डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
हा प्रश्ण विद्यार्थी मॅथ
हा प्रश्ण विद्यार्थी मॅथ टिचर ला का विचारतो? आणी hats off to marriage rituals पाहीजे ना? की मॅथ ने ओढुन ताणुन फेरे फिट केलेत म्हणुन त्याला हॅट्स ऑफ केलयं ?
हपा, इथे मुळात भोंदू पोस्ट्स
हपा, इथे मुळात भोंदू पोस्ट्स लोकांच्या नजरेस आणुन देताना धमाल येतेय अन तुम्ही अजून नव्या भोंदू पोस्ट्स इथेच जन्माला काय घालताय!
मराठी लग्नात सप्तपदी असते. सात फेरे नाहीत.
सप्त पदी सरळ रेषेत असते
सप्त पदी सरळ रेषेत असते
आणि
ती रेघ म्हणजेच वर्तुळाचा व्यास
असे करून पुन्हा ३६०° चा संबध जोडायला सुद्धा मागेपुढे पाहणार नाहीत अशी मंडळी
ती सरळ रेष पृथ्वीतलावर असते.
ती सरळ रेष पृथ्वीतलावर असते. लांबून पाहिल्यास आपण पृथ्वीच्या गोल पृष्ठभागावर चालत असतो. त्यामुळे ३६० अंश लॉजिक बरोबरच आहे. हे तुम्हाला माहीत नाही, पण प्राचीन भारतीयांना माहीत होते.
आणि पृथ्वी थोड़ी कललेली असते
आणि पृथ्वी थोड़ी कललेली असते कारण वरा कडचे पारडे थोड़े जड़ असते म्हणून
किंवा भारताच्या भुगर्भात सप्त पाताल लोक असल्याने संपूर्ण जगाचा तोल भारताच्या दिशेने कलला जातो ह्यातच सनातन धर्माचे सामर्थ्य अधोरेखित होते वगैरे वगैरे
(No subject)
7 फेरे का?
7 फेरे का?
लग्नानंतर 7 वर्षात नव्याची नवलाई ओसरून लोक आठवड्यात 7 ही दिवस सर्व मुद्दे 360 अंश फिरून फिरून सर्व वाद 'तुझे नातेवाईक माझे नातेवाईक' वर आणतात म्हणून
17 ने पण भाग जात नाही.
17 ने पण भाग जात नाही.
17 दिवस हनिमून, पृथ्वी प्रदक्षिणा घालून.
कमी रसिक असेल तर ७ दिवसात आटपा.
ते पण नाय तर मंग आहेच सात फेरे घाला घरीच रहा अन् एखाद्या विकेंडला लोणावळा नाही तर माथेरानला जा आत्याला सोबत घेऊन.
कायच्या काय! उद्या म्हणतील की
कायच्या काय! उद्या म्हणतील की ७ फेर्यांच्या वेळी सनईवर वाजणार्या भारतीय संगीतात २२ श्रुती असतात आणि २२/७ हा पाय असतो (अचूक नाही, पण असल्या पोष्टींमध्ये अचूकता कसली शोधता?). वर्तुळाचा परीघ = पाय गुणिले व्यास. आणि महाभारताबद्दल म्हटलंय 'व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम्', म्हणजे व्यासाने सर्व जग कव्हर केले. अर्थात जग गोल, त्याच्या गणितात पाय हे गुणोत्तर वापरावे लागते, हे सर्व भारतीयांना पुरातनकाळापासून माहीत होते आणि त्याची शिकवण आपल्याकडे लग्नात दिली जाते! धन्य भारतीय संस्कृती!!>>>> हा हा हा मस्त!!!!!
भारीच.
भारीच.
Bharich
Bharich
हपा पायडी .. आपलं पाय दे
हपा
पायडी .. आपलं पाय दे तुझे!
हपा सॉलिड!!!
हपा
सॉलिड!!! 
हपा
हपा
ए कोणीतरी 'भोंदू फॉरवर्ड तयार करा' म्हणून धागा काढा कि ! एंटरटेन्मेंटचे अमर्यादित पोटेन्शियल आहे !
>> 'भोंदू फॉरवर्ड तयार करा'
>> 'भोंदू फॉरवर्ड तयार करा' म्हणून धागा काढा
+१ विरंगुळा मध्ये काढा. मजा येईल.
हा काही वर्षांपूर्वी आला होता
हा काही वर्षांपूर्वी आला होता. बहुदा पु. ना. ओक यांच्या नावे.
Vatican City चे नाव वाटिका (बाग) वरून आले आहे. त्या शहरात सध्याही अनेक उद्याने आहेत ज्यावरून याची सत्यता पटते.
सौदी अरेबियाचे मूळ नाव स्वस्ति अर्वस्थान आहे. अर्व म्हणजे घोडा.
Spectacles हा शब्द स्पष्टकरस (स्पष्ट करून दाखवणारा) यावरून आला आहे.
असे अजून बरंच काय काय होतं. सगळं आता आठवत नाही पण एकूण सगळ्याची व्युपत्ती हिंदू संस्कृती मधून झाली आहे असा सूर होता.
वैदिक क्षत्रियांचे
वैदिक क्षत्रियांचे विश्वसाम्राज्य
रा. रा. पु. ना. ओक हे एक सनातन वैदिक धर्मावर असीम श्रद्धा असलेले इतिहासाचे अभ्यासक होते. आपल्या या अभ्यासातून त्यांनी 'भारतीय इतिहाससंशोधनातील घोडचुका' मांडल्या आहेत. त्यांच्या मते, "कौरवपांडवयुद्धापर्यंत जगात सर्वत्र वैदिक क्षत्रियांचे साम्राज्य होते. त्या साम्राज्यात संस्कृत हीच सर्व मानवांची भाषा होती. चार-पाच हजार वर्षांपूर्वी सिरिया, असिरिया, बाबिलोनिया, मेसोपोटेमिया ही प्राचीन राष्ट्रे होती. परंतु सुर व असुरांत वैर होते. वैदिक साम्राज्य मोडल्यानंतर सुरांचे राज्य सुरिय (Syria) व असुरांचे Assyria झाले." त्यांच्या मते बाबिलोनीया म्हणजे बाहुबलनीय व मेसोपोटेमिया म्हणजे महिषीपट्टनीयम = राणिपूर. "वैदिक संस्कृती लोप पावत केवळ सिंधु प्रदेशातच टिकून राहिली म्हणून तिचे नाव हिंदू. वैदिक विश्वसाम्राज्याची भाषा संस्कृत असल्याने प्राचीन काळी देशांची, सागरांची वगैरे नावे संस्कृतच होती." त्या नावांचा नंतर अपभ्रंश झाला. "उदा. सिंधुस्थानचे हिंदुस्थान, त्याप्रमाणे अर्बस्थान, तुर्गस्थान, कझाकस्थान, बलुचिस्थान, अफगाणिस्थान इत्यादि. रशिया हे मूळचे ऋषिय होते. सैबेरिया - शिबिरिय, प्रशिया - प्रऋषिय, पार्थिया - पार्थीय, ग्रीस - गिरीईश, युरोप - ससुरूप, ऑस्ट्रेलिया - अस्त्रालय, अमेरिका - अमरिश, ऑस्ट्रिया - अस्त्रीय, इजिप्त - अजपती, केनडा - कणाद, उरूग्वे - उरूगावः, ग्वाटेमाला - गौतमालय, जर्मनी अर्थात Deutschland - दैत्यस्थान, Dutch - दैत्य."
तर या पुराव्यांवरून विश्वात पूर्वी वैदिक संस्कृती होती!
इस्लामचे वैदिक मूळ
रा. रा. ओक यांच्या म्हणण्यानुसार इस्लाम हा धर्मही मूळचा वैदिकच आहे! `इस्लामचे वैदिक मूळ' या प्रकरणात ते सांगतात, मक्का नगर इस्लामपूर्व आंतरराष्ट्रीय वैदनक धर्माचे एक प्रख्यात तीर्थक्षेत्र होते. मक्का = मखः (म्हणजे यज्ञ) आणि मदिना = मेदिनी (म्हणजे पृथ्वी). यावरून मक्कामदिना ही मखमेदिनी म्हणजे यज्ञभूमी होती. मक्का-मदिनेची उत्पत्ती लागली. पण काबाचे काय? तर "मक्केत शेषशायी विष्णूचे विशाल मंदिर होते. त्याच्या गर्भगृहास संक्षेपाने गाभा म्हणत. त्याचाच अपभ्रंश काबा असा झाला." काबा या स्थानी विविध देवदेवतांच्या 360 मूर्ती होत्या. इ. स. 930 ह्या वर्षी कारमेथियन लोकांनी काबा लुटून त्यातले शिवलिंग पळवून नेले," असे ते एन्सायक्लोपेडिया इस्लामिया आणि एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकाचा आधार घेऊन सांगतात. शिवाय अर्वा म्हणजे घोडा. यावरून अर्बस्थान - अर्वस्थान म्हणजे घोड्यांचा देश हे नाम तयार झाले. "यावरून वैदिक क्षत्रियांनी तेथे जातिवंत घोड्यांची उत्पत्ती शास्त्रीय पद्धतीने करविली होती."
इस्लामचा प्रेषित महंमद पैगंबर याचे मूळही वैदिकच होते. ते कसे, तर महंमद हा संस्कृत बहुब्रीही समास आहे. 'महान मदः यस्य इति महंमद'. महंमदाच्या कुलाचे नाव कुरेशी. कुर + ईशी. हे कौरव कुलातील लोक होते. अल्ला, अंबा, अक्का ही देवीची द्योतक समानार्थी नावे आहेत. महंमद पैगंबराची कुलदेवता अल्ला (ऊर्फ अंबा) होती.
अंबाबाई ही पैगंबर ची कुलदेवता
अंबाबाई ही पैगंबर ची कुलदेवता वाचून मी निर्वाणपदी पोचलो
पु ना ओकांचं नाही माहित पण
…
हे प्रचंड आहे!!! एकेक वाक्य
हे प्रचंड आहे!!! एकेक वाक्य वाचून आत्मसात करायला दहा दहा मिनिटं लागली.
धमाल धागा
धमाल धागा
चॅंप
चॅंप
हो, त्यातच त्यांनी मुस्लिम या
हो, त्यातच त्यांनी मुस्लिम या अल्ला म्हणतात, संस्कृत मध्ये या शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून अल्ला स्त्रीलिंगी आहे वगैरे ज्ञान वाटले आहे
महत्वाची सूचना कृपया वाचा
महत्वाची सूचना कृपया वाचा
प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पाण्याच्या टाकीत जांभुळाच्या लाकडाचा तुकडा ठेवावा, त्यासाठी एक रुपयाही खर्च होत नाही आणि नफा म्हणजे नफाच. तुम्हाला फक्त जांभुळाचे लाकूड घरी आणायचे आहे आणि ते पूर्णपणे स्वच्छ करून पाण्याच्या टाकीत टाकायचे आहे. यानंतर तुम्हाला पाण्याची टाकी पुन्हा स्वच्छ करण्याची गरज भासणार नाही.
बोट, खूप कमकुवत असताना जांभुळाचे लाकूड तळाशी का ठेवतात माहीत आहे कां?
भारतातील विविध नद्यांमध्ये प्रवाशांना एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नेणाऱ्या बोटीच्या" तळाशी जांभळाचे लाकूड लावले जाते. जे जांभुळ पोटाच्या रुग्णांसाठी घरगुती आयुर्वेदिक औषध आहे, ज्याच्या लाकडाचा उपयोग दात जंतूमुक्त आणि मजबूत बनवण्यासाठी केला जातो, त्याच जांभुळाचे लाकूड बोटीच्या खालच्या पृष्ठभागावर का लावले जाते, हा प्रश्न आहे. तेही जेव्हा जांभुळाचे लाकूड खूप कमकुवत असते. जाड लाकूड हाताने तोडता येते. कारण नदीकाठी त्याच्या वापराने नद्यांचे पाणी पिण्यायोग्य राहते.
खरे तर जांभुळाचे लाकूड हे चमत्कारिक लाकूड आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. पाण्याखाली असतांना ते खराब होत नाही. उलट त्यात चमत्कारिक गुण आहे. जर ते पाण्यात बुडवले तर ते पाणी शुद्ध करते आणि पाण्यात कचरा साचण्यास प्रतिबंध करते. ज्या पूर्वजांना आपण निरक्षर समजतो त्यांनी नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि नाव मजबूत ठेवण्यासाठी इतका प्रभावी आणि सोपा उपाय शोधला हे किती आश्चर्यकारक आहे
७००वर्षांनंतरही विहिरीच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकूड खराब झालेले नाही...
जांभूळाचे लाकडाच्या चमत्कारिक परिणामाचे पुरावे नुकतेच सापडले आहेत. देशाच्या राजधानीत वसलेल्या निजामुद्दीनच्या पायरीची विहीर साफ केली असता त्याच्या पायथ्याशी जांभुळाचे लाकडाची रचना आढळतात. भारतीय पुरातत्व विभागाचे प्रमुख श्री केएन श्रीवास्तव यांनी सांगितले की, संपूर्ण पायरी जांभळाच्या लाकडी संरचनेच्या वर बांधण्यात आली होती. कदाचित त्यामुळेच वर्षांनंतरही या पायरीचे पाणी गोड आहे आणि कोणत्याही प्रकारचा कचरा आणि घाण यामुळे या पायरीचे पाणी स्रोत बंद झालेले नाहीत. तर ७०० वर्षांपासून कोणीही स्वच्छता केली नव्हती.
तुमच्या घरात जांभुळाचे लाकडाचा वापर...
जर तुम्ही तुमच्या छतावरील पाण्याच्या टाकीत जांभुळाचे लाकूड ठेवले तर तुमच्या पाण्यात शेवाळ कधीच बसणार नाही पाण्याचे शुद्धीकरण ७०० वर्षे सुरू राहील. तुमच्या पाण्यात अतिरिक्त खनिजे सापडतील आणि त्याचा TDs शिल्लक राखला जाईल. म्हणजेच जांभूळ आपले रक्त शुद्ध करण्याबरोबरच नदीचे पाणीही शुद्ध करते आणि निसर्गही स्वच्छ ठेवते.
कृपया नेहमी लक्षात ठेवा की जगातील सर्व राजे, राजेशाही आणि सध्याचे अब्जाधीश श्रेष्ठ जे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. जांभुळाचे लाकडापासून बनवलेल्या ग्लासात पाणी पितात तुम्हीही बघाच उपयोग करून...!
ज्या विहिरींना धर (पक्का खडक)
ज्या विहिरींना धर (पक्का खडक) लागत नाही त्यांना जर कडे (माती आत पडू नये म्हणून बांधायची संरक्षक भिंत ) बांधण्या आधी खाली खैर चाफा असाणा अश्या लाकडांचा एक थर देऊन वर दगडाची भिंत बांधतात. हि लाकडे पाण्यामध्ये शेकडो वर्षे टिकून राहतात. त्यावर बांधलेल्या भिंतींना आधार देत राहतात. जांभूळ हे लाकूड देखील अशा प्रकारे वापरात असावे. तुळई साठी वापरलेले मावळात बऱ्याच ठिकाणी पाहिलंय. पण त्याची बेंडिंग स्ट्रेंग्थ जास्त नसल्याने कालांतराने अश्या तुळया वाकू शकतात. बाकी पाणी शुद्ध वगैरे आज काल ऐकण्यात येतंय. त्याला काही आधार असेल असा वाटत नाही.
हलधरना पदम पुरस्कार दिला ,
हलधरना पदम पुरस्कार दिला , पैसे नाहीत , पोस्टाणे पाठवा इ बोगस मेसेज फिरत आहे
त्यांना सरकारने जमीन दिली आहे व 18000 पेन्शन आहे
वरच्या लेखाबद्दल काही नाही पण
वरच्या लेखाबद्दल काही नाही पण त्यात सांगितलेल्या विहिरीच्या रचने बद्दल...
अशी विहीर आमच्या घरी आहे.
अगदी खाली काळे दगड गोलाकार ठेवून त्यावर लाकडाचा सांगाडा आहे आणि त्याच्यावर चिऱ्याच्या दगडाचे बांधकाम आहे. सांगाडा जांभळाचा आहे. सांगाडा विहिरी च्या अगदी तळाशी झऱ्यांच्या जवळ आहे
विहीर 100 वर्षांपेक्षा जुनी आहे. गेल्या 10 वर्षात साफ करायला सुरुवात केली त्याच्या आधी कधी साफ केली नव्हती. विहीर साफ करताना मी सांगाडा पहिला आहे , वेगळी रचना म्हणून लक्षात राहिला
झरे जिवंत आहेत आणि सगळ्यात जास्त पाणी असलेल्या पैकी एक विहीर आहे
आपल्यापैकी बहुतेकांना गाय आणि
आपल्यापैकी बहुतेकांना गाय आणि म्हशीच्या दुधातला फरक समजत नाही...*
बहुतेक लोकांना माहित नाही.
म्हशीला चिखल आवडतो.
गाय आपल्या शेणातही बसत नाही. गाईला शुद्धता आवडते.
जर तुम्ही म्हैस 2kms दूर नेऊन सोडली तर. तो घरी परतणार नाही. पॉवर मेमरी शून्य आहे.
जरी आपण गाय 5 किमी सोडली तरी. दूर, ते घरी परत येईल.
*गाईच्या दुधात स्मरणशक्ती असते.
दहा म्हशींना बांधून त्यांची मुले टाकून दिली तर एकही पिल्लू आईला ओळखणार नाही.
पण गायीचे वासरू, काहीशे गायींच्या मधला आई ओळखू शकतो.
म्हैस दूध काढताना आपले सर्व दूध देते.
गाय आपल्या शावकांसाठी थोडे दूध लपवते. शावक पीत असतानाच ते साठवलेले दूध सोडते. *गाईच्या दुधात कोमलता असते*
म्हैस सूर्य किंवा उष्णता सहन करू शकत नाही.
गाय मे-जूनच्या उन्हातही तग धरू शकते.
म्हैस मोठी आणि आळशी आहे आणि पटकन ओरडत नाही. याचे दूध घट्ट आणि पचायला जड असते. जेव्हा आपण ते दूध घेतो तेव्हा त्याच आळस आणि अपचन होते. दूध काढताना वासराला मालक वाढवतात.
आईपासून वेगळे झाल्यावर वासराला सांभाळणे फार कठीण असते. आईचे दूध पिऊन झाल्यावरही आपण दूध काढण्याच्या वेळी वासरावर नियंत्रण ठेवू शकत नाही. ती काळजी आणि कोमलता त्याच्या दुधात सामायिक आहे.
गाईच्या पाठीवरील "सूर्य केतू तंत्रिका" सूर्यप्रकाशात जागृत होते. ही मज्जातंतू सूर्य, तारे, चंद्र आणि विश्वातून "वैश्विक ऊर्जा" शोषून घेते. त्यामुळे गाईच्या दुधात रोग दूर करण्याची ताकद असते. विश्वातील कोणत्याही सजीवामध्ये अशी शक्ती नाही.
खरं तर, गायीचे दूध सेवन केल्यावर शरीर गरम होत नाही. म्हशीचे दूध दाट असते, ते सेवन केल्यावर शरीर गरम होते, आणि आपल्या शरीरातील साखर देखील वाढते (जेरीच्या दुधात जास्त) साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे ते साखर रुग्णांसाठी चांगले नाही.
पण गायीचे दूध सेवन केल्यावर ते त्याच्या विरुद्ध असते.
आपल्याला प्रत्येक गोष्टीत चरबीचे प्रमाण दिसते. आम्ही एका जाहिरातीच्या सल्ल्याचे पालन करतो, रिफाइंड तेलामुळे कोलेस्ट्रॉल होत नाही, आम्ही ते तेल वापरतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही पैसे देतो आणि घरपोच मिळवतो, म्हशीच्या दुधात जास्त फॅट असते, जे कोलेस्टेरॉलचेही कारण असते (चरबीचे प्रमाण).
म्हशीच्या दुधातील तिसरे आणि चौथे पोषक घटक जेव्हा आपण चुलीवर ठेवतो आणि थोडे गरम करतो तेव्हा त्याचे बाष्पीभवन होते.
गायीचे दूध कितीही वेळा उकळले तरी त्यातील पौष्टिक गुणधर्म नष्ट होत नाहीत.
कृपया प्रियजनांसोबत शेअर करा
आम्हाला तुमची काळजी आहे
(No subject)
गाईचा शावक
गाईचा शावक
Pages