करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
द्वारकानाथ संझगिरींचा सामना
द्वारकानाथ संझगिरींचा सामना मधला लेख कै च्या कै 'आवरा' कॅटेगरीतला आहे , भावनाविवश झाल्याने का ही ही लिहिलय हहपुवा
आयर्लंडनी पार कचरा केला राव
आयर्लंडनी पार कचरा केला राव विंडीजचा... ह्या वर्ल्डकप मधली पहिली मॅच जिच्यात पहिल्यांदा बॅटींग करणार्या टीमनी ३०० प्लस करुन सुद्धा ती हारली..
ब्रावो आयर्लंड! वे टू गो! १०
ब्रावो आयर्लंड! वे टू गो! १० मार्चला भेटू!
स्टर्लिंगने ज्या फिअरलेसनेसने
स्टर्लिंगने ज्या फिअरलेसनेसने (मराठी ?) विंडीजची धुलाई केली ते अप्रतिम
निर्भयपणे*
निर्भयपणे*
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/icc-cricket-world-cup-2015/content/story/832... अप्रतिम लेख!
संझगिरींचा अनेकदा अन्नू कपूर होतो, फार वाहवत जातात!
आजचा आयर्लंडचा विजय किंवा
आजचा आयर्लंडचा विजय किंवा विंडीजचा पराभव काही धक्का वगैरे नाही देऊन गेला.
गेल्या विश्वचषकातही ईंग्लंडला सव्वातीनशे चेस करत धुपवला होताच.
या कंडीशनमध्ये आयर्लंडने पाकिस्तानला हरवले तरी फारसा मोठा धक्का बसणार नाही, किंबहुना त्या सामन्याची उत्सुकता आहे.
सकाळी थोडीशी बॅटींग पाहिली त्यांची, प्रॉपर क्रिकेटींग शॉट मारतात. तरीही त्यांचे कच्चा लिंबू म्हणून मिरवणे हे समोरच्या संघाला जास्त फ्रस्ट्रेट करून जावे.
आयर्लंडला कसोटी दर्जा दिला आणि आपण म्हणजे टीम धोनी त्यांच्या देशात कसोटी खेळायला गेले तर कदाचित ते आपल्यालाही दणकवतील.
असो, पण अश्या निकालांमुळे मालिकेत रंगत येणार.
विंडीज-पाक सामनाही आता अचानक फार महत्वाचा झाला आहे.
झिम्बाब्वेचाही फॉर्म चांगला आहे, एखादा अनपेक्षित निकाल देत या ग्रूपमध्ये ते देखील रंगत भरू शकतात.
आपल्यासाठी आफ्रिकेचा सामना सुद्धा महत्वाचा आहे, जर ति जिंकलो तर आपण ग्रूपमध्ये टॉप करायचे चान्सेच वाढतील आणि श्रीलंका-बांग्लादेशसारखा तुलनेत कमजोर संघ क्वार्टरला मिळेल. अन्यथा ईंग्लंड-न्यूझीलंडशी दोन हात करावे लागतील.
पाकीस्तान बाहेर न जाता पुन्हा सेमी किंवा फायनला (कठीण आहे!) समोर आली तर पुन्हा मजा येईल. तसेच पुन्हा एकदा त्यांच्यावर विजय मिळवून आपण सेमीतून फायनलला जाऊ किंवा तीच फायनल असल्यास विश्चचषक पटकवू
ओ ऋन्मेष थांबा जरा कालच
ओ ऋन्मेष थांबा जरा कालच पहिली मॅच झाली आहे. . लगेच विश्वचषकाला मिठी मारायला पळु नका.
आगाऊ......लेख खरंच मस्त....
आगाऊ......लेख खरंच मस्त.... अगदी वाचनीय
ऋन्मेष..... ऑस्ट्रेलियाला
ऋन्मेष..... ऑस्ट्रेलियाला विसरलास काय?
सरळसरळ अनुल्लेख?
स्वरुप, आपण या ग्रूपमधून चौथे
स्वरुप,
आपण या ग्रूपमधून चौथे नाही येत असा विश्वास आहे..
त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि आपला क्वार्टरला मुकाबला होण्यासाठी आपण तिसरे आणि ऑस्ट्रेलिया दुसरी येणे गरजेचे.., यापैकी एकाने जरी म्हणजे आपण किंवा ऑस्ट्रेलियाने हे टाळत वरचा नंबर राखला तर क्वार्टरला आपली भेट नाही होत,, अर्थात असे घडण्याची शक्यता कमी आहे वगैरे दावा नाही करायचाय, पण बस्स नकोय मला ऑस्ट्रेलिया क्वार्टरला
कबीर, पहिलाच सामना झालाय
कबीर, पहिलाच सामना झालाय खरेय, पण गेमप्लान आतापासूनच बनवायची गरज आहे.. बाद फेरीत कोण कधी आणि कुठल्या ग्राऊंडवर भेटणे चांगले आहे हा अभ्यास करून कुठे किती ताकद लावायची हे ठरवणे योग्य !
अर्थात वरची पोस्ट मी अशीच विस्कळीत लिहिलीय, त्यात काही अभ्यास वगैरे नाही, कारण त्याचे काय मला पैसे नाही मिळणारेत, ना माझ्या अभ्यासाचा टिमला काही फायदाय..
असेच होईल का? Quarter-final
असेच होईल का?
Quarter-final 1 NZ v WI
Quarter-final 2 AUS v PAK
Quarter-final 3 SrL v SA
Quarter-final 4 ENG v IND
The winners of the quarter-finals will qualify for the semi-finals as follows:
Semi Final 1 NZ v SA
Semi Final 2 Aus v Ind
वरच्याला wishful thinking
वरच्याला wishful thinking म्हणतात सेनापती
अर्थात वरची पोस्ट मी अशीच विस्कळीत लिहिलीय, त्यात काही अभ्यास वगैरे नाही >> हि अशी स्वतःची secrets उघडपणे सांगू नकोस
http://crichd.in/live/live-cr
http://crichd.in/live/live-cricket-streaming
आपण म्हणजे टीम धोनी त्यांच्या
आपण म्हणजे टीम धोनी त्यांच्या देशात कसोटी खेळायला गेले >>> टीम कोहली आहे आता.
असामी
असामी
असामी, ते ओपेन सिक्रेट आहे
असामी, ते ओपेन सिक्रेट आहे

देवाने विविध प्रकारचे अंगभूत कौशल्य दिले आहे पण आयुष्य एकच,.. कशाकशाला न्याय देऊ आणि कश्याकशाचा अभ्यास करू.
तळटीप - वरील विधानातील देवाचा उल्लेख फक्त माझी विनम्रता अधोरेखित करतो, अन्यथा मी नास्तिक आहे!
असो, बाकी आजच्या सामन्यात स्कॉटलंडनेही आपली थोडीफार चुणूक दाखवली.
श्रीलंका भाऊ, सावधान!
काल वेस्ट इंडिज ची मॅच बघताना
काल वेस्ट इंडिज ची मॅच बघताना एक जाणवले.. वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सची बॉडी लेंग्वेज एकदम निर्विकार होती.. एकदम अलिप्त.. चमडी जाने या कुत्ता जाने याप्रमाणे यांच्या बोलिंगवर सिक्सर, फोर बसत असताना सुद्धा हे सगळे आपले ढिम्म! तोंडावर कसलाही वाइट वाटल्याचा किंवा पर्वा असल्याचा मागमुसही नाही.. बहुतेक ते सगळे त्यांच्या बोर्डवर नाखुष असल्यामुळे तसे करत असावेत पण इंटर्नॅशनल मॅच खेळताना त्यांनी इर्षेने खेळले पाहीजे असे मला वाटते.
अर्थात आयर्लंड मस्तच खेळले यात वादच नाही पण लहानपणी रिचर्ड्स , ग्रिनिज, लॉइड, कालिचरण्,रॉबर्ट्स, होल्डिंग, गार्नर वगैरे असे वेस्ट इंडियन प्लेयर्स बघीतले असल्यामुळे सध्याचे त्यांचे खेळाडु शिवाजी पार्कवर स्ट्रोल करायला आल्यासारखे काल मैदानावर वावरताना बघुन कसेसेच झाले.
आणी आदल्याच दिवशीच्या हाय ऑक्टेन भारत पाक सामन्याच्या व एडलेड ओव्हलच्या एलेक्ट्रिफायींग अॅट्मॉस्फिअर असलेल्या मॅच नंतर वेस्ट इंडिजची मरगळ अजुनच प्रकर्षाने जाणवली.
काही म्हणा .. गेल्या वेळी भारतात झालेल्या वर्ल्ड कप मॅचेस सगळ्या एकदम लाइव्हली वाटत होत्या.. त्याउलट यंदाच्या.. खासकरुन न्युझिलंड मधल्या मॅचेस बघताना वर्ल्ड कप ची मॅच बघत आहोत असे वाटतच नाही.
वेस्ट इंडीज खेळाडुंचे
वेस्ट इंडीज खेळाडुंचे त्यांच्या बोर्डाशी वाद चालु आहे. बहुदा त्याचा परिणाम दिसुन येत आहे. पोलार्ड ब्राव्हो सारखे मुख्य खेळाडु नाहीत वर नवख्या खेळाडुला कर्णधार बनवले.
मुकुंद, सहमत आयर्लंडकडून
मुकुंद, सहमत
आयर्लंडकडून हरतोय याचेही काही वैषम्य वाटत नव्हते,
मागे नाही का एकदा भारताचा क्रिकेट संघ राष्ट्रकुलला पाठवला होता,
तश्या मूडमध्येच वाटले.
गेलचे तर फुकट ओझे झालेय असे
गेलचे तर फुकट ओझे झालेय असे वाटते, त्याचा अॅटीट्यूड आपल्याच मस्तीत खेळल्यासारखा असतो, एखादा सामन्यात तो २०० देखील मारून जाईल, पण पुढचे चार सामने घाण करून जाईल, आणि मुख्य म्हणजे याचे आपल्याला काहीच पडले नाही अशी बेफिकीरी, अन मी तुमचा स्टार प्लेअर आहे असे वागणे, घात करणार आहे विंडीजचा.
कबीर.. मान्य आहे की बोर्डाशी
कबीर.. मान्य आहे की बोर्डाशी भांडण आहे पण आले आहेत ना वर्ल्ड कप खेळायला? मग खेळा ना जिद्दीने.. नुसता खेळल्याचा आव आणुन खेळत आहेत ही लोक.. आय पील एल मधे कोणीच घेउ नये यांच्यापैकी..
ऋन्मेष.. मी ती गेलची.. मिस फिल्ड केल्यानंतरची .. एक ऐवजी दोन रन दिल्या.. त्या नंतरची बेफिकीर रिअॅक्शन बघुन एवढा इरिटेट झालो होतो की विचारु नकोस.. काहीही खंत नाही .. अक्षरशः निगरगट्टासारखा वावरत होता तो मैदानात..ना खेद ना खंत! यु आर राइट अबाउट हिम!
वेस्टईंडिज एकेकाळी माझा जगात
वेस्टईंडिज एकेकाळी माझा जगात आवडता संघ होता, भारत सोडून कोणाशीही त्यांचा सामना असला की तेच जिंकावे असे वाटायचे, कारण खुन्नस ठेवणे, हलकटपणा करणे हे त्यांच्या कोणाच्या स्वभावात नव्हते. त्यांचे फॅन्स तर जगात भारी. ग्राऊंडवर हर्षवायू झाल्यासारखे कोलांट्या उड्या मारणे हे तेच करू शकतात....
पण हल्ली त्यामुळेच त्यांच्या या अॅटीट्यूडची जास्त चीड येते. कदाचित त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असणे हे देखील यामागे असू शकते.. वाईटही वाटते त्यांच्याबद्दल.
पाकिस्तान मॅच बघत असताना इथे
पाकिस्तान मॅच बघत असताना इथे आलो नाही पण त्या दिवशीचे तुमचे सगळ्यांचे लाइव्ह कॉमेंट्स आत्ता बघीतले.. धमाल..
वैद्यबुवा.. तुला फुकट मॅच दिसली? इ एस पि एन क्रिकेट २०१५ वर? आयला.. म्हणजे मी फुकटच ९९ डॉलर भरले की.. असो.. पण क्वालिटी एकदम जबरी आहे.. मजा येते बिग स्क्रिन टिव्ही वर लाइव्ह बघायला..
चला.. या शनिवारी साउथ आफ्रिकेच्या मॅच ला कोण कोण असणार आहे इथे लाइव्ह बघत असताना? हात वर करा बघु.. मजा येते इथे येउन कॉमेंट्स टाकायला व वाचायला..
डेल स्टाइन आजारी पडला आहे म्हणे...
शकीब अल हसनने तगडे पॉइंट्स
शकीब अल हसनने तगडे पॉइंट्स दिले मला आज
मुकुंद, अहो तो ट्रॅप होता मी
मुकुंद, अहो तो ट्रॅप होता
मी बावळटासारखा पेज रिफ्रेश केला आणि त्यानंतर ते बंद झालं.
काही पबलिकला दिसलं पण ते ही लोकं नंतर पिकचर फ्रीझ झालं असं म्हणत होते बहुतेक.
वैद्यबुवा.. आजची मॅच बघतय का
वैद्यबुवा..:)
आजची मॅच बघतय का कोण? इंग्लंडचा खुर्दा केला टिम साउदीने.. ७ -३१!
डेव्हिड लॉइड त्याच्या टीपिकल अॅक्सेंट मधे.. व्हॉट अ वूंडरफुल स्टुफ फ्रॉम टिम साउदी.. अॅब्स्युल्युट वुंडरफुल पिस ऑफ स्विंग बोलिंग.....
बॉयकॉट ची आठवण आली...(बाय द वे.. कोणी विक्रम साठ्येची क्रिकेट स्टँड अप कॉमेडी बघितली आहे का? टोनी ग्रेग, बॉयकॉट, सिद्धु, श्रिकांत, तेंडुलकर, अझहरुद्दिन या सगळ्यांची सॉलिड.. हुबेहुब नक्कल.. कोणाला लिंक माहीत असेल त्याची यु ट्युब वरची.. तर इथे टाकाल का प्लिज? 
जबरी... मॅकॉलम पेटला आहे..
जबरी... मॅकॉलम पेटला आहे.. बहुतेक १० ओव्हर मधेच न्युझिलंड १२१ चे टारगेट पार करेल अस दिसतय.. लंच च्या आधीच बहुतेक!.. ४ ओव्हर्स मधे ५७ फोर नो लॉस! सो एम्बॅरिसिंग फॉर इंग्लंड!
मॅक ये डा झालाय !
मॅक ये डा झालाय !
Pages