न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला तर भेटू आता उद्या... जलनेवाले जला करें...

(मायबोलीची डागडूज चालू झाल्यामुळे वॄत्तांत लिहीता येणार नाही.... क्षमस्व).

विनय Happy

अरे वा वा छान सगळी तयारी झाली की....बरं ते भेळ कशी करायची सांगणार का कोणी ? Lol

बापरे, कठिणच दिसतंय त्या भेळेचं Wink

भेळेचं होइल सगळं बरं, खाणार्‍यांचं काय Wink

सिंड्रेला, मला वाटलं तु म्हणते आहेस की "भेळ कोण आणणार आहे?"
प्राजक्ता

चला तर भेटू आता उद्या... जलनेवाले जला करें... >>>

एवढे वेगवेगळे पदार्थ एकाचवेळी खाऊन जीटीजीच्या पब्लिकच्याच पोटात जळजळ होईल... Lol

तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा! चवी चवीने खा नी चर्चा करा. Happy

गॉसीप ला मराठी शब्द चर्चाच आहे ना? Happy

भेळ/कुरकुरे/केळ्याचे वेफर्स - सिन्ड्रेला
मिसळ - नयनिश
रगडा, पापु चे पाणी - प्राज
पापु च्या पुर्‍या - मैत्रेयी
पास्ता - सायो
गुलाब जाम (Deep fried milk balls dipped in sugar syrup) - नयनिश
पेये (सोडा , ज्यूस, पाण्याचे कॅन्स) , जिलेबी - लक्ष्मीकांत
अपेये - झक्की
पावभाजी- विनय
समोसा - अनिलभाई व मृ

केक - हे मुले नक्की खातील म्हणून, आणि काही ऐन वेळी राहिलेले आयटेम्स असतील ते - मैत्रेयी
सन्तिनो, अन जे उरलेत ते : अजून काही स्टार्टर्स, इ. निवडू शकता. किंवा इतर काही चॉइस असेल तर तसे लिहा.
हवे असलेले पार्टी स्प्लाइज:
डिशेस -- संदीप
बाउल्स -- संदीप
चमचे -- संदीप
फोर्क -- संदीप
पेपर नॅपकिन्स -- संदीप
ग्लासेस -- संदीप
४ पार्टी टेबलक्लॉथ्स -- संदीप

झक्की (१), अनिलभाई(१), प्राजक्ता (२ + १/२) , सायोनारा(२+२), संटिनो(१), मैत्रेयी (२+२) , सिंडरेला(२ + १/२), नयनीश (३), विनय (२), लक्ष्मीकांत(४), संदीप(४+१), मृण्मयी (१ किंवा मैत्रिण आली बरोबर तर २), शोनू (१)

पत्ता:
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

- अनिलभाई
It's always fun when you connect.

जी टी जी ला शुभेच्छा.... आणि नेहमी प्रमाणे फर्मास वृत्तांत येऊ द्या....
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो

नमस्कार बाराकर. एव्हाना तुमचा जीटीजी सुरूही झाला असेल.
शुभेच्छा तुम्हा सर्वांना. मस्त मजा करा सारे..:)

--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

धन्यवाद धन्यवाद Happy

साजिर्‍या, एक world clock विकत आण बरे Wink

अरे, खरेच की!
शिंडे, लवकरात लवकर चालू करा अन भरपूर मज्जा करा असं म्हणायचं होतं गं मला! च्च च्च. उगीच अशा टेक्निकल शंका काढून आनंद कमी करू नकोस बरं.. Proud

--
पुढच्या युगांची सर्वच दु:खे; मीही भोगीन म्हणतो,
आजच्या व्यथांना काय करावे; कुणी सांगतच नाही!

>>उगीच अशा टेक्निकल शंका काढून <<

जाउ द्या हो. हे अमेरिकन असेच स्व॑तःला फार टेक्निकल नि लोकांना अडाणी समजतात. नि आता स्लमडॉग मिलियनेयर सिनेमा पाहिल्यावर त्यांना असेच वाटते की भारतातले सगळेच लोक तसे असतात!!

Happy

जीटीजी संपन्न झाला. वॄत्तांत लिहिलच कोणी तरी.
प्राजक्ता

येस्स, बा रा मधलं सगळ्यात जास्त गाजावाजा झालेलं अन सर्वात जास्त 'स्टार आयडीज' नी अटेन्ड केलेलं ए वे ए ठि झक्कास पार पडलं. Happy
मी, विनय, भाई, झक्की, सन्दीप चित्रे, ldhule,गृहिणी, सायो, प्राज,नयनिश, अन स्वाती (सर्प्राइज!)हे बारावासी, न्युयॉर्कातून सन्तिनो ,सिन्ड्रेला कनेक्टिकट्मधून, शोनू फिलीवरून, रुनि, लालू (अजून एक सर्प्राइज!) डीसीहून, अन मृण्मयी पाssssर फ्लोरिडाहून!! शिवाय अजून असंख्य डु आयडीज (असंख्य डु ठिकाणाहून ?!) ...
तर थोडक्यात सांगायचं तर..
रेड कार्पेट वरून एन्ट्री मारून सगळे आयडीज भ मे करून हजर झाले.त्यात पण टिकल्या , मंगळसूत्र वाल्या आयडीज ना खास अटेन्शन (चांगल्या की वाईट अर्थाने ते गुलदस्त्यात ठेवू) मिळालं म्हणे!
भाई, विनय नी म्युझिक, कॅरिओकी ट्रॅक्स, माइक अरेन्जमेन्ट वगैरे जोरदार तयारी केली होती त्यामुळे मायबोलीकरांनीच नव्हे तर त्यांच्या पाहुण्यांनी, अन नॉन मायबोलीकर नवरे/बायकांनीसुद्धा मनसोक्त गाऊन घसा साफ करून घेतला! सन्दीप च्रित्रेंच्या शब्दात, विनय नुस्ती अरेन्जमेन्ट करून थांबले नाहीत तर सत्यनारायणाची पूजा सांगावी तसे सगळ्या गायकंना गाणी 'सांगत' पण होते Biggrin
अशा रितीने आलमाअरा या आद्य चित्रपटातल्या आद्य आयटेम सॉन्ग ने जी सुरुवात झाली ते जंगली,लावण्या, (नाही नाही, जंगली मधली गाणी अन लावण्या असं वाचा ते!.. जंगली लावण्या म्हणे!) हिमेस गीते, कोळीगीते , झक्कींचं मौज्ज हि मौज्जा अशी नुस्ती एक से एक गाणी झाली! Happy
सगळ्या गाण्यांना टाळ्या अन जोरदार शिट्ट्यांच्या "प्रतिक्रिया" मिळाल्या. अन भाईंच्या टोपी अन कोल्हेकुई पोझ सह "झलक दिखला जा" ला "अजून येऊ देत" अशी पण प्रतिक्रिया मिळाली!! Proud
मी अन लालू 'आम जनतेसाठी' फ्री स्टाईल नाचाचा कार्यक्रम ठेवू म्हणत होतो, लालूने कुचीपुडीचा स्टार्ट पण घेतला होता पण क्लबहाउस चा इन्शुरन्स केला नव्हता असं कळलं म्हणून मग बारगळला आमचा तो प्रोग्राम.
सन्दीप अन विनय ला उभ्या उभ्या विनोद करण्याच्या गवो गावा हून सुपार्‍या येतात अशी वदंता असल्यमुळे आपल्या मायबोली ए वे ए ठि साठी ते हा कार्यक्रम नक्की (फुकटात) करतील अशी अपेक्षा होतीच, पण त्यांनी संपूर्ण कार्यक्रम न करता नुस्तीच झलक दाखवली अन लोकांना अर्धेच हसवून पूर्ण कार्यक्रम पहायचा असेल तर तिकिट काढून या असे सांगून मराठी माणूस सुद्धा "बिजनेस" करायला शिकू शकतो हे दाखवून दिलं! Happy Light 1
हो, बाकी दर वेळेप्रमाणे शोनू, स्वातीचं फिरतं वाचनालय होतंच. यावेळी त्यात फिरतं कांचीपुरम की कसल्यातरी साड्यांचं दुकान पण ऍड झाल्यामुळे काही काळ नवर्‍यांत घबराट पसरली होती!त्यातल्या एकाच साडीची अनेकींनी 'घडी मोडली' म्हणे!
बाकी जेवणाची लिस्ट वर आहेच.जोडीला झक्कींच्या कृपेने भरपूर रंपा, आणि रुनि ची खास ग्लु वाइन होती. सगळ्या खाद्यपेयांचा फडशा पाडून उरले सुरले डब्यात प्याक करून नेलं मंडळींनी! अन हो, 'आयस्क्रीम' चा नैवेद्य पण झाला . Happy मग कॉफीबरोबर खमंग गॉसिप्स, वाद, अगम्य, सुमार , बेसुमार कविता, मायबोलीवर ठरू शकणार्‍या, ठरलेल्या, झालेल्या, मोडू शकणार्या लग्नांची चर्चा झाली. शेवटी 'चोरट्या अफूची निर्यात करणार्‍या टोळी'चा फोटो काढला अन जड मनाने (की डोक्याने? रंपाचा परिणाम!), अन बसलेल्या घश्याने निरोप घेऊन पब्लिक पांगलं.
खूप धम्माल आली हे सांगायला नकोच!

मैत्रेयी... मी बा रा वासी आहे कनेक्टीकट नव्हे.... भावना दुखावल्या.... Sad Proud

अरे हो, मी तर जीटीजीच्या आठवणी म्हणून खादाडी आणलीच वर तिथलं ट्रॅशही घरी घेऊन आले. Proud

सायो पार घरापर्यन्त घेऊन गेलात की काय! Happy
नयनिश, टाकलं बाबा तुला बारात!
मी अपला असाच मिनी वृत्तान्त लिहिलाय, अजून पण लिहा कुणातरी! विनय ?
विनय /भाई, त्या माइक चा स्टॅन्ड माझ्याकडे राहिला आहे. केव्हाही पिकप करा.

मैत्रेयी,
मी कनेटीकटचा नाहिये.... मी न्यूयॉर्कचा आहे.... Happy

बर्‍याच लोकांना रिलोकेट केलं तर मी Biggrin

हे घ्या थोड फार आमच्या नजरेतुन पण....
माझा हा पहिलाच जी टी जी ... ओळखीचे (म्हणजे आधी भेटलेले) मेंब्र म्हणाल तर फक्त भाई, मृ आणी सिंड्रेला (ती खुप खुप आधी भेटेलेली आहे, आणी भेटतच राहिलीय Happy ) आत गेल्या गेल्या कोणी तरी म्हंटल (ते कोणी तरी संदीप चित्रे होते ते नंतर कळल) काय आणलय? मी म्हंटल भेळ, "भेळ आली म्हणजे नयनीश आला! ते पुढे निघुन जात म्हणाले. मी म्हंटल "अहो पण तुम्ही कोण" ते मेन्यु कढे झेपावत म्हणाले "ते आता ओळखुन दाखवायच.." . म्हंटल झाली का पंचाईत. जर अंदाज चुकला तर विनय जी टी जी वृत्तात लक्तर काढतील्...कोणी सांगा, त्या पेक्षा गप्प बसणेच उत्तम... आजुन एक दोन लोकांना विचारायचा निष्फळ प्रयत्न करुन मी शेवटी गप्पच बसलो आणी माझी गाडी खादाडी स्टेशन ला वळवली.... एक एक पदार्थ अगदी "जमके" झाले (आता झाले की करुन घेतले हाय काय अन नाय काय ! Proud ) होते बघा.... भेळ, पाणीपुरी, समोसे, कटलेट, रस मलाई, जिलेबी... अहाहाहा...! झक्कास.. झक्कास वरुन आठवलं.. झक्कींना त्यांच्या रेप्युटेशन प्रमाणे मी ताबडतोब बिनचुक ओळखल...... "तुम्ही झक्कीssss" अस म्हणत मी त्यांच्याशी ओळख करुन घेतली.
खादाडी स्टेशन ला "पाव भाजी" ची गाडी आजुन आलेली नव्हती अस दिसलं, म्हणजे देसाई आजुन आलेले नाही हे कळल..... जरा वेळ इकडे तिकडे करता करता भाईंना गपचुप एक दोन आजुन मेंब्रांची ओळख विचारुन घेतेली आणी बोलता झालो... सँटीनो ला ही ओळखलं..... थोड्याच वेळात परत हॉल च दार उघडल आणी संदीप नी आरोळी दिली " अरे रॉबीनहुड आले...." बघतो तर श्री व सौ देसाई एंट्री मारत होते..... मैत्रेयी म्हंटली तस देसाई अगदी गाण्या बजवण्या च्या तयारीतच आले होते... ऑडीयो मिक्सर , वड्डा (मोठ्ठा) स्पीकर.... वगैरे घेवुन...
झालं, खाण वगैरे झाल, भाई, देसाईंनी माईकचा ताबा घेतला.. आणी सगळ पबलीक कोंडाळ करुन बसल ओळख परेड करता....मग भाईंनी मायबोली ची "Who said it" ची टेस्ट सगळ्यांच्या हाती दिली.. ओळख परेड झाली.. सगळ्यांनी आपापल्या आयड्या आणी ड्यु आयड्या सांगितल्या... Wink
मग गाणी झाली... सगळ्यांनीच छान गाणी म्हंटली ( यक मी पन म्हनुन घेतल गर्दीत Proud ) भारी हायलाईट म्हणजे स्वाती यांनी म्हंटलेली सगळीच गाणी आणी भाईंच आपल्या लाडक्या "हिमेस" च "झलक दिखलाजा" च रेंडीशन.... विडीयो शुट केलेल आहेच.. विनय, किंवा भाई टाकतीलच आत लिंक.... हॅट्स ऑफ टु भाई.. सॉलीड टाळ्या पडल्या... मी आणी संदीपनी "ऐका दाजीबा" वर आमची शिट्या फुंकण्याची हौस पुर्ण करुन घेतली.....
मग उभ्या उभ्या विनोदाचा चा टिजर झाला... आता पुर्ण कार्यक्रम बघायची ओढ लागलीय......
मग चहा कॉफी , भाईचे "बंगाली मित्र" विनोद झाले.. झक्की स्टार्ट टु एंड "पंच लाईन्स" टाकत होते..
आणी हो.. सरते शेवटी "ग्रुप फोटो" ही झाला... सगळे जण चीssssssज च्या ऐवेजी.. बीsssssss अस म्हंटले फोटो करता.....
आजुन विस्तारीत वृत्त लिहायचा होता पण बायकोला कंप्युटर हवा असल्या मुळे ईथेच ऍब्रप्ट्ली संपवावा लागतोय.. उद्या कंटीन्यु करीन....

भाईंच्या मायबो'लीकर' बद्दल कोणी लिहीले नाही का? Happy

<<आजुन विस्तारीत वृत्त लिहायचा होता पण बायकोला कंप्युटर हवा असल्या मुळे ईथेच ऍब्रप्ट्ली संपवावा लागतोय.. >>
एकतर बायकोला दुसरा लॅपटॉप आणून द्या, जसा मी दिला तसा, किंवा जरा Priorities नक्की करून घ्या. हे मायबोलीच्या मधे येणारे काय एव्हढे महत्वाचे होते?

'हे कुणि लिहीले' यास्पर्धेत तीन विजेते होते. पण त्या तिघात सौ. स्वाति आंबोळे मा. बो. वरील सर्वात जुन्या सभासद असल्यामुळे 'मायबो लिकर' चे बक्षिस त्यांनाच मिळाले.

मी स्वतः: जरा मागे राहून इतरांची प्रतिक्रिया अजमावत होतो. हळू आवाजात कुजबूज चालू होती.
'माझीच तर कॉपी केली होती',
"मी म्हंटले ना, की या मा.बो. वर जुन्या लोकांची एक 'क्लीक' आहे. नवीन लोकांना मुळीच संधी देत नाहीत."

खरे तसे नाहीये. कारण मी तर सर्वात जुना, नि माझी सर्वात कमी उत्तरे बरोबर आली होती. मला consolation बक्षिस मिळेल असे वाटले होते. पण मागून कळले की भाईंच्या बँकेला अजून बेल आउट चे पैसे मिळाले नसल्याने, ते माझ्या योग्य बक्षिस आणू शकले नाहीत. पैसे मिळाले की ते लगेच मला बक्षीस देणार आहेत.

ए वे ए ठी अवर्णनीय झालं!!!

भ. मे. तल्या बायकांबद्दल एकही ओळ नाही? Proud

सगळ्यांचे वृत्तांत आले की मी सिंडीकडल्या मिनी-ए.वे.ए.ठीचाही आढावा घेईन. हा मिनी GTGदेखिल उत्तम रित्या पार पडला. ह्या कामी चि.इशानची खूप मदत झाली. (तो छान झोपला!!)

वरच्या यादीत सँटीनोतर्फे कॉफी होती हे नमूद करते. केवळ त्यामुळेच मंडळी घरी नीट पोचली. अन्यथा बर्‍याच बामोकरांची 'उभ्या उभ्या विनोदाचा' कार्यख्रम' आडव्या आडव्या बघण्याची वेळ होती. ड्रायव्हिंग तर दूरची गोष्ट!

ती 'वेंकटगिरी ' साडी होती . ( कांचीपुरम इडल्यांचा प्रकार असतो अन 'कांजीवरम' साड्या असतात मला साड्यांच्या प्रकारविषयी लेख लिहावा लागेल आता Happy )

भु. अ. आ. क. टो. चा फोटो कोण टाकतंय? मैत्रेयी?? रुनी?

अरे वा वा, मजा केलेली दिसतेय Happy गेल्या वेळेसचे मासे आणि ह्या वेळेस बरेच काही मिसले म्हणायचे Sad

माणसा तुझी आठवण काढली बर का आम्ही Proud
ए बर ते फोटो कुणी कुणी काढलेत? ईमेल करा बर लवकर!!

हो,हो, घरी आली ट्रॅशबॅग. Happy

वा वा मस्तच झाले ए वे ए ठि. सर्व खानपान एकदम जोरदार होते. विषेश म्हणजे कोणीही काहीही आणायला विसरले नाही Wink परंतु आजकालच्या मुली/बायकांना वागण्याची रीत नसल्यामूळे कार्यक्रम संपत आल्यावर आइस क्रीमचा नैवेद्य दाखवण्यात आला. असो, आइस क्रीम खाता खाता आपली पवारफूल भारतीय संस्कृती अधिक सक्षम कशी करता येइल ह्या विषयावर विचारमंथन झाले.

लाडवाक्कांनी लाडवांसहीत येउन सिद्ध केले की त्या(च) एकमेवाद्वितीय लाडवाक्का आहेत. माझ्या लेकाने लाडवांवर चांगलेच हात साफ करुन घेतले.

ह्या ए वे ए ठि नंतर माझा नवरा मायबो लिकर नसतानाही मायबोलीत किती ट्युन्ड झाला आहे ह्याचा मला साक्षात्कार त्याने विचारलेले दोन प्रश्न ऐकुन झाला-
१. "आप की नजरोने..." येह गाना जिन्होने गाया उनका आयडी क्या है ?
२. एक और बहोत क्युट छोटी बच्ची थी वहा. वोह कौन से आयडी की बेटी है ?

असो, पाककृती माहिती नसतानाही भेळ करुन आणल्याबद्दल माझा विषेश अनुल्लेख करण्यात आला. परंतु मायबो लिकर हे अत्यंत कंपुबाज असल्याने मी ते विषेश मनावर घेतले नाही.

मृ, टाकच गं "आपल्या" GTG चा वृतांत Happy

Pages