न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचा वरील लेख वाचला. आरशासमोर उभे राहून जखमेवर मलमपट्टी करतानाचा सीन मलाहि फार आवडला.

त्याचे खईके पान बनारसवाला हेहि गाणे आवडले.
बरं, त्या शोले मधे कुणितरी म्हणतो 'कितने आदमी थे रे?' ते फार प्रसिद्ध आहे. का बरे? काय उत्तर त्याचे? नि पुढे काय संवाद आहे, नि काय होते?

'कितने आदमी थे ?
सरदार, दो
वो दो, और तुम तीन. फिरभी वापस आ गये. क्या समझके आये थे. सरदार खुस होगा. सबासी देगा. सुअर के बच्चों, यहां से पचास पचास कोस दूरतक.....

महावृत्तांत तयार आहे, नेहमीच्या जागेवर .. वाचाल तर वाचाल...

विनय Wink

अरे वा वा!
वाचाल तर वाचाल काय? वाचुच! (काय कमी जास्त लिहीलंय ते कळायला नको?) Proud

कमी काय बी नाय... हां, विनय उशीरा आले म्हणुन वृत्तांत त्यांच्या एंट्री पासुन सुरु होतो ती वेगळी बाब आहे.. Proud

म्हणजे दरवाजा कुणी उघडला? या लालूच्या प्रश्नाचं उत्तर फक्त ती किंवा सन्दीप चित्रे च देऊ शकतात Happy
(म्हणजे तो मी उघडला नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच ) Proud

बंद करा! बंद करा हा बा.फ. Admin, tear down this BB!!

बा. रा. तल्या गप्पा फक्त बा. रा. च्या अनादि अनंत अश्या बा. फ. वरच कराव्या! इतरत्र त्यांची कुठेहि अधिकृत जागा नाही.

बंद करा! बंद करा हा बा.फ. <<< एवढं चिडू नका हो... हवं तर भाईंना सांगू तात्पुरत कुलूप लावायला इकडे. भाई 'झक्की तापून राहीलेत, बघा जमेल तर'... Happy

Admin, tear down this BB!! >> झक्की आज एकदम जोशात दिसतायेत....

मराठीची जोपासना करायचा धडा देताएत ते Happy

>> Admin, tear down this BB!!
ऍडमिनना मराठी कळतं हो. Proud

अहो बाई, जुन्या राष्ट्राध्यक्ष रेगनने बर्लिन वॉल समोर भाषण देताना म्हंटले होते 'Mr. Gorbachev, tear down this wall' तसे मी म्हंटले. त्यातून लवकरच भारतात जायचे असल्याने जरा तिथल्या भाषेत बोलायचा सराव करतो आहे.

जर्सीच्या ए. वे .ए ठि मध्ये कोणीतरी कोपर्‍यातून पुढील काव्यपंक्ती म्हणत होते अशी माझी माहिती आहे.

आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला..
त्यावरि त्यास वृश्चिकदंश झाला..
तशात त्याला झाली भूतबाधा...
लीला काय वर्णूं ,त्या कपीच्या अगाधा...!!!

ख. खो. दे जा.
आणि कोणाला उद्देशून होते तेही म्हणणाराच जाणे... Proud

drunk.jpg

>> Admin, tear down this BB!!
ऍडमिनना मराठी कळतं हो.


>>>>>>

लीला काय वर्णूं ,त्या कपीच्या अगाधा...!!!

CA36J6LW.jpg

समर ए.वे.ए.ठी.
July 2६, 2009 रविवार
स्थळ : झक्कीच घर.

चला तर कोणाकोणाला जमणार नाहीये..
बर्‍याच लोकाना जमणार नसेल तर कधी जमेल ते सांगा, मग तारीख बदलुया..

- अनिलभाई
It's always fun when you connect.

समटाईम इन ऑगस्ट ठेवा ना.. बरं पडेल...

२६ जुलै नको. मला लास्ट विक ऑफ जुलै चालेल किंवा मग सम टाईम/एनी टाईम इन ऑगस्टही हरकत नाही. Proud

झक्की, तुमच्या इथल्या जीटीजीची चर्चा जपानी नाव घेऊन मराठी संकेतस्थळावर इंग्रजीतून करत आहे सायो... Proud Light 1

मला कुठली ही डेट चालेल, आई वडिल असतील , त्यांना पण घेऊन येइन म्हणतो.

सायो, हाच लास्ट विक ऑफ जुलै आहे.

- अनिलभाई
It's always fun when you connect.

भाई,
२७ कशी चालेल? बारामध्ये सोमवारी सुट्टी असते का? की बाराबाहेरच्या लोकांनी येऊ नये यासाठी ही युक्ती? Proud

शोरी.. शोरी.. आश्विनि... २६ बराबर छे... Happy
- अनिलभाई
It's always fun when you connect.

२६ जुलै मला धावेल. Happy
ऑगस्टचा पहिला वीकांतही (१/२) चालेल.

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

मी २५ ला भारतातून येतेय. २६ला लगेच जमणं शक्य वाटत नाही. त्यामुळे ऑगस्टचा पहिला विकेंड जी काय तारीख असेल ती, चालेल.

मला कधीही चालेल. सर्वानुमते तारीख ठरवा Happy

मला पण ऑगस्ट पहिला वीकेन्ड जास्त चालेल.

मला पण ऑगस्ट पहिला वीकेन्ड जास्त चालेल. >>> मोदक मोदक.. लवकर ठरवा... डिल शोधावं लागेल..

डील? आँ! झक्की देणार नाहीत भाडेखर्च? Proud

-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism! Happy

मलापण चालेल ऑगस्ट पहिला आठवडा...

Pages