न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आलो तर चालेल का यावेळी? नव्या मेंब्रांना येंट्री हाये का? Proud

झक्की प्राडा, गुची वगैरे देणार आहेत का 'अगत्याने येणं केल्याबद्दल'? Wink

झक्की देणार नाहीत भाडेखर्च? >>>> ते देणारच आहेत... पण आधीच सामिष अन्न, रंपा ह्यांचा खर्च आहे त्यांना.. म्हंटलं जरा बरं डिल बघून त्यांच्या खर्चाला हातभार लावावा.. Proud


समर ए.वे.ए.ठी.
ऑगस्ट २ रविवार - दुपारी ११:०० वाजता.
स्थळ : झक्कीच घर.
चला तर.. आता कोणाकोणाला जमणार नाहीये.. Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

विशाल... एंट्री सगळ्यानाच असते... तुम्ही पण या....

मला २६ चालेल. ऑगस्टचा पहीला वीकांत डळमळीत आणि दुसरा नाहीच नाही.

विनय Happy

ती वरची कारणं उगाच टाकलेली चालतील का? गेल्या वेळेला मी लिहिली नव्हती, नवे तशी वेळच आली नाही. Proud

धन्यवाद विनय. !!

अरे वा, परत एक ए.वे.ए.ठी. का... २ ऑगस्ट... हम्म्म्म... गजरा जावुन ठेवतो... Happy

नमस्कार मंडळी.
९ ऑगस्ट... ९ ऑगस्ट... ९ ऑगस्ट... ९ ऑगस्ट... ९ ऑगस्ट... ९ ऑगस्ट...९ ऑगस्ट...

हा दिवस आमच्या घरी एकमताने ठरला आहे ए. वे. ए. ठि. साठी.
२ ऑगस्ट शक्य नाही.

त्याचे काय आहे, आधी कुणी मुलगी लग्न ठरवते, तिचा साखरपुडा, मग लग्न, मग डोहाळजेवण. मग कुणि पासष्ठ वर्षाचे होतात, कुणाला एकदम आठवण होते, आपण बरेच दिवसात लोकांना बोलावले नाहीये!

या रीतीने आजकाल रिकामा शनिवार रवीवार मिळणे फार कठीण झाले आहे!! हाच दिवस नक्की रिकामा होता, म्हणून मी त्यावर हक्क सांगितला!! तुम्हा सर्वांना जमेल अशी आशा वाटते.
आपला नम्र,
झक्कि
Happy Light 1

माझी यंट्री नोंदवा. Happy
२ मोठी, १ लहान... वेज/नॉनवेज दोन्ही चालेल.

मेनु ठरवायला सुरवात झाली की सांगते काय काय घेउन येऊ शकेन ते.

नमस्कार मंडळी.
चला सुरुवात तर होकारानी झाली. आता एकेकाने यादी वाढवावी. एकूण किती मोठी माणसे, किती लहान मुले, व्हेज का नॉन व्हेज हेहि लिहावे.

मै भी मै भी !! चांगलं डिल मिळालं (आणि ऐनवेळी कामाचा काही झोल झाला नाही) तर नक्की.. !
खायला व्हेज नॉनव्हेज काहीही चालेल.. रंपात इंटरेस्ट नाही.. रूनी ती ग्लुवाईन का काय आणणार असेल तर चव बघेन... लांबून येणार असल्याने फार काही आणू शकणार नाही.. तिथल्या तिथे नैवेद्यापुरतं आईसक्रिम आणू शकेन... Wink

अडमा, तू फक्त पैठण्या पोचत्या करण्याचं बघ . बाकी काही नाही आणलंस तरी चालेल!

माझी पण धरा यंट्री. मी , एक ग्रिल मास्टर अन दोन कच्चीबच्ची! ग्रिल मास्टरचा मूड असेल तर तो काही ना काही प्रकार ग्रिलसाठी घेऊन येईल . ( चिकन, मटण, फिश यापैकीच काहीतरी ,काळजी नसावी )

मी पण येणार...मी व्हेज...

एवेएठी साठी लागणारं सामान (ताटं, वाट्या) वगैरे मी आणतो. शिट्टी एवेएठीच्या वेळचं पुष्कळ राहिलं आहे... शिट्टी एवेएठीला कणसं नेणार होतो, पण आता ती ह्या जीटीजीला आणतो.. Happy

९ ऑगस्ट मला पण चालेल. २ मोठे आणि एक लहान Happy

मेनु ठरला की सांगते काय घेउन येऊ शकेन ते.

मी ही करुन आणायला वेज. सध्यातरी २ मोठी, २ लहान नोंदवा.

<<लांबून येणार असल्याने फार काही आणू शकणार नाही.. >>
काहीहि हरकत नाही. तुमची उपस्थिती हीच महत्वाची. या, खा, प्या, मजा करा.

कुणि काही आणलेच पाहिजे असे मुळीच नाही.

सहजासहजी जमत असेल तरच आणा.

<<एवेएठी साठी लागणारं सामान (ताटं, वाट्या) वगैरे मी आणतो. शिट्टी एवेएठीच्या वेळचं पुष्कळ राहिलं आहे...>>
तू आम्हाला कधी बोलावशील तेंव्हा तुला लागणार नाही का ते???? Happy
आणणार असशील तर ना नाही.

सायोनारा, सिंडरेला, धन्यवाद. पण अहो, लहान मुले नि खायचे पदार्थ आणणे कठीण असते हो. त्यातून अगदी पावभाजीची भाजी सुद्धा सांडते गाडीत! (लहान मुले गाडीत नसली तरी! पूर्वीचा अनुभव हो!) Happy तेंव्हा विचार करा.

रं पा. ची सोय घरी आहेच. ग्रिल आहे. जर कुणाला हरकत नसेल तर फिली बेसबॉल च्या गेमला गेलो असता मिळालेले एप्रनपण आहेत.

जे काय नसेल ते ९ ऑगस्टला सकाळी जाऊन मी आणू शकेनच. फक्त ८ ऑगस्टला सांगून ठेवा. म्हणजे यादी तयार ठेवून लगेच आणता येईल.
आता फक्त हवा छान ठेवण्याची जबाबदारी घ्या.

Happy Light 1

शिट्टी एवेएठीला कणसं नेणार होतो, पण आता ती ह्या जीटीजीला आणतो.. >>>>>>

शिळी कणसं कोणाकोणाला आवडतात? Sad

माझी पण येंट्री...

विनय Happy

तिकिटाचं बघते. फ्रि. फ्ला. मा. वापरायला मिळाले तर नक्की येईन.
आले तर जर्सीतच सामान विकत घेऊन कबाब करीन. आणि झक्कींकडे ए वे ए ठी ला लागेल ती मदत करीन.

मी पण येणार. १ किंवा ४ OK?
मी 'वडापाव' आणेन/करेन.

लालू त्या वड्याला सबसिडाइज्ड बेसन, पाव तेल मिळणार आहे का झक्कींतर्फे?( मला या प्रशनाचं उत्तर माहित आहे पण मी ते देणार नाही Happy )
आमची ४ टाळकी. आपण मेनु ठरवणार आहोत का? त्यावर अवलंबून आहे मी काय आणणार ते. काहीतरी आणेन नक्की Happy

मी हॉट डॉग्ज आणेन.

९ ऑगस्टला मी नाही येऊ शकत. (कारणे : ३,७,१३,१६,१७,१९ आणि २४. :P)
तुम्ही मजा करा. Happy

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

मी पण येणार, ४ मोठे आणी १ लहान. आता सोमवारी सगळा कुटूंबकबिला आला की त्यांना विचारुन मेनु सांगीन.

मी दाढी झाकुन ठेविन तु आलिस तर.. Happy
लिस्ट..
झक्की फॅमली
Anilbhai
Panna (2+1)
Sayonara (2+2)
Adm
Shonoo (2 + 2)
Sachin_B
Cinderella (2 + 1)
Vinay Desai
Mrunmayee
Lalu (1 or 4)
Maitreyee (2+2)
naynishv(४+१)

- अनिलभाई
It's always fun when you connect.

मेरा अनुल्लेख!!!!!! मैने क्या किया????
भाई, पोस्टी आवडल्या नाहीत तर तसं सांगा, डायरेक अनुल्लेख?? Sad

*

नयनीश, भाई बघ तुला नो एन्ट्री सांगतायेत Wink

टाक्या ना. वो क्या हुवा. मै लिस्ट बनवता था तबीच तु मेसेजा. Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

Pages