विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रे मस्त !!!!! आज नेहमीइतकी नेलबाइटिंग झाली नसली तरी पाकविरुद्ध नेहमीच जास्त धमाल येते त्यामुळे मजा आली रात्रभर (ऑल्मोस्ट) जागून बघायला ! बुवा झोपले होते वाटते नंतर Happy

पावरप्लेचे ५ आणि शेवटचे ५ या ओव्हर्स कडे लक्ष द्यायला हवे जिथे आपण सहज ३२०-३४० जाणार होतो तिथे आपण कुढत ३०० पर्यंत पोहचलो आहे.

एक गोष्ट अधोरेखित झाली.

आपल्याला पहिली फलंदाजी मिळाल्यास प्रत्येक सामन्यात किमान ३५० धावा (किमान) करणे अत्यावश्यक आहे.

दुसरी फलंदाजी मिळाल्यास पंचविसाव्या षटकापर्यंत ओपनिंग पेअर मैदानात टिकायला हवी आहे.

विराट कोहलीच्या सेंचुरीनं मध्ये घोर लावला होता. पण रैना वॉज सिम्पली सुपर्ब.

शामी आणि मोहितनं आज नुसती पिसं काढली नाहीतर काढलेली पिसं बसून पत्त्य्यासारखी कुटली. Happy

जबरी मजा आली.. रैनाची इनिंग लाजबाब! कोहली इज "द मॅन!" फक्त शेवटच्या पाच ओव्हर्समधे जो घोळ झाला तसा नॉक आउट स्टेजेसमधे होउ देउ नये.. असो..

आपल्या बोलर्सची कामगिरीही विसरुन चालणार नाही. पण उमेश यादव ऑस्ट्रेलिअन बाउंसी व फास्ट पिचेस बघुन कधी कधी खुप एक्साइट होतो व लाइन विसरतो. तेव्हड जरा त्याने कमी हायपर झाल तर आपल्याला त्याचा अजुन फायदा होइल.

व्हॉट्स अप वर जोक्स वर जोक्स! मला सगळ्यात जास्त आवडलेला.. अकमलला आउट दिल्यावर टेकन मधला लिआम नेसन फोनवर बोलतोय..." हेलो थर्ड अंपायर? फर्स्ट आय अ‍ॅम गोइंग टु फाइंड यु! देन आय अ‍ॅम गोइंग टु किल यु!" Happy

पहाटे ५ ३० पर्यंत जागे राहील्याचे सार्थक झाले.. टण्या.. आला असतास आमच्याकडे तर अजुन मजा आली असती बघ...:)

अमिताभची कॉमेंटरी ठिक होती.. पण मला गांगुली, द्रविड व शोएब अख्तर यांच्यातले आफ्रिदी खेळत असतानाचे संवाद खुप आवडले.. आफ्रिदी आल्यावर गांगुली म्हणाला की आता या स्टेज मधे एकच टिम जिंकु शकते ती म्हणजे टिम ईंडियाआ! तर शोएब परत परत म्हणत होता की आफ्रिदी अजुनही जिंकु देउ शकतो वगैरे.. तो असे शॉट्स मारु शकतो.. येंऊ करु शकतो .. त्यांउ करु शकतो.. वगैरे वगैरे.. राहुल द्रविड तरी त्याला मधुन मधुन सांगत होता की आफ्रिदीमधे जरी तशी कुवत असली तरी वर्ल्ड कप मॅचेस मधे तो खुप बेभरवश्याचा आहे.. गांगुली शोएबला म्हणाला .. मॅच जिंकायची जबाबदारी आता जर आफ्रिदीवर असेल तर पाकिस्तानचे काही खरे नाही.. तरी शोएब अख्तरचे आफ्रिदिचे टुमणे चालुच होते.. शेवटी राहुल द्रविडला राहवले नाही व त्याला जोराचे हसु फुटले व तो शोएब अख्तरला म्हणाला की कुछ भी हो.. शोएब भाई.. आपको आफ्रिदी के उपर बहोत होसला है.." ज्या पद्धतीने द्र्विड गुदगुल्या होत असल्या सरखा खुदु झुदु हसत ते म्हणाला ते लाजबाब! नंतर शोएबची बडबड एकदम चुप..:)

पाकिस्तानला हरवले हे विश्वचषक जिंकल्यासारखे आहे ही संकल्पना मीडिया लोकांच्या गळी उतरवते आहे हे समजू शकतो, पण पब्लिक कप जिंकल्यासारखे वागत आहे हे पाहून हसू येत आहे.

आपला संघ एखाद्या किरकोळ संघापुढेही कधी नांगी टाकेल हे सांगता येत नाही. लौकीकाला साजेसे न खेळणारे असा आपला बेसिक लौकीक आहे. (त्यामुळे जिंकणेही लौकीकास साजेसे नसते आणि हरणेही लौकीकास साजेसे नसते).

मनोबल वाढणे आणि स्वतःच्या खर्‍या मर्यादा थोड्या अधिक स्पष्ट होणे हे आजच्या सामन्यातील दोन महत्वाचे फायदे म्हणावे लागतील. पाकिस्तानचा बोलिंग अ‍ॅटॅक ह्यावेळी नेहमीपेक्षा कमकुवत दिसत आहे. आपला नेहमीइतकाच कमकुवत आहे. पाकिस्तानची फलंदाजी नेहमीइतकी अनुभवी दिसत नाही आहे. आपली फलंदाजी अजूनही 'हंड्रेड परसेंट' देऊ करत नाही आहे. (आजकालच्या जमान्यात ३०० धावा सहज होतात, विशेषतः टी-ट्वेन्टी आल्यापासून). त्या झाल्या नाहीत तरच नवल वाटून घ्यायला हवे.

पाकिस्तानच्या तुलनेत वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सरस असावेत असे वाटत आहे. क्वार्टर फायनलचा चान्स नक्की वाटत आहे कारण पाकिस्तान हा एक पारंपारीक मोठा अडथळा सहजगत्या दूर झाला आहे. आता आफ्रिका आणि वेस्ट इंडिजशी हरलो तरीही इतर तिघांना हरवू शकू असे वाटत आहे.

आजची अवस्था अशी आहे की भारत पाकिस्तान वर्ल्ड कप फायनलसुद्धा होऊ शकते किंवा आपण साखळीत किंवा नॉक आऊटमध्ये गारद होऊन पाकिस्तान मात्र अंतिम सामन्यात पोचू शकते.

संयमाचा अभाव आणि व्यक्तीपूजेचा अतिरेक एक दिवस रांची आणि दिल्लीतील काही घरे जाळण्यास प्रवृत्त करणारा ठरू शकतो.

मूर्ख कुठले!

बेफिकिर तब्येत ठीक आहे ना? कायची व्यक्तीपुजा अन कशाचा काही संबंध नाही. तेच तेच ऑबिव्यस गोष्टी लिहून आपल्या नकारघंट्याची... आपलं नकारघंट्यात्मक बादरायण संबंध असलेल्या बेसलेस मतांची मध्ये मध्ये पेरणी करायची की झाली हातभर लांबीची पोस्ट तयार! Lol
काल विराट कोहलीला दोन जीवदान मिळाले हे खरं असलं तरी इट्स ऑल पार्ट ऑफ द गेम. तो नाही तर इतर कोणीतरी बाजू लावून धरुन आपल्याला तीनशे पर्यंत पोहोचवले असते/पोहोचवायची ताकद आहे ह्यातच काय ते आले.

मुकुंद, मजा आली पोस्ट वाचायला. Happy पाकिस्तान वाल्यांचे खुप जास्त आशावादी असणे आणि मुख्य म्हणजे फक्त आशावादी नसून आणीबाणीची वेळ असताना हिमतीनी खेळ करुन एन वेळी पासे पलटवल्याची उदाहरणं बरीच आहेत पुर्वी. फक्त आता पुर्वी इतके खंदे प्लेयर नाहीयेत सध्या त्यांच्या टीम मध्ये आणि चक्क हे विनिंग अ‍ॅटिट्यूड आता आपल्या टीम मध्ये आलेय! कोहली, रायना, धवन, शर्मा, धोनी ही मंडळी त्यांच्या एकंदरित स्टान्स वरुन लटपटणारी वाटत नाहीत. एक तर आयपिएल मुळे ह्यांना प्रचंड एक्स्पोजर पण मिळतं फास्ट गेम्स आणि सरवात मोठी गोष्ट म्हणजे अंडर प्रेशर असताना परफॉर्म करायचे ट्रेनिंग. दे जस्ट ट्रीट एवरिथिंग लाईक अ गेम! दॅट्स ऑल. एकदा फक्त गेम आहे हा विचार करुन खेळायला सुरवात केली की माणूस फक्त आपल्या खेळावर कॉन्सन्ट्रेट करतो. ते जिंकणं, जिंकलो नाही तर काय होईल, ह्या सगळ्याचा विचार सुद्धा मनात न आलेलाच बरा. Happy

श्री वैद्यबुवा,

आपल्यासारख्या सुमधुर संभाषण करणार्‍याशी संवाद करण्याची माझी पात्रता नाही हे माहीत असल्यामुळे अनुल्लेख करत आहे.

मुकुंद, मस्त पोस्ट.. Happy

कालच्या मॅचमधली गांगुली, अक्रम, ब्रेट ली, हर्षा भोगले, (चक्क) रमिझ राजा, द्रविड ह्या सगळ्यांची कमेंट्री आवडली.. !

भारतीय दूरचित्रवाहिन्यांवर आज दुपारपासून जे चालू आहे ते ज्यांना माहीत नसेल त्यांना मी ती पोस्ट का लिहिली आहे ते माहीत होणार नाही. बाकीच्यांना ते माहीत होईल की नाही आणि झाल्यास ते येथे त्याबद्दल लिहितील की नाही हे मला माहीत नाही.

परंतु माझ्या पोस्टचा येथील कोणाच्याही पोस्टशी काहीही संबंध नसून भारतीय मीडिया आणि त्यामुळे उसकवले गेलेल्या पब्लिकने आज दिवसभर जे काही केले आहे त्याच्याशी त्या पोस्टचा संबंध आहे.

गोळीबाराचे समर्थन करणार्यांना आज पाकड्यांच्या प्रेमाचे भरते येत आहे Wink

बेफिकीर.. तुमची भावना खरी आहे.. समजु शकतो. . आणी तुम्ही म्हणता तसे १९९२ च्या वर्ल्ड कप मधे झालेही आहे आपण पाकला हरवले व पाकने वर्ल्ड कप जिंकला-- व घरे जाळण्यासारख्या निंदास्पद गोष्टी भारतात पुर्वी झाल्याही आहेत.. अगदी वाडेकर १९७४ मधे हरुन आल्यावर इंदुरला बॅट जाळण्यापासुन! अश्या गोष्टी झाल्या आहेत..

पण मला एक सांगा.. इथे मायबोलिवर असे कोण म्हणत आहे की आपण वर्ल्ड कप जिंकला? भारतात जर मिडिया वाले म्हणत असतील तर त्याचा राग इथे का काढता? इथे आपले मायबोलिकर मित्र पाकीस्तानला हरवल्यावर जो एक वेगळाच आनंद मिळतो तो आनंद व्यक्त करत आहेत असे मला तरी वाटते.असो .. पटते का बघा.

मुकुंद,

विश्वचषकातील आपल्या देशाच्या आणि आपल्या पारंपारीक प्रतिस्पध्याच्या हाय व्होल्टेज ड्रामाबाबत मी माझ्या प्रामाणिक भावना येथे लिहायच्या नाहीत, त्या केदार ह्यांनी काढलेल्या 'पाकच्या संघाला श्रद्धांजली'वर लिहायच्या नाहीत, मग काय वेगळा धागा निर्माण करायचा का?

बेफी, सध्या आपल्या टीमची अवस्था बघता कोणाला वल्ड कप जिंकेल असे वाटतच नव्हते म्हणून हा एकच सामना प्रतिष्ठ्तेचा झाला.

व्यक्तीपूजा वाईटच पण आता आपल्याकडे ती सगळ्याच क्षेत्रात होते सिनेमा राजकारण मग क्रिकेट मध्ये झाली तर वेगळे काय ?

>>>व्यक्तीपूजा वाईटच पण आता आपल्याकडे ती सगळ्याच क्षेत्रात होते सिनेमा राजकारण मग क्रिकेट मध्ये झाली तर वेगळे काय ?<<<

हे सगळे काय चाललेले आहे?

व्यक्तीपूजा सगळीकडे आहे तरीही क्रिकेटमध्ये स्वीकारू नका अश्या अर्थाचे मी काही लिहिले आहे का?

भारतात दिवसभर टीव्हीवाले काय दाखवत होते आणि पब्लिक काय करत होते हे पाहून मी काहीतरी लिहिलेले आहे.

इथे काही लिहायचेच नाही का? की विशिष्ट सदस्यांना अनुमोदने दिल्याशिवाय स्वतःचे मत लिहिलेले चालत वगैरे नाही?

बेफिकीर. तुमच्या प्रामाणिक भावनांविषयी अजिबात दुमत नाही.. फक्त वेबसाइट किंवा फोरम चुकला असे वाटते. ठिक आहे.. तुमचे विचार तुम्ही कुठेही मांडु शकता.. आफ्टर ऑल मायबोलि इज अ‍ॅन ओपन फोरम.. आणि परत एकदा.. तुमच्या भावना समजु शकतो.

Pages