न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे कुठाय "महा वृत्तांत" ...>> येइल येइल.. त्याला एकदाच टाकायचाय. बदलून बदलून नाही टाकायचाय. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

ओ भाई,
तुमचं ते गाणं टाका ना गुलमोहरावर.... टण्याने एक पेशल बीबी उघडला आहे ना त्यासाठी....
किंवा इथेतरी टाका... भारी होतं ते गाणं... Happy

मी माझ्याकडचे फोटो पाठवतो लवकर.
बाकी वृत्तांत मस्तच.

आलेल्यांपैकी १ आयडी या फोटोत नाहीय! >>> MT, ह्याचं खरं उत्तर मला माहित्ये... फोडू का? Proud
ते इतरत्र वाचूनच कळलं हां.. Happy
आणि फोटोच्या एकंदर quality वरुन तो कसा काढला गेला असेल ह्याचा ही थोडा अंदाज येतोय... Wink

अरे त्या झक्कीन्ना येवढ्या मागे का टाकलय???? हे बर नव्हे!
पाय ताणताणून, मान वर कर करुन डोकावताहेत दोन झिपर्‍यान्च्यामधून तरी चकाकती मुन्डी तेवढीच दिस्त्ये कशीबशी! Lol DDD

बर, माझ्या आठवणीचा "अनुल्लेख" केलात की नाही???????? Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मी सांगू का कोण कोण आहेत ते?

सांग बघू. Happy
LT, थांब जरा. महावृत्तांतात कळेल! Proud

(पान ९ वरचा २७ वा मेसेज.)

आता हे घ्या लालूताई, मी फक्त साधारण अंदाज लावून (नी काही खास सोर्सेस कडून मिळलेल्या माहीतीवरून सांगतेय) तेव्हा राग नसावा नी उगीच गैरसमज नकोत.

ओके बसलेली रांग नी खात्रीने नी बहुधा असणारे लोकं,
लहान जॅकेट घातलेली मुलीच्या बाजूला बसलेले धुळे,चष्मा लावलेले विनय देसाइ, दाढीवाले अनिलभाई, डब्बल टीज घातलेली रुनी (बहुधा) तिच्या मागे फक्त डोके दिसणारी ओळखत नाही. हातात मूल असलेल्या सायोनारा बाई, मैत्रेयी (किंवा)मृणमयी त्यांच्या उजव्या हाताला,त्यांच्या मध्ये तूळतूळीत(पुर्ण आदराने बरे का लिहितेय हे) डोके असलेले झक्का,भडक नारंगी टीच्या उजव्या बाजूला संदीप चित्रे,मुलाच्या गळ्यात हात घातलेली बहुधा स्वाती(बहुधा), तिच्या उजव्या बाजूला शींडी(ही पण बहुधा). बस बाई थकले मी.

माणसा, तू तुझ्यापासून सांगितलेस पण तू नक्कि कोण हे आम्हा कसे माहिती Happy

फार छळ होतो आहे. मैत्रेयी, तू फार पिळखोर आहेस हे आत्ता कळलं.

मी फक्त भाई,विनय, झक्की, मैत्रेयी, निराकार, सायोनारा --- यानांच फक्त ओळखले आहे.

>>>>हातात मूल असलेल्या सायोनारा बाई,

बापरे, मला एकदम रिटायरमेंटच्या वयात आल्यासारखं वाटलं. Proud

बी, तू मला ओळखत नाहीस ?? Sad अरे आपण निदान २५ वेळा तरी भेटलोय सिंगापुरला.

अनिलभाई, स्वाति, नि मृण्मयि, फोटो बद्दल धन्यवाद.

मी आता दररोज फोटो बघून प्रत्येकाचे नाव व चेहेरा लक्षात ठेवीन. म्हणजे पुढच्या ए. वे. ए. ठि. ला मी सगळ्यांना ओळखू शकेन, नि कुणाला वाईट वाटणार नाही की काय हे, झक्की, मला ओळखले नाहीत?

पाय ताणताणून, मान वर कर करुन डोकावताहेत दोन झिपर्‍यान्च्यामधून तरी चकाकती मुन्डी तेवढीच दिस्त्ये कशीबशी!>>>>>> ह्यात नेमकं काय गमतीदार आहे?

अनिलभाई, स्वाति, नि मृण्मयि, फोटो बद्दल धन्यवाद. >>> अरे ! भाई , मृण ? मला नाही मिळाले फोटो?!

तुला पाठवायचे राहीलेत का फोटो? सॉरी!! थांब लागलीच पाठवते.

अता आणि हे कुठेचे फोटो. मृ, वेगळे असतील तर मलाही पाठव प्लीज.

मलाही नाही मिळाले. पाठव.

सायो, तुला पाठवलेत तेच. तुझं पिल्लु आणि प्राज्याची बाहुली पण आहे बघ त्यात. नसतील मिळाले तर सांग. मी पाठवते पुन्हा.

नाही मिळाले.माबो वरुन पाठवले होतेस?

नाही जीमेलवरून. पाठवते लागलीच.

मृ, मला पण पाठवतेस फोटोज प्लीज?मा. बो. वरुन चालेल.
प्राजक्ता

मृ, मलाही नाही मिळाले Happy

धुळे ओळखले हो तुम्हाला.. पण लिहायचे राहून गेले Happy

>> १. हॉलचा दरवाजा कोणी उघडला असावा?
लालू, नितीन आणि रूनी सोडून जो कुणी या प्रश्नाचे उत्तर (लबाडी न करता) बरोबर देईल त्याचा जाहीर सत्कार करू ! Happy

मृ -- मलाही फोटो पाठवशील का? माझ्या जीमेलवर?

मला एक मेल पाठव संदीप मायबोलीतून. त्यात तुझा पत्ता आला की फोटो पाठवते.

संदीप ... बच्चन चा लेख कुठे आहे? ... link द्या ना plz

मलापण पाठवा रे.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

bole to mala pan paathv Proud अबब केवढा मो ठा आहे हा फोटो Wink

माझ्या डावीकडुन दोन नंबर किंवा भाईंच्या शेजारची रुनी.

विनयच्या उजवीकडे ldhule

भाईंच्या पाठीमागे lalu
>>> माणसाला ओळखायच कस ?

माझ्याकडे ज्यांचे इ-मेल आयडी होते त्यांना मी माझ्याकडचे फोटोज जीमेलने पाठवलेत. अजुन कोणाला हवे असतील तर मला मेल टाका मायबोलीवरुन म्हणजे मग त्या मेल वर तुम्हाला फोटो पाठवते. माझ्याकडे तो शेवटचा गृप फोटो नाहीये तो कोणीतरी पाठवा मला प्लीज.

>> संदीप ... बच्चन चा लेख कुठे आहे? ... link द्या ना plz

गब्बरसिंग -- तो लेख मायबोली दिवाळी २००८ अंकात प्रकाशित झाला होता.
माझ्या ब्लॉगवरही पोस्टला होता ती लिंक इथे देतोय.
http://atakmatak.blogspot.com/2008/11/ss_25.html

ब्लॉगवर अमिताभच्या 'अनफर्गेटेबल टूर'वर लिहिलेले दोन लेखही आहेत Happy

Pages