भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शक्यता १
शेंडीला गाठ न झोपेलेली / जागवलेली नाइट म्हणजे चाणक्य नाइट असेल Wink
शक्यता २
अरेबियन नाईट्सचा देशी अवतार = चाणक्य नाइट्स

फारेण्ड Happy
कदाचित राजकारणात अति रमलेली मंडळी तेच करत असावी. Lol

पृथ्वीच्या चुंबकीय शक्तिचा विपरीत परिणाम होऊ नए म्हणून उत्तर दक्षिण झोपु नए असे वाटते
>>>इंटरेस्टिंग... म्हणून दक्षिणेला डोके करत असावेत..

चाणक्य नीती असणार.

डोळ्यांंचा प्रकाश कमी होतो Wink आँँखों की रोशनी कम होना असं असेल कदाचित मुळात.
वय कमी होत जाते Lol हे काय माहिती काय ते

*V V Imp*

*+* *( कृपया वाचा )*

कोरोना-
जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट.

जर तुम्हाला कोरोना झाला नसेल तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही.
जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार.

या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता.

तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे.जगातील कुठल्याच देशाला
आजपर्यंत कोरोनावर लस किंवा औषध शोधता आले नाही ही सत्य परिस्थिती आहे.

व्यक्तीचे नाव.

डॉ-बिस्वरूप राय चौधरी.

यांचे काय म्हणणे आहे.

1.टेस्ट किट.

तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले
तर कोरोना नावाच्या राक्षसाला गेली तीन महिने तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही.

त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या
कोरोना टेस्ट किट मध्ये आहे.

तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही.

तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पोजिटिव्ह येऊ शकते.

कारण या टेस्ट किट सदोष आहेत.

2. मास्क.

मास्क वापरणे हे
आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे.
उलट तुम्ही जास्त मास्क वापरला तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त कारण हळूहळू तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊ लागते.

शरीराला नको असलेला कार्बन डाय ऑक्साईड आणि शरीरातून बाहेर पडणारी दूषित हवा आपण पुन्हा पुन्हा मास्कमुळे परत शरीरात जात असते.

याचा पुरावा म्हणजे
ऑक्सिमिटर.

तुम्ही एक दिवस दिवसभर मास्क वापरा आणि तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चेक करा आणि एक दिवस न वापरता ऑक्सिजन चेक करा.

हा प्रयोग केल्यावर तुम्ही परत कधी आयुष्यात मास्क वापरणार नाही.

घरात आणि झोपताना चुकूनही मास्क वापरू नका.

घराबाहेर पडताना
फक्त मास्क लावा.
सरकारी नियम पाळा.

3.सॅनिटायजर.

तुम्ही जर सॅनिटायजर
वापरत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका सर्वात जास्त.

4.पीपीइ किट.

त्वचेला नैसर्गिक वातावरण आणि मोकळी हवा न मिळाल्यामुळे पीपीइ
किट वापरणारी व्यक्ती
आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त.

5.व्हेंटिलेटर-
( कृत्रिम ऑक्सिजन )

मानवीय फुफ्फुसाची
रचनाच मुळी शुद्ध हवा घेण्यासाठी तयार केली आहे कृत्रिम ऑक्सिजन घेण्यासाठी नाही.

कृत्रिम ऑक्सिजन लावलेल्या पेशंट ची बरे होण्याची आणि जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी.

6.लॉक डाऊन.

लॉक डाऊन ही चीनने जगाची केलेली फसवणूक आहे.

चीनने पूर्ण देश एकही दिवस लॉक डाऊन न ठेवता सर्व जगाला कोरोना उपचाराच्या वस्तू विकल्या.
( लॉक डाऊन हे फक्त
वुहानसाठीच केले असे दाखवले होते )

लॉक डाऊन हा अघोरी उपाय असून याने फक्त
एकच गोष्ट साध्य होऊ शकते ती म्हणजे
देशाच्या अर्थव्यवस्थेची
बरबादी.

जगात असे काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन केलेले नाही
आणि तेथील लोकही
लॉकडाउन न केल्यामुळे
त्या प्रमाणात मेलेले
नाहीत.

लक्षात ठेवा कोरोनाने
बाधित लोक बरे होणारच आहेत पण पूर्ण देशच आर्थिक बाधित झाला आहे
ही परिस्थिती जास्त गंभीर आहे.

7.रोगाची भीती.

दरवर्षी होणाऱ्या सर्दी,खोकला,ताप या रोगांपेक्षाही हा सामान्य आजार आहे.

मग तुमच्या मनातील भीती वाढविण्यास फक्त प्रसार माध्यमे जबाबदार आहेत.
यावर नक्की विचार करा. शक्य झाले तर कोरोना संपेपर्यंत पेपर
मधील कोरोना संबंधित बातम्या वाचू नका आणि tv वरील कोरोना च्या बातम्या बघू नका.

8.लस

एखादा आजार मेडिकल रॅकेट आहे असा संशय तुम्हाला
कधी यायला पाहिजे.
जेव्हा सर्व जग एखादया रोगावर लस शोधायला सुरवात करेल तेव्हा.

लस बाजारात आली तर ती फुकट मिळू नाहीतर विकत मिळू अजिबात टोचुन घेऊ नका.

कारण तुमच्या शरीराला लसची आता अजिबात गरज नाही त्याचा सर्वात मोठा पुरावा तुम्ही स्वतः तीन महिन्यानंतरही जिवंत आहात त्याचे कारण या रोगाविरुद्ध लढण्याची
रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात तयार झाली आहे.
या उलट तुम्ही लस टोचली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

9.ऍलोपॅथीची औषधे.

काय वाट्टेल ते झाले तरी चालेल पण ऍलोपॅथीची औषधे खाऊ नका त्याचा पुरावा म्हणून आपण एक उदाहरण बघू.

1 लाख लोक ऍडमिट
1000 मृत्यू,
9000 उपचार चालू,
90,000 बरे होऊन घरी.

जरा विचार करा
जगात कुठल्याच देशाकडे औषध नाही तर मग पेशंट ला कुठली औषधे देऊन बरे केले.

जेव्हा बाजारात एखादे नवीन औषध येणार असते त्याची ट्रायल आधी प्राण्यावर करतात त्या नंतर ती ट्रायल माणसांवर करावी लागते.

नवीन औषधाच्या ट्रायल ने माणसे मेली तर कोरोना ने मेली म्हणून जाहीर.

वर बरा झालेल्या
90,000 व्यक्तींचा पुनर्जन्म अशाच ट्रायल मधून झाला आहे.

एखादा माणूस

चुकीच्या गोळ्या ,औषधांनी मेला

की
डॉक्टरच्या चुकीच्या उपचाराने

की
आधी असलेल्या आजाराने

तुम्ही ओळखू शकत नाही कारण पोस्टमार्टेम होत नाही.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या
राष्ट्रध्यक्षांनी हायड्रोक्लोरोकविल
गोळ्या वापरण्याचा केलेला प्रताप आणि झालेला परिणाम तुम्हाला माहीत असेलच.

10.
रोग निदान आणि बरे झाल्याचा पुरावा.

जर टेस्ट करून तुम्ही पोजिटिव्ह आहात हे सिद्ध होत असेल तर
टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच तुम्ही बरे झालात असे सिद्ध होईल पण
रुग्णाची टेस्ट न करताच रुग्णाला घरी सोडले जाते मग पोजिटिव्ह निगेटिव्ह चा प्रश्न येतोच कुठे ?

11.रुग्ण संख्येत वाढ कशामुळे ?

टेस्ट कमी म्हणून पेशंट कमी
आता टेस्ट जास्त म्हणून पेशंट जास्त.

टेस्ट बंद केल्या तर भारत एक दिवसात कोरोना मुक्त होईल.

12.
जगाची फसवणूक.

सुरवातीला या रोगाचा चीनने केलेला प्रचार आठवा.

भर रस्त्यावर चालता चालता माणसे कोरोनामुळे मेली आणि रस्त्यावर माणसे पडली असे दाखवले

पूर्ण भारत देशात वरीलप्रमाणे असा एकही रुग्ण रस्त्यावर मेला नाही आणि
जेवढा गंभीर हा प्रसार माध्यमांनी दाखविला तशी कुठलीच असामान्य लक्षणे या रोगाची आढळून आली नाहीत.

13.
who आणि आयुष.

Who फक्त ऍलोपॅथी
उपचार पद्धती चा
आंधळा भक्त आहे.

त्यामुळे आज तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले ऍलोपॅथी
वाले औषध शोधत आहेत. जगातील माणसे मेली तरी चालतील पण who
आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा कुठल्याही देशातील स्थानिक उपचार पद्धती ला का पुढे येऊ देत नाही ते उत्तर तुम्हाला शोधावे लागेल.

कदाचित ही माहिती तुम्हाला सुरवातीला खरी वाटणार नाही
म्हणून डॉ. बिस्वरूप राय चौधरी यांनी जगातील पहिले
1000 पानांचे पुरावे असलेले पुस्तक लिहिले आहे.

e-बुक फ्री टू डाउनलोड
आहे.
हा पुरावा तुम्हाला जपून ठेवायचा आहे.तुम्ही नक्की डाउनलोड करून ठेवा.

14. आपली अपेक्षा.

वरील माहिती हे फक्त भाषांतर आहे त्यामध्ये एखादे वाक्य चुकीचे असू शकते पण
डॉ बिस्वरूप राय चौधरी यांचे काय म्हणणे आहे हे खाली
तुम्हाला लिंक देत आहोत त्यावर खरी आणि ओरिजिनल माहिती मिळू शकते.

तुम्ही या विषयाचा सखोलपणे अभ्यास करा.
माहिती योग्य वाटली तर हा मेसेज पुढे पाठवा.
जर माहिती अयोग्य वाटली तर
सरकारला आपण
सर्वजण आवाहन करू
की वरील सर्व माहिती सत्य आणि योग्य असेल तर अशा व्यक्तीला पाठिंबा दयावा आणि वरील माहिती खोटी असेल या व्यक्तीवर कारवाई करावी.

15. संशय.

जर ही भारतातील व्यक्ती खोटे बोलत आहे आणि चुकीची माहिती पसरून जगाची दिशाभूल करीत आहे असे गृहीत धरले तर
यु-ट्यूब आणि फेसबुक सारख्या
आंतरराष्ट्रीय कंपन्या या व्यक्तीच्या माहिती देणारे व्हिडिओ गेले तीन महिने सलग डिलीट का करत
आहेत ?

ही व्यक्ती असे काय सांगायचा प्रयत्न करत आहे ही माहिती तुम्ही स्वतः विडिओ पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईलच.

हा सर्व खटाटोप करण्याचा उद्देश एवढाच आहे.

तुम्ही कोरोना ची टेस्ट करू नका आणि इतरांनाही करायला सांगू नका.

पूर्ण विषय समजून घेतला तर संपूर्ण मानव जातीचे कल्याण आहे.

जर हा विषय तुम्हाला पटला नाहीतर जास्त मनावर घेऊ नका.
जास्त वेळही घालवू नका.
ताबडतोब तुमच्या घरातील सर्वांच्या कोरोना टेस्ट करून टाका.
चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या आणि लस बाजारात आली की
First day
First lot
टोचुन घ्या आणि
निश्चित व्हा.

मेसेज योग्य वाटला तर पुढे फोरवर्ड करा.

इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी आवाहन.

आपणाला जर मराठी व्यतिरिक्त आणखी कुठली भाषा येत असेल तर तुम्ही या मेसेजचे भाषांतर करून पुढे फॉरवर्ड करावा ही नम्र विनंती.

हा घ्या पुरावा.

2009 ला स्वाइन फ्लू ने असाच आपल्या देशात प्रवेश केला संपूर्ण देशाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले आणि कितीतरी लोकांचा जीव गेला
त्यानंतर लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर यांनी
स्वाइन फ्लू हा जीवघेणा आजार नसून
हे एक मेडिकल रॅकेट होते याचे पुरावे देणारे
युद्ध जिवांचे
नावाचे पुस्तक लिहिले.

तसेच
आता कोरोना हा जीवघेणा आजार नसून हे एक मेडिकल रॅकेट आहे असे पुराव्यानिशी सिद्ध करणारे 1000 पानांचे पुस्तक लिहिले असून हे पुस्तक फ्री टू डाउनलोड आहे.
तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करून ठेवा,
त्याचा तुम्हाला पुढच्या पिढीला मेडिकल रॅकेट काय असते हे दाखविण्यासाठी उपयोग होईल.
सोबत दिलेल्या लिंकवर पुस्तक उपलब्ध आहे.

जात,धर्म या पलीकडे विचार करून तुम्हाला आपला देश कोरोनामुक्त व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल आणि कोरोना चा खरा चेहरा
सगळ्यांसमोर उघड व्हावा अशी तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी काही करायची इच्छा असेल तर अशा देशभक्त भारतीयांनी सदर मेसेज जास्तीत शेअर करावा ..
कृपया फोन करू नये.
अधिक माहितीसाठी
खालील लिंकवर माहिती घ्या.
जय हिंद,जय भारत. माहीती संकलन .. महारुद्र तिकुंडे ( माहिती अधिकार कार्यकर्ता ) संस्थापक -अध्यक्ष, युवा राज्य फौडेशन, महाराष्ट्र

For video link
www.biswaroop.com/Corona

Corona Book
www.biswaroop.com/coronabook

For free treatment of infulanza/Covid19
www.biswaroop.com/nice

*A Good News*

Finally an INDIAN student from PONDICHERRY University, named RAMU found a home remedy cure for Covid-19 which is for the very first time accepted by WHO.
- He proved that by adding 1 tablespoon of black pepper powder to 2 table spoons of honey and some ginger juice for consecutive 5 days would suppress the effects of corona. And eventually go away 100%

- Entire world is starting to accept this remedy. Finally a good news In 2020!!

PLEASE CIRCULATE THIS INFORMATION TO ALL YOUR FAMILY MEMBERS AND FRIENDS.

As Received

ही नॉर्मल कफहारक रेमेडी आहे बहुतेक आयुर्वेदाची.
करोना जास्त करुन श्वास, फुफ्फुस याच्याशी संबन्धित असल्याने 'करोनाला पण मदत करेल' असं लॉजिक असेल.
ते 'शहाळ्याचं पाणी प्यायल्याने,दूध हळद प्यायल्याने बाळ गोरं होतं' सारखं असेल Happy
शहाळ्याचं पाणी योग्य प्रमाणात पिऊन हायड्रेशन्+मिनरल्स आणी पोट साफ होऊन स्वतःची आणि बाळाची त्वचा निरोगी असं कायसंसं कनेक्शन असे.
(अजून वेखंड लेप किंवा सितोपलादी चूर्ण याने करोना बरा होतो हा दावा कोणी मांडला नाही का? )

मला वाटलेलं या धाग्यावर भरती येईल fwd ची कोरोना काळात
गेस, रोज इतक्या थिअरी येतायत आणि जातायत की कोणी कोणत्याच थिअरी ला फेक म्हणायला धजत नाहीये, न जाणो आज फेक म्हणून टाकलेले fwd उद्याची who मान्यताप्राप्त प्रणाली निघायची.

वर काळे मीरे खाण्याबद्दल लिहिलंय त्यावरती 2 शब्द

दीनानाथ च्या डॉक्टर बरोबर बोलत होतो, विषय अपरिहार्यपणे कोरोनाच्या अलतरनेत रेमिडी वर आला
ते म्हणाले लोक आपल्या डोक्याने काहि तरी उपाय करतात, आणि विचित्र लक्षणे घेऊन येतात, परवा होम क्वारान्टीन केलेला पेशन्ट बद्धकोष्ठ झाल्याची तक्रार करू लागला. खोदून खोदून विचारल्यावर कोणतातरी काढा घेतो म्हणाला. तो थांबवल्यावर सगळे सुरळीत झाले.

मालेगाव काढ्या ने (खूप काळ पीत राहिल्याने, दिवसात खूप प्यायल्याने) अनेकांना मूळव्याध झाल्याची बातमी पेपर मध्ये आली होती

खूप काळ पीत राहिल्याने, दिवसात खूप प्यायल्याने >>> सिम्बा, त्या काढ्यात इतरही काहीतरी "गुण" असावेत, नाहीतर एखादा काढा इतका लोक पितील का शंका आहे Happy किंवा मग लपवायला लोक चहाच्या मग मधे बियर घेतात तसे असेल Happy

हो ना. अन्यथा एकाच गावचे लोक एकच प्रकारचा काढा सकाळ संध्याकाळ एवढ्या भक्तीभावाने पिणार नाही.

सिम्बा, त्या काढ्यात इतरही काहीतरी "गुण" असावेत >> Biggrin पोट बिघडल्यावर का जनरलीच तब्येत सुधारायला लहानपणी भयानक वास/ चवीचा काढा घेतला आहे. त्यावरुन काढा कोणी गुण असल्याशिवाय हौशीने पिणार नाही याची खात्री आहे.

छान.
(माझ्या दोन्ही मुलांच्या वेळेस ग्रहणे होती आणि मी अजिबात काहीही पाळले नव्हते.सुदृढ,ऐक्टिव मुले झाली दोघेही.)

*बाजरीची भाकर ठरते आहे कोरोनावर गुणकारी*

नुकत्याच WHO च्या वैज्ञानिकांकडून कडून स्पष्ट करण्यात आले की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे.प्रसिद्ध डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरी मधील स्टार्चमुळे आणि बाजरीतील गर्मी मुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही. म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. खेड्यात कुठल्याही सुविधा नसताना खूप कमी लोकांना कोरोनाची लागण होत आहे.

*बाजरीचे फायदे*

1) *शक्ती वर्धक - बाजरी खाल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते*.

2) *बाजरी पचायला हलकी असते. त्यामुळे वजन कमी होते*.

3) *हृदय विकाराचा धोका कमी होतो. कोलेस्टेरॉल कमी होत*

4) *कर्बोदके, पिष्टमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर असल्याने शरीराची झीज भरून काढते*.

5) *बाजरीतील फायबर - ज्यामुळे पाचन क्षमता सुधारते*.

6) *बाजरी खाल्याने. कब्ज, ऍसिडिटी सारख्या समस्या होत नाही*.

7) *कॅन्सर - बाजरीची 1 । भाकर खाल्याने कॅन्सर सारखे आजार होण्यापासून वाचवते*.

असे अनेक फायदे या बाजरीच्या भाकरीचे आहेत.

हल्लीच फ्रोजन आएल मध्ये बाजरीची भाकरी (भगवती ब्रँड) सापडली तेव्हा टडोपा झालं. आता परत मिसिसागाला गेलं पाहिजे आणायला.

वुहानला कुणी निर्यात करतंय की नाही बाजरी का ते पण आता मीच करायचं?? Wink
सीमंतिनीतै.........माझ्या बिझनेसवर डल्ला मारताय होय...ऊं

ते गाणं आहे एक

अल्लम बल्लम साजना मैं कुछ कर जाउंगी
बाजरे के खेत में तुझको ले जाऊंगी .

केवढी दूरदृष्टी बघा.

He proved that by adding 1 tablespoon of black pepper powder to 2 table spoons of honey and some ginger juice for consecutive 5 days would suppress the effects of corona
>> हे मिश्रण नुसतंच तयार करून ठेवायचं की खायचं/नाकात घालायचं/छातीवर चोळायचं?

भारी मिश्रण आहे हो, लावा-बिवायची गरज नाही नुसते दर्शन घ्यायचं मिश्रणाचे.... गायब बघा करोना.

Pages