भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*“टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.*

१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

२. एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

३. तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.

४. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

*ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.*

टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय?
हा भोंदू फॉरवर्ड नाही. टोल रोड ( पुणे - कोल्हापूर) वर गाडी पंक्चर झाल्यावर 10 मिन मध्ये विना मोबदला चाक बदलून मिळाले आहे.

एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते<<<
थाप वाटते आहे ही, जर गाडीत प्रत्येक वेळि टोल च्या थोडसं पुढे जाउन पेट्रोल्/डिझेल संपेल एवढच प्रत्येक वेळी भरलं तर? ते प्रत्येक वेळेस देनार का पेट्रोल.

मला पण आला होता हा मेसेज. नाव पण आहे लेखकाचे.

*“टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.*
१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

२. एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

सध्या उपलब्ध असणाऱ्या टेक्नो कार मध्ये पेट्रोल इंडिकेटर्स असतात त्यामुळे हे क्वचित होत असावं.
पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.

दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

३. तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.

४. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

*टोल कंपन्यांकडून मिळू शकणाऱ्या या सुविधांचा कोणी गैरवापर करू नये हे मात्र अपेक्षित आहे. “खरंच सर्विस मिळते का?” हे बघण्यासाठी सुद्धा कोणी सहज फोन करू नये.*
कारण, आपण त्यांचा तेवढा वेळ, इंधन मागत असतो ज्याची कदाचित दुसऱ्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त गरज असेल.
परवाना धारक जे गुत्तेदार आहेत त्यांना कोणत्याही हायवे वरील टोलनाक्या जवळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणं हे बंधनकारक आहे. तसं नसल्यास आपण रीतसर तक्रार सुद्धा दाखल करू शकता.
ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.
*सुरेश पाटील*,पञकार
दै.राज्य बाळकडू

उद्यापासून नेटवर्क चित्रे पाठवू नका, समजण्यासाठी पुढील लेख पहा. कृपया गुड मॉर्निंग, संध्याकाळ आणि इतर शुभेच्छा सर्व फोटो आणि व्हिडिओ शक्य तितक्या लवकर हटवा. पुढील लेख काळजीपूर्वक वाचा आणि मी समजतो की मी हे टिप का करीत आहे. यापुढे मी केवळ वैयक्तिक शुभेच्छा फोटो आणि व्हिडिओ पाठवीन. सर्व वाचा! बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी कृपया जास्तीत जास्त मित्रांना हा संदेश तातडीने पाठवा. ओल्गा निकोलायव्हनास वकीलाकडून चेतावणी: लक्ष! ज्यांना गुड मॉर्निंग पाठवायचे आहे त्यांच्यासाठी! तो एक सुंदर दिवस आहे! शुभ संध्या! लोकांना चित्रित करा, कृपया हे चांगले संदेश पाठवू नका. आज शांघाय चायना इंटरनॅशनल न्यूजने सर्व ग्राहकांना एसओएस पाठविले (ही तिसरी स्मरणपत्र आहे) आणि तज्ञ सल्ला देतात: गुड मॉर्निंग, गुड नाईट इ. चे चित्र आणि व्हिडिओ पाठवू नका. अहवालात असे दिसून आले आहे की चीनवर हल्ला करणार्‍या हॅकर्सनी या प्रतिमा डिझाइन केल्या आहेत आणि या प्रतिमा आणि व्हिडिओ सुंदर आहेत, परंतु तेथे एक लपलेला फिशिंग कोड आहे आणि जेव्हा प्रत्येकजण हे संदेश पाठवितो तेव्हा हॅकर्स आपल्या डिव्हाइसचा उपयोग बँक कार्ड माहिती आणि वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी करतात डेटा आणि आपला फोन मध्ये ब्रेक. असे नोंदवले गेले आहे की 500,000 हून अधिक बळी गेले आहेत. आपण इतरांना नमस्कार करू इच्छित असल्यास कृपया स्वत: चे अभिवादन लिहा आणि स्वतःची चित्रे आणि व्हिडिओ पाठवा जेणेकरून आपण आपले स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आणि मित्रांचे संरक्षण करू शकाल. महत्वाचे safe सुरक्षित राहण्यासाठी, कृपया आपल्या फोनवरील सर्व परदेशी ग्रीटिंग्ज आणि चित्रे हटवण्याची खात्री करा. जर एखाद्याने आपल्याला अशा प्रतिमा पाठविल्या असतील तर त्यास तत्काळ आपल्या डिव्हाइसवरून काढा. दुर्भावनापूर्ण कोड लागू करण्यात थोडा वेळ लागेल, म्हणून जर आपण त्वरित कारवाई केली तर कोणतीही हानी होणार नाही. आपल्या सर्व मित्रांना हॅक होऊ नये म्हणून सांगा. आपल्या स्वत: च्या शब्दात हॅलो म्हणा आणि केवळ आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या स्वत: च्या तयार केलेल्या प्रतिमा आणि व्हिडिओ पाठवा, जे स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. कृपया मला काय म्हणायचे आहे ते समजून घ्या! प्रत्येकाच्या मोबाइल फोनवर एक बँक कार्ड संलग्न आहे आणि प्रत्येकजणांच्या मोबाइल फोनमध्ये बरेच संपर्क आहेत. हे खाच केवळ आपल्यासाठीच नाही तर आपला फोन, मित्र आणि परिचितांसाठी देखील धोका निर्माण करते! हे एक क्रूर आहे आपल्या मोबाइल फोनच्या सिमकार्डला भेट देण्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेले हे नवीन तंत्र आहे जेणेकरुन आपण त्यांचे साथीदार व्हाल !!! * * * कोणताही अनधिकृत घुसखोरी रोखण्यासाठी हा संदेश जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा
आपलाच..सचिन अहिरे

ही पोस्ट इथे कदाचित मिसफिट असेल. सत्यता तपासलेली नाही. पण मजकूर काळजी वाटण्यासारखा आहे. वाचला गेला तर नुकसान काही नाही.

विनंती
================
प्रिय मित्रांनो,
कृपया लक्षात घ्या की एखाद्याने इसमाने तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये किंवा इतर कोठे निर्मनुष्य ठिकाणी थांबवले आणि अत्तर व सेंटमध्ये आपल्याला रस आहे का आणि सँम्पल म्हणुन आपल्याला वास घेण्यास कागद दिल्यास त्याचा वास घेऊ नका, याचा वास येत नाही. हा एक नवीन घोटाळा आहे, ते लोक पेपर ड्रग्जसह सज्ज आहेत. त्याचा वास घेताच आपण बेशुध्द पडाल व आपले अपहरण होईल. आपण तेथुन ताबडतोब निघून जा. ते आपले अपहरण करू शकतील, लुटतील किंवा वाईट गोष्टी करतील.
हे ३ पेक्षा जास्त नामांकित मॉल्समध्ये घडले आणि ७ हून अधिक मुली बेपत्ता आहेत कृपया सर्व मित्रांना आणि कुटुंबात फॉरवर्ड करा. कृपया आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य वाचवा, वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून हे प्राप्त झाले आहे, नोंद घ्या आणि आपण संरक्षण करू इच्छित असलेल्या प्रत्येकास सूचना द्या.

कापुराचे झाड --एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते
आता हे झाड शेतात लावणार आहे कारण हे फार मोठे होते जवळपास 80 ते 90 फुट उंच व मुळे खोलवर जातात व पसरतात
इंग्रजांनी त्यांच्या फायद्या साठी आपली ही महाकाय झाडे तोडायला लावली व चहा आणी रबराची शेती केली , लोकांना कापुराचे झाड असते हे ही माहीत नाही हे दुर्भाग्य
हे झाड भारतातुन जवळपास नाहीसे झाल्यातच जमा आहे , लोकांनी कापुरा चे झाड आवर्जुन मोकळ्या जागेत लावावे व आपल्या इथे नामशेष होत चाललेल्या झाडाला पुनर्जीवन द्यावे.
एक कापूर चे झाड अर्धा किलोमीटर च्या रेडिअस मध्ये हवा शुद्ध करते , शुद्ध कापुराचे फायदे सगळ्यांना माहीत आहेतच , पुजेला आपण जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाहीच त्याचा तोटाच जास्त , भीमसेनी कापूर हा शुद्ध व तो ह्या झाडापासून मिळवता येतो.
रोप ऍमेझॉन वरून मागवता येते , हिरवे पुण्य नर्सरी नाशिक येथे मिळेल

Akash Ahale *कापूर रोपे बुकिंग फॉर्म - हिरवेपुण्य नर्सरी.*

* कापूर रोपे बुकिंग साठी खाली दिलेल्या लिंक वर तुमची माहिती भरा आणि पेमेंट करा.
* रोपे विक्री १५ जून पासून.
* रोपे लहान असल्या कारणाने ज्यांना नर्सरीत येऊन रोपे नेता येतील त्यांनी नर्सरीतून न्यावे.
* ज्यांना बस ने डिलेव्हरी हवी आहे त्यांना डिलेव्हरी चार्जेस जादा लागतील व ते पार्सल बुकिंगच्या वेळेवर कळवण्यात येतील.

रोप किंमत ₹150 प्रति रोप
रोपाची उंची 6 इंच ते 1 फूट

>> याच्या पुढे नावं आणि फोन नंबर्स आहेत.

आता या पोस्टचा भोंदूपणा दाखवणारी पोस्ट.

'कापूर' झाडाबद्दलच्या व्हायरल पोस्टची सत्यासत्यता !

सध्या 'कापुराच्या झाडा' बद्दलची एक पोस्ट व्हॉटसऍप विद्यापीठात धुमाकूळ घालते आहे. यात कापुराच्या झाडाचं रसभरीत वर्णन केलेलं आहे. हे झाड कसं आपल्या पर्यावरणासाठी अत्यंत उपकारक आहे हे सांगितलं आहे. तसंच ब्रिटिशांनी चहा-रबराच्या लागवडीसाठी कशी या झाडांची कत्तल केली आणि आपण भारतीयच किती करंटे आहोत की आपण केवळ स्वार्थासाठी हे घडू दिलं असा इतिहासही सांगितला आहे. या सगळ्याचा कळस म्हणजे पोस्टवर विज्ञानाची मस्त चमचमीत फोडणी मारली आहे. एवढं सगळं केल्यावर पोस्ट आकर्षक आणि वाचनीय झाली नसती तरच नवल ! सध्या निसर्ग-पर्यावरण हा खूप संवेदनशील विषय झालेला असल्याने त्याबद्दल काहीही नवीन माहिती आली की त्यावर निसर्गप्रेमी वाचकांच्या उड्या पडतात. तसंच, 'उचललं बोट आणि लावलं फॉरवर्ड ऑप्शन ला' या व्हॉटसऍप विद्यापीठाच्या पहिल्या व मूलभूत नियमानुसार अशी माहिती वणव्यापेक्षाही अधिक वेगाने पसरते. त्यामुळे या पोस्टमध्ये किती तथ्य आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट लिहीत आहे.

१) पोस्टमधील पहिला दावा असा की कापुराचे झाड आजूबाजूच्या किमान अर्धा किलोमीटर रेडियसमधील हवा शुद्ध करते. पण या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सर्वच झाडे कमीजास्त प्रमाणात हवा शुद्ध करतात. झाडांच्या पानात असलेले हरितद्रव्य, पानांनी शोषून घेतलेला कार्बनडाय ऑक्साईड आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने झाडे प्रकाशसंश्लेषण क्रिया करतात आणि स्वतःचे अन्न तयार करतात. या प्रक्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन वातावरणात मुक्त होतो. याचाच अर्थ असा की जेवढे झाड मोठे तेवढी त्याच्या पानांची संख्या अधिक, तेवढे त्याचे प्रकाशसंश्लेषण अधिक आणि तेवढी त्याची कार्बनडाय ऑक्साईड शोषण्याची व ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक. कापुराचे झाड आकाराने खूप मोठे होत असल्याने ते मोठ्या प्रमाणात ही वायूंची देवाणघेवाण करणार हे साहजिक आहे. पण तेच काम त्याच्यासारख्याच मोठ्या आकाराचे भारतीय वृक्ष सुद्धा करतात. कापुराच्या झाडाचा हा काही विशेष गुणधर्म नाही.

दुसरी गोष्ट अशी की या झाडात कापुराचा अंश असला तरी हे झाड हवेत कापुराचा काही अंश सोडून हवा शुद्ध वगैरे करत नाही. या झाडापासून कापूर वेगळा करण्यासाठी त्याच्या खोडाच्या तुकड्यांचे ऊर्ध्वपातन (distillation) करून त्यापासून कापूर वेगळा करावा लागतो. या कापुरामध्ये काही प्रमाणात अँटिबायोटिक (प्रतिजैविक), अँटीफंगल (बुरशीनाशक), कीटक परावर्तक (insect repellent) गुणधर्म असतात असे दिसून आले असले तरी कापूर जाळल्यावर खरोखरच हवा शुद्ध होते का हा अजूनही वादग्रस्त मुद्दा आहे. असे असताना कापुराचे झाड हवेत कापुराची वाफ सोडून हवेतील जीवाणू, विषाणूंचा नाश करते असं समजणं फार भाबडेपणाचं आहे. खरी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलिया देशात लागवड केलेल्या कापुराच्या झाडावर काही किडे व्यवस्थित वाढतात आणि झाडाला पोखरतात. त्यामुळे कापुराचे झाड आजूबाजूच्या अर्धा किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करते हा दावा पूर्ण खोटा आहे.

२) ब्रिटिशांनी आपल्या फायद्यासाठी कापुराची झाडे तोडून तिथे चहा-रबराची शेती केली हा पोस्टमधील दावाही खोटा आहे. 'हे झाड भारतातून जवळपास नाहीसं होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याची लागवड करून आपण त्याला नामशेष होण्यापासून वाचवूया व त्याचं पुनरुज्जीवन करूया' असं सांगून पोस्टकर्त्याने हे भासविण्याचा प्रयत्न केलाय की हे भारतीय स्वदेशी झाड असून माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे त्यावर संक्रांत आली आहे. पण ते खरं नाही. कापुराचं झाड हे मूळचं चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इथलं आहे. भारतातील हिंदू, जैन, बौद्ध समाजात धार्मिक विधींसाठी व औषधे बनविण्यासाठी प्राचीन काळापासून कापुराचा वापर होत असला तरी त्याचे उत्पादन भारतात होत असल्याचा कुठलाही उल्लेख सापडत नाही. आयुर्वेदात Cinnamomum camphora या झाडापासून मिळणाऱ्या कापुराला 'पक्व कापूर', तर Dryobalanops aromatica या झाडापासून मिळणाऱ्या कापुराला 'अपक्व कापूर' (कापूर तेल) म्हणतात. पण ही दोन्ही झाडं भारतीय नाहीत किंवा त्यांच्या व्यावसायिक लागवडीचे उल्लेखही कुठे नाहीत. श्रीलंकेच्या जंगलात कापुराचा अंश असलेले Cinnamomum capparu coronde आणि आपल्या केरळ राज्यातील पश्चिम घाटात Cinnamomum agasthymalaynam या दोन स्थानिक जाती सापडलेल्या आहेत. परंतु अजून त्यापासून कापूर वेगळा करण्याची प्रक्रिया विकसित झालेली नाही. प्राचीन काळापासून भारताचे चीन, आग्नेय आशिया येथील देशांशी व्यापारी संबंध असल्याने कापूर तिथून आयात केला जायचा. अगदी अलीकडच्या काळात दक्षिण भारतात आणि उत्तर भारतातील सहराणपूर, देहराडून व कलकत्ता येथे कापुराच्या झाडांची थोडीफार लागवड झाली आहे. पण त्यातून व्यावसायिक उत्पादन फारसे होत नाही.

३) पोस्टमधील शेवटचा दावा असा की आपण आजकाल पूजेला जो कापूर वापरतो तो खरा कापूर नाही. खरा कापूर म्हणजे भीमसेनी कापूर जो या झाडापासून मिळतो. पण खरी गोष्ट अशी की ज्याला खोटा किंवा कृत्रिम कापूर म्हंटलं जातं तो कापूरही झाडापासूनच बनवितात. पाईन सारख्या सूचीपर्णी वृक्षांच्या डिंकाचे ऊर्ध्वपातन करून त्यापासून टरपेंटाईन तेल मिळवितात आणि या तेलातील अल्फा-पायनीन या रसायनापासून कापूर बनवितात. हा कापूर आणि भीमसेनी कापूर यांचे रासायनिक सूत्र C10 H16 O हे एकच आहे. फक्त त्याच्या रासायनिक संरचनेत थोडाफार बदल आहे. पण भीमसेनी कापूर जाळल्यास हवा शुद्ध करतो व अन्य कापूर जाळल्यास तो घातक परिणाम करतो याला पुरेसा वैज्ञानिक आधार नाही. सत्य असे की कोणतीही वस्तू जाळून हवा शुद्ध होतच नसते.

पोस्टमधील असत्यता पाहिल्यावर आता आपण कापुराची रोपे भारतात लावावीत की नाही याची चर्चा करूया. कापुराचे झाड हे चीन,जपान इथलं स्थानिक असलं तरी जगात खूप ठिकाणी त्याची लागवड झालेली आहे आणि जिथे जिथे ते लावलं त्या त्या ठिकाणी त्याचे स्थानिक पर्यावरणावर घातक दुष्परिणाम दिसून आलेले आहेत. या झाडाला येणारी बेरीसारखी फळे पक्षी आवडीने खातात आणि त्यांच्या विष्टेतून या फळांच्या बिया दूरवर पसरतात. याच्या बियांची रुजवण क्षमता खूप असल्याने व दुष्काळात चिवटपणे तग धरण्याच्या क्षमतेमुळे वर्षावने, दलदली, शुष्क माळराने इथे ही वनस्पती झपाट्याने फोफावते आणि स्थानिक वनस्पतींसाठी घातक स्पर्धा निर्माण करते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील राज्यात लागवड केलेल्या कापुराच्या झाडांनी तिथल्या वनजमिनीवर एवढी घुसखोरी केलेली आहे की त्यांनी आता त्याला invasive species घोषित करून त्याच्या लागवडीवर बंदी घातली आहे. ही झाडे ऑस्ट्रेलियातील कोआला या प्राण्याचे एकमेव खाद्य असलेल्या स्थानिक निलगिरीच्या चिवट झाडांशीही तीव्र स्पर्धा करतात.

कापुराच्या झाडाचा दुसरा मोठा धोका म्हणजे त्याचा अन्य झाडांच्या रुजवण क्षमतेवर होणारा दुष्परिणाम. झाडांनी विशिष्ट रसायने तयार करून अन्य झाडांच्या रुजवण क्षमतेवर परिणाम करण्याच्या या क्रियेला वनस्पतीशास्त्रात ऍलिलोपॅथी (Allelopathy) अशी संज्ञा आहे. कापुराच्या झाडाच्या पानांमध्ये कापुराचा अंश असतो. जेव्हा या झाडाची पानगळ होते तेव्हा जमिनीवर पडलेली पाने कुजताना त्यातील कापूर जमिनीत मिसळतो आणि अन्य झाडांच्या बियांची रुजवण क्षमता संपवितो किंवा कमी करतो. हाच कापूर मातीतील काही उपयुक्त बुरशी देखील नष्ट करतो किंवा त्याचे प्रमाण घटवितो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की किमान ५२ प्रकारच्या झाडांच्या बिया व २७ प्रकारच्या बुरशी यांच्यावर कापुराचा घातक दुष्परिणाम होतो. हा कापूर पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत मुरून नैसर्गिक जलस्त्रोतातही मिसळू शकतो. थोडक्यात काय तर आपल्या आजूबाजूला असलेली स्पर्धा कमी करण्यासाठी कापुराचे झाड हे रासायनिक हत्यार वापरते ज्याचा स्थानिक परिसंस्थेवर घातक परिणाम करते.

वरील विवेचनावरून असे लक्षात येईल की कापुराचे झाड भारतीय नसून त्याची इथे लागवड केल्यास त्याचे स्थानिक परिसंस्थेवर वाईट परिणाम होतील हे उघड आहे. पण व्हॉटसऍपवर सध्या फिरणारी पोस्ट या झाडाची प्रचंड भलामण करते आहे. अर्थात, ते काही रोपवाटिका चालकांचं मार्केटिंग तंत्र आहे. त्यासाठी त्यांनी कापुराच्या झाडाचं तोंडभरून कौतुक केलं आहे, हे झाड स्वदेशी आहे असं नकळतपणे भासवलं आहे, ब्रिटिशांनी कशी याची कत्तल केली हे सांगून त्यांच्यावर बिल फाडलं आहे, पुन्हा आपण भारतीय कसे ब्रिटिशांच्या जाळ्यात फसलो हे भासवून निसर्गप्रेमींच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा व सर्वांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुरेशी वातावरण निर्मिती होईल याची खात्री झाल्यावर हळूच रोपांच्या किंमती, ते मिळण्याची ठिकाणं, तुम्हाला रोपं तुमच्या भागात उपलब्ध करून देण्याची सोय, त्यासाठी नेमलेल्या व्यक्ती, त्यांचे मोबाईल नंबर असे तपशील पोस्टमध्ये घुसवलेत. निसर्गप्रेमींनी हा कावा वेळीच ओळखण्याची गरज आहे. 'ज्ञानवर्धक' पोस्टच्या वेष्टनातून एक 'व्यवसायिक जाहिरात' सर्वांच्या माथी मारली जात आहे.

मी तमाम निसर्गप्रेमींना कळकळीची विनंती आणि आवाहन करतो की कृपया अशा फसव्या पोस्ट्सना बळी पडून आपल्या स्थानिक निसर्गाचं वाटोळं होईल असं काही करू नका. एकदा एखाद्या घुसखोर विदेशी वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या प्रजातीचा फैलाव आपल्या देशात झाला की नंतर ती घुसखोर प्रजात आवरता आवरत नाही. येडी बाभळ, टणटणी अशी काही उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यात आता आणखी भर नको. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा पोस्टवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि त्या पोस्ट व्हायरलही करू नका. प्रत्येक निसर्गप्रेमी व्यक्तीने एवढे तारतम्य बाळगल्यास आपण ही जैविक घुसखोरी थांबवू शकू.

© ✍️ डॉ. हर्षद दिवेकर
नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली.

*मी डॉ. दिपाली,*
* *माझे म्हणणे आहे की या कडाक्याच्या थंडीत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनी रात्री १० वाजता झोपल्यानंतर जेव्हाही तुम्ही अंथरुणावरून उठता तेव्हा लगेच उठू नये. कारण थंडीमुळे शरीरातील रक्त घट्ट होते, नंतर हळूहळू काम केल्यामुळे ते हृदयापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकत नाही आणि शरीर निघून जाते. या कारणास्तव, 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हृदयविकारामुळे होणारे अपघात हिवाळ्याच्या महिन्यांत खूप जास्त असल्याचे आढळून आले आहे, म्हणून आपण खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मी पण तीच सूचना देतो.*
*साडेतीन मिनिटे: माझा सल्ला!*
विजयसिंह राजपूत डॉ
सामान्य चिकित्सक
*ज्यांना सकाळी किंवा रात्री झोपताना लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी खास माहिती!!*
या साडेतीन मिनिटांत प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी.
*ते इतके महत्त्वाचे का आहे?*
या साडेतीन मिनिटांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतात, तेव्हा रात्रीच सुदृढ व्यक्तीही मृतावस्थेत आढळते.
अशा लोकांबद्दल आम्ही म्हणतो की, आम्ही त्यांच्याशी कालच बोललो. अचानक काय झालं? तो कसा मेला?
याचे मुख्य कारण असे आहे की जेव्हा आपण रात्री लघवी विसर्जनासाठी जातो तेव्हा अचानक किंवा अचानक आपल्याला जाग येते, परिणामी मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही.
ही साडेतीन मिनिटे खूप महत्त्वाची आहेत.
जेव्हा आपण मध्यरात्री लघवी करण्यासाठी उठतो तेव्हा आपला ईसीजी पॅटर्न बदलू शकतो. याचे कारण असे की, जेव्हा आपण अचानक उभे होतो तेव्हा मेंदूपर्यंत रक्त पोहोचत नाही आणि आपले हृदय काम करणे थांबवते.
साडेतीन मिनिटांचा प्रयत्न हा एक उत्तम उपाय आहे.
1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.
2. *पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा.*
3. *पुढील अडीच मिनिटे गादीखाली पाय डोलत राहू द्या.*
साडेतीन मिनिटांनी तुमचा मेंदू रक्ताशिवाय राहणार नाही आणि हृदय काम करणे थांबवणार नाही! यामुळे आकस्मिक मृत्यूही कमी होतील.
तुमच्या प्रियजनांना फायदा झाला आहे, त्यामुळे त्यांना जाणीव करून देण्यासाठी नक्कीच प्रसारित करा.
*धन्यवाद!!*
45+ साठी खूप महत्वाचे
विनंत्या आणि विनंत्या
तुम्हाला हा मेसेज तुमच्यापैकी फक्त 10 लोकांना फॉरवर्ड करावा लागेल आणि त्या 10 लोकांनी हा मेसेज इतर 10 लोकांना फॉरवर्ड करावा.
तुम्हाला फक्त एक लिंक जोडायची आहे आणि लवकरच संपूर्ण देश फक्त आठ पायऱ्यांमध्ये जोडला जाईल. ,
आवडल्यास सर्व मित्रांसोबत शेअर करा-

1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.
2. *पुढील अर्धा मिनिट गादीवर बसा.*
3. *पुढील अडीच मिनिटे गादीखाली पाय डोलत राहू द्या.*.........
Submitted by सस्मित on 16 November, 2021 - 09:51

मला हे वाचून बेस्ट बसच्या ड्रायव्हर केबिनमधली सूचना आठवली!
इंजिनवर बसवलेल्या टर्बोचार्जर युनिटचे RPM एक लाख प्रती मिनिट असल्याने त्याला ल्युब्रिकेशनची आवश्यकता असते. त्यामुळे बसगाडी चालू केल्यावर तसेच बंद करण्यापूर्वी इंजिन सुमारे ३ मिनिटे आयडलिंग स्पीड मध्ये ठेवावे!!!

1. झोपेतून उठताना अर्धा मिनिट गादीवर झोपावे.
अर्धा मिनिटच्या आधी गादीवर काय उभे की तरंगत असतो ?????? >> आधी गादीखाली झोपले असतील. म्हणून त्यांना सांगावं लागलं की निदान अर्धा मिनिट गादीवर झोपावे.

मुळात घाई होते म्हणून तर रात्री उठाव लागतं
नैतर आमच्या सारखे आळशी बघू उद्या सकाळी म्हणत झोपून राहतात
तर घाई झालेली असताना अडीच मिनिटे यात घालवली तर कसं व्हायचं Happy

बेस्ट बसचे इंजिन Lol गादीखाली/गादीवर Lol

हो, मला सुध्दा आला होता हा फॉरवर्ड. पण पहिल्या दोन तीन वाक्यातच कळले भोंदू असणार म्हणून पुढे वाचले नाही. इथे पूर्ण वाचला. काय भाषा Lol बहुतेक गुगल भाषांतरीत आहे. मान डोलते माहीत होते. पाय डोलतात? नागासारखे का? Lol

https://www.politifact.com/factchecks/2019/sep/26/viral-image/sitting-to...
इथे मूळ इंग्रजी संदेशाचे अंश आणि त्याचं fact check वाचता येईल.

लोक बीपीचा त्रास असणाऱ्यांनी झोपलं असताना चटकन उठून उभं राहिलं तर त्यांना चक्कर येऊ शकते

मालवणी नाहीतर माल वन
आपणास माहिती आहे का ? मालवण नाव कसे पडले भले 14 व्या शतकात दक्षिण भारतात विजयदुर्ग व मालवण ही दोन मोठी बंदरे होती या बंदरावर होऊन आखाती देशाचा आपला व्यापार होत होता. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कुणकेश्वर मंदिर हे 14 व्या शतकात एका अरबी व्यापाऱ्याने बांधले आहे. आजही अग्र पूजेचा मान मुस्लिम समाजाचा पहिला आहे .
सर्व जगामध्ये भारतातून निर्यात होणारा मालाच दर्जा व याची प्रत याचा एक नंबर (वन नंबर माल) माल वन असा उल्लेख जगातले सर्व व्यापारी करत होते तेच आजचे माल वन
उदाहरणार्थ मालवणी खाजा जगात एक नंबर आहे माहित नसेल खाजा हा प्रकार संपूर्ण भारत पाकिस्तान बांगलादेश ब्रम्हदेश आणि लंका येथे तयार होतो .सर्वत्र खाजाउपलब्ध आहे
मात्र मालवणमध्ये तयार होणारा खाजा हा आले, गुळ, बेसन,
काळे तीळ, असा चौरस आहारा मध्ये तयार होतो.
दुसरा झाडू हा प्रकार एवढा मजबूत बांधणीचा झाडू फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार होतो .ज्याच्या झाडूच्या वरच्या भागाने त्याला मुगडा म्हणतात .नारळ फोडतात येतो .अशा प्रकारच्या झाडूला वाढवन म्हणतात वाढवन या शब्दाचा अर्थ धन ,पैसा ,लक्ष्मी ,ऐश्वर्य ,यात जी वाढ करते त्याला वाढवन असे म्हणतात. आंबा जगात सर्वत्र तयार होतो मात्र वन नंबर हापूस आंबा मालवण बंदरातूनच निर्यात होत होता.
सुखा खोबरा राजापूर मालवण बंदरातून जगात निर्यात होत असे. आजही राजापुरी सुके खोबरे जगात एक नंबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या सुक्या खोबर्याला विकत घेणार्या पोर्तुगीज लोकांना एक पैसा कर लावून तो शेतकरयांना मिळवून दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.
जगातील सर्वात श्रेष्ठ दर्जाचे जे तेल हे कोकम तेल पण याच बंदरातून निर्यात होत असे. याचा वापर लिपस्टिक बनवणे औषधे ,मलम ,बनवणे स्वैपाक यासाठी होत होता. तसेच मालवण वेंगुर्ला या भागात तयार होणारा काजू जगातील सर्वोत्कृष्ट काजू म्हणून ओळखला जातो. याची चव ही असामान्य असून कलिफॉर्निया तसेच आफ्रिकन काजू पेक्षा सर्वश्रेष्ठ दर्जाचा काजू हा मालवण बंदरातून निर्यात होत होता असा हा हा एक नंबर चा माल ज्या बंदरात मिळत होता त्या परिसराला कुरटे बेट असे नाव होते. पण एक नंबर माल ,वन नंबर माल,
माल वन ,असा उल्लेख करता करता मालवन चे रूपांतर मालवणमध्ये झाले. व इथे बोलणाऱ्या भाषेला मालवणी असे नाव पडले माहिती आवडली असेल तर ती शेअर करा परवानगी ची गरज नाही
Xxxxxxxxxxxxxx
मुक्काम पोस्ट वडखोल आसोली
तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग
९४०४१xxxxx

ह्या साईट वर या तीन थियरी मिळाल्या:
१. माडाचे वन (जंगल) म्हणून माडवन. त्याचेच पुढे मालवण झाले. (हे व्यक्तिश: मला सर्वाधिक पटते. कारण जैतापूर जवळ सुद्धा एक 'माडवन' आहे)
२. लवण म्हणजे मीठ. इथे मोठी मिठागरे होती. महा-लवण चे पुडे मालवण झाले.
आणि यातच पुढे त्यांनी हि वरच्या फोरवर्ड मध्ये आलेली थियरी तिसरी म्हणून दिली आहे Happy

Pages