डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
काहीतरी चुकतंय! >.
काहीतरी चुकतंय! >.
हे वाक्य लिहीताना पूर्ण विचार
हे वाक्य लिहीताना पूर्ण विचार केलेला दिसत नाही >>>>
पण ज्योक काय आहे नेमका ?
पण ज्योक काय आहे नेमका ?
एक धागा होवून जाऊ दया -न
एक धागा होवून जाऊ दया -
न समजलेले फॉरवर्डस
न समजलेले फॉरवर्डस
न समजलेले फॉरवर्डस

अखंड फोरवर्डच भन्नाट आहे.
अखंड फोरवर्डच भन्नाट आहे. काहीतरी वेगळं. बौद्धिक गुदगुल्या करणारं. वाचताना असं वाटत होतं संपूच नये हो पोस्ट.
मेडूला
>> वैश्विक शक्तीचे ग्रहण करणारा अॅंटिना म्हणजे पाठीचा कणा
वैश्विक शक्तीचे माहित नाही. पण आकाशवाणी केंद्राची शक्ती ग्रहण करणारा अॅंटिना आहे हा. लहानपणी रेडिओच्या जवळ उभारले असता दूरचे स्टेशन अधिक स्पष्ट ऐकायला येत असे.
*आडवे पडून अभ्यास करणाऱ्या
*आडवे पडून अभ्यास करणाऱ्या व्यक्तीची संतती फारशी तल्लख निघत नाही. यासाठी आडवे पडून अध्ययन न करण्याविषयीचा शास्त्रदंडक पूर्वापार पध्दतीने चालत आला आहे.* <<<
>> हे वाक्य लिहीताना पूर्ण
>> हे वाक्य लिहीताना पूर्ण विचार केलेला दिसत नाही
Comment of the day
गटार ( Gutter) नव्हे , गता
गटार ( Gutter) नव्हे , गता+हार !
(जनजागृती साठी)
आपल्या सणांना बदनाम करायचे काम आपणच नेहमी करत असतो. आपल्या कडे आषाढी अमावस्या नंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी(जो आहार गेला आहे ती ) अमावस्या म्हणतात.
गटारी नव्हे गताहारी
गटर हा इंग्रजी शब्द आहे. अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी प्रतिशब्द. इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला.
भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले आहेत. तसेच स्धल काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा प्रगाढ संबंध आहे.
आषाढ हा पूर्वी विशेष करुन तीव्र वर्षावाचा कालावधी असे.
पावसामुळे अंधारलेपण व अन्न अनुपलब्धता हा मोठा अडचणीचा भाग असे.
श्रावण सुरू होण्यापूर्वी व नंतरही श्रावणात कित्येकदा ऊपोषणाची स्थिती असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी ऊपोषणाचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन चार महिन्या साठी लागू केला गेला. (चातुर्मास)
ऊपोषण म्हणजे गताहार - गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या.
आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय.
आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाहीं. आपले सण फक्त आपण आपल्या खऱ्या संस्कृतीने साजरे करू या आणि जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपभ्रंशाने होणारा ऱ्हास थांबवूया.
गटार (Gutter) नव्हे, गताहार
गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते
आहार = भोजन
गत+आहार = गताहार
जसे:-
शाक+आहारी=शाकाहारी
तसे:-
गत+आहारी=गताहारी
गत+आहारी+अमावस्या = गताहारी अमावस्या
या दिवशी दीप पुजन करतात
येत्या रविवारी २८ जुलै २०२२ रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो.
व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे.
पण दीप पूजे ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते.
त्यामुळे अशी आपलीच मानहानी टाळण्यासाठी गटारी हा शब्द वापरू नका ही विनंती आम्ही अनेकांना करीत असतो. तसेच दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात.
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते आहे.
◆ आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया:
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
◆ या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच--
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.
म्हणून विनंती करतो " श्रावण जरूर पाळा, गटारीची कुप्रसिद्धी टाळा "!
( कृपया ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि आपल्या संस्कृतीची जाणीवपूर्वक केली जाणारी कुचेष्टा थांबवा, ही विनंती )
अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा
अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी प्रतिशब्द>>> sewage शब्द आहे त्याला.
गटर म्हणजे, पावसाचे पाणी रुफ वरून वाहून जाण्यासाठी किंवा रस्याच्या कडेने पाणी वाहून जाण्यासाठी केलेली रचना. आता आपल्या इथे गटर इतकी घाण असतात त्याला इंग्रजी बिचारी काय करणार ?
#मॅट्रिक्स_ग्रहण
#मॅट्रिक्स_ग्रहण_उर्जास्थित्यंतर
#डिसेंम्बर21एनर्जी
ऊर्जा स्थित्यंतर किंवा रोज जाणवणारे ऊर्जाबदल हे चढत्या क्रमाने तीव्र होताना जाणवत आहेत.. 2021 मधील नोव्हेंबर महिना हा त्याचा कळस होता असे म्हणता येईल.
आपल्याकडेचे सगळे सण हे वैश्विक high energy portal days आहेत. म्हणजे ज्या दिवशी ब्रह्मांडिय ऊर्जा उच्च असते, त्याच दिवशी आपले सर्व धार्मिक सण नेमलेले आहेत.. जेणेकरून त्या त्या सणांना जे धार्मिक कार्य, रीतिरिवाज, rituals सांगितलेले आहेत, ते आपल्या हातून घडावेत, आणि त्या उच्च ऊर्जेचा लाभ घेता यावा. दिवाळी हा तर आपला सर्वात मोठा सण. दिवाळीपासून अत्यंत उच्च उर्जाबदल रोज चढत्या इंटेनसिटीने जाणवत आहेत.
पण असे असले तरीही यावर्षीच्या दिवाळीमध्ये बऱ्याच लोकांचा अनुभव वेगळा होता. उर्जा च्या विविध ग्रुप द्वारे तसेच ऊर्जा च्या माध्यमातून माझ्याशी वैयक्तिकरित्याही अनेक जण आपले पर्सनल मनोगत शेअर करतात. मला स्वतःलाही रोजचे उर्जाबदल जाणवतात.. त्यावरून हे लिहीत आहे.
अगदी ऐन दिवाळीत देखील हा बऱ्याच जणांचा अनुभव होता, की कसलंही ritual नको, शारीरिक श्रम धावपळ गर्दी गोंधळ, बडेजाव, show off, डामडौल, दिखावा, लोकांना दाखवण्यासाठी केलेले काही नको, स्वतः मध्ये रहावे, एकांत असावा, शांतता असावी, मेडिटेशन ध्यान साधना यात वेळ घालवावा, किंवा फक्त रेस्ट घ्यावी, काहीही करू नये, कुणाशी बोलू नये. अगदी याआधीच्या गणपती नवरात्र इत्यादी सणांच्या सुमारास सुद्धा हा अनुभव अनेक जणांनी शेअर केला आहे.
हे का होत आहे याचे उत्तर शोधण्या आधी थोडंसं मॅट्रिक्स बद्दल जाणून घेऊ.
ब्रम्हांडात म्हणजेच क्वांटम फिल्ड मध्ये कॉन्शसनेसच्या पातळीनुसार विविध मिती किंवा डायमेन्शन्स अस्तित्वात आहेत.
प्रत्येक मितीमध्ये ऊर्जेची विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि ती त्या त्या प्रकारच्या मॅट्रिक्स ला सपोर्ट देते किंवा बळ देते. प्रत्येक वरच्या मिती मध्ये उर्जा, तेथील वातावरण, आणि तेथील दिव्यात्म्यांची आचार-विचार पद्धती, बिलिफ सिस्टीम्स अधिकाधिक शुद्ध होत जातात.. त्या परमेश्वरी स्त्रोताशी अधिकाधिक जोडलेल्या आढळतात.
मिती किंवा डायमेन्शन या विषयावर ऊर्जा वर याआधी एक सविस्तर लेखमाला लिहिलेली आहे, त्याची लिंक खाली देत आहे. जरूर वाचा म्हणजे हा विषय अजून स्पष्ट होईल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2037600969839058&id=18664315...
आपल्या पृथ्वी या ग्रहावर थर्ड डायमेन्शनल रियालिटी म्हणजेच त्रि-मिती आहे. आपण, म्हणजे सर्व पृथ्वीवासीयांची एकत्रित जाणिवेची पातळी तिसऱ्या मीतीमध्ये आहे.
आपल्या विचारांना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी असते हे आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. पृथ्वीसुद्धा आपल्याच प्रमाणे एक सजीव व्यक्तित्व आहे. तिच्या स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्या मधून पृथ्वीसुद्धा एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी बाहेर सोडत असते. आपण या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड द्वारे एकमेकांशी, या पृथ्वीशी तसेच ब्रम्हांडाशी सतत जोडलेलो आणि संवाद साधत असतो.
पृथ्वीवरती पहिला मानव निर्माण झाल्याच्या क्षणापासूनच्या - प्रत्येक मानवाच्या विचार ऊर्जेचे एक अदृश्य जाळे या पृथ्वीच्या वातावरणात तयार झालेले असते, ज्याला मॅट्रिक्स असा इंग्रजी शब्द आहे. याच नावाचा एक इंग्रजी चित्रपट सुद्धा आहे यामध्ये ही संकल्पना सविस्तर उलगडून दाखवलेली आहे.
या मॅट्रिक्स मध्ये किंवा ऊर्जेच्या जाळ्यामध्ये मानवाने आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व रुढी, रितीरीवाज, बीलीफ सिस्टिम्स, पाप-पुण्य - चांगल्या-वाईट इ.कल्पना, समाज - मान्यता, वागण्याचे नियम हे सर्व अंतर्भूत असते. या reality मध्ये राहणारा प्रत्येक सजीव या जाळयात बांधलेला असतो.. आणि त्याला आपण अशाप्रकारे बंदिस्त आहोत याची कल्पनाही नसते. त्याचे जग या मॅट्रिक्स मध्येच मर्यादित राहते आणि या जाळ्याच्या पलीकडेही काही आहे जिथे आपण पोहोचू शकतो याची जाणीव त्याला नसते.
त्रिमिती जगात द्वैत आहे. डार्क आणि लाईट अशा दोन्ही शक्ती येथे कार्यरत आहेत. ज्या समाज मान्यता, रुढी, रीती- रिवाज नीतिनियम, बीलीफ सिस्टिम्स सामान्य माणसाला कंट्रोल आणि मॅनीप्युलेट करण्याच्या उद्देशाने बनवल्या गेल्या आहेत.. त्या - ज्यावेळेस ब्रम्हांडातून उच्च व्हायब्रेशनल उर्जेचा स्त्रोत किंवा उर्जालहरी पृथ्वीवर येतात, त्यावेळेस या बिलिफ सिस्टिम्स, संकल्पना, म्हणजेच हे त्रिमितीचे जाळं(किंवा मॅट्रिक्स) तूटायला किंवा सैल व्हायला सुरुवात होते.
आतापर्यंत गेली कित्येक वर्षे ही प्रोसेस अत्यंत संथ, आपल्या पिढ्यानपिढ्या जातील अशी, दीर्घकाळ चालणारी अशी असायची. उदाहरण द्यायचे झाले तर पूर्वी च्या कित्येक रूढी, पद्धती, जा त्या-त्या काळामध्ये अतिशय योग्य समजल्या जात (उदा. सती जाण्याची पद्धत, स्त्रिशिक्षण बंदी, बालविवाह इ.) त्या कालौघात समाजाने हळूहळू स्वतःहून नाकारल्या, नवीन पद्धती स्वीकारल्या, बदल स्वीकारला, ज्याचा परिणाम म्हणून आज आपण इथपर्यंत आलो आहोत.
आता आपण ऊर्जा स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभे आहोत. 2012 सालापासून अत्यंत हाय-वायब्रेशनल उर्जालहरी ठराविक काळाच्या अंतराने, विशिष्ट पोर्टल डेज मध्ये पृथ्वीवर येत आहेत. 2017 पासून यांचे प्रमाण आणि तीव्रता हळूहळू वाढलेले आहे आणि 2020 पासून या ऊर्जा बदलांनी अत्यंत वेग घेतलेला आहे. या ऊर्जा लहरींचे पृथ्वीच्या वातावरणात होणारे आगमन आता आधुनिक विज्ञानाने देखील नोंद केले आहे.
पृथ्वीवरती कलेक्टिव पातळीवरील त्रिमिती जगाचे हे मॅट्रिक्स/ जाळे हळूहळू तुटत आहे, म्हणजेच अधिकाधिक लोकांना आपण एका विशिष्ट बिलिफ सिस्टीम मध्ये वर्षानुवर्ष जगतोय, परंतु तिच्या बाहेरही अथांग विश्व आहे.. जे आपल्याला अधिक सक्षम करू शकते ,बळ देऊ शकते याची जाणीव होत आहे. अधिकाधिक लोक जागृतीच्या किंवा अवेकनिंग च्या मार्गावर येत आहेत. जुन्या संकल्पना, चुकीच्या बिलिफ सिस्टिम्स, जाचक समाज मान्यता, नियम, पद्धती, ज्या सर्वसामान्यांना कंट्रोल करण्यासाठी भीती, अभाव आणि मॅनिप्युलेशन यावर आधारलेल्या होत्या, त्यातून अधिकाधिक लोक स्वेच्छेने बाहेर पडताना दिसत आहेत. अर्थात हे मॅट्रिक्स चे आवरण जेव्हा दूर होऊ लागते, खूप हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी व्यक्तीला मिळायला लागते तेव्हा या मॅट्रिक्स मधून बाहेर पडताना व्यक्ती एका डिस्कनेक्शन च्या मोडमध्ये जाते. ज्या ज्या गोष्टींशी आपण आधी भौतिक किंवा भावनिक दृष्ट्या जोडलेलो होतो.. आपल्या मनात ज्यांना एक (भावनिक पारंपारिक सांस्कृतिक कौटुंबिक किंवा सामाजिक) स्थान होतं त्या अचानक व्यर्थ वाटू लागतात. आत्तापर्यंत जे जे आपण करत होतो ते का करतोय, असा प्रश्न पडू लागतो. त्रिमिती मधील या मॅट्रिक्सच्या जाळ्याची सर्वसामान्यांवरची पकड ढिली होऊ लागल्याची ही खूण आहे.
पृथ्वीच्या वातावरणात येणाऱ्या उच्च फ्रिक्वेन्सी ऊर्जा लहरींचा परिणाम प्रत्येक मानवाच्या शरीर मन आणि भावनांवरही होत आहे. असं गेली कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्या मानवी शरीर एका विशिष्ट ऊर्जा फ्रिक्वेन्सी वरती आहे. आपल्याला जर अचानक - सतत उच्च फ्रिक्वेन्सीची उर्जा मिळत राहिली, तर ही ऊर्जा ग्रहण करताना आपल्याही नकळत आपले शरीर एका हँग मोडमध्ये जाते. आपल्याला जास्त विश्रांती घ्यावी लागते. खाण्यापिण्याच्या सवयी झोपेचे पॅटर्न्स बदलू शकतात. बऱ्याच जणांना जिथे खूप खोलवर ट्रॉमा किंवा ब्लॉकेजेस आहेत तिथे आजार किंवा दुखणी उद्भवू शकतात. डीप रुटेड भावनिक क्लिअरिंग होऊ शकते, ज्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे असते. अर्थात हे सर्व घडणे ही त्या व्यक्तीच्या हीलिंगची एक संधी असते. तसेच ही अध्यात्मिक विकासाची सुद्धा एक सुसंधी असते.. जी सद्यकाळात प्रत्येकाला उपलब्ध आहे. उर्जा तर्फे 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत ऊर्जा तर्फे रोज "रेकी सेल्फ हिलींग आणि मिनी अट्यूनमेंट आणि ऍक्टिवेशन्स" असा एक उपक्रम घेतला होता, (रेकी देखील अत्यंत हाय वाइब्रेशनल ऊर्जा (प्राणशक्ती)आहे) आणि त्या कालावधीतही हा deep हेअलिंग चा अनुभव जवळजवळ सर्व साधकांनी घेतला होता.
सध्याच्या काळात जे first wave light workers ऊर्जा स्थित्यंतर अनुभवत आहेत, त्यांना भौतिक जगाच्या show off बद्दल detachment चा अनुभव येत आहे, गर्दी नको वाटते, दुसऱ्यांची चांगली-वाईट ऊर्जा जाणवते आणि त्यामुळे एकांत प्रिय वाटू लागतो, आणि आपल्या प्रत्येकात ऊर्जेचे जे शारीरिक मानसिक upgradation अगदी DNA लेव्हल पर्यंत होत आहे, त्यामुळे आपले शरीर आणि मन देखील विश्रांतीची मागणी करत असते.. कुठल्याही कर्मकांडापेक्षा ध्यान, मेडिटेशन , साधना प्रिय वाटू लागते.. शांतता, एकांत, निसर्ग, आपली साधना बरी वाटते.
2020 पेक्षाही 2021 हे वर्ष अधिक वेगवान आणि तीव्र उर्जा बदल घेऊन आलेले आहे.. फक्त 15-15 दिवसांच्या अंतरात आलेल्या 2 मेजर ग्रहणांच्या काळात आपण आहोत. 2022 तर यापुढील पायरीवर प्रत्येकाला घेऊन जाणार आहे असे जाणवत आहे.
येत्या चार डिसेंबरला अमावस्येला होणारे सूर्यग्रहण अत्यंत इंटेन्स आहे, ज्याच्या एनर्जी पोर्टल मध्ये आपण सध्या आहोत. ही एनर्जी खूप अस्थिर आहे. आपल्यातील सर्व शॅडो पार्टस् वर ढवळून काढणारी ही एनर्जी आहे. इतरांच्या वागण्यातून छोट्याशा गोष्टींमुळे आपल्याला ट्रिगर करू शकेल अशी ही एनर्जी आहे.
आपले पूर्ण भौतिक आयुष्य, आयुष्यातील सर्व भाग - नातेसंबंध नोकरी-व्यवसाय आर्थिक स्थैर्य इत्यादी सर्व गोष्टी या, आपल्यामधील ऊर्जेला प्रतिसाद म्हणून आपल्यासमोर आलेल्या असतात. जशी आपली ऊर्जा वाढत आहे, तिचा परिणाम म्हणून आपल्या भौतिक आयुष्यात जिथे ब्लॉकेजेस असतील त्या सर्व भागांमध्ये काही ना काही बदलही घडत जातात. हे बदल प्रथमदर्शनी जरी अप्रिय वाटले तरीही त्यांच्याशी फाईट न करता त्यांचा स्वीकार करायचा असतो.. या जगात प्रत्येक गोष्ट आपल्या सर्वोच्च कल्याणासाठीच घडत आहेत यावर विश्वास ठेवायची आणि त्या प्रत्येक चांगल्या-वाईट बदलाप्रती कृतज्ञ रहाण्याची आवश्यकता असते.
आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग ठेवा. जे घडायला हवय ते या युनिव्हर्स ला सतत सांगा. याकाळात प्रत्येकाने खूप खूप पॉझिटिव्ह राहण्याची गरज आहे. निगेटिव्ह विचारांना जवळ फिरकू देऊ नका.. कारण जेव्हा जेव्हा अशी हाय फ्रिक्वेन्सी एनर्जी आपल्यापर्यंत येते तेव्हा आपल्या आयुष्यात इन्स्टंट manifestation ची सुसंधी देखील घेऊन येते. फक्त आपले विचार आणि आपली ऊर्जा दोन्ही सतत योग्य direction ला हवेत.
कुठलीही गोष्ट धरून ठेऊ नका, सगळं लेट गो करा. दुसऱ्यावर फोकस करण्यात पेक्षा स्वतःवर, स्वतःच्या भविष्यावर सर्व फोकस ठेवा. जे सोडून गेलेत, किंवा जे होऊन गेलंय, ते प्रथम दर्शनी वाईट झालंय, असं जरी वाटलं तरी त्याबद्दल कृतज्ञ रहा.. नवीन चांगल्या गोष्टींकरता आयुष्यात जागा रिकामी केली जातेय असे समजा.
ग्रहण काळ हा त्यातील उच्च फ्रिक्वेन्सी ऊर्जेमुळे अतिशय पोटेन्ट काळ मानला गेलेला आहे. म्हणजेच या काळामध्ये जे बीज रोवाल ते वृक्ष रूपात फलस्वरूप तुमच्याकडे आणले जाईल. आणि म्हणूनच रेकी सेल्फ हीलींग, मेडिटेशन, ध्यान किंवा कुठलीही साधना या काळामध्ये अतिशय फलदायी ठरते.
जर सध्या काळामध्ये तुम्ही ही अशा प्रकारची ऊर्जा, भावनिक अस्थिरता किंवा इतर काही भौतिक बदल आयुष्यात अनुभवत असाल तर जरूर कॉमेंट करा.
जर तुम्हाला असा काहीच अनुभव येत नसेल, किंवा कुठलाच ऊर्जा बदल जाणवत नसेल तर वादविवादात आपली ऊर्जा वाया न घालवता या लेखाकडे दुर्लक्ष करा.
शेअर करताना नाव आणि ऊर्जा च्या फेसबुक पेज लिंकसकट शेअर करा.
शुभ दिवस !!
वैशाली देशपांडे
१.१२.२०२१
https://www.facebook.com/urjaenergyhealing/
वरील पोस्ट कळल्यास मला पण
वरील पोस्ट कळल्यास मला पण समजावून सांगा
मी एक पॅरा वाचून हार मानली
मी एक पॅरा वाचून हार मानली
ऊर्जेचं काही कळलं नाही पण
ऊर्जेचं काही कळलं नाही पण वरवर वाचूनही थकल्यासारखं झालं, या पोस्टमधे वूडू डॉलसारखी ऊर्जा खेचायची शक्ती आहे, नारळपाणी प्यायला जाते.
मनिम्याउ , मी ती पोस्ट वाचून
मनिम्याउ , मी ती पोस्ट वाचून शेल्डन काय रिअॅक्ट करेल ते इमॅजिन करत आहे.
कॉलिंग हर्पा, मोरोबा व मानव
कॉलिंग हर्पा, मोरोबा व मानव फॉर फनी कमेन्टस.
(No subject)
@मानव हहपुवा
@मानव
हहपुवा
मानवदादा जय सनातन धर्म /\
मानवदादा
मला तो माणूस अलेक्झांडर
मला तो माणूस अलेक्झांडर सारखाच वाटला
कायच्या काय पोस्ट आहे ती
कायच्या काय पोस्ट आहे ती मॅट्रिक्सची

मानव
या दोन्ही पोस्ट मिळून एक
या दोन्ही पोस्ट मिळून एक मूव्ही बनू शकतो. वेगळ्याच विश्वातील गोष्टी आहेत या. खालच्या पोस्ट मध्ये आहे तशी पात्रे नी वरच्या पोस्ट मध्ये आहे तशी पार्श्वभूमी. फक्त तो मॉनिटर एलसीडी दाखवा बुवा. हा २००५ वगैरे सालातला फोटो वाटतोय. कदाचित माझाच फोटो असेल प्रोसेस केलेला. एक होता असा फोटो माझा बसलेला. गायब झाला नंतर कुठे
बोलावल्याबद्दल थँक्यू सामो.
बोलावल्याबद्दल थँक्यू सामो. पण त्या मूळ पोस्टपेक्षा फनी लिहायला आमाला पावर नाय.
मानव मामा, पोस्ट भन्नाट आहे!
>>>>>>>पण त्या मूळ
>>>>>>>पण त्या मूळ पोस्टपेक्षा फनी लिहायला आमाला पावर नाय.

कल्पनाच करायची तर वायरलेस् ची
कल्पनाच करायची तर वायरलेस् ची करायला पाहीजे होती
या पोस्टमधे वूडू डॉलसारखी
या पोस्टमधे वूडू डॉलसारखी ऊर्जा खेचायची शक्ती आहे, नारळपाणी प्यायला जाते. >>>
मानव
नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला
नेटाने वाचण्याचा प्रयत्न केला पण या लेखापेक्षा क्रिस्टोफर नोलनचे मुव्हीज् किस झाड कि पत्ती... त्यालाच फॉरवर्ड करा. तो पिक्चर काढेल मग आपल्याला समजेल की लेखिकाबाईंना नक्की काय म्हणायचेय.
सगळे भोंदू फॉरवर्ड निर्माते
सगळे भोंदू फॉरवर्ड निर्माते तूर्तास गाभण काय?
आत्ताच सत्त्या नाडेलाच्या
आत्ताच सत्त्या नाडेलाच्या नावाने एक WA फॉरवर्ड आले. इतके दिवस रतन टाटा, विश्वास नांगरे पाटील वगैरेंच्या नावाने असे फॉरवर्ड्स येत असत आता त्यात सत्त्या नाडेलाची भर पडली.
उद्या न जाणो सुंदर पिचाई किंवा अण्णा हजारेंच्या नावाने आले तर आश्चर्य वाटायला नको.
सुंदर पिचाई आणि अण्णा हजारे
सुंदर पिचाई आणि अण्णा हजारे
लोल
Pages