भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट सॉल्ट लेक सिटी ब्रिज व रामसेतू मधे साधर्म्य दिसतंय. पण वरची कथा बळंच रचलेली वाटतेय. युनियन 'पेकि'पिकने लहरदार साम्यावर रचलेला खयाली 'पूला'व !

कर्करोगाचा पराभव केला

अननस गरम पाणी
कृपया शब्द पसरवा !! कृपया शब्द पसरवा !!
ICBS जनरल हॉस्पिटलचे प्रोफेसर डॉ. गिल्बर्ट ए. क्वोक यांनी आग्रह धरला की ज्यांना हे बुलेटिन मिळाले त्या प्रत्येकाने दहा प्रती इतरांना दिल्यास किमान एक जीव वाचू शकेल.
मी माझ्याकडून काही केले आहे, आशा आहे की तुम्ही देखील करू शकता..
धन्यवाद!
अननसाचे गरम पाणी तुमचे प्राण वाचवेल
गरम अननस कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात.
एका कपमध्ये अननसाचे 2 ते 3 तुकडे बारीक करा आणि त्यात गरम पाणी टाका, ते "क्षारयुक्त पाणी" होईल, जर तुम्ही ते रोज प्यायले तर ते सर्वांसाठी चांगले आहे.
गरम अननस कर्करोगविरोधी पदार्थ सोडते, प्रभावी कर्करोग उपचारांसाठी औषधातील नवीनतम प्रगती.
अननसाच्या कोमट फळामध्ये सिस्ट्स आणि ट्यूमर मारण्याचा प्रभाव असतो. हे सर्व प्रकारचे कर्करोग बरे करते हे सिद्ध झाले आहे.
अननसाचे गरम पाणी ऍलर्जी/अ‍ॅलर्जीमुळे शरीरातील सर्व जंतू आणि विषारी पदार्थ काढून टाकते.
अननसाच्या रसापासून मिळणारे औषध केवळ हिंसक पेशी नष्ट करते आणि निरोगी पेशींवर परिणाम करत नाही.
तसेच, अननसाच्या रसातील अमीनो ऍसिड आणि अननस पॉलिफेनॉल उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात, अंतर्गत रक्तवाहिन्यांमधील अडथळा टाळतात, रक्त परिसंचरण सुधारतात आणि रक्त गोठणे कमी करतात.
वाचल्यानंतर इतरांना, कुटुंबाला, मित्रांना सांगा, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

हा मेसेज किमान पाच ग्रुपवर पाठवा
काही पाठवणार नाहीत
पण मला आशा आहे की तुम्ही ते नक्की पाठवाल

Rofl गरम अननस..
मी ऐकलेय की फळं जास्त वेळ कापून ठेवल्याने/शिजवल्याने त्यातली सत्व जातात.. ते खरंय का?

कृपया शब्द पसरवा !! कृपया शब्द पसरवा !!

LoL

ह्या अननस भोंदूंना भाषासौष्ठवासाठी अधिकचे गुण मिळावेत मिलॉर्ड

हो मानव, सहमत आहे. मूळ मेसेज मलेशिया किंवा चीन मधून आला असावा असे दिसते. बहुधा अननस चा खप कमी झाला असावा तिकडे कुणाचातरी Lol

आपल्या इकडे फॉरवर्ड करणाऱ्यानी जास्त तसदी न घेता गूगल ट्रान्सलेट करून ढकलले आहे.

जास्त पसरवून ठेवले आणि पाऊस आला तर पटकन एवढे उचलणार / आवरणार कोण !!
चपाती सारखे लाटुन पसरवायचे की भाकरी सारखे थापुन ?
की ह्या मेसेजच्या पार्ट २ मध्ये पसरवण्याच्या पद्धतीनुसार कुठल्या प्रकारचा कर्करोग बरा होणार त्याबद्दल विवेचन असणारे ?

कृपया शब्द असा पसरवावा:
"कृप या शब्द पसरवा"
मग कृप (जे चिरंजीवी आहेत) ते येऊन शब्द पसरवतील.

मला वाटतं समाज माध्यम वर येणारे msg हे भोंदू पण असतात
काही खरेच उपयोगी असतात पण त्यांना भोंदू समजले जातात
कारण जे त्यांना भोंदू ठरवतात ते पन सुमार बुध्दी चेच असतात.
एक हत्ती आणि सात आंधळे ही जी गोष्ट आहे त्या प्रमाणे.

कृ

या

शब्द पसरवला... का अजून पसरवून हवा आहे??

काल एक फिरस्ता व्हिडिओ WhatsApp वर आला .
आणि अनेक लोकांकडून आला.

माणसं स्वतः कडे काही ठेवत नाहीत सरळ पुढे ढकलतात मी ही साखळी ब्रेक करतों
सरळ असे msg delete करतो.

" Heart attack आल्यावर त्या व्यक्ती लं गुडघे छाती जवळ घेवून जी पोझिशन येते त्या स्थिती मध्ये बसवा त्या नंतर एक आल्या च तुकडा त्याला ध्या आणि चावून खाण्यास सांगा.
पुढचा धोका पूर्ण टळतो.
मग आरामात dr कडे घेवून जा*
असा तो msg होता.

आले ही जादू कसे करते ह्याचे काही प्रयोग झालेत का?
हा पहिला प्रश्न. आणि
दोन ब्रेन stroke आलेल्या व्यक्ती ना मी जवळून बघितले आहे.(heart attack आणि ब्रेन stroke जास्त फरक नाही)
त्या व्यक्तीला तुम्ही तुम्हाला हवं तसे बसवू शकत नाही.
तो बसणार पण नाही.
चावून आले खाण्या इतके त्याचे तोंड काम करणार नाही.

*गुळमट ब्राह्मणी स्वयंपाक
आणि

*#गुरुचरित्र:

लहानपणी मी शाळेत डबा घेऊन जात असे तेव्हा माझ्या डब्यातील भाजी इतर विद्यार्थी मात्र फारशी खात नसत.

*कोल्हापुरातल्या लोकांना झणझणीत तिखट खाण्याची सवय आणि माझी भाजी गोड लागायची कारण त्यात गूळ घातलेला असायचा.

मी आईला विचारायचो की, आपण स्वयंपाकात गुळ का वापरतो? बरेच दिवस त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नव्हते.

गुरुचरित्रामध्ये *माझ्या परमपुज्य सद्गुरूंनी सांगितलं आहे, गुळमिश्रित अन्न शिळं होत नाही.

*मग आम्ही लागलो प्रयोगाला.

वांग्याची भाजी गुळ घालून आणि गूळ न घालता *तयार करून ठेवली दोन दिवस.

*दोन दिवसांनी पाहिले तर गूळ घातलेल्या भाजीपेक्षा न घातलेली भाजी अतिशय सडलेली होती.

आपल्याकडे प्रवासाला जाताना दीर्घकाळ टिकणाऱ्या दशम्या ह्या गुळापासून यासाठी तर बनवत नव्हते? नक्कीच!

संशोधनामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या.

*प्राचीन बांधकामामध्ये स्लॅब, माळवद टाकताना चुन्यामध्ये गूळ घालत असत.

*अशा अनेक प्रयोगातून समजलं गूळ हा अँटीफंगल, अँटीबॅक्टरियल म्हणून काम करतो.

*गुळाला हा गुणधर्म त्याच्यामध्ये असणाऱ्या भरपूर प्रमाणातल्या फॉस्फरस या मुलद्रव्यामुळे प्राप्त होतो हे राजीव दीक्षित यांनी निर्विवादपणे सिद्ध केलं आहे.

*गूळ घातलेल्या जेवणाचा उपहास करू नका, जे उत्तम आहे, बुद्धीवर्धक आहे ते स्वीकार करा.

*डॉ. अभिराम जोशी।।।

पारंपरिक ज्ञान वर अविश्वास मी पण दाखवत नाही.
कारण ते शेकडो वर्षांच्या अनुभवातून आलेले ज्ञान आहे
अनेक वर्षांचा अनुभव त्या मागे आहे.
ते आताच्या शास्त्र नुसार सिद्ध केलेले आहे का ? तर नाही
ते तुम्ही सिध्द करा आणि चुकीचं ठरवा .
पण असे न करता पारंपरिक ज्ञान हे भोंदू आहे असे समजणे चूक च .
नताशा ह्यांनी एक उदाहरण दिलेच आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत.
हळद ,कडू निंब, ह्यांचा वापर .
वळीव पावसाचे ढग लांब जरी दिसले तरी लगेच घर गाठा असे जुने लोक म्हणायची.
भले तुम्ही जिथे आहात तिथे उन असेल तरी.
कारण हा वळीव पावूस खूप कमी वेळात तुमच्या पर्यंत येवून पोचतो.
मोठ मोठे पावसाचे थेंब,सोसाट्याच्या वारा, आणि विजेचा कडकडाट घेवून च .
ते वातावरण खूप धोकादायक असते.
हे लोकांना अनुभव मधून माहीत होते.
ते कुठे प्रयोग शाळेत सिद्ध कोणी केले नव्हते.
मानवी आहार जो पारंपरिक आहे तो अनुभव मधून च आलेला आहे

गुळाने पदार्थ खराब (फर्मेंट) होत नाही असं काही नसावं. दारू (मोहाची वगैरे) बनवताना उलट गूळ घालतात. फर्मेंट होत नसेल तर दारू कशी तयार होईल?
बांधकामात गूळ वापरायचे ते चिकटपणासाठी असेल.

बांधकामातील गुळ हा पॉलीमर च्या चेन ला कच्चा माल म्हणून वापरतात. बाकी साखर गुळ हे प्रिझर्व्हेटिव्ह्ज आहेतच.

मोरावळा करताना साखर किंवा गुळाचा पाक करतात आणि त्या मध्ये आवळे टाकतात.
गूळ किंवा साखरेच्या पाका मुळे आवळे खराब होत नाहीत..

गूळ किंवा साखरेच्या पाका मुळे आवळे खराब होत नाही
<<

: फेसपाम :

देवा, वांग्याच्या भाजीत 'गोडाची चव' म्हणून गूळ टाकलेला आहे. गुळाच्या पाकातली वांगी केलेली नाहीत. मोरावळा, साखरांबा इ. मधे 'पक्का' पाक असतो.

१००% साखर, तेही पाणी नसताना, तर त्यात इतर जीवजंतू वाढत नाहीत.

हेच भोंदू प्रिन्सिपल वापरून एका 'आयुर्वेदिक' कंपनीने ०.१% मध वालं एक औषध विकून भरपूर माया गोळा केली आहे. त्यांच्या जाहिरातीनुसार मध हा 'अँटीबॅक्टेरियल' आहे. थेरी बरोबर, प्रॅक्टीकल चुकीचे.

साखर/ गुळाने फर्मेंटेशन उलट लवकर होईल ना? बेकरी पदार्थांत, अल्कोहिलिक पदार्थांत बॅक्टेरियाना खाद्य म्हणून साखर वापरतात.
अलिबाबा +१

वांग्याच्या भाजीत 'गोडाची चव' म्हणून गूळ टाकलेला आहे. गुळाच्या पाकातली वांगी केलेली नाहीत. मोरावळा, साखरांबा इ. मधे 'पक्का' पाक असतो.
तेच तर.

Pages