न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाईंचा महा वृत्तांत येइलच, ते सगळ्याच "देअर" असलेल्या लोकांचा आढावा घेतीलच (किंवा आडवे करतीलच) Wink Proud

एकतर इतका लहान फोटो (टॉर्चर करायला) आणि त्यात म्हणे चेहरे ओळखा. मला तरी त्यातल्या त्यात खालिल चेहरे ओळखता आलेतः
१) पिवळ्या रंगाची शर्ट घातलेली जी मुलगी आहे तिच्या बाजुला करड्या रंगाचा टी शर्ट घातलेली मैत्रेयी. भ. मे. न केलेली Happy

२) हिरव्या रंगाचे कपडे घातलेल्या दोघी जणी मला सायोनारा वाटत आहे Happy

३) पांढरा टी घातलेले समोरच्याच रांगेतले भाई.

४) भाईच्या बाजुला उभी, फिल्मी पोज दिलेली ती शिंडी असावी Happy

५) शेंद्री रंगाचे टी घातलेल्याच्या बाजुला चिंचोळ्या जागेत मान वर करून उभे आहेत ते झक्की साहेब.

६) छोट्या मुलाच्या गळ्यात जिचे हात आहेत ती मृ.

७) गर्द लाल रंगाच्या टी/शर्टातले निराकार. यांनीच भ. मे. केलेला दिसतो मैत्रेयीपेक्षा Happy

८) झक्की आणि निराकारच्या मधे विनय देसाई.

९) समोरचा चष्मा घातलेली आणि हात कोट असलेली व्यक्ती बहुतेक नितिन असावी. चु. भु. दे. घे.

बाकी रुनी सोडता मायबोलिकराचे मित्र आहेत म्हणून मला ते कसे काय ओळखता येतील Happy

मी येणार नव्हते पण मेनूमध्ये आईसक्रीम नाही हे माझ्या शुक्रवारी रात्री लक्षात आले. मग मी रुनीला फोन करुन सांगितले की ते कोणीच आणत नाही आहे तेव्हा मी येते. शनिवारी येण्यापूर्वी रुनीकडे गेले तर तिने चहा भरुन थर्मास, बिस्किटे, वाईनच्या बाटल्या अशी तयारी केलेली होती. 'कारमध्ये पिता येईल' असं म्हणाली तेव्हा मला आनंद झाला पण ते ती फक्त चहाबद्दल बोलत होती असे माझ्या लक्षात आले कारण तिथे जाऊन 'ग्लुवाईन' करण्यासाठी फळांचा अर्क, वाईन घेतली होती म्हणे..

आईसक्रीम एन्जे मधूनच घेतले. मी आणि मैत्रेयी गेलो आणि कोणत्या फ्लेवरवर ग्लुवाईन घालून खाल्ल्यास चांगले लागेल याचा विचार करुन वॅनिला आणि कॅरमल आणि बच्चे कंपनी साठी चॉकलेट फ्लेवरचे आईसक्रीम आणले. ग्लुवाईन घालून आईसक्रीम फारच छान लागले!

>>>१)पिवळ्या रंगाची शर्ट घातलेली जी मुलगी आहे तिच्या बाजुला करड्या रंगाचा टी शर्ट घातलेली मैत्रेयी. भ. मे. न केलेली.
बरोबर.

>>>२) हिरव्या रंगाचे कपडे घातलेल्या दोघी जणी मला सायोनारा वाटत आहे .

उत्तर ५०/५०. का दोघी सायोनारा वाटत आहेत? कारणे द्या Wink

>>>३) पांढरा टी घातलेले समोरच्याच रांगेतले भाई.

एकदम चोकस.
>>>४) भाईच्या बाजुला उभी, फिल्मी पोज दिलेली ती शिंडी असावी
Lol चूक. साफ चूक. सिंडी आयडीवरुन जशी वाटते तशी अज्याबात नाहीये.

>>>५) शेंद्री रंगाचे टी घातलेल्याच्या बाजुला चिंचोळ्या जागेत मान वर करून उभे आहेत ते झक्की साहेब.
हेही चूक.
>>>६) छोट्या मुलाच्या गळ्यात जिचे हात आहेत ती मृ.

चूक.

>>>७) गर्द लाल रंगाच्या टी/शर्टातले निराकार. यांनीच भ. मे. केलेला दिसतो मैत्रेयीपेक्षा

Lol बरोबर.

>>>८) झक्की आणि निराकारच्या मधे विनय देसाई.
चूक.
>>>९) समोरचा चष्मा घातलेली आणि हात कोट असलेली व्यक्ती बहुतेक नितिन असावी

हेही चूक.

सायो, तू उत्तरे सांगण्यापूर्वी परवानगी घेतली आहेस का? Proud

मी उत्तरं कुठे सांगितली? नुसतं चूक, बरोबर म्हटलंय. Proud

तेच गं, काय चूक काय बरोबर कळेना.. इतक्या सूक्ष्म फोटोवरुन लोक आता मलाच ओळखू येत नाहीयेत. आणि फोटो काढला तेव्हा मी बाथरुममध्ये होते, तेव्हा कुठे कोण उभे होते तेही माहित नाही. Proud

लालू, फोटोत तु स्वतःला पण ओळखलं नाहीस असं दिस्तय! Happy

फोटोत तु स्वतःला पण ओळखलं नाहीस असं दिस्तय >>> एवढ्यासाठी भ मे करु नये Proud

मैत्रेयी, डाविकडून बसलेले, डावीकडून उभे, अशी सुरुवात कर बघू. Happy

हे असला गोंधळ होतो बघा... म्हणुन मी आपल गप्प बसुन होतो ओळख परेड होऊस्तर.... बाकी बारा, उसगाव यांच्या पासुन ईतके लांब राहतात बी त्या मुळी अंदाजही सगळे वस्तुस्थिती हुन खुपच लांब होते.. Proud

बी हुश्शार हो तू! तुझे अंदाज वाचून करमणुक झाली , Happy सायो त्याला का उगीच पिळत आहेस! Biggrin
केदार तू पण बी सारखे अंदाज का नाही करत Proud

माझ्या डावीकडुन दोन नंबर किंवा भाईंच्या शेजारची रुनी.

विनयच्या उजवीकडे ldhule

भाईंच्या पाठीमागे lalu

lalu च्या बाजुला cinderella

lalu च्या मागे zakki

zakki च्या मागे नयनिश

नयनिश च्या उजव्या हातास एक माणूस सोडुन संदीप

संदीप च्या बाजुस एक बाई-माणूस सोडुन मुलाच्या गळ्यात हात घातलेल्या आंबोळे वहीणी.

बाकी आता मला माझे डोळ्यांना थोडी विश्रांती घेवुंदेत, किती ते बारीक बारीक डोळे करुन पहावे लागले.

भाईंनी आपल्यासाठी पेपर काढला तसा इतरांसाठी काढता येईल. एम्टी ने व्हिज्युअल राउंड साठी प्रश्न टाकलाच आहे. इतर काही प्रश्न असे-

१. हॉलचा दरवाजा कोणी उघडला असावा?
२. शेवटून दुसरे कोण आले असावे?
३. विनयला उशीर होण्यामागची दोन कारणे काय असावीत?
४. कोणत्या प्रकारची/रन्गाची साडी कोणी कोणास दिली असावी?
५. भाईंचे 'झलक दिखला जा' कोणाला उद्देशून होते? Proud
६. मेनूमधला कोणता पदार्थ सर्वप्रथम संपला असावा?

(उत्तरे इतरत्र, असतील वा नसतील)

मी बी नाही. त्यासम तोच. Happy
तसे मला काही लोक (२००३ वैगरेंच्या जीटीजी) मूळे माहीती आहेत. (इलिनॉयच्या आणि एन जेच्या लोकांनी तेंव्हा उदारमनाने फोटो व नाव टाकले होते) Happy जाने कॅंहा गये वो दिन. Happy

>>>>२. शेवटून दुसरे कोण आले असावे?

तिथे असूनही मला फक्त २,५ ह्याच प्रश्नांचं उत्तर माहित आहे. नं.१ चा अंदाज आहे. Proud

५ चे खरे उत्तर सांग बघु सायो Proud

बर बी अन इतरांना एक उदार क्लु : आलेल्यांपैकी १ आयडी या फोटोत नाहीय!
अजून एक क्लु : फोटो कुणीतरी काढला असणार च ना (टायमर वगैरे लावुन काढला नाही) Proud
हे १००% खरे क्लु आहेत हो Happy

मैत्रेयी, कोण बरं नाहीये फोटोत? मलाच आठवत नाहीये. मी नक्की आले होते का GTG ला?
प्राजक्ता

झलक दिखलाजा झलक दिखलाजा
एक बार आजा आजा आजा आजा आ..s...sजा
दीदार को तरसे आखीयाँ, तू बी.बी. बदले या बदले IDयाँ
झलक दिखलाजा
हे मी न सांगता माझ्या नवर्‍याला पण कळले कोणासाठी आहे ते त्यामुळे मला आता शंका यायला लागलीये की तो खरच माबोवर असतो की काय. Proud

फोटोतले काही मेंबर ड्यु आयने वावरणारी मंडळीं आहेत.

प्राजा, अग एक आयडी लवकर नाही का गेला?

रुनी, अग असेल पण. खूप कंफर्टेबल होता तो गेट टू गेदरात. कोपच्यात घेऊन आयडी कोणता ते विचारुन घे बरं.;)

अग त्याने सांगीतले ना ID parade च्या वेळी तो समीर_ऍडमीन आहे ते. आता मला ते खरच वाटायला लागलय. Proud

कोपच्यात घेऊन आयडी कोणता ते विचारुन घे बरं.>>>>> Lol

मायबोलीकरांच्या फोटोत आहे ना तो? मग नक्कीच माबोकर! रुपाली, त्याच्या आयडीचा शोध घ्यायला इन्व्हेस्टिगेशन सुरु केलंय का? Happy

प्राजक्ता

रूनी, अग त्याला म्हणाव ... खरं सांग

इलिनॉयच्या लोकांनी तेंव्हा उदारमनाने फोटो व नाव टाकले होते >> तो आपला मिडवेस्टर्न मोकळेपणा इथे कुठे येणार??? Happy शोनाहो!!!

अरे कुठाय "महा वृत्तांत" ...

Pages