भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विकु
मी अनेक दिवसात इतकी हसले नव्हते Happy

>> मी तर गडबडीत आपली माणसे कुठेही पादली तरी वास येणारच असे वाचले !
>> Submitted by vijaykulkarni on 5 December, 2020 - 21:27

Actually Lol मी तर असे वाचले कि "मोगरा कुठेही असला तरी वास येणारच, तसे आपली माणसे कुठेही असली तरी पादणारच"

यावरून एक किस्सा आठवला. होस्टेलमध्ये असताना एकजण घरून आणलेली भजी खात होता. खाताना पादला. त्याचा वास गाडीच्या धुरासारखा आला. तर एकाने ताडकन त्याला विचारले, "भजी काय इंजिन ऑईल मध्ये तळली होतीस काय रे. असा कसा वास आला?" Biggrin

FB_IMG_1607201289329.jpg

खखो हिप्पो जाणे ! यावर विश्वास ठेवून तर अजून दुसऱ्या फोरवर्ड उपायांचे प्रयोग करतील :कपाळाला हात:
मी आधी म्हणाले तसं फेकाफेकीत खरंच डायवर्सिटी येतेयं.

*********

या न्यु एज सद्गुरूंंचा कुणाला कंटाळा आला आहे का... मला आलाय घोर कंटाळा आलायं !
20201205_150709.jpg

त्यांचे सगळे विडिओ अनसबस्क्राइब /ब्लॉक करूनही हे कसे येतात काय माहिती.... फेसबुक/ कायप्पा/युट्यूब सगळीकडे उच्छाद मांडलाय. आधी बरं वाटायचं पण नंतर हे गोलगोल आहे हे कळालं .

त्यांचे व्हिडीयोज इमानेइतबारे वॉर्डरोब आयडीयाज साठी मोजून साडेतेवीस सेकंद बघायचे. इतका फॅशन कॉन्शिअस गुरू मी आजवर पाहिला नाही. बाकी सारे भगवे, पांढरे इ कंटाळवाणे कपडे घालतात...

मोटरसायकल (हार्ली) राइड पाहिलीस का ? थाट आहे मोठा... असेनाका थाट पण उच्छाद आवरा झालं.
आयडिया बघून कोण घालणारं ते कपडे घरच्या ज्येना वर प्रयोग का Biggrin माझ्या पपांएवढेचेत सांगू का त्यांना नो टेलर ओनली सद्गुरू! #OnlyVimal#

हा कोणता गुरू आहे?
मी ज्या ज्या गुरू आणि बाबा ला फॉलो करतो तो जेल मध्ये जातो... आता बंद केलेय फॉलो करणे...

त्यांच्याकडून ठराविक शब्द वापरून प्रभावी English communication कसे करावे हे शिकण्यासारखे आहे
Cosmos, Enlightning, Conscience, Consciousness, Eternity, Universe, Soul, Mind, Inner peace.... अजून काय?

पर्सनल स्पेस हॉन्ट करतात युट्यूबवर अनसब्सक्राइब करूनही सतत सजेशन्स म्हणून कंटाळा ... माहिती नाही का पण अति झाले की माझे कल्ट अँलर्ट एन्टेने active होतात. एकदमच डिच करते सगळं !

हे आहेत जग्गी वासुदेव. सध्या त्यांना सद्गुरु असे संबोधले जाते. ते इनर इंजिनीअरींग नावाचा कोर्स घेतात इशा फाउंडेशन द्वारे.
वर लिहिल्याप्रमाणे हे विविध इंग्रजी शब्द खुबीने वापरून आपण जे बोलतो आहोत ते कसे वैज्ञानिक दॄष्ट्या बरोबर आहे असे पटवण्याचा बरेचदा यशस्वी प्रयत्न करतात.
उदा: रामानुजनने विकसित केलेले गणित आता कृष्णविवरांच्या संशोधनात वापरले जाते. पण सद्गुरू थेट रामानुजनने कसे कृष्णविवरांचा विचार इतर कुणाच्याही आधी केला होता असे ठामपणे सांगतात.

हे आमच्या सिनिअर बॅचच्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. आमच्या एका आग्र्याच्या मित्राने घरी फोनवर बोलताना कॉन्वोकशनला जोगी ठाकूर आले आहेत म्हणून सांगितले होते.

असाच एक ढोंगी आहे दीपक चोप्रा. त्याची लेनर्ड म्लॉडिनॉवने जाम खेचली होती. बट टू हिज क्रेडिट, म्लॉडिनॉव्ह तिथेच थांबला नाही. त्याने दीपक चोप्रा बरोबर एक खंडन-मंडन स्वरुपातले पुस्तकही लिहिले.

@ टवणे सर
सद्गुरू यांच्या थापाही ही सुरू झाल्या का Sad
दीपक चोप्रा मलाही लबाड वाटतो.. सहमत !
मी ओपराची चहाती असल्याने तिची ज्याच्यावर कृपा त्याचे नशीब फळफळते असं वाटतं. (दीपक चोप्रा/ Dr. Oz / Rachel Ray)
मी हे व्यक्त करू शकल्याने मला बरं वाटतयं.
अवांतर पुरे करते.

काल यूट्युबवर 'कैलास पर्वताची निर्मिती कशी झाली' अश्या नावाच्या व्हिडियोचे सजेशन आले होते, लोकसत्ताच्या ऑफिशियल यूट्युब चॅनलवर. मी उघडून पाहिलं तर पूर्ण व्हिडियो सद्गुरूंच्या एका व्हिडियोचं ते मराठीत डबिंग होतं. लोकसत्ता, तुम भी!!!

ते काय एआय आणि ऑटो टॅग ने सजेशन्स येत असतील पेपर च्या चॅनलवर.बिचाऱ्या निष्पाप मशीन ला काय कळणार लोक थापा मारतात ते Happy

करू का फॉलो... आसाराम ला करायचो.. ,जेल मध्ये गेला.. नंतर गुरू राम रहीम..आश्रम वेब सिरीज बनली त्यावर... जेल मधेय... नंतर नित्यानंद स्वामी...

मला आवडतात सद्गुरू. ते हसायला लागले की कसे गदगदा हलतात ते बघण्यासाठी मी त्यांचे विडिओ आधी बघते आणि नन्तर प्रॅक्टिस पण करून बघते. माझे डोकेच हलते फक्त, तेही मीच मुद्दाम हलवते म्हणून.

त्यांचा वॉर्डरोब आवडतो. डोक्याला जे बांधतात ते मस्तच आहे. हे असे दिवसरात्र बांधून राहतात की व्हिडिओपुरते देव जाणे. त्यांचे उच्चार आधी अमेरिकन वाटायचे, माधुरी दीक्षित जसे अमेरिकन इंग्रजीत बोलते तसे. आता माधुरीही भारतीय इंग्रजीत बोलते आणि सद्गुरूपण. दोघेही फॉर गुड परतले बहुतेक.

शनिशिंगणापूर देवळात स्त्रियांनी का जाऊ नये याचं सद्गुरूने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून माना डोलावणारे (ऱ्या)अनेक जण/णी माझ्या परिचयात आहेत हे आठवून ही कसं कसं होतं.

---------------
*मोरपीस*
------------------

*जाणून घ्या मोरपीस घरात ठेवल्याने होतात हे आश्चर्यकारक फायदे !*

१)घराच्या आग्नेय कोपऱयात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही अडचण येत नाही.

२)मंदिरातील राधा-कृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात ४० दिवसांसाठी मोरपीस लावावे.
त्या मूर्तीला दररोज तुप-साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि ४१ व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे.
यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रवाह वाढतो.

३)ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री झोपताना आपल्या उशीत सात मोरपिसे टाकावीत.

४)दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीतकमी ११ पिसे असणारा पंखा लावावा.
कालसर्प दोष दूर करण्याची ताकद मोरपिसात असल्याचे म्हटले जाते.

५)घरात मस्तीखोर मूल असेल तर तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपिसे बांधा.
पंखा फिरताना मोरपिसांद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल.

६)नवजात बाळाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा. त्यामुळे बाळाला नजर लागणार नाही आणि त्याचे संरक्षण होईल.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी*
------------------------------------------------

सद्गुरु कम्युनिझम बद्दल कैच्या काई बोललेले ते ऐकून जाम हसलेलो.
"कम्युनिस्टांना वाटते श्रीमंत आपली संपत्ती सर्वांना वाटतील. हे त्यांचे स्वप्नरंजन आहे" हे कम्युनिष्ठांबद्दल बोलणे म्हणजे कम्युनिझम कशाशी खातात माहित नसणे.


हे वाक्य उलट होते ना. म्हणजे श्रीमंतांना वाटते असे?

*चढलेला मोठा आवाज*

लेखक : शरद उपाध्ये
----------------------------

आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढल्या आवाजात बोलू नये. विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग शांत करावा.

घरांतील माणसे जिवाला जीव देणारी असतात. प्रकृती बिघडली तर पहिली धाव घेऊन डाॅक्टरांकडे नेतात ती आपली घरांतील माणसे. नंतरही ती सेवा करतात. आई, पत्नी, मुले जी काळजी घेतात तशी हाॅस्पिटलमध्ये घेतली जात नाही. त्यात *'ड्युटी'* असते, आपुलकी नसते. म्हणून रुग्णाला लवकर डिस्चार्ज घेऊन घरी यावेसे वाटते. कारण घरात वात्सल्यमूर्ती आई असते. 'मदर' नसते. प्रेमळ बहिण असते, 'सिस्टर' नसते.

आपल्या आईला रागाच्या भरात ओरडताना मुलामुलींनी आठवावे की आपल्या आजारीपणात आपल्याला उठवतही नव्हते, एकहीजण जवळ येत नव्हता तेंव्हा फक्त आईने रात्र रात्र जागून आपले स्पंजिंग केले, घाम पुसला, मलमूत्र स्वच्छ केले, चहा पाजला, जेवण भरवले, सारखे खोलीत येऊन डोक्यावरून हात फिरवला तर या आईचा असा अपमान ? मातृसौख्याला बालपणीच मुकलेल्यांना विचारा मातृवियोगाचे दु:ख काय असते. म्हणून आपल्या प्रेमळ मातेचे, कष्टाळू पित्याचे, भावंडांचे, मित्रांचे, गुरुंचे ऋण कधीही विसरू नये. घरात हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत.

घरांतील नोकरवर्गावरही तारस्वरात ओरडू नये कारण त्यांना राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. अचानक पोट बिघडते. भूक मंदावते. अस्वस्थ वाटू लागते. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृष्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो.

शुभ लहरींचे ही तसेच आहे. १२ हजार मैलांवर असलेल्या मुलाला आई आशिर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. २५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गायीला पान्हा फुटतो.

एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवितात. सफाई कामगाराला बक्षिस दिले तर तो हात उंचावून आशिर्वाद देणार नाही, थँक यु म्हणणार नाही पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंदलहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फिल्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतीलच. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे.

फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून मंत्रपठण करताना, स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा. घरातही असा भले तुम्ही मग कितीही बैठक, सत्संग करा पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तुमच्या आरडा ओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल नाही तर सगळं व्यर्थ आणि देखावा आहे.

*"शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो असे भगवान दत्तप्रभू सांगतात."*

|| श्री गुरुदेव दत्त |

२५ वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते.
>>> हे कसे शक्य आहे. आणि 25 वर्षाचा करण कुंतीने कधी पाहिला?

Pages