भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Self-limiting (a.k.a. self-recovering) is a term used in clinical medicine to refer to any disease whose natural history is to resolve without treatment. Many viral illnesses, e.g. upper respiratory tract infections, are self-limiting as patients will recover without taking any form of medicine.

self-limited diseases can produce strong overestimations of effectiveness for treatments that actually produce no effect

Most types of jaundice are self limiting.

आजवर पुलं आणि वपू यांच्या नावाने वाट्टेल ते खपवले जात असे. आज मात्र आद्य कवींच्या नावाने हे आले.
याची इंग्रजी भाषांतरेही उपलब्ध आहेत आंतरजालावर (इंग्रजीवरूनच हे मराठी केले असणार). पण भाषा पाहता हे शेक्सपिअरचे अवतरण असण्याची शक्यता फारच कमी वाटते.

WhatsApp Image 2020-12-03 at 7.53.29 PM.jpeg

What's in a name? That which we call a rose. By any other name would smell as sweet. Happy Wink जाऊ द्या, रागावला शेक्सपियर तर सांगू त्याला व्हॉटस इन अ नेम...

सीमंतिनी, अहो ते वाक्यही घेतलं आहे ह्या भोंदू लोकांनी, म्हणे -

'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास

वपु , पुल , नाना पाटेकर..
आता शेक्सपिअर , फेकाफेकीत डायवर्सिटी येत आहे.
सकारात्मक मुद्दा Wink
लोक पुण्यकर्म असल्यासारखे भक्तिभावाने पुढे फेकतात.
रच्याकने , हा कधीही वेअरवुल्फ होईल असा लुक आहे.

शेक्सपिअर चे वचन Lol

'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास >>> Lol

व्हॉट्सॅप वरची वचने फॉरवर्ड करणारे व शेक्सपिअर वाचणारे यांची वर्तुळे काढली तर किंचितही ओव्हरलॅप नसेल. अटेन्शन स्पॅन मधला फरक प्रचंड असेल Happy

आता शेक्सपिअर , फेकाफेकीत डायवर्सिटी येत आहे. >>
रच्याकने , हा कधीही वेअरवुल्फ होईल असा लुक आहे. >>> Lol

"दिल" सारखा रिचर्स होउन जाउ द्या यावर एक Happy

हे असले फॉरवर्ड निगुतीने तयार करणारे रिकामटेकडे नेमके कोण असतात ? त्यांना काय मिळते ?
तरीही असले निरुपद्रवी फॉरवर्ड व आरोग्याला घातक फॉरवर्ड यात फरक आहे.

या वीकेंड ला मीही एक करेन.
"टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र.
लोक न वाचताच फॉरवर्ड करतील याची खात्री आहे.

"टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. >>> Lol हो ते मुलांना काहीतरी शिकवतानाचा फोटो.

किंवा कलाम म्हणून ए आर रहमानचा फोटो.

विकु, त्यावर कलाम हे शाकाहारी होते असा उलट प्रहार होइल. ही असली सगळी भोंदू फॉरवर्ड्स साजूक असणे गरजेचे आहे. आपट्याची पाने, गाईचे शेण, हाताच्या तळव्यावरचे पॉइंट्स वगैरे वगैरे. चिकन, मटण, बीफ चालत नाही त्यात.

"टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते>>>>>>> शाळेत असताना अशा टाईप्स सुविचार होते Lol

"केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा" हा एक असा अजरामर सुविचार आहे.

"केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद व्हा" >> Rofl
माहिती होता, पण आत्ता बऱ्याच दिवसांनी वाचला!!

*इटली विश्व का पहला देश बन गया है जिसनें एक कोविड-19 से मृत शरीर पर अटोप्सी  (पोस्टमार्टम) किया और एक व्यापक जाँच करने के बाद पता लगाया है कि वायरस के रूप में कोविड-19 मौजूद नहीं है,*
*बल्कि यह सब एक बहुत बड़ा ग्लोबल घोटाला है।*
*लोग असल में "ऐमप्लीफाईड ग्लोबल 5G इलैक्ट्रोमैगनेटिक रेडिएशन (ज़हर)" के कारण मर रहे हैं।*
*इटली के डॉक्टरों ने विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) के कानून का उल्लंघन किया है, जो कि करोना वायरस से मरने वाले लोगों के मृत शरीर पर आटोप्सी (पोस्टमार्टम) करने की आज्ञा नहीं देता ताकि किसी तरह की वैज्ञानिक खोज व पड़ताल के बाद ये पता ना लगाया जा सके कि यह एक वायरस नहीं है, बल्कि एक बैक्टीरिया है जो मौत का कारण बनता है, जिस की वजह से नसों में ख़ून की गाँठें बन जाती हैं यानि इस बैक्टीरिया के कारण ख़ून नसों व नाड़ियों में जम जाता है और यही मरीज़ की मौत का कारण बन जाता है।*
*इटली ने इस वायरस को हराया है, ओर कहा है कि "फैलीआ-इंट्रावासकूलर कोगूलेशन (थ्रोम्बोसिस) के इलावा और कुछ नहीं है और इस का मुक़ाबला करने का तरीका आर्थात इलाज़ यह बताया है........*
*ऐंटीबायोटिकस* *(Antibiotics tablets}*
*ऐंटी-इंनफ्लेमटरी* *(Anti-inflamentry) और ऐंटीकोआगूलैटस* *(Aspirin) को लेने से यह ठीक हो जाता है।*
*ओर यह संकेत करते हुए कि इस बीमारी का इलाज़ सम्भव है,*
*विश्व के लिए यह संनसनीख़ेज़ ख़बर इटालियन डाक्टरों द्वारा कोविड-19 वायरस से मृत लाशों की आटोप्सीज़ (पोस्टमार्टम) कर तैयार की गई है।*
*कुछ और इतालवी वैज्ञानिकों के अनुसार वेन्टीलेटर्स और इंसैसिव केयर यूनिट (ICU) की कभी ज़रूरत ही नहीं थी।*
*इस के लिए इटली में अब नए सिरे से प्रोटोकॉल जारी किए गए है ।*
*CHINA इसके बारे में पहले से ही जानता था मगर इसकी रिपोर्ट कभी किसी के सामने उसने सार्वजनिक नहीं की।*
*कृपया इस जानकारी को अपने सारे परिवार, पड़ोसियों, जानकारों, मित्रों, सहकर्मीओं को साझा करें ताकि वो कोविड-19 के डर से बाहर निकल सकें ओर उनकी यह समझ मे आये कि यह वायरस बिल्कुल नहीं है बल्कि एक बैक्टीरिया मात्र है जो 5G रेडियेशन के कारण उन लोगो को नुकसान पहुँचा रहा है जिनकी रोग प्रतिरोधक क्षमता बहुत कम है ।*
*यह रेडियेशन इंफलामेशन और हाईपौकसीया भी पैदा करता है।*
*जो लोग भी इस की जद में आ जायें उन्हें *Asprin-100mg और *ऐप्रोनिकस या पैरासिटामोल 650mg लेनी चाहिए ।* *क्यों...???*
*....क्योंकि यह सामने आया है कि कोविड-19 ख़ून को जमा देता है।* *जिससे व्यक्ति को थ्रोमोबसिस पैदा होता है और जिसके कारण ख़ून नसों में जम जाता है और इस कारण दिमाग, दिल व फेफड़ों को ऑक्सीजन नहीं मिल पाती जिसके कारण से व्यक्ति को सांस लेने में दिक्कत होने लगती है और सांस ना आने के कारण व्यक्ति की तेज़ी से मौत हो जाती है।*
*इटली के डॉक्टर्स ने WHO के प्रोटोकॉल को नहीं माना और उन लाशों पर आटोप्सीज़ किया जिनकी मौत कोविड-19 की वजह से हुई थी।*
*डॉक्टरों ने उन लाशो की भुजाओं, टांगों ओर शरीर के दूसरे हिस्सों को खोल कर सही से देखने व परखने के बाद महसूस किया कि ख़ून की नस-नाड़ियां फैली हुई हैं और नसें थ्रोम्बी से भरी हुई थी, जो ख़ून को आमतौर पर बहने से रोकती है और आकसीजन के शरीर में प्रवाह को भी कम करती है जिस कारण रोगी की मौत हो जाती है।*
*इस रिसर्च को जान लेने के बाद इटली के स्वास्थ्य - मंत्रालय ने तुरंत कोविड-19 के इलाज़ प्रोटोकॉल को बदल दिया और अपने पोज़िटिव मरीज़ो को एस्पिरिन 100mg और एंप्रोमैकस देना शुरू कर दिया।*
*जिससे मरीज़ ठीक होने लगे और उनकी सेहत में सुधार नज़र आने लगा।*
*इटली स्वास्थ्य मंत्रालय ने एक ही दिन में 14000 से भी ज्यादा मरीज़ों की छुट्टी कर दी और उन्हें अपने अपने घरों को भेज दिया।*
*स्रोत: इटली स्वास्थ्य मंत्रालय।*
------------------------------------------------

धन्य ते स्कॉलर, धन्य ते टापर __/\__

सगळेच Lol
"मोळी विका पण शाळा शिका" असा पण एक सुविचार ऐकला होता. आता शहरात शिकत असाल तर मोळी कुठे नि का नि कशाला विकायची? नि शहरात मोळी विकली जाईल इतकी सेल्समनशिप अंगी असेल तर शाळा का शिकायची??... पण ह्या सुविचाराचे चित्र इ घालून फॉर्वर्ड मस्त बनेल.

"टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाची साखर व प्रामाणिकपणाचे केशर टाकले की यशाचा साखरभात होईल ना.... जो डॉ कलामांना चालेल?

आमच्या शाळेत सुविचार लिहिलेला असायचा
गवत डुलतं, फूल फुलतं आणि अमुक अमुक विद्यालयाचं नाव खुलतं.
अत्यंत काहीही सुविचार आहे हा.

"मोळी विका पण शाळा शिका" असा पण एक सुविचार ऐकला होता. आता शहरात शिकत असाल तर मोळी कुठे नि का नि कशाला विकायची?

म्हणुन तर गांधीजी म्हणालेत नां की "खेड्याकडे चला" मोळी विकता येईल तिकडे.

आपट्याची पाने, गाईचे शेण, हाताच्या तळव्यावरचे पॉइंट्स >> हे वाचता वाचता पुढे 'सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, सोन्यासारख्या माणसांना सोनेरी शुभेच्छा' छाप मेसेजेस आठवले.

हे असले फॉरवर्ड निगुतीने तयार करणारे रिकामटेकडे नेमके कोण असतात ? त्यांना काय मिळते ?>>>>

मलाही हा प्रश्न पडायचा पण मी एकदा हा प्रयोग करून पाहिला
एक विचित्र दिसणाऱ्या सापाच्या फोटोला फोटोशॉप मध्ये निळा रंग देऊन त्या सोबत खरी वाटेल अशी तद्दन खोटी माहिती लॅटिन नाव, स्थानिक नाव, लांबी, आकारमान, भक्ष्य अस काय काय टाकून
किती वर्षे जगतो आणि आज हा साप प्रचंड दुर्मिळ आहे असा मजकूर टाकून आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये टाकला होता
मला कल्पनाही नव्हती इतका त्याचा प्रसार झाला आणि दोन तीन दिवसांनी तोच फोटो आणि मजकूर मला आला आणि हा साप आंबोली घाटात अभ्यासकांना सापडला असे देखील त्यात जोडण्यात आलं होतं
मी कपाळावर हात मारून घेतला
आता वाईट वाटतंय की त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून ही घटना लिहून ठेवायला हवी होती
मला आता ती ओरिजिनल पोस्ट सापडत नाहीये

कठीण आहे आशु. Happy
तसंच ते जांभळा आंबा वाली एक फेक पोस्ट पण फिरायची ना?

अशा रितीने 'ओरिजिन ऑफ ए भोंदू फॉर्वर्ड' ह्या गोष्टीचा उलगडा झाला
<<
कर्रेक्ट.

आशुचँप यांना "भारतीय भोंदू फॉर्वर्ड्सचे जनक" अशी पदवी देण्यात येत आहे Lol

Lol

*घराचा प्रमुख होणे सोपे नाही......*
*त्याची स्थिती पत्र्याच्या शेड सारखी असते,*
*जो ऊन,पाऊस,वारा,वादळ आदी सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो,*
*परंतु त्या खाली राहणारे नेहमी म्हाणतात की,"हा खुप आवाज करतो."*

* शुभ सकाळ *
------
तो ला तो लावून तयार केलेले हे ताजे तत्त्वज्ञान बघा काय म्हाणते Biggrin

हे आद्य नवकवी आहेत तरी कोण ?

त्यावर कलाम हे शाकाहारी होते असा उलट प्रहार होइल. ही असली सगळी भोंदू फॉरवर्ड्स साजूक असणे गरजेचे आहे. आपट्याची पाने, गाईचे शेण, हाताच्या तळव्यावरचे पॉइंट्स वगैरे वगैरे. चिकन, मटण, बीफ चालत नाही त्यात.
_______/\______

आणि हा साप आंबोली घाटात अभ्यासकांना सापडला असे देखील त्यात जोडण्यात आलं होतं >>> Lol

शेवटी निसर्ग, उत्क्रांती वगैरे मंडळी क्यों शरमिंदा कर रहे हो म्हणून खरेच असा एक साप पैदा करतील.

11753101-E757-48C1-B3DB-EE82A975989B.jpeg

हे आत्ताच आले !
मी तर गडबडीत आपली माणसे कुठेही पादली तरी वास येणारच असे वाचले !

Pages