भोंदू फॉर्वर्डस

Submitted by नीधप on 26 December, 2014 - 02:44

डॉ. देवेंद्र साठे म्हणून एक कार्डिऑलॉजिस्ट आहेत. कोथरूडात रहातात. त्यांच्या नावाने हार्ट अ‍ॅटॅकवर पिंपळपानाच्या काढ्याच्या उपायाची एक पोस्ट फिरतेय व्हॉटसॅपवर. पोस्टमधे पिंपळपानाच्या काढ्याचे उपयोग वगैरे गोष्टी आणि पथ्ये असे दोन भाग आहेत. पथ्ये जी आहेत ती कुठल्याही हृदयविकाराच्या पेशंटने पाळलीच पाहिजेत अशी आहेत (उदा. तेलकट खाऊ नका, मीठ कमी करा, मांसाहार, दारू बंद करा वगैरे). ती कायमची पाळली तर हृदयविकार दूर राहण्यास मदत होते हे जगजाहिर आहे.
पण पिंपळपान संबंधित जे तारे आहेत की हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर पंधरा दिवस हा काढा घेतल्यास तब्येत सुधारते आणि परत येत नाही. पिंपळामधे हृदयाला शक्ती आणि शांती (?) देण्याची अदभुत क्षमता आहे. पिंपळपान, भगवंताचे पान, त्याचा आकार देवाने हृदयासारखा बनवला आहे याचे कारणच ते हृदयविकारावर गुणकारी आहे हे आहे. इत्यादी भोंदू बडबड आहे.
आमच्या संस्कृतीने लाख्खो वर्षांपूर्वी सगळे शोध लावलेच्च होते असे म्हणणारे अनेक जण ही भोंदू पोस्ट विश्वास ठेवून पुढे ढकलण्यात धन्यता मानतायत.

हे जाहीर लिहिले अश्यासाठी की कोणीही खरोखरीचा हृदयविकारतज्ञ अश्या प्रकारची भोंदू विधाने लिहील असे मला वाटत नाही. लिहिले असेल तर त्याच्या तज्ञ असण्याबद्दल शंका घ्यावी असे म्हणण्यास जागा आहे.

आता हे डॉ देवेंद्र साठे कोण वगैरे मला माहित नाही. त्यांनी हे आर्टिकल पाठवले आहे असे मला सांगण्यात आले. विचारल्यावर त्यांचा पुण्यातला पत्ताही देण्यात आला. तुम्ही कोणी त्यांना ओळखत असाल तर त्यांच्या नावे ही असली पोस्ट फिरते आहे याची त्यांना माहिती जरूर द्या.

बघा आमची संस्कृती कशी महान करत विमान, अणुबॉम्ब, संगणक आम्हीच बनवला होता वगैरेवाल्या पोस्टींकडे इग्नोर मारता येते. पण असल्या डायरेक्ट तुमच्या आरोग्यावर बेतू शकणार्‍या पोस्टींकडे दुर्लक्ष करू नये असे मला वाटते.

हा धागा अश्या प्रकारच्या भोंदू फॉर्वर्डसची माहिती देण्यासाठी वापरावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी
मुसळ धन्य झालं असेल मायबोलीवर इतकी प्रसिद्धी मिळाल्याने
आता धागाविभू यावर नवीन धागा कधी विणतात याची वाट बघतोय

ग्रहण काळात मुसळ उभे का करायचं
इतर वेळी त्याला कुठं ठेवतात?
आमच्या ऑफिस मध्ये यावर चर्चा झाली
मला याबदद्दल काही माहिती नाही
मायबोलीकरांचे मत वाचायला आवडेल

म्हणजे 100 एक प्रतिसादाची सोय झाली Happy

आशूचॅम्प नाही Happy

मी हल्ली प्रॅक्टीकल विचार करतो. लोकांचे मद्यपनाचे व्यसन सोडवायचा प्रयत्न करतो ज्याने खरेच त्यांचे काही भले होईल.

श्रद्धा अंधश्रद्धा यात फारसा आता पडत नाही. जोपर्यंत त्या अंधश्रद्धेने कोणाचे काही नुक्सान होत नाही.
मानू द्यावे ज्याला जे मानायचे त्याला ते ते..
मी स्वता देव मानत नसल्याने माझ्यासाठी तर सारे आस्तिक हे अंधश्रद्धाळूच झाले जे कधी न पाहिलेल्या देवाला मानतात. मग काय त्या सर्व जगाची समजूत काढत बसू का?

‘जतन करण्याविषयी‘ खुलासा केलेला पाहून हुश्श झालं >>> फेफ Happy बहुधा धाडधाड २-३ बाफं वर लिहीत गेलो त्यामुळे असे झाले असावे Happy

तुम्ही धागाविभु थोडीच आहात...
तुम्ही धावे आहात...
>>>

ओके
हे मला माहीत नव्हते. यावर धागा काढाय्ला हवा. माबोवर कोणाचे काय टोपंणनाव आहे.

असो
सांगायचा मुद्दा असा की गुढीपडव्याला गुढी उभारणारे श्रद्धाळू आणि ग्रहणात मुसळ उभे करणारे अंधम्श्रद्धाळू हे आपणच सोयीने निकष लावत ठरवले आहे.
आता कोणी अंधश्रद्धेचा फायदा उचलत कोणाला लुबाडत असेल तर त्याला जरूर रोखा. पण काही प्रथा असतात. ज्या लोकं एंजॉय करतात. करू द्यावे. त्यांना ते करण्यापसून रोखून जगात काय असे सुख समाधन शांतता नांदणार आहे जे उगाच आटापीटा करा ईतकाच माझा मुद्दा होता.

आपल्याकडे पूर्वी वाग्भट नावाचे मोठे आयुर्वेद वैद्य होऊन गेले. त्यांचा अष्टांगहृदय नावाचा आयुर्वेदावरील ग्रंथ फेमस आहे. माझ्या माहितीप्रमाणे आजही आयुर्वेदिक शिक्षण घेताना या ग्रंथातले संदर्भ दिले जातात.
या वागभट्टानि पुस्तकात म्हणले आहे की स्वयंपाक नेहमी सूर्यप्रकाश असतानाच करावा. प्रकाश न लाभलेले अन्न अशुद्ध आणि विषासमान असते. कदाचित म्हणूनच ग्रहणकाळात अन्न शिजवले आणि खाल्ले जात नसावे. पुढे वाग्भट (आणि आता अनेक आयुर्वेदाचार्य सुद्धा) हेही म्हणतात की रात्रीचे भोजन सूर्यास्तापूर्वीच करावे. याचाच अर्थ सूर्यप्रकाश आणि अन्न यांचा काहीतरी सूक्ष्म संबंध असावा. कदाचित आयुर्वेदिक तज्ज्ञ यावर प्रकाश टाकू शकतील.

परंतु तसे पाहिल्यास आजच्या जीवनशैलीत सूर्यास्तापूर्वी भोजन शक्य नाही आणि या न्यायाने गेल्यास रोजचे रात्रीचे जेवण आणि ग्रहणात खाल्लेले अन्न यात काहीच फरक नाही. मग एका दिवसासाठी हे पाळायचा आटापिटा कशाला करतात लोक कळत नाही.

रात्रीचे भोजन सूर्यास्तापूर्वीच करावे. याचाच अर्थ सूर्यप्रकाश आणि अन्न यांचा काहीतरी सूक्ष्म संबंध असावा.
>>>

एकदा भोजन उरकले की तुमचा दिवस संपला. मग उगाच तुम्ही लाईट जाळत बसणार नाही. वीज असो वा तेल वा कुठलीही नैसर्गिक साधनसपत्तीचा कमी र्हास होणार आणि तुमची जास्तीत जास्त कामे सुर्याच्या आयत्या उजेडात होणार.

दुसरे म्हणजे सुर्यप्रकाश गेल्यावर काही सूक्ष्मजीव चेकाळत असतील. त्यांचा अन्नाशी होणारा विटाळ टाळायला हे करत असावेत.

ग्रहणाचे तथाकथित नियम मोडणा र्‍या गर्भवतीच्या बातमीतल्या कमेंट्समधून
१ अति शहाणपणा नडतोच शेवटी...ग्रहणकाळात अदृश्य अल्ट्राव्हायोलेट व त्याच्या विरूद्ध ईन्फ्रा रेड किरणांचा मारा पृथ्वीवरून ग्रहण दिसते अशा सर्व प्रदेशात वाढतो ..हे दोन्ही अदृष्य किरण आहेत ..अल्ट्राव्हायोलेटने शरीरात जास्त प्रमाणात विटामिन डी तयार होऊन कॅल्शियम चयापचय बिघडतो मूत्ररोग होतात.तसेच शर्करा नियंत्रण स्वादुपिंड कार्यावरही प्रभाव पडतो.हृदय कार्यावरही परीणाम होतो(हे मेडीकल क्षेत्रात अलिकडेच स्पष्ट झाले आहे) आता हेच किरण का पडतात..तर रिफ्रैक्शन स्पेक्ट्रमचा क्रम बघा..पहीला तांबडा जो सकाळ संध्याकाळ क्षितिजावर राहतो..शेवटी व्हायोलेट..त्यामुळे या किरणांचा अतियोग होतो व शरीरावर अन्नपदार्थावर .. दोष निर्माण होतो..याकरिता लोणची चटणी वगैरे साठ्यावर तुळस पाने ग्रहणात ठेवतात..त्या पानातील बाहेर पडणारा ओझोन हा अतिरिक्त अल्ट्राव्हायोलेटचा दुष्परिणाम रोखतो...हे विज्ञान आहे...आजही ऑस्ट्रेलियात फ्रिआन गॅसच्या अतिवापराने वातावरणावरील वरील ओझोन थर फाटल्यामुळे ....अल्ट्राव्हायोलेटचा मारा होऊन लोकांना त्वचेचे कॅन्सर होत असल्याचे निष्पन्न होत आहे....हिंदू धर्मशास्त्र खुळ्यानी बनवलेले नाही..एवढेच नाही तर रोजचा सूर्यास्तही पाहू नये असेही धर्मशास्त्र सांगते...जो लोक हौसेने बघायला जातात

२ अमावस्या, पौर्णिमा , ग्रहण ह्या काळात चंद्राची गुरूत्वीय शक्ती अधिक प्रमाणात असते त्या मुळे अधिक रक्त दाब निर्माण होतो. त्यामुळे कोणत्याही हत्याराने काम करताना इजा झाल्यास शरीरातुन अधिक रक्त स्त्राव होऊ शकतो म्हणून ते निर्बंध. ग्रहणात सुर्य किरणे पोहचण्यास अटकाव झाल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून अन्न शिजवून ठेवले जात नाही.
वैज्ञानिक दृष्टीकोन उघडा डोळे निट बघा आणि सत्य दाखवा फक्त सनातन संस्कृती ला नाव ठेवु नका

३. अंधश्रद्धे पेक्षा ग्रहणा चे नियम पाळणे हे शास्त्राला धरून आहे. पूर्वीचे लोक आत्तपेक्षा जास्त हुशार होते. घरातून बाहेर का पडायचे नाही तर पटकन सूर्याकडे नजर गेली तर डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ग्रहण काळात काही खाऊ नये कारण त्यावेळी हवामान बिघडल्या मुळे पचन शक्ती कमजोर होते. असे त्या मागचे कारण आहे. असो. All the best
४ कधी दर्गावर विनाकारण चादरी का चढवतात?
बकरी ईद ला निष्पाप जनावरे का मारतात?
मोहरमला स्व'तःवर तलवारीने वार का करतात?
एखाद्या गरीबाचं घर ऊजळवण्याऐवजी चर्च मधे मेणबत्त्या का लावतात ?
कधीतरी यावर पण लिहण्याचं धाडस दाखवा.
ज्या सनातन हिंदू धर्माने कही असंस्कारी लोकांना कधी गावाबाहेरची जागा दाखवून दिली होती. तेच आज हिंदू धर्मावर टिका करण्याचा असंस्कृतपणा दाखवत आहेत
५ अनिंसवाले सध्या कोरोना काळात कुठे लुप्त झालेत, इतर वेळी सामाजिक बांधिलकी म्हणुन ओरडत असतात, आता सामाजासाठी काय केलं?कोरोना अंधश्रद्धा नाही पण एकवास्तव आहे.आता का येत नाहीत जनतेच्या मदतिला,त्यांच्या मदति बद्दल कुठे वाचल्याचं किंवा TV channel वर बातमी दिसली नाही,म्हणुन ही शंका.
६. अग बाई तू जर खरंच गरोदर आहेस तर बाळाचा जन्म झाल्यावर कर की सोहळा
आताच का जाहीर सोहळा करून घेतेस
आणि जितक्या आत्मविश्वास नि तू आता social media वर चर्चा करून घेतलीस तितकीच बाळंतपण झाल्यावर कर म्हणजे मग मानू तुला
७ प्रत्येकाची मर्जी, पण आम्ही हिंदू अहोत, हिंदू धर्मातील सर्व नियम पालणारचं
८ ग्रहण पाळले तर काहीच नुकसान होणार नव्हते..अंधश्रद्धा आणि परंपरा ह्यातला ताळमेळ पण बसवता आला पाहिजे. ज्या गोष्टींनी आपले किंवा दुसऱ्याचे नुकसान होणार आहे अशा परंपरा चालरिती नक्कीच सोडा. पण जिथे कोणाचे काही नुकसान नाही अशा गोष्टी नक्की करा...Respect our traditions and customs as many have scientific reasons behind it.
९ आती शहाणी आहे नंतर भोग म्हणा कर्माची फळ मग कोणीही रणरागिणी म्हणायला येणार नाही
१० माणूस ज्या देशात,समाजात जन्म घेतो त्या देशाच्या, समाजाच्या काही,रुढी, परंपरा असतात जर एखाद्याला त्या मान्य नसतील तर त्याने समाजाचं काही नुकसान होत नाही. पण मान्य नसणाऱ्याने त्याचा देखावा केला तर समाजात क्लेश निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. तुम्ही स्वतंत्र आहात तुमच्या मनाला पटेल ते करा पण ते करताना मनापासून करा ज्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. देखावा करून मन: स्वास्थ बिघडवून घेवू नका.

पहिली पोस्ट ही छद्मविज्ञानाचे नमुनेदार उदाहरण आहे.
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडून पृथ्वीकडे कुठलेही स्पेशल किरण येत नाहीत. ( एरवी जे आणि जितक्या प्रमाणात येतात तेच आणि तितक्याच प्रमाणात येतात) प्रॉब्लेम एवढाच असतो की जर आपण खग्रास सूर्यग्रहण पूर्ण लागलेलं असताना (totality) नुसत्या डोळ्यांनी बघत असलो, तर आपल्या डोळ्यांवर पडणारा उजेड कमी असल्याने डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या झालेल्या असतात. तेवढ्यात ग्रहण सुटलं आणि डायमंड रिंग दिसली,.की तो प्रखर प्रकाश अचानक आपल्या डोळ्यांच्या विस्तारित बाहुल्यांवर पडतो आणि त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

पोस्ट (म्हणजे दिलेली कमेंट) अगदीच भंपक आहे पण काही कारणाने त्यातला 6वा मुद्दा मला पटला.त्यातलाही पहिला भाग.
म्हणजे 'बाळंतपण झाल्यावर स्पष्ट दाखव डिफेक्ट नाहीत ते,आता पुरावे नाहीत' म्हणून नव्हे तर तर सोशल मीडिया, ट्रोलिंग या सगळ्या भानगडीत प्रेग असताना पडू नये असं काहीतरी मनात वाटलं म्हणून.

असा जाहीर कार्यक्रम एकट्या गरोदर स्त्रीने करणं ही खरंच रिस्क आहे. प्रत्येक गरोदरपणात थोडी का होईना, अनिश्चितता ही असतेच. उद्या न जाणो काही बारीकसंसुद्धा कॉम्प्लिकेशन आलं, साधं नॉर्मलऐवजी सी सेक्शन झालं तरी हातात कोलीत मिळेल या लोकांना.

असा जाहीर कार्यक्रम एकट्या गरोदर स्त्रीने करणं ही खरंच रिस्क आहे. प्रत्येक गरोदरपणात थोडी का होईना, अनिश्चितता ही असतेच. उद्या न जाणो काही बारीकसंसुद्धा कॉम्प्लिकेशन आलं, साधं नॉर्मलऐवजी सी सेक्शन झालं तरी हातात कोलीत मिळेल या लोकांना.

Submitted by वावे on 25 June, 2020 - 00:12 >>>>>>

अश्या वेळी खरे तर अनेक गरोदर स्त्रियांनी हे एकत्र करून दाखवले पाहिजे म्हणजे दूध का दूध और पानी का पानी होईल. हे मात्र खरे आहे की सोशल मीडिया वरून विरोध करून मॉडर्न असल्याचा आव आणायचा आणि वेळ आली की रिस्क नको म्हणून चालीरीती पाळायच्या याला काहीच अर्थ नाही. मनापासून काही गोष्टी पटत नसतील तर समोर येऊन दाखवून द्या त्या कश्या चुकीच्या आहेत म्हणजे पुढेही अनेकांना फायदा होईल.

A minister can also tell about FREE RATION, Why
Narendra Modi?

Reactive RW, TRP Media are basically Judgemental & lack deep thinking

Modi's speech was not about COVID or Ration but a strong message to China, adopting the Strategy of Indirect Approach

Let me explain:

4 PM, the time slot he chose was very strategic and to me, it was clear that he is not addressing INDIANS mainly but the world at large.

At 4 PM most Indians are at work in office, shop or market or taking their afternoon nap.

He was addressing the east during early evening and west early morning, covering a maximum of the world.

Without addressing or taking names Ladakh, China or Chinese agents in India, he made it clear to The Chinese and the world that he is in full control of the situation and his mind is very clear about what he wants to do and that the Nation stands with him.

He brilliantly downgraded the threats of the Chinese and made them a non issue and also told the World, the Chinese and the Chinese agents in India that he communicates directly with his people unlike Xi who is facing revolt in CCP and PLA.

It was also a message to the Congress and the Left.

He conveyed a message to the world that people of India stand rock solid with him and trust his Leadership. Xi and his CCP have to keep Chinese people suppressed to survive. That difference Modi ji demonstrated and the message was sent out loud and clear to the Chinese.

Modi has a very strong and controlled mind and he is the best there is to play a Mind game. Today’s speech was a PSYOPS strike of the highest order.

Most of you must have thought that Modi ji will talk about the current Ladakh Stand off, the Army and the future course; well, he didn't.

By blocking 59 APPs, Modi ji has demonstrated that to save the nation he will not hesitate to take strong measures.

Most of you may believe that blocking the APPs will not yield much but here is where you could be wrong.

He set a domino effect in motion, which the world will notice and follow through.

By blocking APPs on one hand, Modi ji kicked billions of $$ revenue directly out of China and on the other hand, which is even more important, he challenged China as a Global Tech power.

The APPs ban also sent a message to the world that China is not a Tech giant but a dirty and snooping Giant.

Modi Ji has very successfully garnered international support first time ever in Independent India and China stands further isolated.

This was his best diplomatic speech; a Chanakya Master stroke for us to understand!

Jai Hind

https://youtu.be/1ve4AmD2y5s

कुणीही आता करोनाला घाबरवण्याचे कारण नाही ... करोना normal influenza virus आहे तो deadly नाही , मेडीया लोकांना घाबरवत आहे .... डाॅक्टर विश्वरुप राय यांनी ३०० डाॅक्टरांच्या टीम सोबत फ्री करोना ट्रिटमेंट चालु केली आहे ... सर्वांनी ही माहिती सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करा किंवा copy paste करा ....ना सरकारी दवाखान्यात जावुन उपचारावीना मरण्याची गरज ना प्रायवेट हाॅस्पीटल मधे जाउन उपचारांसाठी घरदार विकण्याची गरज.... just dial the helpline - +91-8587059169 किंवा ह्या link वर पेशंटची माहिती द्या ताबडतोप उपचार सुरु तेही फ्री मधे - www.Biswaroop.com/nice.
आपल्या प्रियजनंना पाठवा.
https://youtu.be/1ve4AmD2y5s

कुणीही आता करोनाला घाबरवण्याचे कारण नाही ... करोना normal influenza virus आहे तो deadly नाही , मेडीया लोकांना घाबरवत आहे .... डाॅक्टर विश्वरुप राय यांनी ३०० डाॅक्टरांच्या टीम सोबत फ्री करोना ट्रिटमेंट चालु केली आहे ... सर्वांनी ही माहिती सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करा किंवा copy paste करा ....ना सरकारी दवाखान्यात जावुन उपचारावीना मरण्याची गरज ना प्रायवेट हाॅस्पीटल मधे जाउन उपचारांसाठी घरदार विकण्याची गरज.... just dial the helpline - +91-8587059169 किंवा ह्या link वर पेशंटची माहिती द्या ताबडतोप उपचार सुरु तेही फ्री मधे - www.Biswaroop.com/nice.
आपल्या प्रियजनंना पाठवा.

मी वरील नंबर वर कॉल करून verify केलं आहे.

संदेश लाळगे
----------व्हाट्सअप साभार--------
.
काहीही अगदी
Lol

खाली एक फॉरवर्ड देतेय, भोंदू की खरे माहीत नाही

-------

*कोविड-१९ मेडिकल किट घरी आवश्यक आहे:*

१. पॅरासिटामोल
२. माउथवॉश आणि गारगल साठी बीटाडाइन
३. व्हिटॅमिन सी आणि डी 3
५. बी कॉम्प्लेक्स
६. वाफ + वाफ + कॅप्सूल
७. ऑक्सिमीटर
८. ऑक्सिजन सिलिंडर (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी)
९. आरोग्य सेतु अ‍ॅप
१०. व्यायाम व्यायाम

*कोविड चे तीन टप्पे:*

*१. केवळ नाकातील कोविड -*
बरे होण्यासाठी वेळ अर्धा दिवस आहे. (स्टीम इनहेलिंग, व्हिटॅमिन सी) सहसा ताप येत नाही. एसिम्प्टोमॅटिक.

*२. घशातील कोविड -*
घसा खवखवणे. बरे होण्यासाठी वेळ 1 दिवस. (गरम पाण्याचा गार्गल, पिण्यास गरम पाणी, जर ताप असेल तर पॅरासिटामोल, व्हिटॅमिन सी, बी कॉप्लेक्स, लक्षणे जास्त तीव्र असल्यास अँटीबायोटिक.)

*३. फुफ्फुसातील(Lung) कोविड-*
खोकला आणि श्वसनासाठी त्रास, दम 4 ते 5 दिवस. (व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, गरम पाण्याचे गार्गल, ऑक्सिमीटर, पॅरासिटामॉल, ऑक्सिजन सिलेंडर गंभीर असल्यास, भरपूर गरम पाणी आवश्यक आहे. श्वासोच्छवासाचा प्राणायाम कपालभारती सारखे व्यायाम करा.)

*इस्पितळात कधी जायचे अशी अवस्थाः*

ऑक्सिजनच्या पातळीवर (सामान्य पातळी 98-100) लक्ष ठेवा. जर पातळी 93 च्या जवळ गेली तर आपल्याला ऑक्सिजन सिलेंडरची आवश्यक लागणार आहे. जर सिलेंडर घरी उपलब्ध असेल तर इतर कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्याची गरज लागणार नाही.

*निरोगी रहा, सुरक्षित रहा!*

*कृपया भारतातील आपल्या संपर्कांवर चर्चा करा. ह्याची कोणाला मदत होईल हे आपल्याला आता सांगता येणार नाही.*

*टाटा समूहाने चांगला उपक्रम सुरू केला आहे. ते गप्पांच्या माध्यमातून डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला सल्ला देत आहेत. ही सुविधा आपल्यासाठी सुरू केली गेली आहे; जेणेकरून आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरीच सुरक्षित राहाल.*

*खाली लिंक आहे. मी सर्वांना या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो.*
*https://www.tatahealth.com/online-doctor-consultation/general-physician*

*+91 74069 28123* *विलगिकरण रुग्णालयातील सल्ला, आम्ही घरी करू शकतो.*

*पुढीलऔषधे रुग्णालयात घेतली जातात-*
*१. व्हिटॅमिन सी -1000
*२. व्हिटॅमिन ई (ई)
*३. (10 ते 12 तासांतून) उन्हात 15-20 मिनिटे बसा
*४. अंड्याचे(Egg) जेवण, रोज एकदा.
*५. आम्ही किमान 7-8 तास विश्रांती घेतो/झोपतो
*६. आम्ही दररोज 1.5 लिटर पाणी पितो
*७. सर्व जेवण उबदार(थंड नाही) असावे.

*रोगप्रतिकारक यंत्रणा बळकट करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये इतकेच करतो.*

*लक्षात घ्या की कोरोनाव्हायरसचे पीएच 5.5 ते 8.5 पर्यंत असते*

*म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे; व्हायरसच्या आंबटपणाच्या पातळीपेक्षा जास्त क्षारीय पदार्थांचे सेवन करणे. जसे:
*केळी
*हिरवा लिंबू - 9.9 पीएच
*पिवळा लिंबू - 8.2 पीएच
*एवोकॅडो - 15.6 पीएच
*लसूण - 13.2 पीएच
*आंबा - 8.7 पीएच
*टेंजरिन - 8.5 पीएच
*अननस - 12.7 पीएच
*वॉटरक्रिस - 22.7 पीएच
*संत्री - 9.2 पीएच

*आपल्याला कोरोना विषाणूची लागण झाली हे कसे कळेल?*
*१. घसा खवखवणे
*२. कोरडा घसा
*३. कोरडा खोकला
*४. उच्च ताप
*५. श्वास लागणे
*६. गंध वास कमी होणे

*कोमट पाण्यात लिंबू पिळून पिल्याने फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच व्हायरसला सुरवातीलाच नष्ट करते*

*ही माहिती फक्त स्वतःजवळच ठेवू नका. आपले सर्व नातलग आणि मित्रांना पाठवा.*

*धन्यवाद

pH चौदाच्या वर! Uhoh

त्या स्टेप्स भोंदू आहेत.

भोंदू फॉरवर्डच आहे, मध्ये थोड्या अभोंदू गोष्टी लिहिल्या आहेत भोंदूगिरी खपवायला.

म्हणूनच, व्हायरसच्या उच्चाटनासाठी आपल्याला जे करायचे आहे ते म्हणजे; >>>अगदी साधी गोष्ट आहे-
लिंबू=साइट्रिक एसिड आणि एसिड म्हटले की ७ पेक्षा कमी pH
----------
बाकी ते १४ च्या वरचे आकड़े पाहुन भारी मौज वाटली Biggrin

लिंबू=साइट्रिक एसिड आणि एसिड म्हटले की ७ पेक्षा कमी pH

त्यांच ते १४ तुन वजा करायचे राहिले असतील :)) (लिंबु वगैरेसाठी), बाकी त्यांची पीएच पट्टी अ‍ॅडव्हान्स दिसतेय.

काही forwards मध्ये तर अल्कलाईन पदार्थ खा, करोना हटवण्यासाठी, असे म्हटले होते. आणि पी एच उलटा मोजलाय म्हणावे तर तेही नाही. नुसता पी एच शब्द वापरून वैजञानिक दृष्टिकोनाचा भास निर्माण केला आहे.

*झोपेचे नियम:*

1. *सुनसान घरात झोपू नये व तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटेच झोपू नये. *देव मंदिर* आणि *स्मशानभूमी* मध्ये झोपू नये. *(मनुस्मृति)*

२. झोपलेल्या व्यक्तीला *अचानक* उठू नये. *(विष्णुस्मृति)*

3. *विद्यार्थी, नोकरदार आणि द्वारपाल* जर ते बराच काळ झोपले असतील तर त्यांनी त्यांना जागे केले पाहिजे. *(चाणक्यनाइट)*

4. निरोगी शरीर हव्हे असेल तर *ब्रह्ममुहूर्त* (म्हणजे पहाटे 5 ते 7 च्या दरम्यान )उठले पाहिजे. *(देवी भागवत)* पूर्णपणे *अंधार* करून खोलीत झोपू नका. *(पद्मपुराण)*

5. *ओले पाय करून झोपू नये* *कोरडे पाय करून झोपल्यास* *लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या कामाला मिळतो.* *(अत्रीस्मृती)* *तुटलेल्या खाटावर आणि *उष्ट्य तोंड करून झोपू नये* (महाभारत) *

6. *"नग्न"* झोपू नये. *(गौतम धर्मसूत्र)*

7.पूर्वेकडे डोकं करून झोपल्यास विद्या प्राप्त होते, *शिक्षणात प्रगती होते, पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास, * तीव्र चिंता निर्माण होतात, उत्तरेकडे डोकं करून, झोपल्यास *तोटा होतो मृत्यू चे भय कायम असते* *दक्षिण कडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि वय वाढते**

8. दिवसा कधीही झोपू नका. पण *ज्येष्ठ महिन्यात* दुपारी 1 तास 48 मिनिटे झोपू शकतात. (दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात आणि वय कमी होत जाते)

9. दिवसा आणि सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय होतो. *(ब्रह्मवैवर्तपुराण)*

१०. सूर्यास्ताच्या तीन तासा नंतर 'झोपायला पाहिजे'.

11. डाव्या बाजूस झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

१२. दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये. *यम आणि दुष्ट देवता* यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते. त्यामुळे *मेंदू* मधील रक्ताभिसरण कमी होते, स्मरणशक्ती कमी, मृत्यू आणि बर्‍याच रोग होतात.

13. हृदयावर हात ठेवून बिंम च्या खाली पाया वर पाय ठेवून झोपू नका.

14. पलंगावर बसून खाणे - पिणे अशुभ आहे.

15. झोपताना *वाचन* करू नये. *असे केल्याने डोळ्यांचा प्रकाश कमी होतो*

16. कपाळावर *टीळक* लावून झोपणे *अशुभ* आहे. तर झोपेच्या वेळी टिळक काढा.

*या 14 नियमांचे अनुसरण केल्यामुळे कीर्ती निरोगी, निरोगी आणि दीर्घायुष्य होते.*

*टीप: - हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून सर्वांना
फायदा होईल.

________________________

ता. क. यातल्या काही काही मुद्द्यांमध्ये तथ्य असेलही.

यातले बरेच मुद्दे सेन्सिबल वाटले
क्र 6: पूर्वीच्या काळी थंडी वाजेल, साप विंचू चावेल म्हणून असेल
हल्ली ज्याची त्याची मर्जी. Happy

9: कॉमन सेन्स असेल
संध्याकाळी झोपल्याने काम कमी होत असेल, सकाळी उशिरा उठल्याने आवरायला उशीर होऊन काम कमी होत असेल आणि पैसे कमी मिळत असतील.

5 लॉजिकल आहे
4 पटले नाही(बहुतेक पूर्ण अंधार केल्यावर रात्री वॉशरूम ला जाताना ठेच लागणे/साप चावणे होत असेल)
1 चे कारणही सापच वाटते.

ओले पाय करून कोण झोपेल?
आणि समजा नीट कोरडे झाले नाही झोपताना, तर थोड्याच वेळात होतील की कोरडे.

१- एकटेपणाचा फोबिया हां स्मशानभूमिसाठी आणि मंदिरात एकटया व्यक्तिवर भुरटे चोर वगैरे पासून एकटेपणाचा गैरफायदा घेतला जाऊन शारीरिक ईजा होऊ नए म्हणून असावे
२- अर्धवट झोपेत दचकुन काही रक्त पुरवठा संबंधी त्रास होऊ नए म्हणून असावे
३- अतिनिद्रा घेतल्याने आळस अंगात भिनुन कर्तव्य दक्षता हरवू नए म्हणून असावे
४- ह्यात दिलेली ब्रह्ममुहूर्त वेळ चुकलीय. पहाटे ऑक्सीजन मात्रा भरपूर त्यामुळे उल्हासित मनाने कार्यसिद्धि लवकर साधता येण्यासाठी असावे. सुदृढ़ मन + स्वस्थ शरीर = दीर्घ आयुष्य हाच फक्त उद्देश् असावा
५- ओले पायवाला नियम अतिवृष्टी भागासाठी पावसाळ्यात बनवला गेला असेल किंवा जिकडे कापूस महाग होता त्या प्रदेशात ह्याची सुरुवात असेल Wink
६- इंद्रिय दमन हा उद्देश असू शकेल. बाकी Lol अचानक भूकंप वगैरे झाला तर त्या अवस्थेत कसे कोण पळु शकेल हे विचार करून हहपुवा
७- हां पॉइंट शास्त्रीय दृष्टया फारच चुकीचा वाटला. पृथ्वीच्या चुंबकीय शक्तिचा विपरीत परिणाम होऊ नए म्हणून उत्तर दक्षिण झोपु नए असे वाटते ( ह्यातही पापभिरु लोकांना यमाची दिशा म्हणून दक्षिणेला पाय करून झोपण्यासंबधी घाबरावायचे कारण तेच असावे)

Pages