ 07876
कढी नक्की कशाशी खायची ?????
कढी नक्की कशाशी खायची ????? भात पण लागेल ना... झक्की बघा काय ते...
आणि हो मला आईस्क्रिम किती आणि कुठलं आणायचं ते सांगा... तिथे आसपास देसी आईस्क्रिम मिळतं का???
आता केलात तर चालेल. माझ्याकडे
आता केलात तर चालेल. माझ्याकडे तुमचा जो नंबर आहे तो चालत नाही.
<< तो पत्ता इंग्रजीत
<< तो पत्ता इंग्रजीत असावा.>>
का? कुणि पुण्याहून किंवा भारतातून येणार आहेत का?
कसे यायचे ते मराठीत लिहीले आहेच.
सायोनारा, २७ जून, १४:११ चे माझे पोस्ट पहा.
लालू, धन्यवाद.
"पण आमच्या घरी साबुदाणा नाही, उपासाचे काहीच नाही. तेंव्हा खिचडी इ. जमणार नाही." हे वाचले ना?
माझा फोन नं. ९७३-५८४-५९२३. मोबाईल्/सेलः "ते काय असते?".
तसे पाहिले तर "Twitter, facebook, blue tooth, sms, orkut" हे असले सगळे काय असते? मुख्य म्हणजे कश्शाला असते? उगीचच काहीतरी!
नसते धंदे! खाण्या पिण्याचे बोलावे.
झक्की, मिळाल्या
झक्की, मिळाल्या डायरेक्शन्स.
अडमा, जर्नल स्क्वेअरला पटेलकडे देसी आईस्क्रिम मिळेल. तू जर्सी सिटीतून येणार ना?
Pages