डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
मांडी घालून झोपू नये असेही
मांडी घालून झोपू नये असेही आहे.
आजी, आई लगेच हटकायच्या.
मलाही असेच काहीतरी कारण
मलाही असेच काहीतरी कारण सांगितलेलं
कारण मी वाटीने आमटी प्यायली तर चालते, ताक चालतं तर पाणी का नाही असा वाद घातलेला
तेव्हा आज्जीने ते अशुभ असतं म्हणून मला गप्प केलेलं
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ
सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील
श्री हरीश साळवे अलर्ट.
काळजीपूर्वक वाचा. खूप महत्वाचा संदेश. कृपया वगळू नका.
*चेतावणी:*
नोव्हेंबरमध्ये राज्यसभेत भाजपला बहुमत मिळेल आणि 25 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान 25 नवीन विधेयके मंजूर होतील ज्यात सर्वात महत्त्वाचे विधेयक लोकसंख्या नियंत्रण विधेयक आहे. लक्षात ठेवा की हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असेल.
मी सर्वांना विनंती करतो की आतापासूनच तयारी करावी. तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा. त्यांना समजावून सांगा की त्या वेळी आपण अतिशय हुशारीने आणि काळजीपूर्वक वागले पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा वेळी आपल्याला आपल्या कुटुंबाचे आणि समाजातील लोकांचे रक्षण करायचे असते. याची पूर्वतयारी न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
ही सर्व विधेयके मंजूर झाल्यावर संपूर्ण देशात एकाच वेळी मोठे गृहयुद्ध सुरू होऊ शकते.
तुमची तयारी असो वा नसो, विरोधकांची तयारी जबरदस्त आहे. त्यांच्या तयारीचे नमुने दिल्ली आणि बंगळुरूमध्ये पाहायला मिळाले आहेत.
त्याचवेळी चीन आणि पाकिस्तानसोबत युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. लष्कर सीमेवर व्यस्त असेल, याचा अर्थ ते देशाच्या आत काहीही करण्याच्या स्थितीत नसेल.
त्यामुळे आपल्या ऐक्याचा आणि समजुतीचा फायदा आहे.
* काय करायचं? ,
तुमच्या 8-10 शेजाऱ्यांसोबत समाजात कुठेतरी बसण्यासाठी एक दिवस आणि वेळ सेट करा. मग पुढच्या दोन दिवसात अजून 8-10 लोकांना गोळा करा आणि त्यांना सांगा की आम्ही दर आठवड्याला इथे बसू. ही प्रक्रिया दोन किंवा तीन वेळा पुनरावृत्ती केल्याने, तुमचा संपूर्ण रस्ता साप्ताहिक बैठकीत समाविष्ट केला जाईल.
जर ते मंदिरात जमत असतील, तर पूजेनंतर त्यांच्याशी धर्म, जातिनिर्मूलन, स्वच्छता, सहकार, आरोग्य, समाज, शहर, देश याविषयी बोला की, या सुरक्षा वर्तुळात यावेळी कोणीही जिहाद करू शकत नाही. आत येऊ नका
प्रसारित करा, प्रचार करा, कठोर परिश्रम करा जेणेकरून प्रत्येक रस्त्यावर चांगली सुरक्षा व्यवस्था असेल आणि प्रत्येक गल्लीतील प्रत्येक मंदिर या घोषणेने देशभर गुंजेल. बोलणे प्रत्येक गल्लीत हिंदू एकता.
*गणिताने समजून घ्या*
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 30 दशलक्ष वरून 300 दशलक्ष झाली आहे, तर पुढील 70 वर्षात (2090) आपल्या मुलाचे वय किती असेल? दहा वेळा विचार करा मग ३०० कोटी जास्त....*
1-आमच्या मालमत्तेचे काय होईल?
२-आमच्या व्यवसायाचे काय होईल?
3-आमच्या कामाचे काय?
4-आमच्या मंदिरांचे काय होणार?
5-आमच्या मुलीला शाळेत जाताना काय होईल?
6-आपल्या संविधानाचे काय होणार?
7-आमच्या आरक्षणाचे काय होणार?
8-आमच्या नेतृत्वाचे काय होणार?
9-आमच्या जातीतील लोकांचे काय होणार?
*मग आपली स्वार्थी बुद्धी काही तोडगा काढू शकेल का?* अन्यथा काश्मिरी हिंदूंचे जे झाले तेच होईल.
*त्याला अजून भारतात आश्रय घ्यावा लागला* तुमच्याकडे काय असेल. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षेसाठी CAA, NRC, NPR आणि लोकसंख्या नियंत्रण विधेयक अनिवार्य आहे. * https://www.facebook.com/vinod.shukla.184881
* मी तयार आहे आणि मी पुढील 5 गट जोडत आहे आणि मी त्या पाच लोकांना पुढील 5 लोकांना देखील जोडण्याचा प्रयत्न करेन.
*फक्त पाच ग्रुप फॉरवर्ड करा आणि पाच ग्रुप्स फॉरवर्ड करण्याचा आग्रह जय हिंद*
* recd म्हणून
:हाहा:... काही!!
अगदीच भोंदू फॉरवर्ड नावाला साजेसे...!!
महत्वाची माहिती
महत्वाची माहिती
गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताचा बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके बनवले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूपेक्षा विषारी आहेत. याशिवाय, भारतात, डोळ्यांच्या आजारांच्या प्रसारासाठी विशेष प्रकाश सजावटीचे दिवे देखील तयार केले जात आहेत. ज्यामुळे अंधत्व येते. पारा मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे, कृपया या दिवाळीत जागरूक रहा आणि या चायनीज उत्पादनांचा वापर करू नका. हा संदेश सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवा.
जय हिंद
विश्वजित मुखर्जी,
वरिष्ठ तपास अधिकारी,
गृह मंत्रालय,
भारत सरकार, (CG)
जसे तुम्हाला प्राप्त होईल तसे पुढे पाठवा
2017 पासून फिरतोय हा मेसेज
2017 पासून फिरतोय हा मेसेज
आतापर्यंत चायना ला यश मिळालं नाही म्हणजेच चायनीज माल त्यांची इमेज सिद्ध करत आहेत
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 30 दशलक्ष वरून 300 दशलक्ष झाली आहे, तर पुढील 70 वर्षात (2090) आपल्या मुलाचे वय किती असेल? दहा वेळा विचार करा मग ३०० कोटी जास्त....*>>>>
हे काय गणित आहे
पुढच्या 70 वर्षात आपल्या मुलाचे वय आता आहे त्यात 70 जोडल्यावर जितके येईल तितकेच असेल ना? का मुसलमान लोकसंख्येच्या प्रमाणात वय पण बदलत जाणारे
पुढील ७० वर्षात जी आपल्याला
पुढील ७० वर्षात जी आपल्याला मुले होणार त्यांची वय काय असतील अश्या अर्थाने असावे ते वाक्य
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 30 दशलक्ष वरून 300 दशलक्ष झाली आहे, तर पुढील 70 वर्षात (2090) आपल्या मुलाचे वय किती असेल? दहा वेळा विचार करा मग ३०० कोटी जास्त....*>>>>
हे काय गणित आहे Happy
पुढच्या 70 वर्षात आपल्या मुलाचे वय आता आहे त्यात 70 जोडल्यावर जितके येईल तितकेच असेल ना? का मुसलमान लोकसंख्येच्या प्रमाणात वय पण बदलत जाणारे Happy>>>>
अहो, त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा की, आता तुमचा मुलगा समजा ५ वर्षांचा आहे तर सत्तर वर्षांनी तो ७५ वर्षांचा होईल. तेव्हा त्या म्हातारपणात त्याला शांततेने जीवन जगता येईल का? कारण ** ची संख्या वाढत गेली तर समाजात अशांतता, गुन्हेगारी, दहशतवाद आदी पसरत जाणार.
हे असले मेसेजेस भक्तीभावाने
हे असले मेसेजेस भक्तीभावाने फॉर्वर्ड करणाऱ्या **ची संख्या वाढते आहे.
त्यांच्यामुळे अविश्वास , अशांतता वाढत आहे आणि देशाचा सरासरी बुद्ध्यांक खाली घसरतो आहे
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात
स्वातंत्र्याच्या 73 वर्षात भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 30 दशलक्ष वरून 300 दशलक्ष झाली आहे, तर पुढील 70 वर्षात (2090) आपल्या मुलाचे वय किती असेल? दहा वेळा विचार करा मग ३०० कोटी जास्त >>>
एक लोकसंख्याशास्त्रज्ञ म्हणून सांगतो की ही सगळी गृहीतक चुकीची आहेत, काहीही अभ्यास न करता केवळ सरधोपट विधान केली जातात.
ह्यावरच आधारित देशातील एका महत्त्वाच्या राज्यात लोकसंख्या धोरण २०२१ आणले गेले. कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या धोरणाला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील असलेल्या आमच्या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थान, देवनार (गोवंडी) ह्या अभिमत विद्यापीठातील अनेक प्राध्यापकांनी विरोध केला, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. किंबहुना, (२०१४ नंतर) अनेक प्राध्यापकांना मंत्रालयातून सरकारी धोरण, कायदे व कानून विरुद्ध काहीही बोलू नका, असे छुप्या मार्गाने संदेश दिल्या जात आहेत.
>> तुमच्या 8-10 शेजाऱ्यांसोबत
>> तुमच्या 8-10 शेजाऱ्यांसोबत समाजात कुठेतरी बसण्यासाठी एक दिवस आणि वेळ सेट करा. मग पुढच्या दोन दिवसात अजून 8-10 लोकांना गोळा करा आणि त्यांना सांगा की आम्ही दर आठवड्याला इथे बसू. ही प्रक्रिया दोन किंवा तीन वेळा पुनरावृत्ती केल्याने, तुमचा संपूर्ण रस्ता साप्ताहिक बैठकीत समाविष्ट केला जाईल.
असे मेसेज वाचून खरोखर याप्रमाणे त्याची अंमलबजावणी कोणी करत असतील काय?
हा मेसेज (लोकसंख्या वगैरे)
हा मेसेज (लोकसंख्या वगैरे) 'भोंदू' म्हणण्यापेक्षा 'अपप्रचार' म्हणायला हवा. म्हणजे खोटंच, पण वेगळं.
अपप्रचार या कॅटेगरीतले विशेषतः राजकीय मेसेजेस कित्येक फिरत असतात.
> हा मेसेज (लोकसंख्या वगैरे)
> हा मेसेज (लोकसंख्या वगैरे) 'भोंदू' म्हणण्यापेक्षा 'अपप्रचार' म्हणायला हवा. म्हणजे खोटंच, पण वेगळं.
हो
अपप्रचार +१
अपप्रचार +१
ईनजनरलच आपल्याकडे सगळं
ईनजनरलच आपल्याकडे सगळं 'सिव्हील अनरेस्ट' सुरू आहे, हे अत्यंत काळजी करण्यासारखं व भारतमातेला आतून पूर्णपणे पोखरून टाकणारं आहे. विषारी पोस्टींनी /अजेन्ड्यांनी भरलेला सो मि बघून व त्यांना वाह-वाह करणारी जनता बघून भयंकर अस्वस्थ/हतबल वाटते. अंधपणे फॉरवर्ड करणारी लोक रोबॉट झाली आहेत, त्यांनाही कळत नाहीयेत हे मॅनिप्यूलेशन /माईन्डगेम्स ! एखादी अनैतिक गोष्ट हजारजणांनी केली की समाजाला ती नैतिकदृष्ट्या योग्य व स्विकारार्ह वाटायला लागते, जे खूप भीतीदायक आहे.
हा प्रतिसाद कुणाला उद्देशून नाही, कायप्पा बघून अधूनमधून येणारे विचार आहेत.
>> Submitted by अस्मिता. on
>> Submitted by अस्मिता. on 29 September, 2022 - 20:41
+१
पूर्ण पोस्ट सहमत.
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व भारतमातेला आतून पूर्णपणे पोखरून टाकणारं आहे.
+१११
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व भारतमातेला आतून पूर्णपणे पोखरून टाकणारं आहे. >>> +१
अंधपणे फॉरवर्ड करणारी लोक
अंधपणे फॉरवर्ड करणारी लोक रोबॉट झाली आहेत >> अगदी!! फॉर्वर्ड करण्यापूर्वी विचार करायला हवा.
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व
हे अत्यंत काळजी करण्यासारखं व भारतमातेला आतून पूर्णपणे पोखरून टाकणारं आहे. >>> +१
शिवाय एखाद्याला दाखवून दिले तरी 'मला जसे आले तसेच मी पाठवले' हा बचाव असतो !
ही चर्चा वाढवायची इच्छा नाही
ही चर्चा वाढवायची इच्छा नाही खरंतर, पण तरी खूप दिवसांपासून असलेला प्रश्न इथेच विचारते.
मी सेक्युलर आहे, हिंदुत्ववादी नाही - म्हणजे मला असं वाटतं , कारण २०१४ नंतरच्या बऱ्याच गोष्टी डोक्यात जातात. पण कधी पडताळून पाहण्याची वेळ आली नाही.
असो. काही लोकांची संख्या वाढत चालली आहे , हे एका बाजूने ओरडणे आणि संख्याशास्त्र तसा कोणताही पुरावा देत नाही, हे दुसऱ्या बाजूने काही वर्षे ऐकत आहे.
माझा परीघ खूप छोटा आहे. मी पाच वर्षांची असल्यापासून एकाच एरियामध्ये राहते, त्यामुळे दुकानदार, त्यांची मुले, परिसर, वस्त्या हे सगळं माहीत आहे.
मी कोविड आणि त्याआधी काही कारणाने बराच काळ घरातच घालवला. या वर्षांत बाहेर पडले आहे - ट्रीप्स किंवा दुकानातून खरेदी गेल्या काही महिन्यात , जवळपास ४ वर्षांनंतर.
पण मला खरंच काही लोकांची संख्या वाढत आहे असं दिसतंय. म्हणजे - प्लंबर, इलेक्टरीशिअन, ड्रायव्हर, पार्लर, डॉक्टर अचानक सगळे नॉन हिंदू येतात. कोकणात, कोल्हापूरकडे फिरायला गेलो, तरी नजरेला येतील एवढे लोक.
पुण्यात कॅम्पमध्ये मी कायम हाय सोसायटी , मेकअप केलेल्या बाया पहिल्या, पण आजकाल बुरखा किंवा हिजाब खूप दिसतात.
असं लिहिणं योग्य नाही, हे माहीत आहे. पण वर ठामपणे कोणाचीही संख्या वाढत नाही असे लिहिलंय म्हणून प्रश्न पडला.
यातही ही संख्या वाढल्याने खूप काही निगेटिव्ह परिणाम होईल अशा मताची मी नाही, (ज्यादिवशी ते वाटायला लागेल त्यावेळी आपण अंध हिंदुत्ववादी नक्की, ही स्वतःची स्वतःसाठी टेस्ट आहे. मी तिथपर्यंत पोचणार नाही, एवढी खात्री आहे.)
पण तरीही ती संख्या नक्की वाढत नाहीये, हे ठाम नक्की कसं ठरवलं हे जाणून घ्यायला आवडेल.
>>हे असले मेसेजेस भक्तीभावाने
>>हे असले मेसेजेस भक्तीभावाने फॉर्वर्ड करणाऱ्या **ची संख्या वाढते आहे.
त्यांच्यामुळे अविश्वास , अशांतता वाढत आहे आणि देशाचा सरासरी बुद्ध्यांक खाली घसरतो आहे >> +१
पीनी, लोकांचा धर्म लक्षात
पीनी, लोकांचा धर्म लक्षात येणं आधी होतं नसेल आणि आता होऊ लागलं असेल.
अल्पसंख्यंकांत आपली धार्मिक ओळख ठळकपणे दाखवण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
Submitted by पीनी on 29
Submitted by पीनी on 29 September, 2022 - 21:58>>>> +११११११११११११११
अल्पसंख्यंकांत आपली धार्मिक ओळख ठळकपणे दाखवण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
Submitted by भरत. on 29 September, 2022 - 22:43
इतके तरी मान्य केलेत, हेही नसे थोडके!!!!
पिनी म्हणतात तसे बदल दिसू
पिनी म्हणतात तसे बदल दिसू लागले आहे
मी फिरायला जातो तिथं कॅनाल च्या पलीकडे झोपडपट्टी आहे सगळी
खूप आधीपासूनच आहे आणि कधी काही तिथं वेगळं जाणवलं नाही
पण गेल्या काही वर्षात तिथं आता संध्याकाळी अजान ऐकू येते
मोठ्याने आरत्या आणि देवाची भजने ऐकू येतात
वेगवेगळ्या वेळी भगवे झेंडे आणि हिरवे झेंडे फडकताना दिसतात
म्हणजे झोपडपट्टी चे राहणीमान आहे तसेच आहे पण धार्मिक ध्रुवीकरण तटस्थपणे पाहिलं तर दिसत आहे
कुठल्या झोपड्या यांच्या आणि कुठल्या त्यांच्या हे अगदी स्पष्टपणे कळेल असं
वरील विष यांबद्दल अस्वस्थ
वरील विष यांबद्दल अस्वस्थ असलेल्यांनी कृपया न्युज लाँड्री.कोम साइट उघडून बघा. हे लोक्स एकही जाहिरात घेत नाहीत. केवळ वर्गणीदारां वर अवलंबून आहेत. अगदी कमी स्वरुपाच्या मेंबरशिप आहेत. पण निदान एक बॅलन्स्ड आउट्लु क तयार व्हायला मदत होते. वर्गणी भरून पॉडकास्ट ऐकता येतात. मी गेम चेंजर मेंबर आहे व हे लिहिल्याने मला काहीही फायदा नाही.
https://www.newslaundry.com/
स्पॉटिफाय वरही भाजापॉड पॉडकास्ट चांगला आहे.
या दिवाळीसाठी तळण तळण्याच्या
या दिवाळीसाठी तळण तळण्याच्या योग्य वेळा
16 ऑक्टोबर: दुपारी 1.30 ते 4.30
17 Oct : दुपारी 2.15 pm to 5.15 pm
18 Oct : दुपारी 3 pm to 6 pm
19 Oct : दुपारी 3.45 pm to 6.45 pm
20 Oct : सायंकाळी 4.30 pm to 7.30 pm
21 Oct : सायंकाळी 5.15pm to 8.15 pm
22 Oct : सायंकाळी 6 pm to 9 pm
23 Oct : सायंकाळी 6.45 pm to 9.45 pm
24 Oct : सायंकाळी 7.30 pm to 10.30 pm
25 Oct : रात्री 8.15 pm to 11.15 pm
अधिक माहितीसाठी खालील लेख व विश्लेषण वाचा..
भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?
उत्तर: हो
१) एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.
२) जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.
३) भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे---- वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत.
कालनिर्णयवर आजची तिथी बघावी ,उदारणार्थ आजची कृ. २ आहे , तिथी कृ. २ × ३/४ = १.५ , आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.
४) जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.
५) वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण, विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal), Rotational, Vibrational and Translational अशा मोशन व फोर्सेस असतात. ह्या भाषेत सांगितलं की अमेरिका, युरोपाचे तळवे चाटणार्या लोकांना लगेच कळतं, पण हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात.
६) स्पष्टीकरण: -- भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त अँक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले हार्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मुठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभु शकते.
७) तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.
८) याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.
---त्यामुळे पोस्ट मधली 'तळण तळणे व भरती ओहोटी' ही माहिती अतिशय परिपूर्ण व शास्त्रीय असून त्यात भयानक, खोटे, धार्मिक, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे लक्षात ठेवा.
पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरिरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहोटीचा परिणाम होतो हे वाचून धन्य झालो.
कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा लेख.
जगातला कोणताही आरोग्यशास्त्र तुलनात्मकरीत्या भारतीय आरोग्यशास्त्राच्या जवळपास ही नाही असे आमचे महान अभ्यासपूर्ण भारतीय आरोग्यशास्त्र तसेच धन्य ते भारतीय धन्वंतरी ज्यांनी भारतीय आरोग्य शास्त्रास श्रीमंत केले नी करत आहात.
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या
आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्रुपवर ही पोस्ट गांभीर्याने काही दिवसांपूर्वी आली. त्यावर एक दोघांनी "धन्यवाद, उपयुक्त माहिती." असे गंभीर प्रतिसादही दिले.
ही पोस्ट वाचून ती गांभीर्याने घेणारे आणि न घेणारे दोन्हीही धन्य होतात हे याचे वैशिष्ट्य आहे.
उठा उठा दिवाळी आली भरती
उठा उठा दिवाळी आली भरती ओहोटी बघण्याची वेळ झाली!
Pages