भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्रांती वाटते येथे एवढ्या ओळीवरून कंपनरहित जागा, उपग्रह वगैरे कुठच्या कुठे नेलाय विचार! ह्याला म्हणतात रामाचा पक्या करणे.

(कुणाला माहीत नसल्यास, रामा च्या उलट मारा, मारा म्हणजे पीटो, त्याच्या उलट टोपी, टोपी म्हणजे क्याप, आणि त्याच्या उलट पक्या)

होय वाचलं होतं हे फॉरवर्ड मी पूर्वी. भोपळे हे कॅरॅक्टर वपुंच्या 'भदे' सारखे वाटले होते. लिहिलंय पण तसेच. हातात हात घेऊन भदे शांतपणे म्हणाले, "काळेसाहेब, आजपासून तुमचे ब्लडप्रेशर आमच्याकडे" Lol

>> इथे रायगड पोलीस स्टेशनच्या वायरलेसचे काम करायला आलो होतो.

सहज म्हणून बघितले तर रायगड पोलीस स्टेशन ते शिवथरघळ तब्बल ८४ किमी अंतर आहे.

यावरून अजून एक फॉरवर्ड आठवले. काहीच दिवसांपूर्वीच आले होते. लेखकाने लिहिले होते की ते नातेवाईकांकडे कर्वे रोडवर वारजे पूल येथे गेले होते. तिथे त्यांना रस्ता क्रॉस करायचा होता. पण वाहने इतकी की रस्ता क्रॉस करणे जवळपास अशक्यच होते. मग त्यांनी म्हणे शक्कल लढवली. तिथल्या एका गुराखी मुलाला थोडे पैसे दिले आणि त्या बदल्यात त्याला म्हशी रस्त्यावरून आडव्या घेऊन जायला सांगितले. आणि अशा प्रकारे त्या म्हशीच्या आडून यांनी रस्ता क्रॉस केला.

मग लेखक महोदय अनेक दिवसांनी पुन्हा तिथे गेले. तर म्हणे तो मुलगा यावेळीही तिथेच होता. त्याने धावत येऊन यांना नमस्कार केला आणि म्हणाला, "तुमच्यामुळे मला बिजनेस आयडिया कळली व मी आज गुरे राखायला आल्यावर चार पैसे कमवू लागलो". तर या मुलाने म्हणे लेखक महोदय यांचे ऐकून, आजवर अनेक पादचाऱ्यांना थोडया पैशांच्या मोबदल्यात रस्त्यावर म्हशी आडव्या घालून रस्ता क्रॉस करून दिला होता व यात त्याला दिवसाकाठी भरपूर कमाई होत होती.

एवढे लिहून अखेर लेखक महोदयांनी उपदेश दिला होता. तोच आपला नेहमीचा Lol

काही लोकांना हि कथा खरी वाटली म्हणूनच ती फॉरवर्ड होत होत माझ्यापर्यंत आली Happy

घळीत डास फार आहेत. भक्तांना डास चावू नयेत म्हणून तिकडे समर्थांनी मच्छरदाणी लावली होती. पूर्वीच्या मच्छरदाणीला छिद्रे पडल्याने ती उन्हापावसात टिकावी आणि घळीत दरड कोसळली तर सुरक्षाही रहावी म्हणून पंचधातूची बनवायचं कॉन्टँक्ट आमच्याच कंपनीला हल्ली मिळाले होते. आता संपूर्ण घळीवर फाईन मेशचे आवरणच आहे म्हणाना!
आता हल्लीची लोकं त्यास फॅरेडे केज का कायसं संबोधतात, पण समर्थाचीया सेवका वक्र पाहे, असा सर्व भू मंडळी कोण आहे? असं त्यांनी म्हणून ठेवलंय याचा गर्भितार्थ आत्ता आपल्याला समजतोय. अर्थात सगळेच किरण त्या जाळ्यावर पडले की आत येऊ शकत नाहीत अर्थात माणूस सोडाच कुठल्याही वारंवारतेचे (मेश अती सूक्ष्म आहे, त्याअर्थी प्रकाशाचा वेग, सूक्ष्म अंतर मोजणे... इ. समर्थांना ज्ञात असणार यात शंका नाही) किरण भेद करुन आत येऊच शकत नाहीत. वक्र होतात.
पुंडलीक वरदा हारी विठ्ठल. जयजय रघुवीर समर्थ!

ओह्ह... 'व्हाय डिड द म्हैस कॉस द रोड?' असा तो खरा जोक आहे तर! अर्थात तो पुलंचा आहे.
उगा पाश्चात्यांचा वाटायचा मला. चिकन म्हणे!

अच्छा! पण मला फॉरवर्ड झालेले व्हर्शन 'पुणेरी उद्योजक व उद्योजगता' अशा शीर्षकाखाली आलेले असे काहीसे होते:
https://www.facebook.com/354029878032843/posts/912409005528258/

लोकसत्तेतला लेख आवडला, तोच पुढे अतुल म्हणतात तसं व्हॉअ‍ॅ फॉरवर्ड झाला असेल. त्यात शेवटी जी बातमीशीर्षके दिली आहेत, त्यात टिपिकल लोकसत्तेची नाहियेत. उदा. 'ही' करते रस्ता ओलांडायला मदत, पादचार्‍यांची 'हिला' पसंती, 'ही' आली पुढे आता रस्त्यावरून 'हे' होणार गायब

वावे, गेल्या दोन तीन वर्षांपासून लोकसत्ता ऑनलाईन आणि मोबाईल वरुन फक्त क्लिकबेटच सर्व करते.

त्यावर जोक्स् पण येत आहेत. पत्रकाराच्या बायकोने लिहिलेली सोडचिठ्ठी - " 'ह्या' कारणासाठी दिला तुला घटस्फोट "

तो लेख छापील आवृत्तीत प्रकाशित झाला होता. तिथे अजूनतरी असले प्रकार सुरू झाले नाहीत.

बरोबर आहे. छापिल आवृत्तीत क्लिक करता येत नाही, त्यामुळे क्लिकबेटचा उपयोग नाही. पुढे घरोघरी ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आल्यावर तिथेही हे प्रकार येतील याची खात्री आहे.

आम्ही दिलेले उत्तर *

आमचं जुनं ते कसं वैज्ञानिक होतं हे सिद्ध करण्यासाठी ज्या लटपटी चालू आहेत त्यापैकी एक उत्तम नमूना म्हणून या पोस्टकडे पाहता येईल. त्यातील वर्णन वाचतांना जीपीएस विक्रेता भोपळे या पोस्ट-लेखकास आपल्या विक्री-कौशल्याने कसा मामा बनवतो हे पाहून मस्त करमणूक होते. या पोस्टवर काही शंका उपस्थित होतात. त्या पुढे प्रस्तुत करीत आहे:

1) लेखकाने आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक दिलेला नाही. त्यामुळे याची सत्यता पडताळता येत नाही.
2) भोपळे आपल्या खचाखच भरलेल्या खिशातून यंत्रे बाहेर काढतात! शक्य आहे! तो जीपीएस यंत्रेच विकत असल्याने अशी खिशातच घेऊन फिरत असेल. पण त्याने जे काही प्रेझेंटेशन लॅपटॉप वर दाखवले त्याचे तो पाच-पन्नास हजार रुपये घेतो हे अगदी अकल्पनीय आहे. आपले उत्पादन विकण्यासाठी, आपल्या वस्तूची वैशिष्ठ्ये दाखवून देण्यासाठी जे प्रेझेंटेशन करावे लागते त्याचे सुद्धा पैसे (पाच-पन्नास हजार) घेणारा विक्रेता (आणि मूर्खपणे ते देणारा ग्राहक) मी तरी आजतागायत पाहीलेला नाही. परंतु पोस्ट-लेखकासारखे निर्बुद्ध लोक ग्राहक म्हणून लाभल्यास हे सहज शक्य होत असावे.
3) भोपळे यांनी दाखवलेली यंत्रे विश्वसनीय नसावीत असे सरळ सरळ दिसते. कारण 30 उपग्रहांपैकी कुण्या यंत्राने 20 उपग्रह पकडले, कुणी 24 तर कुणी 28, असे या लेखकानेच लिहलेले आहे. जीपीएस यंत्रांकडून आकाश मोकळे असलेल्या एकाच ठिकाणी अशा चुका जर होत असतील तर घळी मध्ये असतांना त्यांनी एकही उपग्रह न टिपण्याची चूक नक्कीच संभवते. त्यामुळे घळीत असतांना रेंज न मिळणे यात कसलेही आश्चर्य नाही, चमत्कार ही नाही.
4) एकाद्या ठिकाणी उपग्रहांची रेंज पोहोचत नसल्यास त्याची कारणे न शोधता त्याचा चमत्कार म्हणून उल्लेख करून संत रामदासांशी बादरायण संबंध जोडणे हे छद्म विज्ञान आहे. जंगलातील कुठल्याही गुहेत, घळीत नीरव शांतता असते. याला शिवथर घळ ही सुद्धा अपवाद नाही. तिथे कुठल्याही लहरी पोहोचू शकत नाहीत हे विज्ञानाने सिद्ध केले पाहिजे. रेंज न मिळणार्‍या जीपीएस यंत्राने नव्हे.
5) एका दुचाकी-स्वाराने दिलेला आपला अनुभव (तिथे जीपीएस उपलब्ध आहे, 7 उपग्रह दिसतात असे तो म्हणतो) पुढील लिंक वर जरूर वाचवा:
http://thesixthgear.nene.in/post/121745759252/shivtharghal-has-gps-coverage
6) संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी सुद्धा अप्रतिम लेखन केले आहे. परंतु त्यांना ते लिखाण करण्यासाठी कधीही फ्रिक्वेंसीलेस घळीची गरज भासली नाही.
7) समर्थ रामदास या घळीत का व कसे पोहोचले यावर मला काही म्हणायचे नाही. परंतु 400 वर्षांपूर्वी मोबाइल सदृश कसल्याही लहरींचा शोधच लागलेला नसतांना रामदासांना त्या आधीच कशा ज्ञात होत्या याची भाकडकथा रचून एका संताला शास्त्रज्ञ बनविण्याचा अट्टाहास करणे हे कशाचे लक्षण आहे ?

*उत्तम जोगदंड*
*(चला उत्तर देऊ या- टीम)*

#3: एकाच ठिकाणी वेगवेगळ्या उपकरणांना असमान संख्येचे उपग्रह दिसणे यात काहीच नवल नाही. किंबहुना बऱ्याचदा तसेच होण्याची शक्यता आहे. GNSS सिस्टीम बंद स्थितीतून चालू केल्यावर लॉक होईतोवर अनेक मिनिटे घेते. प्रत्येक उपकरणाची अचूकता मापन समान असतं नाही. जोडलेल्या अंटेनाची गेन, कलीबरेशन, व्यतीत झालेला काळ... अनेक मुद्दे आहेत. ती मुळात चूक नाहीच.

कायच्या काय! उद्या म्हणतील की ७ फेर्‍यांच्या वेळी सनईवर वाजणार्‍या भारतीय संगीतात २२ श्रुती असतात आणि २२/७ हा पाय असतो (अचूक नाही, पण असल्या पोष्टींमध्ये अचूकता कसली शोधता?). वर्तुळाचा परीघ = पाय गुणिले व्यास. आणि महाभारताबद्दल म्हटलंय 'व्यासोच्छिष्टम् जगत् सर्वम्', म्हणजे व्यासाने सर्व जग कव्हर केले. अर्थात जग गोल, त्याच्या गणितात पाय हे गुणोत्तर वापरावे लागते, हे सर्व भारतीयांना पुरातनकाळापासून माहीत होते आणि त्याची शिकवण आपल्याकडे लग्नात दिली जाते! धन्य भारतीय संस्कृती!!

Pages