डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
सर्व जगामध्ये भारतातून
सर्व जगामध्ये भारतातून निर्यात होणारा मालाच दर्जा व याची प्रत याचा एक नंबर (वन नंबर माल) माल वन असा उल्लेख जगातले सर्व व्यापारी करत होते तेच आजचे माल वन>>
काहीच्या काही!
जगातले सगळे व्यापारी इंग्रजीत
जगातले सगळे व्यापारी इंग्रजीत बोलत होते का मालवणीत?

सगळेच
सगळेच
"यंदा मेल्या कित्याक तू
"यंदा मेल्या कित्याक तू अवकाळी इलास ?"
असे एखादा इंग्रज व्यापारी अरबी व्यापाऱ्याला म्हणतोय असे इम्याजिन करतोय मी
तिथे मिठागरे होती आणि तिथे
तिथे मिठागरे होती आणि तिथे नवीन कोणी दिसले मीठ घ्या मीठ घ्या म्हणुन तिथले व्यापारी मागे लागायचे, संस्कृत मधून.
तेव्हा तिथे जाणारे नेहमीचे लोक व्यापारी दिसला की "मा लवण" असे संस्कृत मध्ये ओरडून सांगायचे. (संस्कृत मध्ये मा म्हणजे नको.) त्यामुळे मालवण नाव पडले.
मानवदादा , व्युत्पत्ती
मानवदादा , व्युत्पत्ती
आता मला उगाच लवणासुर, लोणार सरोवर हे आठवतेयं.
माहिती आवडली असेल तर ती शेअर
माहिती आवडली असेल तर ती शेअर करा
परवानगीचीशहानिशा करायची गरज नाहीमानवदादांनी दिलेली
मानवदादांनी दिलेली व्युत्पत्ती आवडली.
*मी डॉ. दिपाली,*
*मी डॉ. दिपाली,*
* *माझे म्हणणे आहे की या कडाक्याच्या थंडीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री १० वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून >>>
मेसेज पेक्षा कमेंट्स हहपुवा आहेत. :लोल:
हे फारच धमाल आहे
हे फारच धमाल आहे
किंवा तिथल्या पुरुषांना खूप वेळ तेलाचे दिवे लावून ठेवायची सवय असेल आणि त्यांच्या बायका आया बहिणी त्यांना ग्रामीण भाषेत ओरडून 'मालव णं' सांगत असतील रोज. म्हणून मालवण
#मीतारेतोडणारम्हणजेतोडणार
ओरडून 'मालव णं' सांगत असतील
ओरडून 'मालव णं' सांगत असतील रोज. म्हणून मालवण >> कमाल!
मुळात मालवण हे नाव इंग्रजांनी दिले आहे. हे पहा: https://en.wikipedia.org/wiki/Great_Malvern
@हर्पा
@हर्पा
माहिती आवडली असेल तर ती शेअर करा परवानगीची शहानिशा करायची गरज नाही >>>> कुण्या मातेचे आशीर्वाद/कुण्या पित्याच्या ओठावरचं हसू ह्या आणि अशा महान कारणांपुढे ह्या गोष्टी कःपदार्थ , म्हणून न वाचताच धडाधड शेअर करतात. सत्कृत्य वाटते हे त्यांना
लिंक रोचक आहे.
आज एक फॉरवर्ड आलं होतं
आज एक फॉरवर्ड आलं होतं स्त्रियांसाठी. लहान मूल एकटं रडत असलेलं दिसलं की आपण त्याच्याजवळ जाऊन आपण विचारपूस करतो. तेव्हा जर तो मुलगा बोलला मला अमुक तमुक ठिकाणी घेऊन चला तर जायचं नाही. त्या ठिकाणी किडन्यापर बसलेले असतात ते आपल्याला पकडतात.
आज एक फॉरवर्ड आलं होतं
आज एक फॉरवर्ड आलं होतं स्त्रियांसाठी. लहान मूल एकटं रडत असलेलं दिसलं की आपण त्याच्याजवळ जाऊन आपण विचारपूस करतो. तेव्हा जर तो मुलगा बोलला मला अमुक तमुक ठिकाणी घेऊन चला तर जायचं नाही. त्या ठिकाणी किडन्यापर बसलेले असतात ते आपल्याला पकडतात.
Submitted by बोकलत on 18 November, 2021 - 20:40
हे काही प्रमाणात खरे असू शकते. काही वर्षांपूर्वी झी मराठी वर सुरु असलेल्या 'अस्मिता' या मालिकेतदेखील असाच प्रसंग दाखवला आहे.
https://www.youtube.com/watch?v=vX6FwpSzCeg
लिंक रोचक आहे. >> हो!
लिंक रोचक आहे. >> हो! त्यावरून लक्षात आलं, मी शेवटी डोळा मारणारी बाहुलीसदृश काहीतरी टाकायला पाहिजे होती. उगाच ही इंग्रजी नावाची चौथी थियरी निघायची नाहीतर!
गेल्या एक दोन दिवसांत
गेल्या एक दोन दिवसांत अनेकांच्या व्हॉटसॅप ग्रूप्स मधून हे आले असेल. फायझरच्या एका व्हीपीला (इव्हीपी) अटक झाली आहे व्हॅक्सीनच्या क्लेम बद्दल. आणि भारताने फायझरला येउ दिले नाही ते किती भारी वगैरे.
ती बातमी इथे आली पहिल्यांदा.
https://vancouvertimes.org/vp-of-pfizer-arrested-after-document-dump/
मग फारसा विचार न करता सोशल मिडिया मधे पब्लिकने व्हायरल केली. ती वाचतानाच काहीतरी गडबड आहे हे जाणवत होते. पुढे चेक केल्यावर त्यांच्या सॅटायर सेक्शन मधली बातमी आहे हे लक्षात आले. तेथील इतर बातम्या पाहिल्या तर लगेच कळेल. आता एनीवे स्नोप वगैरेंनी सुद्धा ते क्लिअर केले आहे.
मुळात यावर पब्लिक विश्वास ठेवते हे फार विनोदी आहे. जणू कही त्यांनी चुकीचे क्लेम्स केले तर अमेरिकन सरकार ते स्वतःच्या एजन्सीमार्फत चेक न करता तसेच स्वीकारून लशींना मान्यता देते
तुम्हाला हे माहिती आहे का ?
तुम्हाला हे माहिती आहे का ?
विंचवी म्हणजे मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे.
ती मुलांना जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते.
••◆ विंचु ◆••
विंचवा विषयी आपल्याला काय माहित आहे?
विंचु डंख मारतो, इतकच ना?
तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणुयात तिला.
श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर विंचवीला भेटलच पाहिजे.
विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिलं होतात,अगदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी.काही तासांनी पिलांना भुक लागते,निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.
तिला पिलांच पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवा विषयी आपल्याला माहित असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांच पोट भरतं. ईथे त्याहुनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भुक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासाविस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिलं तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरुन निमुट बसुन रहाते. आता पिलांची भुक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिलं पोट भरुन तृप्त झालेली असतात, आणि विंचवी.............विंचवी.......
हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!
याला म्हणायचं आईचं आईपण. "आई "मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो कि तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादु आहे कि जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजलं.
या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खुप प्रेम द्या.
मदर्स डे स्पेशल मेसेज दिसतोय.
मदर्स डे स्पेशल मेसेज दिसतोय...
लेओनादो दा विंचवी (लेओनादो =
लेओनादो दा विंचवी (लेओनादो = घ्या ना दोन घास)
(No subject)
एक प्रकारचा टोळ असतो. त्यातली
एक प्रकारचा टोळ असतो. त्यातली मादी, समागमानंतर लगेचच नराचं डोकं खाऊन टाकते. नंतर अंडी घालून तिथून निघून जाते. पिल्लं आपापली वाढतात. (हे खरं आहे. सबब, उगाच प्राण्यांचे आदर्श ठेवू नयेत)
अतिरंजित करून सांगितले आहे.
अतिरंजित करून सांगितले आहे. पण तसं ते अगदीच खोटं नाही. जन्मदात्रीने पिलांना खाणे किंवा पिलांनी तिला खाणे हे काही कीटकांत पण अपवादात्मक परिस्थितीत घडते असे आढळून आले आहे.
Matriphagy, or mother-eating, is found in some species of insects, scorpions, nematode worms and spiders.
(Ref: https://www.sciencenews.org/blog/gory-details/some-animals-eat-their-mom...)
लेओनादो दा विंचवी (लेओनादो =
लेओनादो दा विंचवी (लेओनादो = घ्या ना दोन घास)

(No subject)
*एकदा सहज म्हणून शिवथर घळीत
*एकदा सहज म्हणून शिवथर घळीत गेलो होतो. राहायला नेहेमी मिळते तशी मोफत खोली मिळाली... आज फारसे भाविक नसल्याने व्यवस्थापकांनी अजून कुणाला तरी माझ्याच खोलीत विनंती करून राहावयास पाठविले.*
*एक चांगली जाडजूड वजनदार सॅक घेऊन एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ आत आले ! "हाय ! मी भोपळे !" ओळख करून दिली गेली. मनुष्य पेहेरावावरून मॉडर्न वाटत होता... इतक्यात त्यांनी पँटच्या खिशातून खचाखच भरलेल्या काही इक्विपमेंट्स काढून टेबलावर मांडली... माझी उत्कंठा ताणली गेली.. "हे काय आहे ?" "ही जीपीएस मशीन्स आहेत ... डू यू नो व्हॉट जीपीएस इज ?"*
*माझ्यातला सुप्त शास्त्रज्ञ जागा होऊ लागला ! "येस, आय नो... पण आपण इतकी सारी जीपीएस यंत्रे का वापरता ?" हसत हसत ते म्हणाले "मी जीपीएस व्हेंडर आहे. माझा तो व्यवसायच आहे " असे म्हणत त्यांनी माझ्या उत्कंठित चेहर्यावरचे भाव ओळखत लॅपटॉप बाहेर काढला आणि म्हणाले - "हे जे प्रेझेंटेशन आहे जे मी आता तुम्हाला दाखविणार आहे याचे मी बाहेर किमान ५-५० हजार रुपये घेतो ! पण तुम्ही समर्थ भक्त आहात म्हणून तुम्हाला हे ज्ञान मोफत !" असे म्हणत त्यांनी सुमारे एक तास अतिशय सखोलपणे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएसची इत्थंभूत माहिती मला सांगितली ... ज्ञानात चांगलीच भर पडली ! आता तुम्ही म्हणाल याचा आणि शिवथर घळीचा काय संबंध ? मलाही तोच प्रश्न पडला ! पण खरी गंमत तर पुढे आहे ! वाचत रहा !*
*भोपळे म्हणाले "चलो यंग मॅन, आता थियरी खूप झाली, आता थोडे प्रॅक्टिकल करूयात..." असे म्हणत ती सर्व यंत्रे घेऊन आम्ही बाहेर आलो... उघड्या आकाशाखाली... कारण जीपीएसला ओपन स्काय अर्थात खुले आकाश लागते ! त्या आकाशातील उपग्रह या आपल्या हातातील यंत्राला त्याची पोझिशन, स्थान सांगत असतात ! आता माझी परीक्षा सुरु झाली !*
*भोपळे : बरं, वर पहा, किती डिग्री आकाश खुले आहे ?*
*मी : "९० तरी असेल."*
*भोपळे : "गुड.. मग मला सांगा आता या स्पेस मध्ये साधारण किती सॅटेलाईट्स असतील ?"*
*मी : "तुम्ही मघाशी सांगितलेत त्याप्रमाणे ३० एक तरी असावेत."*
*भोपळे: "करेक्ट! लेट्स व्हेरीफाय !"*
*असे म्हणत त्यांनी जमिनीवर मांडलेली सर्व यंत्रे एक एक करत सुरू केली. कुणी २० उपग्रह पकडले (उपग्रहांची रेंज पकडली), कुणी २४, कुणी २८... नियमानुसार २४ उपग्रह असतील तर एक मीटरपर्यंत अचूक स्थान सांगता येते तसे त्या यंत्रांनी सांगितलेही !*
*भोपळे :" मी जगभरातील अनेक देश फिरलोय... सगळीकडे या यंत्रांचे असेच बिहेवियर असते". आता मात्र मला रहावेना. मी म्हणालो - "भोपळे सर, आपण इतके उच्चशिक्षित आणि शास्त्रसंपन्न आहात तर या इथे खबदाडात, खनाळात कसे काय वाट चुकलात ?"*
*"तीच तर गंमत आहे!" भोपळे हसत हसत म्हणाले - "इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो. म्हणजे सर्वेक्षणच होते .. आणि अचानक एक चमत्कार गवसला !"*
*मी अति उत्सुकतेने ऐकत होतो !*
*"डू यू वाँट टू विटनेस इट ? या माझ्या सोबत !" असे म्हणत ते मला शिवथर घळीच्या तोंडापाशी घेऊन गेले.*
*भोपळे : "वर पहा, किती आकाश आहे ?"*
*मी :" ७० अंश तरी आहेच आहे."*
*भोपळे :" मग किती उपग्रह दिसावेत ?"*
*मी : निदान २०-२५ ?*
*भोपळे : "करेक्ट, नाऊ लेट्स चेक..." असे म्हणत त्यांनी पुन्हा सर्व यंत्रे खुल्या आकाशाखाली मांडून सुरू केली ... आणि काय आश्चर्य ! जर्मन, चायनीज, जपानी, अमेरिकन, ब्रिटिश, कोरियन अशा सर्व बनावटीच्या एकाही यंत्राला एकाही उपग्रहाची रेंज येईना ! चमत्कारच हा ! उपग्रह नजरेच्या टप्प्यात होते ! पण यंत्रांना मात्र सापडत नव्हते. म्हणजे त्या घळीभोवती असे काहीतरी क्षेत्र होते जे उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सीज खाली पोहोचूच देत नव्हते !*
*भोपळे म्हणाले "पूर्ण जग फिरलो परंतु absolutely frequency less अशी केवळ हीच एक जागा पाहिली !" आणि मग मला समर्थांच्या शिवथर घळीचे वर्णन करणा-या ओळी झर्र्कन स्मरल्या !*
*विश्रांती वाटते येथे। यावया पुण्य पाहिजे !! विश्रांती ! शांतता ! कंपनरहित अवस्था ! निर्विचार स्थिती ! अशा स्थितीत केवळ आपल्याच मनातले विचार ऐकू येणार ! त्यात भेसळ होणे नाही ! आणि म्हणूनच समर्थांनी दासबोध लिहायला ही जागा निवडली असणार !*
*म्हणूनच हा ग्रंथ शुद्ध समर्थांचाच आहे !*
*अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या... भोपळेंचे मनापासून आभार मानत घळीत पाय ठेवला... समर्थांच्या पायावर लोटांगण घातले... आज तिथे भासणारी शांतता अधिक खोल होती... अधिक गंभीर होती... अधिक शांत होती ! भ्रांत मनास विश्रांती खरोखरीच वाटत होती !*
*आधुनिक विज्ञानास जे गवसले ते माझ्या या माऊलीला ४०० वर्षांपूर्वीच केवळ अंतःस्थ जाणीवेने समजले होते !*
*दासबोधाचे जन्मस्थान म्हणजे रायगडाजवळील शिवथरची घळ हे समीकरण आता सर्वांनाच माहिती आहे ! परंतु ही अद्भुत घळ आपण प्रत्यक्षात पाहिली आहे का हो ? नसेल ... तर अगदी अवश्य पहा ! आणि सर्वांना सांगा !
!! जय जय रघुवीर समर्थ !!
समर्थांना शिवथरघळीत शांतता
समर्थांना शिवथरघळीत शांतता लाभली, त्यांना ते ठिकाण आवडलं हे खरंच असेल. तिथे जीपीएसच्या उपग्रहांची रेंज मिळत नाही हेही कदाचित खरं असेल. मला माहिती नाही. (ते तसं असेल तर का आहे हे शोधून काढायला हवं) पण समर्थांना हे सतराव्या शतकात समजलं होतं हे कशासाठी?? तेव्हा जीपीएस, कृत्रिम उपग्रह या संकल्पना तरी होत्या का?
समर्थ रामदासांची थोरवी ज्यासाठी आहे, त्यासाठी त्यांचा आदर करूया. उगाच ओढूनताणून काहीही का लिहायचं?
सटायर असेल.
सटायर असेल.
सटायर असेल तर जमलेलं नाहीये.
सटायर असेल तर जमलेलं नाहीये.
नाही सटायर नाही, थोड्या काळा
नाही सटायर नाही, थोड्या काळा पूर्वी बऱ्याच ग्रुप वर येऊन गेलंय.
या fwd चा जुळा भाऊ म्हणचे GM काउंटर वापरून ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी मधून येणारी रेडिएशन टिपली सांगणारे fwd.
कधी आले वाचण्यात तर टाकेन इकडे
मेलं, कोथरूडात ओपन बाल्कनी
मेलं, कोथरूडात ओपन बाल्कनी मध्ये एकही मोबाईल कम्पनी चा सिग्नल येत नाही, यावर फॉरवर्ड ची जिलबी पाडावी काय?
Pages