डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.
हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.
आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.
बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.
हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.
पौर्णिमा/अमावस्या (उधाणाची
पौर्णिमा/अमावस्या (उधाणाची भरती), आणि अष्टमी (भांगेची भरती) या दोन्हीचा प्रभाव तेलावर सारखाच पडतो हे समस्त विज्ञानास बुचकळ्यात टाकणारे आहे. म्हणजे या सगळ्यावर प्रचंड प्रभाव टाकणारे सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत असोत वा काटकोनात, यात जे काही "तत्त्व" आहे ते बिनधास्त आपले काम तसेच्या तसे करते हे विशेष
बाकी दुनियाभरचे पाणी कमी जास्त वर चढेल. पण जलतत्त्व व तेल यांच्या वागण्यात काही फरक नाही.
बाय द वे नागपूरवाल्यांनी अरबी समुद्रातील भरतीची वेळ धरावी, की बंगालच्या उपसागरातील? कॅन्सास मधल्या भारतीयांनी अटलांटिक मधली, की पॅसिफिक मधली?
नागपूरसारख्या ठिकाणी घरात
नागपूरसारख्या ठिकाणी घरात स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे, त्यातही शेगडी कुठल्या दिशेला आहे हे महत्त्वाचे आहे. शेगडी आणि स्वयंपाकघर, दोन्ही पूर्वेला असेल तर बंगालच्या उपसागराला आपलं म्हणावं आणि पश्चिमेला असेल तर अरबी समुद्राला. स्वयंपाकघर पूर्वेला आणि शेगडी पश्चिमेला किंवा vice versa असल्यास दोन्ही समुद्र आलटून पालटून. म्हणजे शंकरपाळे तळताना अरबी समुद्र आणि चकल्या तळताना बंगालचा उपसागर वगैरे.
म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले
वावे - या लोकांना तो दोन चंद्र वाला लेख फॉर्वर्ड करायला पाहिजे. तो शब्दशः घेणारे नगही असतील.
कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा
कौतुकाचे शब्द थिटे पडतील असा लेख.>>
म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले की "समुद्र चुकला" असे समजावे>>>>>>>>>> लोल
चकल्या मऊ पड्लया तरी पण
तळणीचे राहिलेले तेल पण टाकताना भरतीचा ओहोटीचा विचार करावा असा लेख येऊ शकेल आता
म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले
म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले की "समुद्र चुकला" असे समजावे >> आणि शंकरपाळे करपले तर त्सुनामी आली होती असे समजावे
"म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले
"म्हणजे शंकरपाळे कच्चे राहिले की "समुद्र चुकला" असे समजावे" -
ही पोस्ट मागच्या दिवाळीतपण आली होती. शिमगा गेला तरी कवित्व राहिलं ह्या चालीवर दिवाळी गेली तरी फॉरवर्ड राहिला असं म्हणायला हवं.
वावे
वावे
आम्ही तळण सुरू करण्याआधी
आम्ही तळण सुरू करण्याआधी कोकणात एखाद्या तांडेलाला फोन करून विचारतो. भरतीची वेळ चुकायला नको. तांडेल होडी पाण्यात आणि आम्ही भजी एकत्रच तेलात सोडतो. कोळीगीत पण म्हणतो त्याने भज्यांच्या वासाने येणारे शेजारी येत नाही.
तांडेल होडी पाण्यात आणि आम्ही
तांडेल होडी पाण्यात आणि आम्ही भजी एकत्रच तेलात सोडतो. कोळीगीत पण म्हणतो त्याने भज्यांच्या वासाने येणारे शेजारी येत नाही. >>
आणि मी उगीचच माझ्या टॉवेलला
आणि मी उगीचच माझ्या टॉवेलला दोष देत होतो पाणी नीट शोषून घेत नाही म्हणून. आज मी भरतीच्या वेळी अंघोळ करून पाहिली. आणि काय आश्चर्य, अंग पुसताना टॉवेलने झरझर झरझर पाणी शोषून घेतले
असो. अणुरेणु मधल्या बलांवर गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होतो असा एकंदर सूर दिसत आहे पोस्टकर्त्याचा (बायदवे अमेरिकेचे तळवे कुठे असतात? तळवे, तळणे, तळण असा सावळोगोंधळ आसा हय पोष्टीत. बर ते सुद्धा असो). पण ते अर्थातच चूक आहे. छोट्या आकारामुळे नाही. अखंड महासागर भरून जरी तेल असते आणि एव्हरेस्ट एव्हढी करंजी असती तरी भरतीच्या वेळी हा इफेक्ट येणार नाही. कारण मूळ गृहीतकच चुकीचे आहे.
पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी
पृथ्वी तालावर ७० टक्के पाणी नि मानवी शरीरातही ७० टक्के पाण्याचे प्रमाण म्हणून भरती ओहटीचा समुर्द्रवर व मानवी शरिरातील पाण्यावर परिणाम होतो हे माहीतच होते पण अन-धान्य नि पाकशास्त्रावरही भरती ओहोटीचा परिणाम होतो हे वाचून धन्य झालो.
>>> मानवी शरीरावर??? लोल
मग! तुम्हीच नाही का म्हणत कधी
मग! तुम्हीच नाही का म्हणत कधी नीट घ्यावी वाटते तर कधी आईस घालून. पुढल्या वेळेला नोंद करा वेळेची आणि भरती ओहोटीची मग लक्षात येईल.
आपले पोलीस खाते खराब आहे कारण
आपले पोलीस खाते खराब आहे कारण 'पोलीस भरती' ही ओहोटीच्या वेळेला करतात.
सगळेच
सगळेच
फारएण्ड, समुद्र गलत नहीं होता, आदमी गलत होता है |
माझं वरचं म्हणणं चुकीचं आहे याचा मला साक्षात्कार झाला. बंगालच्या उपसागराची क्षारता ही (निदान किनाऱ्याजवळ तरी) अरबी समुद्रापेक्षा कमी आहे. (तिथे जास्त नद्या येऊन मिळतात म्हणून तसं आहे म्हणे. आपण खोलात कशाला शिरा? क्षारता कमी आहे हे महत्त्वाचं. शिवाय खोलात गेलं (समुद्रात) तर क्षारता वाढते म्हणे. त्यामुळे नकोच.) तर त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या बंगालचा उपसागर हा अरबी समुद्रापेक्षा गोड आहे. (म्हणूनच बंगाली लोकांना मिठाई आवडते.) त्यामुळे गोड पदार्थ (शंकरपाळे, करंज्या, अनरसे वगैरे ) तळताना नागपुरात बंगालचा उपसागर प्रमाण मानावा आणि चकल्या-कडबोळी तळताना अरबी समुद्र.
पश्चिम किनाऱ्याजवळ आल्यावर बंगालच्या उपसागराचा हा प्रभाव कमी होतो त्यामुळे सरसकट अरबी समुद्र. (तरीही पुण्यामुंबईत अनरसे फसले तर बंगालच्या उपसागराचा प्रभाव वाढला म्हणायचं.)
बंगाल उपसागर फॉलो करणाऱ्यांनी
बंगाल उपसागर फॉलो करणाऱ्यांनी क्षारता कमी असल्याने पदार्थात थोडे मीठ जास्त घालावे काय मग?
वावे धमाल लिहीले आहे.
वावे
धमाल लिहीले आहे.
तुलनात्मकदृष्ट्या बंगालचा उपसागर हा अरबी समुद्रापेक्षा गोड आहे. >>> असू शकेल. पण मी अरबी समुद्रावर टीका करणार नाही. कारण मी (बहुधा) त्याचे मीठ खाल्ले आहे
(No subject)
बाय द वे नागपूरवाल्यांनी अरबी
बाय द वे नागपूरवाल्यांनी अरबी समुद्रातील भरतीची वेळ धरावी, की बंगालच्या उपसागरातील? कॅन्सास मधल्या भारतीयांनी अटलांटिक मधली, की पॅसिफिक मधली? >>> फारएण्ड, मलाही आमच्या नागपूर व पर्यायाने विदर्भातील लोकांनी काय करावे हाच प्रश्न पडला होता. केवळ तळण तळायला अरबी समुद्र वा बंगालच्या उपसागराकिनारी जाणे तर परवडण्यासारखे नव्हतेच.
नागपूरसारख्या ठिकाणी घरात स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे, त्यातही शेगडी कुठल्या दिशेला आहे हे महत्त्वाचे आहे. शेगडी आणि स्वयंपाकघर, दोन्ही पूर्वेला असेल तर बंगालच्या उपसागराला आपलं म्हणावं आणि पश्चिमेला असेल तर अरबी समुद्राला. स्वयंपाकघर पूर्वेला आणि शेगडी पश्चिमेला किंवा vice versa असल्यास दोन्ही समुद्र आलटून पालटून. म्हणजे शंकरपाळे तळताना अरबी समुद्र आणि चकल्या तळताना बंगालचा उपसागर वगैरे
बंगालच्या उपसागराची क्षारता ही (निदान किनाऱ्याजवळ तरी) अरबी समुद्रापेक्षा कमी आहे. (तिथे जास्त नद्या येऊन मिळतात म्हणून तसं आहे म्हणे. आपण खोलात कशाला शिरा? क्षारता कमी आहे हे महत्त्वाचं. शिवाय खोलात गेलं (समुद्रात) तर क्षारता वाढते म्हणे. त्यामुळे नकोच.) तर त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या बंगालचा उपसागर हा अरबी समुद्रापेक्षा गोड आहे. (म्हणूनच बंगाली लोकांना मिठाई आवडते.) त्यामुळे गोड पदार्थ (शंकरपाळे, करंज्या, अनरसे वगैरे ) तळताना नागपुरात बंगालचा उपसागर प्रमाण मानावा आणि चकल्या-कडबोळी तळताना अरबी समुद्र. >>> पण वावेने उत्तम पर्याय सुचवलाय.
धन्य ते भोंदू फॉर्वर्डस! धन्य ते भोंदू फॉर्वर्डसजन्मदाते! आणि धन्य ते भोंदू फॉर्वर्डसप्रसारकर्ते!!!
(रच्याकने फेसबुक वर मधुरा पेठेंचा 'खादाड खाऊ' नावाचा एक समूह आहे, त्यात दरवर्षी हे भोंदू फॉर्वर्ड येते. त्यावर जगभरातील कित्येक तथाकथित विद्वानांमध्ये ह्या फॉर्वर्डसची सत्यता पटवून देण्यासाठी विविध दाखले देण्याची चढाओढ लागते आणि दुर्दैवाने काही साधीभोळी माणसं ह्याला नाहक बळी पडतात, कारण आदल्या वर्षी त्यांच्या चकल्या किंवा अनारसे फसलेले असतात)
वावे
वावे
आमच्या कॉलेज बॅच ग्रुपवर हे गांभीर्याने घेणारे मोजकेच का होईना प्रतिसाद बघून कुठेतरी कळवळलेला आत्मा या धाग्यावरील प्रतिसाद वाचल्यावर शांत होऊन उल्हसीत झाला.
वावे
हा धागा स्ट्रेसबस्टर आहे
हा धागा स्ट्रेसबस्टर आहे माझ्यासाठी.
मागच्या २-३ दिवसातले विशेषतः तळणीचे प्रतिसाद तर कहर आहेत
कहर
कहर
मधल्यामधे हपांची पोलिस भरती
मधल्यामधे हपांची पोलिस भरती निसटली
हाहाहा
हाहाहा
धन्य ते भोंदू फॉर्वर्डसजन्मदाते <<< हे खरय नाहीतर तळणे आणि समुद्राचा संबंध लावणे म्हणजे कठीण काम आहे...
हे भरती आहोटी चा तळण शी संबंध
हे भरती आहोटी चा तळण शी संबंध आहे ही मी इथेच कुठेतरी कधीतरी वाचलं होतं
मीठाचे पाणी अधिक पातळ व
मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभु शकते.>>>
असं असल्यास टमरेलात मिठाचं पाणी भरायला हवं ना? आणि भरतीची वेळ येईपर्यंत कळ सहन केली पाहिजे. आंघोळीच्या बादलीत मीठ घालून काय उपयोग?
(No subject)
पुण्यातला झेड ब्रिज पण
पुण्यातला झेड ब्रिज पण रामसेतू वरूनच घेतलाय.
“ पुण्यातला झेड ब्रिज पण
“ पुण्यातला झेड ब्रिज पण रामसेतू वरूनच घेतलाय.” - असणारच! पण तो शिंचा पाण्याखाली जातच नाही. जो जातो, तो भिडे पूल मात्र सरळ बांधलाय. मुठेच्या पाण्यात लाटा निर्माण होत नसल्यामुळे असावं कदाचित.

याच तत्वाने खिचडी, दाल, वरण,
याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो. >>> अरे देवा!!!!!!!! आता एकदाचे इलेक्ट्रीक कुकरला/इंस्टापॉटलाच थेट एक "भरती सेटींग" नि "ओहटी सेटींग" लावून द्या म्हणजे तुम्हीही सुटले नि आम्हीही...
Pages